01/06/2026
#जून_महिन्यात_वाढदिवस 🎂 असणाऱ्यांसाठी माहितीपूर्ण #आरोग्यदायी_शुभेच्छा_संदेश 💐
माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे, कृपया वेळ काढून शांत डोक्याने शेवटपर्यंत पूर्ण वाचा.🙏🏻
सर्वप्रथम
'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' 👨🏻⚕️
डॉ.उदय पाटील, (सातारा व कोरेगाव)
फोन - 88884 98732
यांचेकडून तुम्हाला
वाढदिवसाच्या आरोग्यदायी, मंगलमय शुभेच्छा❗🎂 💐
वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्याचा महत्वाचा दिवस...🥳 कारण याच दिवशी आपण या जगात आलो... बरोबर❓❌
🚫 थांबा... खरंतर आपण या जगात याआधी 9 महिने (38 ते 40 आठवडे) पूर्वीच आपल्या आईच्या पोटात🤰🏻आलोय... ✅ त्यामुळे ते आधी लक्षात घेतलं पाहिजे❗🎯
आता तुम्ही म्हणालं... एवढा कशाला त्याचा विचार करायचाय❓🤔
(शेवटपर्यंत वाचा... तुम्ही जरूर म्हणाल हे फार महत्वाचं आहे❗😃)
Birthday Celebration, केक 🎂 आणि पार्टी 🥳 तर आहेच... पण "Many Many Happy Returns of The Day" हवे असतील तर आपले आरोग्य उत्तम 💪🏻 राहिले पाहिजे... बरोबर ना❗
उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी आपण स्वतःला जाणलं पाहिजे, त्यासाठीच आयुर्वेद शास्त्रात सांगितलेप्रमाणे प्रत्येकाने स्वतःची जन्म-प्रकृती म्हणजेच आपले शरीर व मन कसे बनले आहे ते ओळखलं पाहिजे‼️
प्रत्येकाची प्रकृती ही त्या व्यक्तीच्या आई-वडिलांचे स्त्री-पुरुष बीज, मातेचे गर्भाशय, गर्भधारणा होतानाच निसर्गातील ऋतू व मातेचा आहार-विहार यामध्ये असणाऱ्या वात-पित्त-कफ दोषांच्या स्थिती नुसार ठरत असते.
(आयुर्वेद ग्रंथ संदर्भ - अष्टांग हृदय शारीरस्थान 3/82)
यातील सर्वसामान्य जनतेला आपली स्वतःची प्रकृती कोणती❓🤔
हे समजण्या साठी 1 सोप्पी ट्रिक आहे.
👇
आईच्या पोटात असताना पहिल्या 2 महिन्यात कोणता ऋतू होता❓ हे बघून त्या व्यक्तीची जन्म-प्रकृती ठरवता येते.
कसे❓ते सांगतो पुढे...
#आयुर्वेदशास्त्र पहिल्या 2 महिन्यात रस व रक्ताची 🩸 निर्मिती सांगते, जे आपल्या संपूर्ण शरीराचे पुढे आयुष्यभर पोषण करते व त्यात दोष आल्यास आपल्या शरीरात आजार निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते.
#आधुनिकशास्त्र देखील पहिल्या 2 महिन्यात अवयव निर्मिती Organogenesis सांगते. म्हणजेच आपला मूळ पाया (Base) या गर्भावस्थेच्या पहिल्या 2 महिन्यातच तयार होतो❗
🫵🏻 आता तुमचेच उदाहरण घेऊयात...
(जन्मतारीख खरी असावी, 1 जून ही अनेक जेष्ठ नागरिकांची रेकॉर्ड मध्ये लावलेली खोटी असते, तशी नसावी.)
जर तुमचा #जन्म जून महिन्यात झाला आहे म्हणजे तुमची #गर्भधारणा (भारतात महाराष्ट्रात) आईच्या पोटात 9 महिने मागे, सप्टेंबर महिन्यात शरद ऋतूमध्ये झाली असणार.
सप्टेंबर हा 🌧️ थंड पावसाळ्याचा शेवट व ऑक्टोबर मध्ये अचानक वाढणारी उष्णता, असा 2 ऋतूंच्या सांध्याचा कालावधी.
सप्टेंबर मधील पावसाचे ओलसर (आम्ल) वातावरण, मध्ये ऑक्टोबर हिट व पुन्हा 4 महिने हिवाळा असा हा विचित्र संयोग एकत्र येत असल्याने याचा परिणाम वाढणाऱ्या गर्भावर होऊन जन्माला येणाऱ्या बाळामध्ये *कफ+पित्त प्रधान अशी आम्लधर्मीच पण उष्णतेकडे झुकणारी अशी मिश्र प्रकृती* बनते.
यानुसार या लोकांची काही वैशिष्ट्ये सांगतो.... 🎯 बघा तुमच्याशी किती मॅच होताहेत...❗
(गर्भधारणा ऋतू सोबत इतर गोष्टीही परिणाम करत असतात, त्यामुळे खालील माहिती सर्वांना 100% लागू पडणार नाही कदाचित, पण आजारपणे टाळण्यासाठी नक्कीच सर्वांच्या उपयोगी आहे... Trust me❗)
#जून_मध्ये_जन्म_असणाऱ्या_लोकांची_सामान्य_शरीरवैशिष्ट्ये -👇🏻
🕺🏻 #शरीरठेवण -
जरी गर्भावस्थेचा सुरवातीचा कालावधी ऋतुबदलांचा असला तरी त्यातही बराच कालावधी थंड वातावरणात जात असल्याने या लोकांची शरीरयष्टी ही स्थूल, चरबी, जाडी जास्त असलेली राहते. लहान मुले 👶🏻 देखील दिसायला गोलमटोल दिसतात.
या लोकातही कितीही डाएट, व्यायाम 🏋🏻♀️ केला तरी वजन फारसे कमी होत नाही, हवा खाऊन देखील 🫃🏻चरबीच वाढते 🤦🏻♀️ ही मुख्य तक्रार असते❗
अगदी फार थोड्या व्यक्तींमध्ये मात्र आईवडिलांकडूनही उष्णता आल्यास किंवा स्वतःला भूक कमी असल्यामुळे भूक मारणे, उपवास, चहा ☕ जास्त, निकृष्ट आहार घेतला गेल्याने तब्बेतीने बारीक राहू शकते.
#त्वचा - गर्भकाळात दुसऱ्या महिन्यात ऑक्टोबर हिट चा परिणाम स्वरूप अनेकांची त्वचा ही कोरडी पडणारी, रुक्ष रहाते. तळपायांना भेगा असल्याची तक्रार अनेकांची असते.
👩🏻 #केस - उष्णतेमुळे या लोकांचे केस हे मध्यम स्वरूपाचे व कोरडे असतात. केस पिकणे, गळणे या तक्रारी देखील असू शकतात.
🤧 #सर्दी, कफ खोकल्याचा त्रास - बराच गर्भकाळ थंड वातावरणात असल्यामुळे थंड 🍧🍹 खाण्या-पिण्यामुळे, हवेमुळे यांना लगेच 🤧 सर्दी खोकल्याचा त्रास होतो. जून मध्ये जन्म असणाऱ्या लहान मुलांमध्येही वारंवार छातीत कफ होण्याचा त्रास असू शकतो.
#भूक - पित्ताला कफाचे साहचर्य असल्यामुळे पित्ताची उष्ण-तिक्ष्णता कमी राहते, त्यामुळे यांना मुळातच भूक कमी लागते. चहासारख्या उष्ण गोष्टी पिऊन अधिकच भूक मारली जाते व पुढे पचनाचे त्रास चालू होतात.
🤮 पित्ताचा त्रास - या लोकांना #आम्लपित्त चा त्रास मोठ्या प्रमाणात आढळून येतो. पोटात मळमळणे, आंबट गुळण्या येणे, तोंड, दात आंबणे, पित्त साठून उलट्या होणे, किंवा रोज सकाळी 🤮 उलटी करून पित्त बाहेर पाडल्याशिवाय बरे न वाटणे, सतत डोकेदुखी चा मायग्रेनचा 💆🏻♀️ त्रास होत असतो.
🚽 #अपचन चा त्रास (ग्रहणी / कोलायटीस / IBS) - पचनशक्ती (जठराग्नी) मंद असल्यामुळे वारंवार पोट बिघडणे, जुलाब, अपचनाची तक्रार अनेकांची असते. मल हा बांधून न होता, चिकट भसरट होणे, गॅसेस, आतड्यांना सूज येऊन कोलायटीसचा त्रास कॉमन आढळतो.
👩🏻महिलांमध्ये #मासिकपाळी अनियमित येणे हे कॉमनली दिसून येते. पचनशक्ती मंद असल्याने स्त्रीबीजाची वाढ (follicular Growth) व वेळेवर फुटणे ( ) या गोष्टी वेळेवर होत नाहीत, त्यामुळे / PCOS मासिक पाळी उशिरा 45 ते 90 दिवस, काही स्त्रियांना तर औषध घेतल्याशिवाय बीज फुटतच नाही व त्यामुळे 🤰🏻प्रेग्नन्सी राहण्यात देखील अडचणी ( ) येतात.
अंगावरून पांढरे जाणे (White Discharge) चा त्रास देखील अनेक महिलांना होताना दिसतो.
😇 #मन, स्वभाव -
सप्टेंबर च्या कमी होत चाललेल्या पावसात गर्भधारणा व पुढे ऑक्टोबर हिट यामुळे यांचे मन किंवा स्वभाव देखील 🌊 पाण्याप्रमाणे चंचल, अस्थिर, खूप हळवा, विचारांना खूप ब्रॅंचिंग असलेला परंतु या सोबतच अचानक चिडणारा तापट देखील असू शकतो.
तसेच स्वभावातील हळवेपणा, सततचे डोक्यातील विचार यामुळे त्यांना #निद्रानाश (शांत झोप न लागणे) होतो. हेच पूढे अनेकांच्या बाबतीत मानसिक ताणास व पुढे जाऊन ब्लडप्रेशर, डायबेटीस, कोलेस्टेरॉल, थायरॉईड सारख्या अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरते. 😨
#थायरॉईड ग्रंथींचे आजार - जून मध्ये जन्म असणाऱ्या विशेषतः महिलांमध्ये हायपोथायरॉईडीजम जास्त प्रमाणात आढळते. मासिक पाळीची अनियमितता व जाडी वाढणे ही कॉमन लक्षणे असतात.
हळव्या व तापट अशी भिन्न मनोवृत्ती एकत्र असल्याने मानसिक ताण येऊन मेंदू मधूनच हॉर्मोन्सचे असंतुलन ( ) सुरू होते. पुढे जाऊन #जाडी_जास्त_व_हाडे_ठिसूळ अशी परिस्थिती अनेकांची होताना दिसते. यातून सांध्यांचे विशेषतः मान, कंबर, गुडघे, टाचा या weight bearing जॉइन्ट्स वर ताण येऊन दुखणे चालू होते. 😨
डॉक्टर 'वजन कमी करायला' सांगतात पण मूळची कफप्रधान प्रकृती असल्याने पेशंट्स ना ते खूप अवघड जाते.🤦🏻♂️
🎯योग्य उपचार -
ऋतुसंधीच्या वातावरणात यांची गर्भकाळातील सुरुवात झालेली असल्याने या लोकांमध्ये वेगवेगळ्या आजारांची शक्यता अधिक राहते.
यासाठी या लोकांनी आवर्जून आपल्या जवळच्या 'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' चा सल्ला घ्यावा. आपल्या प्रकृतीचे योग्य निदान करून घ्यावे, पोटाची पचनक्रियेची आयुर्वेदिक पद्धतीने तपासणी करून घेऊन मंद झालेल्या अग्नीचे 🔥कार्य सुधारण्यासाठी आयुर्वेदिक औषधे, योग्य पथ्यापथ्य, योगा-व्यायाम, व गरजेनुसार पंचकर्म करून घ्यावीत.
🎯 #योग्य_आहार - आपली स्वतःची एकदा कफ-पित्ताची म्हणजेच आम्लपित्ताची जन्म-प्रकृती आहे हे कन्फर्म झाले की त्यानुसार पथ्यापथ्य समजून घेतले पाहिजे.
✅ 👉🏻 भूक मंद असल्यामुळे यांनी नेहमी ताजे, गरम, मसालेयुक्त, पचायला हलके अन्नच खावे.
याविरुद्ध थंड, आंबट, आंबवलेले (इडली, डोसा इ.) अति गोड (गुळ साखर घातलेले) पदार्थ, शिळे अन्न, बिस्कीट इ. मैद्याचे बेकरी प्रोडक्टस खाणे टाळावे.❌🚫
✅ #सुंठ हे या लोकांसाठी खूप चांगले औषध आहे. सर्दी, खोकला, कफ, आम्लपित्त, उलटी, जुलाब, आव पडणे इ. तक्रारींमध्ये सुंठ पावडर मध किंवा गरम पाण्यासोबत घेतल्यास त्वरित चांगला आराम मिळतो. 👌👍
☕ गरम चहा, आलं टाकून पिल्यावर या लोकांना छान फ्रेश वाटते. पण अतिमात्रेत चहा झाल्यास आम्लपित्त, त्वचा विकार व जाडी देखील वाढते.
यासाठी या लोकांनी साधा चहा-कॉफी न घेता आयुर्वेदिक पद्धतीचा चहा प्यावा. 👍
☕ #आयुर्वेदिकचहा (काढा) -
रात्री झोपण्यापूर्वी 2 कप पाण्यात 4 खारका व मूठभर मनुका भिजत घालाव्यात. त्यात सकाळी आले / सुंठ, लवंग, वेलची, दालचिनी, तुळस, गवती चहा टाकून हा काढा उकळावा, निम्मा आटवावा. हा काढा गाळून घेऊन त्यातील खारीक मनुका चावून खाव्या व काढा चहासारखा प्यावा.
जर उष्णतेचा त्रास असेल तर मात्र लवंग, मिरे असे उष्ण मसाल्याचे पदार्थ टाळावेत.
🎯अवेळी, पोषण मूल्ये समजून न घेता आहार घेणे ही मुख्य चूक -
2 वेळचा गोड चहा, 2 वेळचा नाष्टा व 2 वेळचे घरचे जेवण इतके अन्न देखील या लोकांमध्ये अपचनास, वजन वाढीस कारणीभूत होते. 😨
यासोबत जर चहाचे प्रमाण वाढले, बाहेरचे चमचमीत पदार्थ खाणे झाले तर पचन आणखीनच बिघडते व वजन जास्तच वाढत जाते.
👉🏻 भूक कमी, अग्नी मंद असल्यामुळे या लोकांना वजन कमी करण्यासाठी दीक्षित डाएट प्रमाणे फक्त 2 वेळी पोटभर जेवण्याचा फॉर्म्युला योग्य लागू पडतो.
यांना मी साधा गोड चहा, नाष्टा बंद ठेऊन सकाळी आयुर्वेदिक चहा (काढा) पिणे व चांगली भूक लागली की 10 ते 11 चे दरम्यान पोटभर जेवण, व संध्याकाळी लवकर 8 वाजणेपूर्वी हलका आहार (फक्त शिजवलेले मूग / मुगाची खिचडी तूप टाकून) खायला सांगतो. या लोकांना खोटी भूक सारखी लागत असेल तर त्यांनी साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्या फोडणी दिलेल्या खाव्या. गोड खायची इच्छा झाल्यास खारीक (Dates) खावी. हाडांच्या मजबुतीसाठी अंड्याचा पांढरा भाग, चणे-फुटाणे, तुपात भाजलेला डिंक+खारीक पावडर मिक्स करून खावी.
🎯 #योग्य_व्यायाम -💪🏻 कफ प्रधान व्यक्तींमध्ये पचन सुधारण्यासाठी व वजन, चरबी कमी होण्यासाठी भरपूर व्यायाम करावा. सूर्यनमस्कार, जोर बैठका किंवा चांगल्या ट्रेनर च्या मार्गदर्शन खाली जिममध्ये सुद्धा 🏋🏻♀️ व्यायाम करून भरपूर घाम गाळायला हरकत नाही. फक्त या ट्रेनर कडून काहीही चुकीचा डाएट न घेता 'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' कडून तुमच्या प्रकृतीला योग्य डाएट सल्ला घेणे अधिक योग्य ठरते.
व्यायामानंतर भरपूर घाम येऊन त्या जागी त्वचेला फंगल इन्फेक्शन होण्याचा त्रास अनेकांना होतो, तो टाळण्यासाठी या लोकांनी व्यायामानंतर त्रिफळा चूर्ण किंवा उटणे लावून अंघोळ करावी व आंघोळीनंतर सुद्धा हे चूर्ण अंगाला कोरडे फासावे.
😇 #मनस्थिती स्वभाव स्थिर ठेवणे महत्वाचे.
या लोकांची चंचल, अस्थिर मनस्थिती, सतत विचार करणेचा स्वभाव अनेक आजारांना कारणीभूत असतो. त्यासाठी
📕 #डायरीलेखन (मनातले विचार, टेंशन्स, त्यावर सुचलेला मार्ग, नफा नुकसान, रोजचे वेळापत्रक, भविष्यातील प्लॅनिंग्ज इ. लिहावे)
🧘🏻🧘🏻♀️ #नामस्मरण, सोबत योगा, प्राणायाम, मेडिटेशन सारखे उपचार करणे देखील अतिआवश्यक ठरतात. 🧘🏻♀️🧘🏻♂️
तसे तर संपूर्ण निरोगीपणाचे वरदान कोणालाच मिळालेले नाही❗
पण जर आपण स्वतःची जन्म-प्रकृती म्हणजेच शरीर व मनाला नीट समजून घेतले तर मोठ्या आजारपणांपासून नक्कीच स्वतःचा बचाव करू शकतो, हे महत्वाचे लक्षात ठेवा.
आणखी एक महत्वाची गोष्ट कायम लक्षात ठेवा... 👨🏻⚕️ डॉक्टर हा फक्त उत्तम मार्गदर्शक असतो व औषधे मदतीला... बाकी 'तुमचं शरीर स्वतःच स्वत:ला बरं करत असतं❗'
“तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार❗” - सदगुरू 🙏🏻
तसं तरं बरंच काही सांगण्यासारखं आहे, पण शब्दांच्या मर्यादा लक्षात घेऊन आवरतं घेतो.
मला आशा आहे कि या माहितीमुळे आता तुम्ही योग्य ती काळजी घ्याल व आजच्या वाढदिवसानिमित्त मिळालेल्या सर्व शुभेच्छा (शुभ-इच्छा) सार्थकी लागतील❗
तुमच्या कोणत्याही आरोग्याच्या तक्रारींवर मार्गदर्शनासाठी तुमचा हा ‘आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर’ तुमच्या सोबत नेहमी आहेच, आवश्यकतेनुसार जरूर संपर्क करा.
धन्यवाद 🙏🏻
आपलाच
‘आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर’
डॉ.उदय पाटील
।। श्री श्रद्धा आयुर्वेद ।।
फॅमिली हेल्थ क्लिनिक व पंचकर्म सेंटर
कोरेगाव & सातारा
फोन - 88884 98732 & 082087 13119
यासारखी आयुर्वेदिक आरोग्यदायी माहिती नियमित मिळवण्यासाठी वरील फोन नं. वर मेसेज करा - "आयुर्वेद फॅमिली मध्ये ऍड करा❗"