17/05/2023
अंड्यातील कोलीन हा घटक शरीरामध्ये निर्माण होणारा दाह कमी करतो. तसेच मानवी रक्तातील घातक कोलेस्ट्रॉल (LDL) चे प्रमाण कमी करुन आवश्यक कोलेस्ट्रॉल (HDL) चे प्रमाण वाढविण्यास मदत करीत असल्यामुळे हृदय रोगाची जोखीम कमी करते. तसेच कोलीन हे मेंदू आणि चेतासंस्थेच्या आरोग्यासाठी पूरक पोषणमूल्य असून मेंदू पेशी निरोगी राहण्यासाठी आवश्यक असणारी फॉस्फोलिपीडस हे कोलीनमुळे मिळतात. तसेच कोलीनमुळे मुडदूस, अल्झायमर, हाडाची ठिसूळता आणि मधूमेह यांची जोखीम टाळता येते.
वयोमान परत्वे होणारी शरीराची झीज, ताणतणाव, मोतीबिंदू, प्रोस्टेट ग्रंथीची वाढ, कर्करोग इत्यादी कमी करण्यास अंड्यातील सुक्ष्म पोषकमूल्य सेलिनियम उपयोगी ठरते. निरोगी केसांची वाढ, नखांचे आरोग्य, नितळ चमकदार त्वचा व शरीर वाढीस अंडे हे आवश्यक असल्यामुळे सर्वांच्या आहारात अंडे असणे गरजेचे आहे. अंगणवाडी, बालवाडी तसेच शाळांमधून शिक्षकांनी अंड्यांचे महत्व व मुलांना पटवून दिल्यास निरोगी सदृढ भारत निर्माण होण्यास मदत होईल, यात शंका नाही.
अश्याच विविध माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करीत जा
https://www.facebook.com/profile.php?id=100092260082474