IndiEats

IndiEats Pune-based network of home kitchens, farmers, goshalas & small-scale food businesses. Delivering fresh, homemade, preservative-free food globally!

   #सोलर_ड्राइड_कडधान्य  #तयार_ओले_वाटण  #विद्यार्थी_स्पेशल 093566 87224 शून्य स्किल्स असूनही मिसळ करता येऊ शकते ती अशी!...
08/08/2026


#सोलर_ड्राइड_कडधान्य #तयार_ओले_वाटण
#विद्यार्थी_स्पेशल
093566 87224

शून्य स्किल्स असूनही मिसळ करता येऊ शकते ती अशी! आणि मिसळच कशाला, कोणतीही उसळ अगदी झटपट करता येईल!

#पद्धत_1

१. सोलर ड्राईड मोड आलेली मटकी (किंवा इतर कोणतेही कडधान्य) पॅक घ्या. एका "मोठ्या" भांड्यात कडधान्य काढून घ्या.

२. एका भांड्यात पाणी गरम करून घ्या. कडधान्य ठेवलेल्या भांड्यात ओता. तासाभरात कडधान्य परत फुलून येईल आणि मोड आलेली रसरशीत मटकी तयार होईल! ही मटकी भेळ, सॅलड इत्यादी कुठेही वापरता येईल.

३. कुकरमध्ये मिसळीचे तयार ओले वाटण तेलावर 2 मिनिटे परतून घ्या आणि त्यात मटकी आणि पाणी टाकून 2 शिट्ट्या काढा. किंवा मटकी आधीच वेगळी शिजवून रस्सा वेगळा तयार करू शकता.

#पद्धत_2

जर मिसळ करायची हे फिक्स असेल आणि कडधान्य इतर कुठल्या पदार्थात वापरायचे नसेल, तर मग थेट कुकर मध्ये तयार वाटण किंचित परतून घ्या आणि त्यात वाळवलेली मटकी धुवून टाका. भिजवून ठेवायची गरज नाही. कुकरला 2 शिट्ट्या काढा. गरमागरम मिसळ तयार!!

कोणतेही कडधान्य आणि वाटणांच्या चार प्रकारांपैकी कोणताही एक प्रकार वापरून झटपट उसळी तयार करता येतील!

#कडधान्य प्रकार :- 100 gm pack

▪️छोले , राजमा - 100 gm - ₹55

▪️चणा, मटकी, मूग, चवळी, कुळीथ, अक्खा मसूर, मेथ्या, कडवे वाल, काळा घेवडा - 100 gm - ₹50

#वाटण प्रकार :- 150 gm pack - 150/-

कोल्हापुरी मिसळ मसाला वाटण
कोल्हापुरी (कमी तिखट) मिसळ मसाला वाटण
पुणेरी मिसळ मसाला वाटण
काळा मसाला वाटण
आमटी मसाला वाटण

श्रावणातले उपवास आता सुरू होतीलच आणि सोबतच येईल भगर विरहित उपवास थालपीठ भाजणीची मागणी! केळी पीठ टाकून अधिक पौष्टिक पर्या...
07/08/2026

श्रावणातले उपवास आता सुरू होतीलच आणि सोबतच येईल भगर विरहित उपवास थालपीठ भाजणीची मागणी!

केळी पीठ टाकून अधिक पौष्टिक पर्याय उपलब्ध आहे.

रेडी तू कूक असल्यामुळे तुम्हाला यात काहीही टाकायची गरज नाही. फक्त मळा आणि थालीपीठ लावा! 😊

093566 87224

 #किस्साआज डिलिव्हरीचा मोठा dispatch होता. सकाळपासून नुसता गोंधळ! जनरली काय पद्धत आहे आमची की करंजी, लाडू, वड्या, चकली ह...
07/08/2026

#किस्सा

आज डिलिव्हरीचा मोठा dispatch होता. सकाळपासून नुसता गोंधळ! जनरली काय पद्धत आहे आमची की करंजी, लाडू, वड्या, चकली ह्या गोष्टी डिलिव्हरीच्या दिवशी सकाळी फ्रेश येतात. आणि ताबडतोब पॅक होऊन अर्ध्या तासात डिलिव्हरी सर्व्हिस घेऊन जातात. म्हणजे हा अर्धा तास डोक्याची मंडई करणारा असतो!

आज सकाळी सकाळी मला इंडस फूड्सच्या गौरीताई लाडू देऊन गेल्या. जरा वेळात मी पॅकिंगला सुरुवात केली. करता करता असं लक्षात आलं की मूग गूळ लाडू ऑर्डरमध्ये तर दिसत आहेत, पण आलेल्या स्टॉक मध्ये दिसत नाहीत.

एरवीची गोष्ट असती तर शांत मनाने नेमका हा गोंधळ झाला कसा हे बघता येतं. पण त्या अर्ध्या तासाच्या गोंधळात मी नेमक्या कोणत्या गौराईचा हा लाडू आहे ते नीट पाहिलंच नाही. तर ऑर्डर होती गौरी दाते यांच्या लाडूला आणि मी स्टॉक चेक करत होते गौरी मुळे यांच्या लाडूंचा!

बदाम सात मध्ये नाही का, जर आपण पत्त्यांचे दोन कॅट घेतलेले असतील, तर दोन दोन सत्या, दोन दोन पंज्या असं येत राहतं. आणि आपलं डोकं आऊट करत राहतं. तशा माझ्याकडे दोन दोन लाडूवाल्या गौरी, दोन कुलकर्णी फूड्स, दोन रमा फूड्स असा प्रकार आहे!

लगेच गडबडीने मी गौरी मुळे यांना फोन केला आणि झालेला गोंधळ एक्सप्लेन करून मला प्लीज लाडू आणून देता का म्हणून विचारलं. त्याही बिचाऱ्या खूप चांगल्या आहेत. आणि त्यांचे नेमके हे लाडू तयार होते. लगेच मिस्टर मुळे आले आणि लाडू देऊन गेले.

साधारण दहा मिनिटामध्ये गौरी दातेंच्या लाडूंचा स्टॉक सुद्धा आलाच. त्यात बघते तर काय, मूग गूळ लाडू!

नीट ऑर्डर बघितली तर तशीच होती ती! जाऊ दे म्हणलं, आपणच खाऊन टाकू आता.

पण खरा किस्सा तर पुढे आहे.

पाच मिनिटांपूर्वी फोन वाजला आणि स्क्रीनवर जर्मनीहून आलेला मेसेज दिसला

"आज माझ्या सासू सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर तुम्ही पटकन संध्याकाळपर्यंत मूग गुळ लाडू आणि इतर काही थोडासा खाऊ पाठवू शकाल का हो?! आम्हाला त्यांना काही तरी वेगळं द्यायचं आहे केकपेक्षा! " 😁😁😁

म्हटलं "अहो मी कोण देणार?! त्यांच्या नशिबात लिहिलेत हे लाडू!"

#माझ्याबिझनेसकडेदेवमाझापाहतोआहे !

#दानेदानेपेलिखाहैखानेवालेकानाम !

#ह्याप्पीऍनिव्हर्सरीकाकाकाकू!

06/08/2026

Cookies
with Pure Love and Pure Ghee!!

Order at Indieats.in

तुपातल्या कुकीज!093566 87224 फोटो मधून सुगंध पाठवता आला असता तर खरंच तुम्ही आम्हाला शाबासकी दिली असती इतका सुरेख खमंग वा...
06/08/2026

तुपातल्या कुकीज!
093566 87224

फोटो मधून सुगंध पाठवता आला असता तर खरंच तुम्ही आम्हाला शाबासकी दिली असती इतका सुरेख खमंग वास या कुकीजचा डबा उघडल्यानंतर येतो!

मला जाहिरात करायची गरजच नाही. तुम्ही फक्त ज्यांनी खाऊन बघितले आहे त्यांना विचारा!

▪️🍪 #कुकीज - साजूक तूप
गव्हाची नानकटाई (साखर) - 235/-
गव्हाची चोकोचिप कुकीज (साखर) 235/-
गव्हाची बदाम कुकीज (साखर) 270/-
ज्वारी साधी कुकीज (साखर) - 225/-
ज्वारी साधी कुकीज (गुळ) - 230/-
ज्वारी नारळ कुकीज (साखर) - 245/-
नाचणी ओट्स कुकीज (साखर) - 225/-
नाचणी ओट्स कुकीज (गुळ) - 240/-
मल्टिग्रेन कुकीज (साखर) - 240/-

https://wa.me/919356687224

05/08/2026

Ladoo just a click away!!

Indieats.in
9356687224

 #पीठ स्पेशल093566 87224 येत्या शनिवारी खालील पीठे  तयार करून देऊ शकतो. ▪️ इन्स्टंट  #दोसा / घावन / आंबोळी पीठ* (२५० ग्र...
05/08/2026

#पीठ स्पेशल
093566 87224

येत्या शनिवारी खालील पीठे तयार करून देऊ शकतो.

▪️ इन्स्टंट #दोसा / घावन / आंबोळी पीठ* (२५० ग्रॅम)
आंबोळी पीठ - 85/-
घावन पीठ - 65/-
ज्वारी मूग डोसा पीठ - 70/-
ज्वारी नाचणी डोसा पीठ - 65/-
सप्तधान्य आंबोळी पीठ - 80/-
भाजणी डोसा पीठ - 75/-
ओट्स डोसा पीठ - 100/-
पेसरट्टू (तांदूळ मोड आलेले मूग) - 100/-
ज्वारी लाल चवळी - 90/-
कडधान्य डोसा - 100/-

▪️ #रोजची पीठे*
लोकवन 90/- kg
लोकवन+सिहोर 105/- kg
नाचणी पीठ 100/- kg
ज्वारीचे पीठ 100/- kg
बाजरीचे पीठ 100/- kg
तांदूळ पिठी (मोदक) - 150/-
तांदूळ पीठ (साधे) - 80/-
बेसन (५०० ग्रॅम) - 80/-
मूग डाळ पीठ (२५० ग्रॅम) - 70/-

▪️ #पौष्टिक पीठे* (२५० ग्रॅम)
नाचणी सत्व - 75/-
सातू पीठ - 75/-

▪️ #स्पेशल पीठे*
कळणा भाकरी पीठ (५००ग्रॅम) - 75/-
बाटी पीठ (५०० ग्रॅम) - 70/-
पंचरत्न मिक्स मिलेट पीठ (२५० ग्रॅम) - 80/-
सहा डाळींचे मिक्स पीठ (२५० ग्रॅम) - 100/-
धपाटा पीठ (२५० ग्रॅम) - 85/-

▪️ #भाजणी (200 gm)*
थालपीठ भाजणी - 50/-
रेडी टू कुक भाजणी - 70/-
भाज्या घातलेली थालपीठ भाजणी - 70/-
(बीट / गाजर / पालक / मेथी अशा विविध भाज्या)

कोकणी वडे भाजणी - 70/-

उपवास थालिपीठ भाजणी - 70/-
RTC उपवास भाजणी - 80/-
भगरविरहित केळी उपवास भाजणी - 80/-

▪️ #दलिया / रवा* (५०० ग्रॅम)
ज्वारी कण्या / दलिया - 60/-
नाचणी रवा - 60/-

▪️ #ओली पीठे* (५०० ग्रॅम)
ज्वारी डोसा पीठ - 70/-
नाचणी डोसा पीठ - 70/-

#ऑर्डर* - https://wa.me/919356687224

04/08/2026



"खाऊ स्पेशल बुधवार" या कल्पनेला  #तुफान प्रतिसाद मिळाल्यामुळे आता "खाऊ स्पेशल रविवार" सुद्धा करतोय!! उद्याच्या तुमच्या ख...
04/08/2026

"खाऊ स्पेशल बुधवार" या कल्पनेला #तुफान प्रतिसाद मिळाल्यामुळे आता "खाऊ स्पेशल रविवार" सुद्धा करतोय!!

उद्याच्या तुमच्या खाऊच्या डिलिव्हरी आज निघाल्या आहेत.
तसंच शनिवारीसुद्धा आम्ही तुम्हाला खाऊ बनवून देऊ!

😋*खाऊ स्पेशल रविवार!!* 😋

*Booking* - 6 ऑगस्ट, गुरुवार पर्यंत
*Delivery* - 8 ऑगस्ट, शनिवार संध्याकाळ पर्यंत

▪️ 🍌 #केळी_वेफर्स - घरी बनवलेले अतिशय फ्रेश आणि कुरकुरीत

#फ्लेवर्स - सैंधव, काळीमिरी, मसाला, पेरी पेरी आणि चटपटा

120/- (180 gm)

▪️ 🌮 #दोसा पीठ
ज्वारी आणि नाचणीचे आंबवलेले ओले पीठ
घरगुती आणि पौष्टिक असे हे पीठ तुम्ही डोसा, इडली, आप्पे असं काहीही बनवण्यासाठी वापरू शकता!

ज्वारी / नाचणी ओले पीठ
70/- (500 gm)

▪️🍟 #खाऊ (250 gm)
भाजणी चकली - 165/-
खारे आणि गोड शंकरपाळे - 120/-
मेथी स्टिक्स - 120/-
मक्याचा चिवडा - 125/-
मुरमुरा भडंग - 125/-
डाएट चिवडा - 120/-

▪️🧆 #लाडू - साजूक तुपातले
बेसन लाडू - 165/-
रवा नारळ लाडू - 150/-
मूग गूळ लाडू - 165/-
डिंक लाडू - 240/-
मेथी लाडू - 240/-
मखाना लाडू - 300/-
पौष्टिक लाडू - 175/-

▪️🧆 #लाडू - देशी गाईच्या तुपातले आणि सेंद्रिय गुळातले लाडू
मिक्स लाही गूळ लाडू - 280/-
नाचणी डिंक गुळ लाडू - 200/-
मूग गूळ लाडू - 205/-

▪️🍪 #कुकीज - साजूक तूप
गव्हाची नानकटाई (साखर) - 235/-
गव्हाची चोकोचिप कुकीज (साखर) 235/-
गव्हाची बदाम कुकीज (साखर) 270/-
ज्वारी साधी कुकीज (साखर) - 225/-
ज्वारी साधी कुकीज (गुळ) - 230/-
ज्वारी नारळ कुकीज (साखर) - 245/-
नाचणी ओट्स कुकीज (साखर) - 225/-
नाचणी ओट्स कुकीज (गुळ) - 240/-
मल्टिग्रेन कुकीज (साखर) - 240/-

ह्याशिवाय आपले नेहमीचे पीठे, भाजणी, चटण्या, लोणची इत्यादी आहेच!

#ऑर्डर -

www.IndiEats.in
https://wa.me/919356687224

अंतरानुसार डिलिव्हरी चार्जेस लागू

   #परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढच्या महिन्यात आपली अनेक पाखरं भरारी मारून परदेशात जाणार आहेत. आत्तापर्य...
03/08/2026


#परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

पुढच्या महिन्यात आपली अनेक पाखरं भरारी मारून परदेशात जाणार आहेत. आत्तापर्यंत दुनियाभरच्या परीक्षा, फॉर्म्स, कागदपत्रं आणि अजून काय काय त्यांनी मॅनेज केलंय. Admit पण आलंय. तिकिटं बुक झालीत. आता फक्त निघायचं आहे आणि पलीकडच्या देशात जाऊन पोहचायचं आहे. की झालं!!
.. असं फक्त पोरांना वाटतंय..

प्रत्यक्षात आई बाबांना व्यवस्थित ठाऊक आहे की अभी तो पार्टी शुरू हुई है! आता जरा पोरांना दाल आटे के भाव कळतील! घरी कसं आयतं गरम गरम खायला मिळत होतं चार वेळेला त्याची किंमत कळेल. आई बाबा कसे आपल्या डायटीशनचा रोल करत पोटात सगळं सगळं व्यवस्थित जाईल याची काळजी वहात होते हे जाणवेल.

इकडे आई-बाबांना घोर लागला असेल की माझ्या पोराला इतका अभ्यास सांभाळून पाच मिनिटं तरी मिळतील का स्वतःसाठी काहीतरी करून खायला? की हे पोर बाहेरचेच खात बसणार?!!

हम्मम .. पाच मिनिटं!

समजा मिळाली तरी पुरेशी असतील का ही "पाच मिनिटं"?

खालच्या फोटोमध्ये पदार्थ जरी वेगवेगळे दिसत असले तरी सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. जी तुमच्या कामाची आहे!

या सगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी तयारीचा वेळ? साधारणतः पाच मिनिटं!

मग ते पराठे, थालपीठ, आंबोळी किंवा डोसा असू दे..
उसळी असू देत.. ग्रेव्ही असू देत.. उपमा असू देत.. नाही तर अगदी साबुदाणा वडा असू दे..

सगळं फक्त तयारीला 5 मिनिटं देऊन होऊ शकतं. कसं?

तर #इंडिइट्स वर उपलब्ध #प्रिझर्व्हेटिव्ह_फ्री पर्याय वापरून!

मुळात आपल्याला ना स्वयंपाक करण्यापेक्षा त्याच्या तयारीचा जास्त कंटाळा आलेला असतो. भाज्या आणा, धुवा, चिरा. कडधान्य भिजवा, त्यांना मोड आणा. कोण करणार इतकं? म्हणूनच आपल्याला पॅकेट फोडून, ते पाण्यात ओतून शिजवून खायला फार फार आवडतं!

हरकत नाही, पॅकेट फोडण्याचा आनंद देऊ ना तुम्हाला!आणि ती प्रिझर्वेटिव्ह फ्री असतील हे ही बघू!

तर मंडळी, खास करून बाहेर जाणाऱ्या मुलांना स्वयंपाक करणं सोपं जावं म्हणून आम्ही उद्यापासून आमच्याकडे असणाऱ्या सर्व उपलब्ध पर्यायांची सविस्तर ओळख करून देऊ. म्हणजे तुम्ही त्यानुसार प्लॅनिंग करून जातानाच मुलांना सुसज्ज पाठवू शकता!

Stay Tuned!!

Address


Opening Hours

Monday 09:00 - 17:00
Tuesday 09:00 - 17:00
Wednesday 09:00 - 17:00
Thursday 09:00 - 17:00
Friday 09:00 - 17:00
Saturday 09:00 - 17:00
Sunday 09:00 - 17:00

Telephone

+919356687224

Alerts

Be the first to know and let us send you an email when IndiEats posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to IndiEats:

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Health & Beauty Business?

Share