Varad Ayurved Panchkarma and Cosmatic Center

Varad Ayurved Panchkarma and Cosmatic Center Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Varad Ayurved Panchkarma and Cosmatic Center, Nashik.

Authentic Panchkarma Chikitsalaya

And Fully Natural and customised cosmetics

Ethical way to come across the world of cosmetics, completely pure, handmade, 100 % paraben free , sulfer free

मलावष्टंभ भाग ८  अंतिम भाग    भाग १-७ वाचण्यासाठीhttps://www.facebook.com/Varad-Ayurved-Panchkarma-and-Cosmatic-Center-1...
16/01/2022

मलावष्टंभ
भाग ८ अंतिम भाग

भाग १-७ वाचण्यासाठी

https://www.facebook.com/Varad-Ayurved-Panchkarma-and-Cosmatic-Center-105568854775205/



मलावष्टंभ
म्हटलं तर खूप साध लक्षण परंतू चिकित्सा करतांना कधी कधी खरचं अवघड जातं.
कारण बरेच वेळा पेशंट वारंवार त्रिफळा चूर्ण किंवा त्यासारखे पोट साफ होण्याचे अनेक औषधी घेऊन आपल्या कडे आलेला असतो.
व्याधी जीर्णाअवस्थेत तर रुग्णांचे आंत्र रुक्षावस्थेत(कोरडे) पोहचलेले असतात.
त्यावर विजय मिळवण्यासाठी आपण खालील प्रमाणे उपाय योजना करुन शकतो.

१.
दिनचर्या,ऋतुचर्याचे पालन करणे.

२.

आपण पहिल्या भागात मलावष्टंभाचे हेतू पाहिले होते.
भाग १

https://www.facebook.com/105568854775205/posts/298852035446885/

कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती नाही या न्यायानुसार जर आपण मलावष्टंभाचे हेतू टाळले तर
व्याधी वर सहज विजय मिळवता.

३.
भुक लागल्यावर वेळेवर ,जास्त पातळ नाही, नाही रुक्ष नसलेले,अन्न व्यवस्थित चावून खावे.
अन्न सेवन करतांना ज्याप्रमाणे आपण यज्ञविधी मध्ये ,समीधा भक्तीभावाने शांत ,प्रसन्न मनाने अर्पण करतो त्याप्रमाणे आपल्यातील वैश्वानर म्हणजे अग्नी देवतेला शांत, प्रसन्न मनाने अन्न समर्पित करावे.

४.

तहान लागेल तसे पाणी प्यावे.
जेवणाच्या आधी ,नंतर लगेच खूप पाणी घेऊ नये,जेवतांना मध्ये मध्ये घोट भर पाणी प्यावे.

५.
रात्रीचे भोजन सायंकाळी लवकर करावे जेणे करुन रात्रीचे भोजन व निद्रा यात तीन तासांचे अंतर असेल.
रात्रीचे भोजन पचण्यास हलके असावे.दही,मांसाहार, कडधान्य यांसारखे नसून पातळ फळ- भाजी भाकरी यासारखा आहार ठेवावा.


६.
आहार सेवना नंतर कष्टाचे काम ,व्यायाम,स्नान यासारख्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.

७.
सकाळी ताज्या हवेत फिरणे,रात्री भोजनानंतर शतपावली करणे म्हणजे आंत्रगती व्यवस्थापन करणे होय.

८.
आहार व विहारासोबतच योगासनांचा आंतर्भाव आपल्या दिनचर्येत नक्की करावा.

सुर्य नमस्कार
सर्वांगसुंदर व्यायाम

विपरितशयनस्थियीतील आसने
भुजंगासन
शलभासन
धनुरासन

शयनस्थितीतील आसने
पवनमुक्तासन
हलासन
चक्रासन
पादसंचालन
जानु संचालन

बैठक स्थितीतील आसने
वक्रासन
पश्चिमोत्तानासन
वज्रासन
मत्सेंद्रासन
धनुरासन

दंडस्थितीतील आसने
वीरासन
त्रिकोणासन

ही फक्त प्रातिनिधिक नावे दिलेली आहेत याशिवाय पोटावर दाब व ताण येणारी आसने .

९.
मलावष्टंभा मुळे पोट फुगत असेल ,भुक मंदावली असेल तर पोटाला हिंगाचा लेप लावणे,काळं मीठ लावून आलं तुकडा जेवणाच्या आधी चघळणे, तज्ञांच्या सल्ल्याने आमपाचन,हिंग्वाष्टक चूर्ण,लसूनादी वटी, अविपत्तीकर चूर्ण या सारखे औषधांची उपाय योजना करता येते.

१०.
पक्वाशयातील वात वाढला असेल ,व्याधी खूप जीर्ण अवस्थेत असेल ,तर दिपन पाचना बरोबर शोधन कर्म आवश्यक आहे.आंत्र अधिक रुक्ष झालेले असतील तर विरेचन, अनुवासन ,आस्थापना बस्तीचा चांगला परिणाम दिसून येतो.

धन्यवाद

स्वस्थ रहा
मस्त रहा
जय आयुर्वेद 🙏

'वरद'आयुर्वेद पंचकर्म कॉस्मेटिक चिकित्सालय,नाशिक
८९९९९६४५३७

मलावष्टंभ                   भाग ७भाग १-६ पाहण्यासाठीhttps://www.facebook.com/Varad-Ayurved-Panchkarma-and-Cosmatic-Cente...
08/01/2022

मलावष्टंभ
भाग ७

भाग १-६ पाहण्यासाठी

https://www.facebook.com/Varad-Ayurved-Panchkarma-and-Cosmatic-Center-105568854775205/

वात, पित्त ,कफ हे मुख्य तीन दोष व या तिन्ही दोषांच्या तर तम भावानुसार आपली प्रकृती बनत असते.
वयानुसार ,दिवसानुसार ,आहार सेवनानंतर अशा विविध अवस्थेत त्या त्या दोषांचे प्राबल्य असते उदा.वाताची अवस्था लक्षात घ्यायची असेल तर
वयानुसार वार्धक्य अवस्था
दिवसानुसार सायंकाळी
रात्री नुसार. शेवटचा प्रहर
जेवणानंतर पचनाची शेवटची अवस्था म्हणजे पच्यमान अवस्थेत वात निर्माण होतो

त्याचप्रमाणे पित्ताची अवस्था ही मधली अवस्था व कफाची अवस्था ही सुरवातीची अवस्था असते.
एवढेच नव्हे तर ऋतू नुसार,आपण सेवन करत असणारे मधूर ,अम्ल,लवण यासारखे सहा रसांप्रमाणे सुध्दा वात,पित्त,कफ दोषांची अवस्था अवलंबून असते.
मलनिस:रण होण्याचा काल हा मुख्यतः सकाळीच असतो , म्हणून च सकाळी लवकर उठले म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहरी जर उठलो तर वाताच्या काळी वाताचा वेग व्यवस्थित येण्यास नक्कीच मदत होते.

म्हणूनच म्हणतात....

लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य आयुष्य लाभे.....

वयानुसार वार्धक्य अवस्था ही वाताची अवस्था असते त्यामुळे शरीरात मुख्यतः रुक्ष गुण वाढलेला असतो, यामुळे वार्धक्य अवस्थेत मलावष्टंभाचा त्रास अधिक प्रमाणात जाणवण्याची शक्यता असते .
‌म्हणून या अवस्थेत आहारातून तूपाचे प्रमाण , स्निग्ध पदार्थांचे सेवन आवश्यक असते.


थोडे महत्त्वाचे

लहान मुलांची अवस्था ही मुख्यतः कफाची अवस्था असते ,त्यात जर मलावष्टंभासारखे वाताचे विकार असतील तर ते नक्की कशामुळे आहेत हे समजून घेणे आवश्यक असते,फक्त आहाराच्या काही सवयी बदलल्या तरी हे लक्षण कमी होते.

स्वस्थ रहा
मस्त रहा
जय आयुर्वेद 😊🙏

'वरद'आयुर्वेद पंचकर्म कॉस्मेटिक चिकित्सालय,नाशिक
८९९९९६४५३७

मलावष्टंभ                     भाग ५मलावष्टंभ भाग १_४ पाहण्यासाठीhttps://www.facebook.com/Varad-Ayurved-Panchkarma-and-Co...
19/12/2021

मलावष्टंभ
भाग ५

मलावष्टंभ भाग १_४ पाहण्यासाठी

https://www.facebook.com/Varad-Ayurved-Panchkarma-and-Cosmatic-Center-105568854775205/


जेव्हा पण मलावष्टंभ होतो तेव्हा तेव्हा वात,पित्त,कफ हे तीनच दोष विकृत होतात असे नव्हे तर या विकृत दोषांचा परिणाम सप्त धातू,तसेच मुख्य अवयवांवर ही होतं असतो.
शरीरातील सर्व अवयव एकमेकांशी संलग्न internally connected असल्याने त्यांच्या कार्यात काहीही गडबड झाली तरी त्याचा परिणाम इतर अवयवांवर ही होतं असतो.
मुखापासून गुदापर्यंत एकच नलिका असते हे आपणास माहीत च आहे, त्यामुळे
पक्वाशयातील वाढलेले दोष एक तर खालच्या मार्गाने किंवा वरील मार्गाने बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात.

त्यावेळी आपल्याला वारंवार अपचन,अतिसार ,चिकट मलप्रवृत्ति,पोटात दुखणे,किंवा आग वाटणे, वारंवार ढेकर येणे ,मळमळ होणे ,शिर:शुल यासारखे लक्षणांबरोबर,कधीकधी हृदययाचे चे ठोके अधिक जाणवते,चालतांना धाप लागते, क्वचित चक्कर येतात,पाठीच्या,कमरेच्या भागात जखडणे व वेदना होणे , वारंवार मुतखडा तयार होणे,सकाळी पूर्ण अंग जखडल्या सारखे वाटणे, यासारखे अनेक लक्षणं जाणवतात.
तपासणी केली तर सगळे normal report येतात.

व्यक्ति परत्वे हे लक्षणे ,या लक्षणांची तीव्रता पण बदलत असते , प्रकृती ,आहार विहाराच्या सवयी तसेच ऋतूनुसार ही लक्षणे बदलत असतात.
अगदी उत्साह न वाटणे यापासून तर अनेक मोठ्या आजारांपर्यंत .....
इतर अनेक कारणांबरोबर बिघडलेली पचनसंस्था हे सर्व कारणांचे मुळ कारण नक्कीच असू शकते.


थोडे महत्त्वाचे

लहान मुलांना वारंवार सर्दी होत असेल‌ तर त्यांच्या
मलप्रवृत्तिच्या सवयी ,खाण्याच्या सवयी,यांचा जवळचा संबंध असतो.लगेच औषधी देण्यापेक्षा थोडे आहारात बदल केले ,तर मलप्रवृत्ती नीट होऊन त्रास कायमचा बंद होऊ शकतो.

स्वस्थ रहा
मस्त रहा
जय आयुर्वेद 😊🙏

धन्यवाद 🙏

'वरद' आयुर्वेद व पंचकर्म कॉस्मेटिक चिकित्सालय, नाशिक.
८९९९९६४५३७

मलावष्टंभ                             भाग १  मलावष्टंभ------ मलाचा अवष्टंभ                         मलाचा अवरोध          ...
20/11/2021

मलावष्टंभ
भाग १

मलावष्टंभ------ मलाचा अवष्टंभ
मलाचा अवरोध
मल बाहेर न पडणे

मल-- शरीराच्या पचन क्रियेत शरीरा बाहेर टाकला जाणारा पदार्थ म्हणजे 'मल '
शरीरात रस ,रक्त ,मांस,...असे सात धातू आहेत ,त्यांचे पण मल आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत.
या ठिकाणी आपण मुख्य मलांविषयी माहीती घेणार आहोत.
मलाचा अवष्टंभ म्हटला की फक्त पोट साफ न होणे एवढाच अर्थ होतो का ???
तर नाही ,मल तीन असतात.
पुरीष
स्वेद
मुत्र
हे तिन्ही मल शरीराच्या बाहेर योग्य प्रमाणात,योग्य वेळी बाहेर न पडणे म्हणजे अवष्टंभ म्हणू शकतो.
आपल्याला रोज मल प्रवृत्ती होतेय का,कोणत्या वेळी होतेय,किती वेळ लागतोय,होतांना पोटात दुखतेय का, जाऊन आल्यावर काही त्रास होतोय का तसेच
आपल्याला घाम येतोय का किंवा अजिबातच येत नाही आहे किंवा अधिक प्रमाणात येतोय ,याकडे आपले बरेच वेळा दुर्लक्ष होते ,तसेच मूत्र प्रवृत्तीच्या बाबतीत ही होते.
प्रत्येकाने वार्षिक investigation करण्याअगोदर
आपले दैनंदिन दिवसातील हे सहज होणारे ,खर्चीक नसणारे स्वतः चे परीक्षण केले तर योग्य उपाय योजना करुन हे लक्षण चिरकालीन म्हणजे जीर्ण अवस्थेत जाण्या आधी आपण दूर करु शकतो.
कुठलाही व्याधी होण्या आधी शरीर आपल्याला काही लक्षणे दाखवतात तसेच मलाचा अवरोध हा व्याधी नसून अनेक व्याधीचे पूर्वरुप म्हणजे व्याधी होण्याअगोदरच्यालक्षणांमध्ये यांचा अंतर्भाव आहे .
म्हणजे हे स्पष्ट होते की जर आपण मलावष्टंभ वेळीच दूर केला तर अनेक व्यांधींपासून सहजच दूर राहू शकतो.


मलावष्टंभ दूर होण्यासाठी चुकीचे केले जाणारे प्रयोग

सकाळी उठल्यावर व दिवसभरात गरज नसतांनाही अधिक पाणी पिणे
प्रमाणाच्या बाहेर गरम पाणी वारंवार सेवन करणे
चहा , कॉफी, सारखे पेय पदार्थ अधिक घेणे
सिगरेट ,तंबाखू,मिस्त्री सारखे पदार्थ अधिक सेवन
हिरवी मिरची ,तिखट पदार्थ अधिक आहारात घेणे
वारंवार त्रिफळा चूर्ण ,पोटसफा सारखे चूर्ण अधिक प्रमाणात घेणे
अधिक प्रमाणात लंघन, उपवास करणे
यासारखे अनेक चुकीच्या गोष्टी करुन आपण आतड्यांना अधिक रुक्षता आणतो व मलावष्टंभ दूर होण्या ऐवजी अजून च वाढतो.

याविषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या भागात

तोपर्यंत एक महत्त्वाची सुचना

आपल्या मुलांना लहान पणा पासूनच स्वतः घ्या शरिराचे निरिक्षण करण्यास शिकवूया
आहारात कोरडे पदार्थ न घेता स्निग्ध पदार्थ जास्त घेऊया
काय खाल्ले की काय त्रास होतो हे त्यांचे त्यांनाच कळेल व आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश होऊन कुरकुरे सारखे रुक्ष पदार्थ दूर होतील
व प्रतिकार क्षमता आपोआप निर्माण होईल.

जाणुन घेऊया पुढील भागात

मलावष्टंभाची प्रमुख कारणे
प्रमुख लक्षणे

स्वस्थ रहा ,मस्त रहा
जय आयुर्वेद 🙏🙏😊

वरद आयुर्वेद पंचकर्म कॉस्मेटिक चिकित्सालय
नाशिक,८९९९९६४५३७

Address

Nashik

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919420002376

Alerts

Be the first to know and let us send you an email when Varad Ayurved Panchkarma and Cosmatic Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Varad Ayurved Panchkarma and Cosmatic Center:

Shortcuts

Share