YOG VIDYA DHAM DHULE

YOG VIDYA DHAM DHULE Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from YOG VIDYA DHAM DHULE, Health & Wellness Website, शिवपार्वती कॉलनी देवपूर धुळे, Dhule.

30/03/2026

*योग विद्या धाम धुळे येथील योग वर्ग*
*दि. 1 एप्रिल 2026 पासून*
*बेसिक योग वर्ग:-*
1. सकाळी 06:00 ते 07:00:-
सौ. स्वाती राव मॅम, सौ. सुनिता पाटील मॅम,
2. सायंकाळी 06:00 ते 07:00:-
सौ. वैशाली किशोर पाटील मॅम,
*सराव योग वर्ग:-*
1. सकाळी 05:00 ते 06:00:-
डॉ.जितेंद्र भामरे सर, सौ.मनिषा पाटील मॅम, सौ. रत्ना सपकाळ
2. सकाळी 06:00 ते 07:00:-
कुमारी सेजल सोनवणे मॅम, इंजि. विजय जाधव सर,
3. सकाळी 07:00 ते 08:00:-
श्री. राजेश सोनवणे सर, श्री. प्रशांत जाधव सर,
4. सायंकाळी 06:00 ते 07:00:-
श्री. लक्ष्मण दहीहंडे सर, श्री. स्वप्निल पवार सर.

*ऑनलाईन योग वर्ग:-*
सकाळी 06:00 ते 07:15:-
डॉ. अविनाश धर्माधिकारी सर,
श्री. विजय पाटील सर,श्री. विश्वनाथ सोमवंशी सर,श्री. प्रकाश कुलकर्णी सर.

*योग वर्गाचे ठिकाण - 'योग भवन', योग विद्या धाम शिवपार्वती कॉलनी देवपूर धुळे* येथे होणार आहेत.

*गायत्री प्रज्ञा पीठ*
येथील योग वर्ग
*सकाळी 06:30 ते 07:30:-*
श्री नरेंद्र गांगुर्डे सर,
*कुमार नगर बहावलपुरी पंचायत भवन साक्री रोड* येथील योग वर्ग
*सकाळी 06:30 ते 07:30:-*
सौ. शोभा भगत मॅम.

कृपया आपण सर्वांनी हा मेसेज इतरांपर्यंत पाठवा.
धन्यवाद...

कार्याध्यक्ष
योग विद्या धाम धुळे 💐🙏

योग विद्या धाम धुळे संचलित शंकरराव स्वास्थ्य केंद्र देवपूर धुळे रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी सर्व योग शिक्षक व संचालक...
10/03/2026

योग विद्या धाम धुळे संचलित शंकरराव स्वास्थ्य केंद्र देवपूर धुळे
रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी सर्व योग शिक्षक व संचालक मंडळाची सहविचार सभा योग भवन येथे सायंकाळी पाच वाजता घेण्यात आली.
सभेची सुरुवात त्रिवार ओंकार व प्रार्थनेने झाली. सभेच्या सुरुवातीला निदेशक डॉ. जितेंद्र भामरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत नियमित चालणारे योग वर्ग कशाप्रकारे प्रभावी पणे घेता येतील याबाबत सूचना दिल्या.
सभेत योग कार्यासोबत मे महिन्यात होणाऱ्या निवासी वर्गाबाबत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे सदर वर्गाचे स्वरूप व त्याचा प्रचार प्रसार योग्य पद्धतीने होण्यासाठी नियोजन करण्यात आले. मे महिन्यात होणारा योग शिक्षक वर्गाची बातमी सर्व जिज्ञासू साधकांपर्यंत पोहोचेल. ज्यामुळे त्यांना आपल्या नियोजनामध्ये त्याप्रमाणे योग्य बदल करता यावा व निवासी योग शिक्षक वर्गात सहभागी होता यावे. म्हणून सदर वर्गाचं स्वरूप, कालावधी, नियोजन यावर सांगोपांग चर्चा करण्यात आली.
हा वर्ग दिनांक 1 मे ते 22 मे 2026 दरम्यान घेण्यात येणार असून त्यात योगशास्त्र, भगवद गीता, निसर्गोपचार, शरीरशास्त्र, आहारशास्त्र, ऋतुचर्या, अध्यापन शास्त्र, यौगिक शुद्धिक्रिया इत्यादी विषयांचा सखोल अभ्यास त्यासोबत विविध प्रात्यक्षिक व शुद्धिक्रियांचाही समावेश असेल.
अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष श्री यशवंत पाटील यांनी दिली.
त्याप्रमाणे योग्य तज्ञांना सदर विषयांचे व्याख्याने देऊन योग निवासी वर्ग यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. असे उपस्थित सर्व ज्येष्ठ शिक्षक व कार्यकारी संचालक मंडळांनी एकमताने ठरवून कामाची दिशा व गती यावर विचार विनिमय केला.
या सोबतच योग शिक्षकांनी मांडलेल्या विविध अडचणी व समस्या यावर चर्चा करण्यात आली. त्याला संस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर दादा बेंद्रे,
सचिव शोभा भगत तसेच अरुण महाले व ज्येष्ठ शिक्षकांच्या मदतीने त्यावर उपाय शोधण्यात आले.
धुळे शहरातील सर्व प्रमुख विभागांमध्ये सदर वर्गाबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी फलक लावण्यात येतील. सदर वर्गाबाबत एक प्रकारचे जनजागृती अभियान पुढील 50 दिवसांमध्ये होऊन जास्तीत जास्त व्यक्ती सहभागी करून घेण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला.

Address

शिवपार्वती कॉलनी देवपूर धुळे
Dhule
424005

Alerts

Be the first to know and let us send you an email when YOG VIDYA DHAM DHULE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share