Nisargved

Nisargved Nisargved
We are giving you only 3 simple tips for a healthier life.
1) Seasonal diet (Rutucharya)

15/08/2026
पाऊस आणि मिश्रीच्या डब्बीतील आठाणे!पावसाळा म्हटलं की शरीरात वात वाढणं हे आपसूकच आलं.•पोट बिघडणं, •काही कारण वाटत नसताना ...
30/06/2026

पाऊस आणि मिश्रीच्या डब्बीतील आठाणे!

पावसाळा म्हटलं की शरीरात वात वाढणं हे आपसूकच आलं.

•पोट बिघडणं,
•काही कारण वाटत नसताना डोकं दुखणं,
•अंग मोडून येणं,
•भूक न लागणं,
•कंबर-पाठ दुखणं,
•कधी प्रसन्न वाटणं तर कधी नैराश्य येणं,
•झोप न लागणं. इ. शरीरात वात वाढल्याची लक्षणं दिसतात.

पूर्वी आमची आज्जी पावसाळा सुरु झाली की आम्हा भावंडांना एकत्र बोलवायची आणि म्हणायची जो कुणी हा कोरा चहा पिणार त्याला मी गोळ्या खायला आठाणे देणार. आम्ही खायला आठाणे मिळणार म्हणून लगेच मी, मी करत आम्ही उभे राहायचो.

पावसाळ्यातील वाढणाऱ्या वातावर काही प्रमाणात उपाय म्हणून आज्जी आम्हाला सुट्टी दिवशी उपाशी पोटी कोऱ्या चहात चमचाभर एरंडेल तेल प्यायला द्यायची. त्याने खेळता खेळता पोटात कळ यायची. घरी आल्यावर खळखळून २-३ वेळेस पोट साफ व्हायचं. मग दिवसभरात जेव्हा भूक लागेल तेव्हा मूग डाळ भात खायला द्यायची. आणि मग ठरल्याप्रमाणे मिळालेल्या त्या आठाण्याचे दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर मधल्या सुट्टीत आम्ही गोळ्या किंवा एखादा पेरू विकत घेऊन खात असू.

आज्जी बाईचा बटवा आता सहसा कुठे पाहायला मिळत नाही. जुनं ते सोनं आपण आता हरवून बसलोय. या अशा उपायांनी शरीरात वाढणारी लहान लहान लक्षणे त्या त्या लहान उपायांनी बाहेर पडत होती. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहून व्याधी सहसा जवळ येत नसत. परंतु आता मात्र थोडं काही झालं की गुगल बाईला विचारून आपण मेडिकलची औषधं सहज उपलब्ध करत आहोत. याने कुठल्याही व्याधीचा प्रवास हा १ रुपयाच्या गोळी पासून सुरु होऊन तो ४ लाखांच्या ऑपेरेशनपर्यंत कधी पोहोचतो याची जाणीव आपल्याला हातात बिल आल्यावरच होते.

असो आजही पाऊस सुरु झाला की आमच्या आज्जीच्या मिश्रीच्या डब्बीतील त्या आठाण्याची आठवण नेहमी होते. तुमच्याही अशा आज्जी सोबतच्या आठवणी असतील तर लिहा आणि आम्हाला पाठवा.

धन्यवाद!🙏🏻

डॉ.स्वप्नील घाटगे!
निसर्गवेद -Pain Heal Ayurveda!
Bavdhan, Pune.
Naupada, Thane(1st Sunday of every month) 5th July 26.
☎️ 8767566627.

उष्माघाताचे खूप रुग्ण वाढत आहेत.त्रास काय होऊ शकतो ?१)नाकातून रक्तस्त्राव,२)हात, पाय, पोट व डोळ्यांची जळजळ३)अशक्तपणा,४)भ...
02/05/2026

उष्माघाताचे खूप रुग्ण वाढत आहेत.

त्रास काय होऊ शकतो ?

१)नाकातून रक्तस्त्राव,
२)हात, पाय, पोट व डोळ्यांची जळजळ
३)अशक्तपणा,
४)भूक मंदावणे,
५)चक्कर येणे,
६)लघवी पिवळी अथवा लाल रंगाची होणे,
७) उलटी, जुलाब होणे.

उपाय:
१)काय करावे ?
बाहेरून घरात आल्यावर लगेच अतिमात्रेत फ्रीज मधील थंड पाणी पिऊ नका. थोडा वेळ थांबून मग घोट घोट माठातील वाळा किंवा चंदनयुक्त थंड पाणी प्या. यामुळे शरीरातील पेशींना त्वरित ऊर्जा भेटते. शरीरातील रस धातूचे प्रीणन कर्म उत्तम प्रकारे घडते.

२)काय पिणे टाळावे ?
उन्हाळ्यात ताक पिणे टाळावे. ताक व दही हे स्पर्शाने थंड आहेत परंतु गुणधर्माने उष्ण आहेत. उन्हाळ्यात नियमित ताकाचे व दह्याचे सेवन करणाऱ्यांस पित्ताचा म्हणजेच उष्णतेचा अधिक त्रास वाढताना दिसतो. यातूनच शितपित्तासारखे त्वचा विकार उत्पन्न होतात.

३)काय प्यावे ?
लिंबू सरबत, कोकम सरबत, उसाचा रस, सोलकढी, खर्जुरादी मंथ(आयुर्वेदिक औषध घरी बनवता येते), वाळा सरबत(धूतपापेश्वर फार्माचे -शीतसुधा), चंदन सरबत इ.प्रकारचे सहज घरी बनवता येतील असे सरबत या काळात प्रकृतीप्रमाणे प्यायला हरकत नाही.

अधिक माहितीकरता: 8767566627

डॉ.स्वप्नील प्र. घाटगे!
निसर्गवेद -Pain Heal Ayurveda!
Bavdhan, Pune 21.
Naupada, Thane (प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी).

Address

303 Fortune Plaza, NDA-Pashan Road Bavdhan
Pune
411021

Telephone

+919022170470

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nisargved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nisargved:

Shortcuts

Share