नमस्कार , मी श्रीकांत सुरेश गायकवाड, मुळचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेळगांव (आर) या गावचा मी , माझे पाचवी ते बारावीपर्यंंत चे शिक्षण हे गावातील शेळगांव हायस्कूल शेळगांव या माध्यमिक शाळेत झाले. माझे माध्यमिक शिक्षण हे श्री स्वामी समर्थ हाॅटेल (मालक - पांडुरंग सपाटे 8975129412) मध्ये काम करत केले. बारावीच्या नंतर शिक्षणासाठी आणि मनात काहीतरी वेगळं करायचं म्हणून पुण्यवान पुण्यात Diploma
mechanical engineering ला प्रवेश घेतला. शेवटच्या वर्षात मी 80% गुण मिळवून उत्तीर्ण झालो. पुढे जाऊन जगातील सगळ्यात मोठ्या Tetra Pak Company (World's largest company in packaging sector ) मध्ये तीन वर्षे काम केले. पण मनात काहीतरी नवीन करण्याची गरमी गुरमी गप्प बसू देत नव्हती. चालू चांगला पगार आणि चांगली नामवंत कंपनी मधून राजीनामा देऊन काम सोडले आणि स्थिरतेतून अस्थिरतेत आलो. मनात नुसता आगडोंब पेटलेला, आई-वडिल यांना कल्पना देऊन मी काम सोडलेले होते . सुरुवातीला मी शहाळे विकण्याचा व्यवसाय केला . पण अंगात असलेली चहा बनवायची कला अजिबात बसू देत नव्हती .त्यातूनच मी कुंदन तंदुरी चाय हे दुकान चालू केले पण त्या चहाचे आर्थिक बजेट जास्त असायचे. तंदुरी चाय हा 40 रुपयाला असायचा त्यामुळे या ठिकाणी फक्त धनदांडगे, श्रीमंत लोकच चहा प्यायला यायचे आणि विशेषतः त्या चहाचे आकर्षण होते म्हणून सुरुवातीला चांगले चालले पण नंतर ते तोट्यात चालले. पण डोक्यातला नवीन काही तरी वेगळं आणि जगापेक्षा वेगळं काहीतरी करायचा रहिमानी किडा गप्पच बसू देत नव्हता. मग डोक्यात आरोग्यासाठी हितकारक असलेल्या सेंद्रिय गुळाच्या चहाच्या पाठीमागे हात धुऊन लागलो. नुसता येड्यागत सेंद्रिय गुळासाठी हिकडं -तिकडं फिरू लागलो. पुण्याच्या जवळ असलेली सर्व सेंद्रिय गुळाचे कारखाने फिरुन प्रयोगासाठी गुळ खरेदी केला. जवळपास पन्नास ठिकाणांहून पन्नास किलो सेंद्रिय गुळ खरेदी केला. पन्नास प्रकारचे मसाले तयार केले. आणि घरात एकट्याला कोंडून घेतले. मनात ठरवले होते की, जोवर यश येेेत नाही तोवर शांत बसणार नाही. सोबतीला प्रेरणा देणारी मित्रसंपदा होती गुळाचा गुणकारी चहाची कल्पना नागीण सळसळ करत सुटली. सुरुवातीला सतत चहा नासायचा. काय करावं अन् काय नाही काहीच समजत नव्हतं. जवळपास 100 लिटर एवढे दुध वाया घालवून मी सेंद्रिय गुळाचा गुणकारी चहा यशस्वी केला . आणि लगेचच वेळ न घालवता एक टपरी भाड्याने घेतली आणि स्वतःच्याच नावाने श्री. जी. गुळाचा चहा नावाने पुण्यवान पुण्यात सुरूवात केली . पुण्यातील कोथरूड या गजबजलेल्या भागामध्ये कर्वे नगर परिसरात आजही टपरी आहे . तसेच वडगाव मावळ पंचायत समिती समोर आमचे पहिले आउटलेट सुरू केले त्याला आज ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता भविष्यात या व्यवसायाला मोठं स्वरूप देण्याबरोबरच माझ्यासारख्या प्रत्येक नव उद्योजकाला सहकार्य करून त्याला त्याच्या पायावर स्वावलंबी बनवायचा ध्यास धरला आहे . आपल्या बांधवांना आयुष्यात काहीतरी कामधंदा करून पैसा कमवावे वाटते. समाजात मान-सन्मान मिळवावा. रोजगार उपलब्ध करून द्यावा. या सर्व गोष्टींसाठी मी फ्रेंचायजी सुरू केली आहे. संपर्क साधून जास्तीत-जास्त नव-उद्योजकांनी या नवीन आणि भविष्यात अतिशय उत्तम पणे चालू शकणार्या व्यवसायाचे मालक व्हावे. त्याबरोबरच आज आम्ही क्लाउडक्यू कंपनी (Ref: +919820775095 आदित्य परांजपे सर), सृजन सोल्यूशन कंपनी बरोबरच आम्ही इतर कंपन्यांनाही चहा काउंटर सेवा देतो.