24/05/2026
10/05/2026
आर्वी :-जागतिक रेड क्रॉस दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा आर्वीच्या वतीने रक्तदान शिबिर माहेश्वरी भवन आर्वी येथे आयोजित केले होते. या शिबिराला तप्त उन्हामध्ये देखील आर्वीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल 97 रक्तदात्यांनी रक्तदान केले . या तप्त उन्हामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद रक्तदानाला मिळणं ही सकारात्मक बाब असल्याची प्रतिक्रिया रक्त संकलित करण्यासाठी आलेल्या चमूने व्यक्त केली. यावेळी डॉ.हेडगेवार रक्त केंद्र नागपूर, सामान्य रुग्णालय वर्धा रक्तपेढ्यांनी रक्त संकलित करण्याचं काम केलं. यामध्ये प्रामुख्याने इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा आर्वीचे पदसिद्ध अध्यक्ष आर्वीचे उपविभागीय अधिकारी श्री विश्वासजी शिरसाट यांनी देखील रक्तदान केलं. उदय बाजपेयी 45 सुशील लाठी वाला 40, निलेश कडू 30, डॉ विनय देशपांडे 25 वेळा रक्तदान केले. सुधीर गुल्हाने , नितीन टावरी रवी शहा, रविंद्र साखरे या
50 पेक्षा अधिक वेळा रक्त दान करणाऱ्या रक्त दात्याचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला
सन्मान करतेवेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा आर्वीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अरुणजी पावडे, उपाध्यक्ष राजाभाऊ तेलरांधे, सचिव अभिलाष धरमठोक, कोषाध्यक्ष रवी शहा, नंदकिशोर दिक्षित,नवलकिशोर अग्रवाल, अनिल भट्ट, प्रा रमेश जवंजाळ, , एडवोकेट विनोद देशपांडे, देवकिरण भाटी , डॉ प्रकाश धान्दे आदि रेड क्रॉस सदस्य उपस्थित होते.
मदर्स डे चे औचित्य साधून रेडक्रॉस सोसायटी शाखा आर्वीच्या महिला आघाडी च्या डॉ प्रतिभा पावडे, एडवोकेट अरुणा देशपांडे, ज्योतीताई भट्ट यांनी
रक्तदान करणाऱ्या महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
आमदार सुमितजी वानखेडे, आमदार श्री दादारावजी केचे, उपविभागीय अधिकारी श्री विश्वाजी शिरसाठ,उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखरजी ढोले, नगरपालिकेचे उपाध्यक्ष गौरव जाजू, नगरसेवक शुभांगी गाठे, प्रमोद गाठे, लवेश गलोले , सुनिल बाजपेयी,सिडेट कंपनी तळेगाव चे ऑपरेशन डायरेक्टर कृष्णाजी, व्यवस्थापक सोमेश्वर साठवणे, माजी नगराध्यक्ष प्रा प्रशांत सव्वालाखे,माजी नगरसवेक प्रकाश गुल्हाने , राहुल गोडबोले, मुख्याध्यापक विश्वेश्वर पायले, पत्रकार सूर्यप्रकाश भट्टड, दशरथ जाधव, राजेश सोळकी, अविनाश टाके, अरुण कहारे,सुरेंद्र गोठाणे,अन्सार भाई,नरेंद्र निंभोरकर,विजय वाघमारे,आदि मान्यवरांनी भेट दिली
जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा येथील डॉ. प्रकृती, डॉ. चैतन्य, अंकुश कांचनपुरे, वैशाली जगताप, प्रवीण गावंडे.डॉ हेडगेवार रक्त संकलन केंद्र, नागपूर येथील अनिल परमाळे,उमेश ओंकार, अभिजीत अपराजित, कल्पना काळे, रूपाली रोकडे,मीनाक्षी राऊत, प्रणाली सोमकुवर इत्यादीनी रक्त संकलित करण्यासाठी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ रवींद्र सोनटक्के, राजेंद्र साखरे, डॉ सतीश ठाकरे प्रा डॉ अविनाश कदम,अरुण ढोक, प्रा अभय दर्भे, सुशीलसिंह ठाकुर प्रा नितीन बोडखे ,प्रमोद पाटणी, किशोर चोरडिया, सुरेश कान्हे , डॉ प्रमोद जाणे,प्रफुल ठाकरे,प्रवीण देशमुख,राजाभाऊ गिरधर, सुभाष वऱ्हेकर, सुरेश चांडक, देवीकिरण भाटी, प्रा दर्शन चांभारे ,डॉ उमेश गुल्हाने,डॉ. देवेंद्र खंडेलवाल डॉ. वैभव अग्रवाल,डॉ भूषण अग्रवाल, सुशील लाठीवाला, प्रवीण शिरपूरकर, जाकीर हुसेन मोहन चांडक,वीरेंद्र लाठी वाला, अनिश चोरडिया, विजय चोरडिया,प्रज्वल कसर, संदीप बुधवाणी,हरदेव साठे आदि इंडियन रेड क्रॉस सोसायटी शाखा आर्वीच्या सदस्यांनी शिबिर यशस्वी करण्याकरता परिश्रम घेतले.