Ayurvedic Lifestyle - a must target for all to achieve health

Ayurvedic Lifestyle - a must target for all to achieve health I am an Ayurvedic Doctor by profession since last 22 years

02/07/2026

Good morning to all!It's been a longtime since I posted anything.yesterday it was Doctor's day.I had written a article.So I will post it here today
चांगल्या वैद्याने आयुर्वेदीय चिकित्सा करताना- ग्रंथोक्त श्लोक पाठांतर महत्त्वाचे आहे, पण त्याहीपेक्षा श्लोकांचे,रोगलक्षणांचे आयुर्वेदीय निदान आणि चिकित्सा करताना,वेळेवर स्मरण होणे गरजेचे आहे.
आयुर्वेदीय ग्रंथात यासाठी सुत्र स्थानातील अध्यायांमधल्या, अध्यायात वर्णन केलेले श्लोक,अतिशय महत्वाचे आहेत!

पंचमहाभूत सिद्धांत, त्रिदोष सिद्धांत,षड्रस सिद्धांत, काल,ऋतू चक्र,आदान,विसर्ग काल,ऋतू वर्णन, ऋतू आणि दोष यांचा संबंध,ऋतू आणि रसांचा संबंध, रस आणि दोषांचा संबंध, दिवस आणि रात्र यांच्या मधील नैसर्गिक दोषाधिक्याच्या वेळा,भोजन आणि पचनावस्था आणि दोषांचा संबंध, प्रक्रुति सिद्धांत, अग्नी प्रकार, कोष्ठ प्रकार,
दोष,धातू,मल विज्ञान,(त्यांची उत्पत्ती, कर्म,उपधातू, मल,त्यांची क्षय,व्रुद्धि,दुष्टी लक्षणे, स्रोतस विज्ञान (मूलस्थान,दुष्टी हेतू, लक्षणे,चिकित्सा),तीन रोगमार्ग(कोष्ठ, मर्म,अस्थि,संधी,रसरक्त आदी धातू अर्थात शाखा)दोषांची कोष्ठ आणि शाखा गती संकल्पना आणि त्यांची लक्षणे,व तसे होण्याची कारणे/ हेतू,
आम दोष व्याख्या,त्याची कारणे,साम दोष,धातू,मल,लक्षणे, षट्क्रिया काल,आणि त्यांचे महत्त्व, संतर्पण आणि अपतर्पण,लंघन आणि ब्रुंहण विचार,
अष्टौ आहार विधीविशेषायतनानि,
सामान्य निदान पंचक(हेतू, पूर्वरुप,रुप,उपशय,संप्राप्ती),संशोधन आणि संशमन चिकित्सा प्रकार आणि त्यांचे महत्त्व, वमनादी पंचकर्मसाठी रोग्यांची अर्हता/अनार्हता,स्नेहन आणि स्वेदन करण्याची आवश्यकता आणि न करण्याचा काळ/अवस्था, पंचकर्म केल्यानंतर संसर्जन क्रमाचे महत्त्व, बस्ति आणि रक्तमोक्षण यांचे विशेष महत्त्व,
संशमन चिकित्सा करताना लंघन, काल चिकित्सा, स्वेदन(विशेषतः निरग्नि स्वेदन व त्याचे प्रकार),
औषधी द्रव्यांचे गुणधर्म,वीर्य, विपाक,प्रभाव, कर्म,स्रोतोगामित्व,पंचविध कषाय कल्पना(स्वरस,कल्क,कषाय,हिम,फांट) व त्यांचा उपयोग,त्यात केल्या जाणाऱ्या प्रक्षेपद्रव्यांचे महत्त्व, आणि मात्रा,
अनेक औषधींचे संमिश्र कल्प,तेल,घ्रुत,कषाय,चूर्ण, गुटी,वटी,मोदक,लेप,इ. कल्पना व त्यांचा वापर कधी,कुठे व कसा करावा या बाबत मार्गदर्शन, रसौषधी,भस्म संकल्पना, रसकल्प,यांचे महत्त्व,
मात्रा आणि काळ यांच्या आश्रयाने युक्ती वापरून चिकित्सा करण्याचे महत्त्व,दूष्य,देश,आदी दशविध परीक्ष्य भाव व त्यांचे रोग निदान आणि चिकित्सा करताना असलेले महत्त्व, स्वस्थाची(आरोग्याची) व्याख्या, रोगांची सामान्य व्याख्या,आठ महागद,आयुर्वेदीय द्रुष्टीने कोणत्याही
रोगांचे साध्यासाध्यत्व व त्यांची लक्षणे,नियत आणि अनियत आयु विचार,ज्योतिष शास्त्रानुसार चिकित्सा विचार, अर्थात वैद्यकीय ज्योतिष,कल्प,व्याकरण, छंद,निरुक्त,इ.इतर शास्त्रांचा वैद्यकीय शास्त्राला आधार, दैवव्यपाश्रय,युक्तिव्यपाश्रय आणि सत्वावजय चिकित्सा, आधिभौतिक, आधिदैविक,अध्यात्मिक, असे म्रुत्यु चे प्रकार,कर्मज व्याधी,
आप्तोपदेश(आगम), प्रत्यक्ष, अनुमान आणि युक्ती या ज्ञान साधनेच्या प्रमाणांचा,रुग्ण चिकित्सेत करावयाचा उपयोग,इ.या सर्व मुद्द्यांचा, उचित ठिकाणी आवश्यकतेनुसार उपयोग करणे,हे प्राणाभिसर वैद्याचे कर्तव्य आहे!
दोषद्रुष्टी भवेद्भिषक् हा श्लोक लक्षात ठेवणे गरजेचे आहे!पाठांतर आवश्यक आहे पण,त्यापेक्षा आयुर्वेदीय सिद्धांत लक्षात घेऊन त्यांचा चिकित्सा करताना, उचित ठिकाणी उपयोग करणे,आवश्यक आहे!
-वै.धनंजय रमेश गद्रे,
बुधवार,1.7.2026

Address

Flat No. 302, Aryan Residency
Dombivli
421201

Telephone

+91 98332 19069

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayurvedic Lifestyle - a must target for all to achieve health posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share