15/03/2026
*“नेहमीच्या सततच्या गुडघेदुखीचा कंटाळा आला आहे…”*
ऑस्टिओआर्थरायटिस (Osteoarthritis) – गुडघ्यांची झीज, वेदना आणि पुन्हा चालण्याचा आत्मविश्वास
“नेहमीच्या सततच्या गुडघेदुखीचा कंटाळा आला आहे…”
हे वाक्य मी रोज ऐकतो… आणि खरं सांगू का? ही वेदना फक्त गुडघ्यांत नसते…
ती मनात, आत्मविश्वासात आणि कुटुंबाच्या आनंदात शिरलेली असते.
गुडघा दुखतो म्हणजे फक्त “चालता येत नाही” असं नसतं…
गुडघा दुखतो म्हणजे - पिकनिकवर जाण्याचा आनंद कमी होतो, देवदर्शनाचा उत्साह संपतो, नातवांबरोबर खेळता येत नाही, घरातले चार पायऱ्या चढतानाच जीव कासावीस होतो आणि मनात एक प्रश्न येतो -“आता माझं जगणं फक्त वेदनेतच जाणार का?”
ही गोष्ट एका सुखी आणि समृद्ध कुटुंबाची…
साधारण साठीतले आई-वडील, त्यांची मुले आणि नातवंडं. नववर्षाची सुट्टी असल्यामुळे खूप दिवसांनी सगळं कुटुंब एकत्र जमलं होतं. घरात आनंदाचं वातावरण होतं - “पिकनिकला जाऊया!”
“कुठे जाऊ?”
“रिसॉर्टला जाऊ!”
सगळीकडे हसणं… गप्पा… प्लॅनिंग… तेवढ्यात वडील म्हणाले -
“आपण आधी देवदर्शनाला गडावर जाऊया… मग पुढे पिकनिक.” सगळ्यांना खूप आनंद झाला. सगळे तयारीला लागले… पण…
एक गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही... त्या वयस्कर आईची गुडघेदुखी.
आईनेही काही सांगितलं नाही. कारण तिला कळत होतं -
“मी नाही म्हटलं तर घरचे नाराज होतील.” ती हसली… आणि म्हणाली -
“हो… चला जाऊया.” पण त्या आईला अनेक वर्षांपासून गुडघेदुखी होती.
घरातल्या चार पायऱ्या चढणंही कठीण होतं. आणि दुसऱ्या दिवशी पिकनिक, देवदर्शन , लांबचा प्रवास?
आईच्या मनात एकच भीती - “मी नाही गेले तर सगळ्यांचा आनंद बिघडेल…”
“मी गेले तर वेदना मला आनंद घेऊ देणार नाही…”
मित्र हो… ही स्टोरी नाही... हा प्रसंग प्रत्येक घरात घडतो.
साधारण ६० च्या आसपास आई-वडील आयुष्यभर मेहनत करून घर उभं करतात, आर्थिक स्थैर्य मिळतं, जीवन सोपं होतं… पण त्याच वेळी एक समस्या आनंदावर पाणी टाकते - ऑस्टिओआर्थरायटिस (गुडघ्यांची झीज)
माझ्या क्लिनिकमध्ये अनेक कुटुंबं येतात आणि मुलं म्हणतात –
“Sir, कितीही पैसे लागले तरी चालतील…
पण आमच्या आईचे गुडघे बरे करून द्या.”
आणि इथेच मी एक गोष्ट ठामपणे सांगतो -
*“You can’t buy your Health… You have to build it!”*
आरोग्य विकत मिळत नाही… ते घडवावं लागतं! जर आरोग्य विकत मिळालं असतं,
तर या जगात कोण दुखी राहिलं नसतं… गुडघेदुखीही अपवाद नसता.
Osteoarthritis म्हणजे गुडघ्याच्या सांध्यामधील कार्टिलेज (cushion) हळूहळू झिजणे.
या कुशनमुळे गुडघा “गुळगुळीत” चालतो. जसं हे कुशन कमी होतं, तसं -
हाडं एकमेकांवर घासू लागतात, सांधा सूजतो, वेदना वाढतात, चालताना त्रास होतो, बसून उठताना कळ येते, जिना चढणे अवघड होतं, कटकट आवाज येतो.
साध्या भाषेत— गुडघ्याच्या सांध्याची झीज (Knee joint degeneration) ही झीज का होते?
मी थोडक्यात पण स्पष्ट समजावतो...
पहिलं कारण – वाढलेलं वजन.. हे Osteoarthritis मध्ये सर्वात मोठं कारण आहे.
१ किलो वाढलेल्या वजनाचा ताण गुडघ्यावर ३–४ किलो पडतो. म्हणजे १० किलो वजन वाढलं तर गुडघ्यावर ३०–४० किलो जास्त ताण! म्हणूनच नैसर्गिक वजन कमी केल्याने गुडघेदुखीवर खूप चांगला फायदा होतो.
वजन कमी केल्याचे फायदे:
• गुडघ्याचा ताण कमी होतो
• शरीरातील टॉक्सिसिटी कमी होण्यास मदत
• जळजळ (inflammation) कमी होते
• वेदना कमी होते, चालणे सुधारते
निसर्गोपचारामध्ये योग्य आहारामुळे शरीर अधिक alkaline balance कडे येते, त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
दुसरं कारण – कमरेतील व मांड्यांतील स्नायू कमकुवत होणे.. गुडघ्याला सर्वात जास्त आधार देतात ते - Quadriceps (मांडीतले स्नायू), Hip muscles आणि Core muscles…हे स्नायू कमकुवत झाले की गुडघ्यावरचा भार “चुकीच्या पद्धतीने” पडतो आणि वेदना वाढते. त्यावर उपाय म्हणजे
• योग्य Physiotherapy strengthening
• knee alignment correction
• योगासने (सुरक्षित पद्धतीने)
तिसरं कारण – चुकीचे Footwear (पादत्राणे) -
मी अनेक रुग्णांमध्ये एक गोष्ट पाहतो ज्यांना गुडघेदुखी असते, त्यांच्या चपला/शूज
मधल्या साइडला जास्त झिजलेले असतात. याचा अर्थ काय? शरीराचं वजन गुडघ्याच्या सांध्याच्या एकाच बाजूला जास्त पडतं.
दीर्घ काळ तसेच footwear वापरल्याने—
• गुडघ्याची alignment बिघडते
• झीज वाढते
• वेदना वाढते
✅ म्हणून योग्य footwear अत्यंत गरजेचे आहे.
✅ जळजळ आणि गुडघ्यात गरम वाटणे, यासाठी दुखणे कसे कमी करावे? (Pain Relief)
Osteoarthritis मध्ये वेदना “जळजळीसारखी” वाटते, सूज येते, गुडघा गरम होतो. अशावेळी केवळ Pain killer हा उपाय नाही. प्रभावी उपाय म्हणजे -
Advanced Physiotherapy + Lifestyle + Naturopathy + Yoga
________________________________________
✅ Advance Physiotherapy (आधुनिक फिजिओथेरपी)
आजच्या काळात physiotherapy खूप पुढे गेली आहे. उदा:
• Dry Needling
• Cupping Therapy
• Matrix Therapy
• Shockwave Therapy
• Manual Therapy Techniques
• TENS / Ultrasound / Wax Therapy
या उपचारांनी सूज कमी होत, वेदना कमी होते, स्नायू सैल होतात, चालण्याची quality सुधारते
✅ निसर्गोपचार + आहार (Root cause treatment)
निसर्गोपचारामध्ये आम्ही आजाराचे “मूळ कारण” शोधतो.
योग्य आहार + detox support + lifestyle correction मुळे फक्त गुडघेदुखी नाही तर—
Diabetes, BP, Thyroid, Fatty liver, Obesity, Sleep issues, Stress यामध्येही फायदा होतो.
आमच्या wellness practice मध्ये अनेक रुग्णांचे
✅ ५ किलो ते ३५ किलो पर्यंत वजन कमी झाले आहे आणि त्यांचा गुडघेदुखीचा त्रास प्रचंड कमी झाला आहे. अनेकदा रुग्णांना knee replacement चा सल्ला दिला जातो.
किंवा knee replacement झाल्यानंतरही वेदना/भीती कायम असते. असे अनेक रुग्ण आशिर्वाद Physiotherapy & Wellness Center मध्ये येतात.
योग्य rehabilitation + exercise plan + जीवनशैली बदल केल्यावर रुग्ण - चालू लागतो, आत्मविश्वास वाढतो, औषधांवर अवलंबित्व कमी होते, जीवनाचा आनंद घेऊ लागतो
🌸 *योग-निसर्गोपचाराची Beauty - Side effect नाही… Good effect!*
योग-निसर्गोपचाराची सर्वात मोठी सुंदरता म्हणजे - याचे side effects नाहीत आणि एकाचा फायदा अनेक आजारांवर होतो. म्हणजे रुग्ण गुडघेदुखीसाठी येतो… पण त्याच्यासोबत त्याचे diabetes/bp/stress/obesity सुद्धा control होतात.
मित्र हो, “सततची गुडघेदुखी” हा तुमचा नशिबाचा भाग नाही. ती योग्य उपचार, योग्य व्यायाम आणि योग्य जीवनशैली यामुळे कमी होऊ शकते.
जर तुम्हाला - चालताना दुखतं
• जिना चढताना त्रास होतो
• बसून उठताना कळ येते
• गुडघा सूजतो
• X-ray मध्ये झीज दिसते
✅ तर आजच treatment plan सुरू करा.
तुमच्या घरातली आई पिकनिकला “हो” म्हणते…
पण तिच्या मनात वेदना असते.
आता ठरवा - नववर्षाचा प्लॅन फक्त पिकनिकचा नको…
✅ *आईच्या वेदनामुक्त जीवनाचाही प्लॅन करा.*
“वेदना सहन करू नका… उपाय सुरू करा!”
“गुडघे बरे झाले, तर आयुष्य परत हसेल !”
________________________________________
👨⚕️ Dr. Labhendra Mhatre
Physiotherapist
🏥 Hare Krishna Physiotherapy Clinic
📍 Mumbai
📞 Contact:
98199 18844
98199 16644
70451 77277