Priyal_my_fight_with_cancer

Priyal_my_fight_with_cancer Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Priyal_my_fight_with_cancer, Amravati.

Since 6 months i m fighting c cancer i just want to tell u all abt my journey c cancer, my mental, physical an emotional condition that i m facing yet..an want to encourage cancer patients..

आयुष्य....आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपण काही ना काही गमवत असतो. कधी वेळ, माणसं, कधी स्वतः मधला निरागसपणा....पण यातच खर...
29/05/2026

आयुष्य....

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपण काही ना काही गमवत असतो. कधी वेळ, माणसं, कधी स्वतः मधला निरागसपणा....
पण यातच खरी गंमत आहे.. कारण हरवलेल्या प्रत्येक गोष्टी सोबत आपण अधिक समजूतदार होत जातो...
मग अशी एक वेळ येते की जेथे 'सगळं मिळवणं', यापेक्षा
'मन शांत असणं' गरजेचं वाटू लागत....

28/05/2026

डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करताना पेशंट सोबत एक नातं जोडल्या जाते. अनेक म्हातारी पेशंट येऊन त्यांची व्यथा माझ्याकडे सांगतात. त्यांची खाण्याची होणारे हाल दोन टाईमच धड जेवणही त्यांना भेटत नाही .एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवलेली असते मुलांसाठी .पण आता दोन टाईमच जेवण आणि दुखलं चुकलं तर दवाखान्यात न्यायलाही कोणी नसतं.
अशा लोकांसाठी गावात मी देव ठरलेली आहे असं त्यांना वाटतं. काही दुखलं तर माझ्याकडे बिनधास्त यायचं पैशाचं टेन्शन घ्यायचं नाही, मी तुम्हाला काही पैसे मागत नाही, मला पैसे नकोत, असं मी त्यांना सांगून मोकळी होते. आणि ग्रामीण भागात प्रॅक्टिस करताना फी किती असते फक्त पन्नास रुपये माझी फी आहे. आणि त्यातही जेव्हा असे पेशंट येतात त्यांच्याकडून मी एक रुपया ही घेत नाही...
अशा पेशंट कडून मला नेहमी च खूप सगळा आशीर्वाद मिळतो. कधी कधी ते उपाशी असतात, काही खाल्लेले नसते त्यांना क्लिनिक मध्येच काही मागून खाऊ घालते म्हणून माझ्याकडे रडतात ही. माझ्या डोक्यावरून मायेचा हात फिरवत मला आशीर्वाद देतात.
बऱ्याच वेळा वृद्ध पेशंट जेव्हा त्यांच्या आयुष्याची शेवटची घटका मोजत असतात तेव्हा मी डॉक्टर म्हणून त्यांच्यासोबत असते आणि माझ्या डोळ्या देखत कधी कधी माझ्या हातात हात घेऊन ते प्राण सोडतात... तेव्हा माझ्यासाठी सर्वात मोठी हतबलता असते. आणि तेव्हा कळते मृत्यू हे आयुष्यातलं अंतिम सत्य आहे...
ती डोळ्या आड होऊन जाते. बघता बघता तेरव येत.. थाटामाटात, पंच पकवान केले जातात, गाव जेवण दिल्या जाते.
आणि मग मला आठवतं, तो माझ्याकडे येणारा आयुष्यात म्हातारपणाला कंटाळलेला, हतबल झालेला माझा पेशंट....
माझी आता कोणीच गोष्ट घेत नाही, मला कोणीच विचारत नाही, मला दोन टाईमच कोणी खाऊ घालत नाही, दुखलं सुकल तर दवाखान्यात नेत नाही, माझेच पैसे मला मिळत नाहीत असं रडून रडून पश्चाताप करणार म्हातारपण.. तरी आपले सगळे आहेत म्हणून निमुटपणे, सगळं सहन करणारे म्हातारपण....
म्हणून म्हणते तेराव्या करू नका पण जिवंतपणी त्यांचे पोट भरू द्या, त्यांना दुखावू नका. आज ते आहेत ,उद्या आपणही त्याच ठिकाणी असणार आहोत....
मग पितृदोष मातृदोष निवारण्यासाठी कुठल्याही पूजेची गरज पडणार नाही.

घटस्फोटानंतर माहेरी राहणारी स्त्री आणि सणवार......             बरेच दिवस झाले मुलगी ऐकत होती सगळ्यांकडून, आता अधिक महिन्...
27/05/2026

घटस्फोटानंतर माहेरी राहणारी स्त्री आणि सणवार......

बरेच दिवस झाले मुलगी ऐकत होती सगळ्यांकडून, आता अधिक महिन्यात सगळ्या मावशी येतील. आणि सगळेजण येणार म्हणून ती पण खूप खुश होती.
मग तिने मला एक प्रश्न केला, मम्मा अधिक महिन्यात काय असते गं? आजी म्हणत होती सगळेच मावशी येणार आहेत म्हणून....
मग मी तिला सांगितलं, बाळा अधिक महिन्यात मुली माहेरी येत असतात. मग त्यांना पाहुणचार केला जातो. नवीन कपडे घेतल्या जातात. आणि काही चांदीची,सोन्याची, तांब्याची, पितळची आपापल्या पद्धतीने दान केलं जातं...
आता सोन चांदी तर खूप महाग झालय.. आता तांब्या पितळावरच अधिक महिना आहे, असं मिश्किलपणे मी तिला बोलले... आणि अधिक महिन्यात जेवढ होईल तेवढं देवाचं नामस्मरण केलं जात..
झाला ना लगेच मग दुसरा प्रश्न तयार...
मम्मा मग तुला पण आजी आजोबा काहीतरी देतील? तू पण तर त्यांची मुलगीच आहेस ना....
त्यावर मी तिला म्हटले, आपण इथेच तर राहतो ग पिल्लू आजी आजोबांकडे. आपल्याला कशाला काही पाहिजे?
त्यावर तिला प्रचंड राग आला. असं कसं मम्मा तू पण तर त्यांची मुलगीच आहे ना.. तुला का बरं नाही...
मी तिला म्हटलं आपण इथेच राहतो बाळा. सगळा खर्च आजी-आजोबाच तर करतात आपला. वेगळं कशाला काय मागव लागत...
पण यानंतर मी विचार केला. जी स्त्री लग्नानंतर घटस्फोट होऊन आई-वडिलांकडे राहते तिला हक्काने काही मागाचा अधिकारच राहत नाही. सतत ती या ओझ्याखाली जगत असते की आपण आपल्या आई-वडिलांकडेच राहतो. तेच आपला खाण्या पिण्याचा खर्च उचलतात. मग सासरी असलेल्या मुलींसारखं दोन दिवस येऊन मला दिवाळीला हे पाहिजे, मला अधिक महिन्यात हे पाहिजे, मला एवढेच पैसे हवेत, हे हट्ट हा बालिशपणा एक मुलगी म्हणून आता राहिलाच नाही... घटस्फोटानंतर झालेल्या बदलांमध्ये हा एक बदल नक्कीच झालाय....
मी जेव्हा माहेरी राहायला आले तेव्हा मला माझ्या आई-वडिलांनी माझ्या घरच्यांनी एकच गोष्ट सांगितली होती की तुझाही तुझ्या भावा एवढाच अधिकार इथे आहे. त्यामुळे ही गोष्ट तू कधीच डोक्यात आणू नकोस की तू आमच्यासाठी ओझं आहेस म्हणून...
मी माझा व्यवसाय सुरू केला.मी माझ्या आणि माझ्या मुलीचे खर्च उचलायला स्वतःला सक्षम केलं. फार कमवत नाही पण मुलीचा आणि माझा खर्च भागेल एवढं कामापुरतं नक्कीच कमावते.जरी मी त्यांच्याकडे राहते, खाते पिते पण बाकीचे सर्व खर्च माझे आणि माझ्या मुलीचे मी करते...
त्यात एक दिवस मला हा ही प्रश्न पडला, मी एक उच्चशिक्षित स्त्री असल्यामुळे मी माझा आणि माझ्या मुलीचा खर्च उचलण्यास सक्षम आहे. जरी मी माहेरी राहत असली तरी. मी कमावते म्हणून माहेरी मला रिस्पेक्ट मिळतो. माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे.
पण मला असं जाणवलं, जर माझ्याकडे ही डिग्री नसती तर मी माहेरी घरात एक कोपऱ्यात पडून असते. अगदी छोट्या छोट्या खर्चासाठी मला आई-वडिलांकडे हात पसरवा लागला असता. माझी मत, माझे विचार कोणीही गृहीत धरले नसते. उलट त्यांचे निर्णय, त्यांची मत माझ्या वर लादल्या गेली असती.
आणि वडिलांनी शिकवलं आपल्या शिक्षणावर एवढा पैसा खर्च केला त्याचं चीज झाल्यासारखं सगळ्यांना वाटते. कारण आयुष्यात मुलींवर कुठली वेळ कशी आणि कधी येईल सांगता येत नाही. त्यामुळे त्या सक्षम असणे खूप महत्त्वाचे आहे. आज मी सक्षम आहे म्हणून माझे निर्णय माझ्या मुलीच्या बाबतीतले निर्णय, तीला कुठल्या शाळेत घालायचं, कुठले क्लासेस लावायचे हे मी ठरवू शकते. जर मी काहीच कमवत नसते तर हा अधिकार कदाचित माझ्याकडे नसता. ज्यांच्यावर मी अवलंबून आहे त्यांच्याकडे असता...
आई-वडिलांकडून न मागताही सगळच मिळत असतं...
दिवाळी, अधिक महिना हे माझ्यासाठी सन राहिले नाहीयेत. ह्या सगळ्या गोष्टींची उत्सुकता मला आता अजिबात नाही आहे. माझे कुठलेही हट्ट आई-वडिलांकडे आत्ता नाहीत. कारण माझ्या वाईट काळात मला वाचवण्यासाठी, माझ्या ट्रीटमेंट साठी लाखांनी पैसा त्यांनी उधळलाय. पैशांचा कुठलाही विचार न करणारे माझे आई-वडील माझ्या सोबत आहेत. आम्हाला दुसरा मुलगा असता तर त्याचा प्रॉपर्टी मध्ये हिस्सा असताच ना, असं म्हणून मला त्यांनी नेहमी समजावलं आहे. त्यांच्यामुळे मला आणि माझ्या मुलीला एक सिक्युअर आयुष्य मिळत आहे.
त्यामुळे आयुष्यात एकच गोष्ट करा ,सगळ्या मुलींच्या आई-वडिलांना मला एकच गोष्ट सांगायची आहे. आपल्या मुलींना शिकवा.त्यांना स्वतःच्या पायावर उभं करा आणि सक्षम करा. हीच काळाची गरज आहे..
मला आयुष्यभरासाठी माझ्या आई-वडिलांकडून मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे माझं शिक्षण...

26/05/2026

फॅशन साठी काही पण....
सध्या आमच्या विदर्भामध्ये एवढं ऊन आहे की सकाळी उठल्यापासूनच घामाच्या धारा लागतात. AC, कुलर काहीही काम करत नाही आहेत. दिवसभर घरात राहूनही ऊन लागतंय...
स्त्रियांमध्ये उन्हाळी लागणे हा प्रकार वाढलाय... पोट दुखी व उलट्या, डोकेदुखी, चक्कर येणे हे सर्रास सुरू आहे...
त्यात आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणं खूप महत्त्वाचा आहे.... त्यामुळे उन्हाळ्यात कुठले कपडे घालायचे काय प्यायचं, काय खायचं हे खूप महत्त्वाचं असतं.
उन्हाळ्यात कॉटनचे सैल कपडे सगळ्यांनी प्रिफर करावे. वॉटर इंटेक जास्त असला पाहिजे. पुदिना, काकडी तुमच्या जेवणात जास्त घ्या. जेवण हे चमचमीत नको...
मसाल्याचं,तळलेलं खाऊ नका...
साधा सिंपल जेवण आपलं असावं....
उगाच चांगल दिसण्याच्या नादात शरीराला त्रास देऊ नका. आणि तुम्ही त्रास करून घेऊ नका...
एवढे जाड कपडे घातल्याने घामामुळे अंगावर खाज, घामोळ्या, फंगल इन्फेक्शन होते...
कोणी काय घालावं हा ज्याचा त्याचा प्रश्न... पण वातावरणाचा भानही असावं..

26/05/2026

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी....
आई.... फक्त दोन अक्षरे आहेत पण या दोन अक्षरात अख्ख जग सामावलेला आहे....
नभा एवढे सामर्थ्य या शब्दात आहे....
खरंच सांगते आई झाल्यावर कळलं मला काय असते ही आई....
आज जे काही लिहिते, तुमच्यासोबत बोलतीये फक्त एक आई म्हणून.. आणि हे नवीन आयुष्य सुद्धा मला या आई मुळे मिळाले...
आयुष्यात जगण्याला जर काही अर्थ नसेल, काही दिशा नसेल तर व्यक्ती जगण्याची आस सोडतो. कॅन्सर आजारासोबत लढताना ही एकच आस माझ्याकडे होती, ती म्हणजे मी एक आई आहे आणि मला माझ्या मुलीसाठी जगायचं आहे...
माझ्या मुलीसाठी मी आजाराशी लढली.मी लोकांसोबतही लढली. मला फक्त काही नको होतं मला फक्त ती हवी होती...
याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या.माझं जर काही बरं वाईट झालं तर नवरा आणि सासू-सासरे मुलीचे हाल करतील... आणि मी जर वाचली तर माझी जगण्याची आस फक्त माझी मुलगी आहे..... तिच्यासाठी परत खंबीर होऊन लढेल...
कॅन्सर ची ट्रीटमेंट घेतल्यानंतर आणि घटस्फोटानंतर 'हिरकणी' हा चित्रपट मी माझ्या मुलीला दाखवला....
चित्रपट बघताना डोळ्यातून अश्रू येत होते... आणि माझा जीवन प्रवास माझ्या डोळ्या समोरून जात होता...
आणि तेव्हा मला कळले प्रत्येक आईच वेळ पडली की हिरकणी होते आपल्या मुलांसाठी.....😍

25/05/2026

खाताना मला guilt नको असतं..
अरे हे तर मला चालत नाही, माझ्या आरोग्याला हानिकारक आहे, पण खायची तर इच्छा होत आहे. किती स्वतः आवरायचे प्रत्येक गोष्ट खाण्यापासून..... जणू काय मी 60 70 वर्षाची शुगर डायबेटिक पेशंट आहे... असे प्रश्न मला स्वतःलाच पडतात आणि राग येतो मग स्वतःचा च....
खाण्याची प्रचंड आवड असणाऱ्या व्यक्तीला एकदम सगळं बंद करायची वेळ येते तेव्हा तो स्वतःला आवरतो. पण वर्षानुवर्ष सगळं तसंच सुरू आहे... घरातील इतर मंडळी माझ्यासमोर सगळं खातायत 😂 माझी पण इच्छा होणार नाही खाण्याची...
किती आवरू या जिभेला.....
पण मग म्हणूनच तर मी खेड्यात राहते. खेड्यात सगळ्या गोष्टी प्युअर फॉर्ममध्ये मिळून जातात. शेजारच्या काकू आपल्या अंगणातील टोमॅटो मिरच्या पालक मेथी वांगी प्रत्येक जण असं मला सगळं आणून देतो त्याच्याकडे जे आहे ते 😂
अगदी पपई पेरू ,आमच्याकडे आता उन्हाळ्यात टरबूज खरबूज काकड्या हे सगळं शेतात असतं... त
सगळं ऑरगॅनिक मिळवण्यासाठी माझी नेहमी धडपड असते. आणि जेव्हा असं मला बाहेरून मिळतं तेव्हा मी कुठलाही विचार न करता ते मागवते.
यावर्षी मला ऑरगॅनिक मँगो सुद्धा मिळाले आणि तेही खूप छान क्वालिटीचे.... त्यामुळे सीजनल फ्रूट खाण्याचं भाग्य लाभलं... आणि जिभेचे टोचले ही पुरवल्या गेले. आणि खाताना काही guilt ही नव्हत....
Happy Summer.....😄

23/05/2026

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा..
ऐरावत रत्न थोर, त्याची अंकुशाचा मार...
ज्याचे अंगी मोठेपण ,तया यातना कठीण..
तुका म्हणे जाण, व्हावे लहानाहुनी लहान....

जीवनातला तिसर ऑपरेशन.....माझ्या लाडक्या लहान भावाचा साखरपुडा होता. आठ दिवस अगदी पायाला पाय नव्हता. भावाच्या एंगेजमेंट ची...
22/05/2026

जीवनातला तिसर ऑपरेशन.....
माझ्या लाडक्या लहान भावाचा साखरपुडा होता. आठ दिवस अगदी पायाला पाय नव्हता. भावाच्या एंगेजमेंट ची सगळी तयारी मी केली. आठ दिवस अक्षरशः अकोला शेगाव वाऱ्या सुरू होत्या. असंख्य स्वप्न मी भावाच्या लग्नासाठी रंगवली होती. कुटुंबातील सर्वात शेवटचं लग्न म्हणून सगळ्यांनाच उत्सुकता होती. अनेक reels आणि प्लॅनिंग डोक्यात शिजत होते. आनंदात भावाचं साखरपुडाही पार पडला.
रात्री घरी आले. मला जेवायचं नाही म्हणून मम्मीला सांगून बेडवर पडले. आणि अचानक थोडं पोटात दुखायला लागलं. आज मसाल्याची भाजी खाल्ली आणि ऊनही होतं असा विचार करून मी ,antacide घेतली आणि परत झोपले. थोड दुखणार पोट अगदी मला दहा मिनिटात तडपवायला लागलं....
घरी आज सगळेच दमलेले आहेत नको कुणाला सांगू, उगाच सगळे टेन्शनमध्ये येतात, परत पेन किलर आणि अँटॅसिड घेऊन बघते मनातच विचार केला.
तेवढ्यात एक उलटी झाली. सगळ्यांना वाटलं मला आणि ऍसिडिटी वाढली. पण आता त्रास आणखीनच वाढायला लागला. मी पोटन झोपू देत होतं न चालू देत होतं. माझी लहान बहीण म्हटली दीदी आत्ताच दवाखान्यात जा बाई शेगावला. का अंगावर काढतेस?
पण तिच्या या बोलण्याचा मला राग आला. अग तुला कळते की नाही काही, आज सगळे दमलेले आहेत, पडेल मला आराम, मी तिच्यावरच ओरडले. आता मोठ्या बहिणी पुढे काय बोलणार ना ती पण? 😄
मोठी आई मात्र माझ्याजवळ बसून होती. ती माझा त्रास बघत होती. आणि तीही जाणं बाई दवाखान्यात.. म्हणून जीव तोडत होती. पण हट्टी मी.
असं करत करत एक तास गेला. पण मग माझीच कॅपॅसिटी संपली. मग मीच परमिशन दिली, पप्पा नाही कमी होते चला आता शेगावला. गाडी काढली हॉस्पिटल ला ॲडमिट झाले. खूप सगळा औषधांचा भडीमार झाला. रात्री दीड वाजता कुठे मला थोडा आराम पडला. मी घरी घेऊन आले सगळ्यांना.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, उठल्याबरोबर पाणी पिले लगेच उलटी झाली. सिलसिला सुरू झाला उलट्यांचा.
तरी क्लिनिकला आले सकाळी. पेशंटला आयव्ही लावायला गेले तर मलाच उलटी सारखं झालं. पेशंटला म्हटलं थांबा थोडं मी उलटी करून येते बाहेरून..
पेशंटला आयवी तर लावली व लगेच पप्पांना फोन केला, पप्पा मला उलट्या कमी झाल्या नाही. मला आय वी इंजेक्टेबल द्या. आणि मग काय एका बेडवर माझा पेशंट आणि दुसऱ्या बेडवर मी 😄
तो दिवस कसा बसा गेला. तिसऱ्या दिवशी दुपारी मुलीचा प्रोजेक्ट करता करता माझा पोट दुखायला लागल. पण यावेळेस मात्र माझ्या अंगाला काटा आला होता. आता ते दुखणं सहन करायची कॅपॅसिटी माझ्यात राहिली नव्हती. आणि काय विचारता संध्याकाळपर्यंत परत पोटाने परत दगा दिला. परत गाडी काढली परत शेगावला ॲडमिट झाले. पण या वेळेस पप्पा म्हटले घरी परत याची घाई करू नकोस. सगळे इन्वेस्टीगेशन करून घेऊयात. रात्रभर ट्रीटमेंट केली पण मला काहीच आराम नव्हता. सकाळी सोनोग्राफी केली आणि त्यात आलं ना..15 mm चा golbladdler stone🫢.
मग माझे धाबे दणाणले. कधीही ऍसिडिटीचा त्रास नाही. याच्या आधी कधीही पोट दुखण्याचा किंवा उलट्यांचा एपिसोड येऊन गेला नाही. कॅन्सर ट्रीटमेंट पासून माझं सात्विक जेवण असते. मसाल्याचा तिखट मी खात नाही. हा कधी तयार झाला एवढा मोठा स्टोन? या आधी पण आपल्या USG झाल्यात. कधीच त्यात आलं नाही,असंख्य प्रश्न मला पडले.
डॉक्टर म्हटले इमर्जन्सी आजच अपडेट करावे लागेल. आपण हे पुढे ढकलू शकत नाही. मग मात्र पोटात दुसरी कळ आली. सर पंधरा दिवसांनी भावाचं लग्न आहे, थांबूयात ना थोडं पंधरा दिवसांनी करू ना ऑपरेशन. सर हसले, लग्नात काहीतरी गोंधळ घालण्यापेक्षा ऑपरेशन करून मोकळी हो. भावाचं लग्न तरी बसून बघू शकशील.
मग काय निघाले आमची गाडी अकोल्याला. होळी होती त्या दिवशी. घरी कोणालाच काहीच कल्पना नव्हती. आधी घरी गेलो. सगळ्यांना वाटलं मला डिस्चार्ज झाला मी बरी होऊन आली. पण मग लगेच पप्पांनी बॅग भरायला काढली. मम्मी चावरी बावरी होऊन बघायला लागली. तिला वाटलं हे काय करतात आल्या आल्या धावपळ. ते विचारायला लागली. पण पप्पाची आणि माझी हिम्मतच होईना तिला हे सांगायचं की आम्ही ऑपरेशनला चाललो.
कसंतरी हिंमत करून सगळ्यांना घरी सांगितलं. झाला ना हो माहोल चेंज...
अर्ध्या तासात सगळी पॅकिंग केली. सगळ्यांचा रडका चेहरा एकदा बघितलं. मुलीला प्रॉमिस केलं होतं की तुझ्या सोबत मी रंगपंचमी खेळेल म्हणून, तिच्या त्या उतरलेल्या चेहऱ्याकडे एकदा बघितलं, तिला जवळ घेऊन पप्पी घेतली आणि अकोल्याला निघालो.
डॉक्टरांना भेटले आणि रात्री नऊ वाजता ऑपरेशन करायचे ठरले. पोटात तीन चार दिवस झाले काहीच नव्हतं.
त्याआधी माझी पॅथॉलॉजिस्ट मैत्रिणीने टेक्निशियन पाठवून माझे सगळे प्रि ऑप टेस्ट करून घेतल्या. बहिणी भाऊ जावई सगळे आलेले होते आणि रात्री नऊ वाजता मी ओटीत गेले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेच मला जाग आली. असंख्य वेदना होत्या. पोटात द्रेन टाकलेला होता. कॅथेटर होत आणि माझ्या डोळ्यात पाणी होतं...
आपण बेडवर पडलोय भावाचं लग्न दहा दिवसांवर राहिले. अजून काहीच तयारी नाही. कुठलाच प्लॅनिंग नाही. पत्रिका ही छापल्या गेलेल्या नाहीत. मुलीला यावर्षी रंगपंचमीला पिचकारी आणि कलर सुद्धा आपण आणून दिले नाहीत ह्या सगळ्यांचे दुःख मला होत.
पण या दुःखातही साथ देणारी माझी माणसं माझ्यासोबत होती. जिवाभावाची मैत्रीण डॉ. स्नेहल राऊळ, डॉ. पराग डोईफोडे, डॉ. सागर इधोळ सगळे वेळात वेळ काढून माझ्यासाठी धावून आले.
डॉ. अभिजीत भागवत सरांकडे माझ ऑपरेशन झालं. आणि आणि अनुभव खूप चांगला होता. डॉक्टर आणि माणूस म्हणून ते खरच खूप चांगले आहेत. माझी मैत्रीण डॉक्टर स्नेहल आणि सागर राऊळ यांनी माझी संपूर्ण स्टोरी सरांना आधीच सांगितलेली होती. त्यामुळे सर मला म्हटले मॅडम, मला तुमच्याबद्दल सगळं माहिती कळाली. सकारात्मक रहा.
Golbladdler stone, kidney stone हे इमर्जन्सी कोणालाही येऊ शकतात. त्याच्यामुळे तुमच्या सोबतच का असं बोलू नका...
चार तारखेला घरी आले. खर तर कोणाची मानसिकता लग्नाची तयारी करण्याची नव्हती. लग्न पोस्टपोन करावे लागतात की काय असं सगळ्यांना वाटायला लागलं. कारण तयारी शून्य. कोणाच डोकं चालत नव्हतं.
पण मग मी घरी आले आणि थोड आशावादी सगळे झाले. महाराजांना बोलावून सगळे मुहूर्त निघाले. बुकिंग सुरू झाले. बहिणीं, वहिनी आणि आत्या यांनी कामे वाटून घेतली. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. पलंगावरून खाली उतरू नकोस. सत्त ताकीद मिळायला लागल्यात.
पण आई म्हणून मला पलंगावर बसून कसं जमेल.
त्यात माझ्या आईची तब्येत सुद्धा बिघडली. मुलीची सकाळची शाळा सुरू होती. पोटाला हात लावून सकाळी मुलीची तयारी तिचा टिफिन मी बनवायला सुरुवात केली. सगळ्यांचा जीव तुटत होता आणि माझा सगळ्यांसाठी...
कारण वेळ आराम करायची नव्हतीच...
सगळे ओरडत होते आणि मग मी म्हणायची लग्न झालं की आरामच करायचं आहे.
मला काम करताना बघून माझ्या घरचे सगळे म्हणत होते हिला देवाने एक ईश्वरी देणगी दिली आहे. एवढा मोठा ऑपरेशन झाल्यानंतर दोन महिने एखाद्या बाईने पलंगावरून पाय खाली घेतला नसता. आणि ही पोरगी ओल्या टाक्यांनी सगळी काम करती आहे.
12 तारखेला टाके काढायला जायचं होतं. 16 तारखेला भावाचं लग्न होतं. माझ्या पोरीला मी ड्रेसही घेतला नव्हता. टाके काढायला अकोल्याला जाताना तिला सोबत घेऊन गेले. घरच्यांना म्हटलं कोणीही माझ्यासोबत येऊ नका मी माझे सगळे काम करून येते. त्याच दिवशी घरी गोंधळ सुद्धा होता.
ड्रायव्हर मी आणि माझी मुलगी आणि अकोल्याला गेलो. टाके काढले आणि सरळ मार्केटमध्ये गेले. स्वतःसाठी काही नको पण माझ्या मुलीसाठी एकुलता एक मामाच्या लग्नात मुलीला ड्रेस तर हवाच. आपली मुलगी एकटीच तशी राहील या विचाराने उन्हात तिला घेऊन मी मार्केटमध्ये फिरले. तिला दोन ड्रेस घेतले,तिची आवडती चप्पल घेतली आणि संध्याकाळी सात वाजता मी घरी आले. घरी आले तर काय बघते गोंधळाची पूजा मांडली होती. हात पाय धुतले आणि फक्त पंधरा मिनिटे बेडवर पळू द्या म्हटलं मला.
पंधरा मिनिटांनी उठले मुलीला छान पातळ घालून त्याची तयारी करून दिली आणि मी ही तयारी केली.
सगळे माझ्याकडे बघतच राहिले. कुठून येते तिच्यामध्ये एवढी एनर्जी 😅.
खरं सांगायचं तर आयुष्यात अडचणी दुःख हे सांगून येत नाही तो आयुष्याचा एक भाग असतो पण ते दुःख पेलवण्याची ताकद तुम्हाला देव देतो. आणि मला काही जास्तच दिलेली आहे...😂
भावाचं लग्न फुल एन्जॉय केलं. खूप नाचले. अगदी घरचे आणि फोटोग्राफर दादा मला हात धरून खाली बसवत होते. त्यांना भीती वाटत होती तिला लागेल, त्रास होईल.
मी मात्र माझ्याच धुंदीत होती. भावाचं लग्न एकदाच होणार आहे, हे मोमेंट्स परत मिळणार नाहीत. लग्न झाल्यावर आरामच आहे मला असे म्हणत उड्या मारायचं सोडलं नाही....
लग्न इतका सक्सेसफुल झालं. कि लोक अवाक झालेत. इतक्या कमी वेळात, एवढा छान सुनियोजित कार्यक्रम झाला त्यावर विश्वासच बसेना. पण खरं सांगू ज्या कुटुंबात एकी असते प्रेम असते त्या कुटुंबातील लोक सगळे मिळून सगळ्या आव्हानांना पार करतात.....that's family love😘
थोडक्यात काय काळजीही देवालाच असते...
तो संकट देतो पण त्या संकटांवर मात करण्याची ताकद ही दुपटीने देतो...

22/05/2026

असंख्य वादळ झेलून जी स्त्री स्वतःच्या आयुष्याची सुरुवात सुरुवातीपासून करते, ती आई म्हणून भयानक असते.....
आपल्या लेकरासाठी दुःख उराशी ठेवून परत लढायला लागते आणि जगायला शिकते....

21/05/2026

आई वडील म्हणून दुर्दैव.... आणि हे सामाजिक दुर्दैव...

18/05/2026

काय दिवे लावतो तुमचा वंशाचा दिवा.....
ज्या देवाकडे तुम्ही वंशाचा दिवा मागता, त्यासाठी नवस बोलता तोच वंशाचा दिवा एक दिवस तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवून देतो..... का हा भेदभाव?

Address

Amravati

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Priyal_my_fight_with_cancer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share