09/04/2025
सातव्या महिन्यात जन्मलेले जुळे बाळ
दीड महिन्याच्या संघर्षातून सुखरूप घरी
यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरच्या टीमला मोठे यश
लातूर - गरोदरपणाच्या सातव्या महिन्यात अत्यंत अकाली जन्माला आलेल्या अपरिपक्व जुळ्या दोन्ही बाळावर लातूर येथील एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात विविध अत्याधुनिक उपचार पद्धतीचा वापर करून तब्बल दीड महिन्यानंतर मृत्यूची झुंज देणारे दोन्ही बाळ सुखरूप घरी परतले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गेल्या 23 फेब्रुवारी 2025 रोजी 22 वर्षीय महिला गरोदर असल्याने लातूर येथील एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली पोटात गुंतागुंत झाल्याने सातव्या महिन्यातच सदर महिलेवर बाळंतपणाची शस्त्रक्रिया करावी लागली. एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन जुळे बाळ अपरिपक्व अवस्थेत 28 आठवड्यात जन्माला आले अत्यंत अकाली बाळाचा जन्म झाल्याने वजन कमी तर होते शिवाय शरीराची पूर्णपणे वाढ न झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
जन्मानंतर दोन्ही बाळांना नवजात अतिदक्षता विभागात तातडीने दाखल करण्यात आले फुफ्फुसाची वाढ पूर्ण झाली नसल्यामुळे जन्मानंतर श्वासोच्छ्वास घेण्यास अडचणी येऊ लागली त्यामुळे बाळ जन्माच्या काही तासातच अत्याधुनिक मशीनच्या साह्याने सर्फक्टंट थेरपी देऊन कृत्रिम श्वसन प्रक्रिया करण्यात आली. एका बाळाची रक्त गोठवण्याची प्रक्रिया मंदावली असल्याने अत्याधुनिक औषधाचा वापर करून रक्त घटक देण्यात आले नलिकेद्वारे आईचे दूध दिल्याने प्रकृतीत सुधारणा झाली.
सर्व अत्याधुनिक उपचारांना दोन्ही बाळांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला वजनही वाढले बाळाच्या वाढीसाठी विशेष पोषण तसेच कांगारू मदत केअर या पद्धतीचा अवलंब करण्यात आला दीड महिन्याच्या सर्व उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात असलेल्या महात्मा फुले आरोग्य सुविधा योजनाची खूप मोठी मदत झाली. अत्याधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे अकाली जन्मलेले दोन्ही बाळ मृत्यूशी झुंज देत तब्बल दीड महिन्याच्या उपचारांत सुखरूप घरी परतली यावेळी बाळाच्या आईसह कुटुंबातील अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आमदार रमेशआप्पा कराड, मानवसंसाधन प्रमुख ऋषिकेश कराड, परिसर समन्वयक पृथ्वीराज कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एमआयटीचे अधिष्ठता डॉ एमपी जमादार, उपअधिष्टता डॉ बसवराज नागोबा, शैक्षणिक संचालक डॉ. चंद्रकांत शिरोळे, प्रशासकीय संचालक डॉ सरिता मंत्री, रुग्णालय अधीक्षक डॉक्टर एकनाथ माले यांच्या सल्ल्यानुसार अकाली जन्मलेल्या दोन्ही जुळ्या बाळ्यांच्या उपचारासाठी बालरोग विभाग प्रमुख डॉ विद्या कांदे, डॉ शिल्पा दडगे, नवजात शिशूतज्ञ डॉ दीपिका भोसले डॉ अंकुश मेंदाड, डॉ प्रमोद तोष्णीवाल, यांच्यासह बालरोग विभागाचे निवासी डॉ अभिषेक जैन, डॉ निखिल नंदवानी, डॉ स्नेहल सोनकांबळे, डॉ निकिता डोमाल, डॉ अंकिता चव्हाण, डॉ स्नेहा फोले, डॉ संकेत राजुरकर, डॉ मनमित सिंग, डॉ शुभम डाळे, डॉ श्रेया दाताळ, डॉ स्पर्श रंजन, डॉ आकांक्षा वाडेवाले, डॉ शुभम कलेढले, डॉ अमृता शिंदे या तज्ञ डॉक्टरच्या टीमने अर्थ परिश्रम घेतले. नवजात शिशुविभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे.