Maharashtra Rajya Aarogya Karmachari Mahasang

Maharashtra Rajya Aarogya Karmachari Mahasang महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंग
(Health Department)

आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली लावणे

आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर भारत सरकारचे आयुष मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण रा...
11/05/2026

आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर भारत सरकारचे आयुष मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा. श्री प्रतापराव जाधव साहेब यांना दिल्ली प्रवासासाठी अधिकृतरित्या कार्यालयामार्फत श्री विजय मोहरकर राज्याध्यक्ष व श्री मिलिंद गायकवाड यांनी निरोप दिला. 💐💐💐💐
Vijay Moharkar

आज रोजी छत्रपती संभाजीनगर येथे थॅलेसेमिया सप्ताह समाप्त समारोप कार्यक्रमानिमित्त मा.ना.  मेघनादिदी बोर्डीकर आरोग्य राज्य...
08/05/2026

आज रोजी छत्रपती संभाजीनगर येथे थॅलेसेमिया सप्ताह समाप्त समारोप कार्यक्रमानिमित्त मा.ना. मेघनादिदी बोर्डीकर आरोग्य राज्यमंत्री आले असता आरोग्य कर्मचारी महासंघाच्या वतीने श्री. विजय मोहरकर राज्याध्यक्ष यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्न बाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले खालील प्रमाणे मुद्दे.
1. 16/2/ 24 शासन निर्णय तात्काळ रद्द करावा हि विनंती.
2. विनंती बदली करत असताना आदिवासी क्षेत्र व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना तीन वर्ष झाले असल्यास त्यांना प्रथम प्राधान्य क्रमात विनंती बदली करण्यात यावे.
3. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात नव्याने स्थापन झालेल्या BPHU (Block Public Health Unit) येथे कीटक समहारक किंवा प्रशिक्षित आरोग्य सेवक भरण्यात यावे.
4. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य परीक्षक यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या या राज्यस्तरावर करण्यात यावे जेणेकरून त्यांची जेष्ठता डावली जाणार नाही.
5. प्रशासकीय बदली करत असताना सहा वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात यावे. 🙏🙏

Vijay Moharkar

मा.भाजप वरिष्ठ नेतृत्व,भारतीय जनता पार्टीविषय : मा. संजय केणेकर यांना विधानपरिषदेवर पुन्हा संधी देण्याबाबत मनापासून विनं...
23/04/2026

मा.
भाजप वरिष्ठ नेतृत्व,
भारतीय जनता पार्टी

विषय : मा. संजय केणेकर यांना विधानपरिषदेवर पुन्हा संधी देण्याबाबत मनापासून विनंती

महोदय,

काही प्रवास हे फक्त राजकारणापुरते मर्यादित नसतात… ते प्रेरणेचे, जिद्दीचे आणि निष्ठेचे जिवंत उदाहरण असतात. छत्रपती संभाजीनगरच्या मातीतून उभा राहिलेला मा. संजय केणेकर यांचा प्रवास हाच त्याचा खरा पुरावा आहे.

गुलमंडीतील साधा नारळ विक्रेता म्हणून सुरुवात… हातात मोठी साधनसंपत्ती नव्हती, पण मनात प्रचंड जिद्द आणि पक्षनिष्ठा होती. त्या जिद्दीच्या बळावर त्यांनी एक एक पायरी चढत आजवरचा राजकीय प्रवास घडवला. 1988 पासून विद्यार्थी संघटना (ABVP) मधून सुरू झालेला त्यांचा प्रवास, भारतीय जनता पक्षात तब्बल 35 वर्षांहून अधिक काळ सातत्याने काम करत वॉर्ड अध्यक्ष, शहराध्यक्ष, तसेच प्रदेश सरचिटणीस अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत.

अवघ्या 23 व्या वर्षी उपमहापौर पद भूषवणारे हे नेतृत्व, तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत 15 वर्षे नगरसेवक म्हणून काम करत त्यांनी जनतेच्या प्रश्नांशी घट्ट नाळ जोडून ठेवली. ही पदे त्यांनी केवळ भूषवली नाहीत, तर प्रत्येक पदावर कामगिरीची वेगळी छाप उमटवली.

आजच्या राजकारणात “नेतृत्व” सहज मिळतं, पण “कार्यकर्तेपण” जपणं कठीण असतं आणि संजय केणेकर हे नाव म्हणजे त्या कार्यकर्तेपणाची खरी ओळख आहे. गोरगरीब, कामगार, सर्वसामान्य नागरिक यांच्या अडचणी त्यांनी कधीही दूरून पाहिल्या नाहीत; त्या आपल्या जबाबदारीप्रमाणे स्वीकारल्या. पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून भव्य मोर्चे काढणे, आंदोलने उभी करणे, आणि प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढणे, हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य राहिले आहे.

जिथे कार्यकर्त्याला अडचण… जिथे नागरिक त्रस्त… किंवा जिथे हिंदुत्वाला धक्का; तिथे सर्वात आधी पोहोचणारे नाव म्हणजे मा. संजय केणेकर. हिंदुत्व हा त्यांच्यासाठी केवळ विचार नाही, तर ती त्यांची ठाम भूमिका आणि जीवनशैली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कडवट, निडर आणि ठाम हिंदुत्व टिकवून ठेवणारे भाजपचे भक्कम नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

त्यांना 13 महिन्यांसाठी आमदार होण्याची संधी मिळाली तेव्हा तो फक्त त्यांचा वैयक्तिक सन्मान नव्हता; तो प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान होता. त्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी मनापासून अनुभवलं, “आपल्यातलाच एक जण आमदार झाला.” ही भावना निर्माण करणे हेच त्यांच्या कार्यकर्तेपणाचे आणि जनाधाराचे खरे यश आहे.

आज पक्षाला अशा नेतृत्वाची गरज आहे, जे पदासाठी नाही तर विचारासाठी जगतं, जे सत्तेसाठी नाही तर समाजासाठी लढतं, आणि जे नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाच्या सोबत उभं राहतं.

म्हणूनच, मा. संजय केणेकर यांना पुन्हा एकदा विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी, ही केवळ विनंती नाही; तर छत्रपती संभाजीनगरमधील असंख्य कार्यकर्ते, नागरिक आणि समर्थक यांच्या मनातील भावना आणि अपेक्षांचा प्रामाणिक आवाज आहे.

आपण या भावनेचा आदर करून योग्य निर्णय घ्याल, ही मनापासून अपेक्षा.

आपले विश्वासू,
सर्व सामान्य नागरिक, छत्रपती संभाजीनगर.

Sanjay Kenekar Vijay Moharkar

🙏भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, क्रांतीसुर्य ,प्रज्ञासूर्य, अर्थतज्ञ, कायदेतज्ञ, इतिहास रचयिता ,विश्वरत्न, भारतरत्न महामान...
14/04/2026

🙏भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, क्रांतीसुर्य ,प्रज्ञासूर्य, अर्थतज्ञ, कायदेतज्ञ, इतिहास रचयिता ,विश्वरत्न, भारतरत्न महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन....!!🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏.

Vijay Moharkar

10/04/2026
आज रोजी छत्रपती संभाजी नगर येथे `माझे गाव आरोग्य संपन्न गाव`कार्यशाळेचे उद्घाटन मा.ना.प्रकाश आबिटकर साहेब सार्वजनिक आरोग...
10/04/2026

आज रोजी छत्रपती संभाजी नगर येथे `माझे गाव आरोग्य संपन्न गाव`कार्यशाळेचे उद्घाटन मा.ना.प्रकाश आबिटकर साहेब सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्यअध्यक्ष श्री. विजय मोहरकर यांनी त्यांचे स्वागत केले व कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी बाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.
१) आरोग्य कर्मचारी यांचे नाव बदल करून ग्राम आरोग्य अधिकारी करण्यात यावे.
२) राज्यस्तरावरील आरोग्य पर्यवेक्षक पदाच्या पदोन्नती तात्काळ करण्यात यावे.
३) शासन निर्णय 16 /2 /24 अधिकार हस्तांतर निर्णय तात्काळ रद्द करावा.
४) शासन निर्णय 22/9/ 2019 हिवताप अधिकारी यांचे अधिकार हस्तांतर करण्याबाबत शासन निर्णय रद्द करावा.
५) कायम प्रवास भत्ता वाढ करून किमान ५००० रुपये करण्यात यावा.
६) सर्वसाधारण बदली समुपदेशन प्रक्रियेद्वारे शासन निर्णय 9/4/2017 प्रमाणे करण्यात यावे.
७) अंतर मंडळ बदली प्रस्ताव तात्काळ निकाली काढावे. यावेळी महासंघाचे राज्यउपाध्यक्ष श्री.काकासाहेब शेळके पाटील व जिल्हा उपाध्यक्ष श्री विजय जोजारे जिल्हा सरचिटणीस श्री. जावेद पटेल श्री. दत्तू मोरे पाटिल श्री. अर्जुन आगळे पाटील इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

Vijay Moharkar

मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान भवन येथे मा. ना. श्री. जयंत पाटील साहेब माजी जलसंपदा मंत्री व ...
26/03/2026

मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान भवन येथे मा. ना. श्री. जयंत पाटील साहेब माजी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष /वरिष्ठ नेते यांची सदिच्छा भेट.🙏🙏🙏

Vijay Moharkar

24/03/2026

विधान भवन📍

आज विधान परिषदेमध्ये सदस्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या भावना माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आणि अभिमानास्पद ठरल्या. बालपणातील प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय कार्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर भारतीय जनता पक्ष चा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जनतेसाठी सातत्याने काम करण्याची संधी मिळाली.

कामगार, वंचित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन, मोर्चे आणि लढ्यांच्या माध्यमातून नेहमीच अग्रभागी राहून काम केले. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे नगरसेवक म्हणून निवडून येत सलग तीन वेळा जवळपास १५ वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली, गटनेते आणि उपमहापौर म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या, तसेच छत्रपती संभाजीनगर म्हाडा सभापती म्हणून देखील कार्य करण्याची संधी मिळाली. भारतीय बहुजन कामगार संघटनेची स्थापना करून मराठवाड्यात तिचा प्रभावी विस्तार केला आणि संघटन तसेच आंदोलन कौशल्याने अनेकांच्या मनावर ठसा उमटवला.

मागील ३८ वर्षांच्या प्रवासाबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी “संजय केनेकर कधी नेते झाले नाहीत, त्यांनी आयुष्यभर कार्यकर्तेपण जपले” असे गौरवोद्गार काढले, हे माझ्यासाठी अत्यंत सन्मानाचे असून जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारे आहेत. भारतीय जनता पक्ष ने दिलेल्या संधीबद्दल मी मनःपूर्वक आभारी असून, पुढेही पक्षनिष्ठा जपत जनतेच्या सेवेसाठी सदैव कार्यरत राहण्याचा निर्धार आहे.

Sanjay Kenekar
Vijay Moharkar

महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाचे पुणे जिल्हा येथे बैठक संपन्न.दि.17/3/2026 रोजी पुणे जिल्हयातील आरोग्य सेवक,आर...
18/03/2026

महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाचे पुणे जिल्हा येथे बैठक संपन्न.

दि.17/3/2026 रोजी पुणे जिल्हयातील आरोग्य सेवक,आरोग्य सहाय्यक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचे 10,20,30 बाबतचे आलेले प्रस्ताव दि.6/3/2026 रोजी D.P.C घेऊन मंजूर करण्यात आले. असल्याचे मा.उपसंचालक कार्यालय,पुणे कडून सांगण्यात आले असून अद्याप कोणतेही प्रकरण अपूर्ण नाही दोन ते तीन दिवसात याबाबतचे आदेश पुणे कार्यालयाकडे देण्यात येईल असे कार्यालयातील अधिक्षकानी श्री साळवी साहेब यांनी सांगीतले तसेच तसेच आपल्या विभागातील आरोग्य सेवकांमधून आरोग्य निरीक्षक पदाच्या एकूण आठ पदोन्नती लवकरच करण्यात येणार आहे. तसेच D.MO.पाटील मॅडमची भेट घेऊन जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा केली असता त्या हजर झाल्यापासून कोणतेही प्रकरणे,अपूर्ण ठेवले नसून सर्व कर्मचारी वर्गाचे मागील राहीलेले वेतन, सेवापुस्तक पूर्ण करुन कोषागार/ऐ.जी कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठवली ती पूर्ण कर्मचारी वर्गाची असणारी रक्कम ही खात्यावर जमा केली असून राहीलेल्याची बीले कामकाज पूर्ण करुन वाटपही करण्यात येईल असे ही सांगण्यात आले. तसेच मा. सहाय्यक संचालक डॉ.सारणीकर सराची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करण्यात आली या वेळी माझे राज्यअध्यक्ष श्री.विजय मोहरकर, श्री राहुल टकले जिल्हाध्यक्ष श्री प्रशांत रिकामे, श्री विजय जोजारे श्री. संतोष कुलकणीॅ, तिकोने,पवार,गरुड हे संघटनेच्या वतीने उपस्थित होते.

Vijay Moharkar
Vijay Jojare

अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत विधान भवन मुंबई येथेकळमनुरीचे दबंग आमदार मा.श्री संतोष बांगर साहेब यांचीसदिच्छा भेट.Vijay ...
09/03/2026

अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत विधान भवन मुंबई येथे
कळमनुरीचे दबंग आमदार मा.श्री संतोष बांगर साहेब यांची
सदिच्छा भेट.

Vijay Moharkar

छत्रपती संभाजीनगर म.न.पा निवडणुकीत भा.ज.पा.ची एक हाती सत्ता मिळवून देणारे किंगमेकर मा. आमदार संजय केणेकर साहेब यांचे महा...
18/01/2026

छत्रपती संभाजीनगर म.न.पा निवडणुकीत भा.ज.पा.ची एक हाती सत्ता मिळवून देणारे किंगमेकर मा. आमदार संजय केणेकर साहेब यांचे महासंघाच्या वतीने अभिनंदन व स्वागत करण्यात आले.💐💐💐💐💐💐
Sanjay Kenekar
Vijay Moharkar

Address

Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Rajya Aarogya Karmachari Mahasang posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share