Somnath Ayurved Rasshala

Contact the business

Somnath Ayurved Rasshala Since 2004, "Somnath Ayurved Rasshala" gives best ayurvedic medicines to customers and will committe

We are happy to share that - Today our product became amazon's No. 1 choice and started appearing top in respective sear...
17/04/2022

We are happy to share that - Today our product became amazon's No. 1 choice and started appearing top in respective search categories.
It's been 2 years now since we started online journey of delivering ayurvedic products to people through amazon.

We are really thankful for all your support. 😊

Product details are:
Acisom Tablet - Ayurvedic Antacid/Helpful in relieving acidity
https://www.amazon.in/Acisom-Tablet-Acidity-Ayurvedic-Antacid/dp/B083V5JFWH
Somarsh Tablet - Helpful in relieving piles problems
https://www.amazon.in/Somarsh-Tablet-Gives-relief-bleeding/dp/B08HKB2XR9

शिवण हा एक मोठा पानझडी वृक्ष आहे. याचे खोड सरळ व त्यावर राखाडी पिवळट रंगाची साल असते. याला जमिनीला समांतर वाढणार्‍या पां...
01/12/2021

शिवण हा एक मोठा पानझडी वृक्ष आहे. याचे खोड सरळ व त्यावर राखाडी पिवळट रंगाची साल असते. याला जमिनीला समांतर वाढणार्‍या पांढर्‍या फांद्या येतात. याला पिवळी-करड्या रंगाची, अंडाकृती किंवा हृदयाकृती पाने व लांबट गोल, रसाळ, पिवळट शेंदरी फळे येतात. या वृक्षाची मुळे, कोवळी पाने, फळे व फुले ही उपयोगी अंगे आहेत. हे वृक्ष किनारपट्टीवर, हिमालयात, तसेच पानगळी जंगलामध्ये सर्वत्र आढळतात.

याची मुळे कटूदीपक व आनुलोमिक असतात. शिवणीचे मूळ दशमुळापैकी एक आहे. कोवळी पाने शीतल व स्नेहक असतात. फुले व फळे तृषाहर, दाहशामक व स्नेहक असतात. या वनौषधीचा वातशामक म्हणून चांगला उपयोग होतो.

मूत्रघातात शिवणमूळ थंड पाण्यात उगाळून द्यावे. गर्भधारणेच्या प्रथमावस्थेत शिवणमूळ, मंजिष्ठ व शतावरी यांचे वस्त्रगाळ चूर्ण दुधातून देतात. खोकला, परमा या रोगात कोवळ्या तुर्‍यांचा रस सुगंधी पदार्थाबरोबर देतात. उन्हाळ्यात डोकेदुखीवर कोवळी पाने दुधात वाटून डोक्यावर चोळतात. आम्लपित्तात शिवणीचा पाला, आघाडा मूळ व सावरीचे मूळ गाईच्या दुधात वाटून देतात. अंगाची आग होत असल्यास पानांचा रस अंगास चोळतात. ज्वरात फळांचा काढा देतात. रक्तपित्ताचे शमन करण्यासाठी याची फळे मधाबरोबर खावीत. अंगावर पित्तामुळे गाठी उठणे, अंग सुजणे यावर सुकलेली फळे शिजवून, वाटून त्याचा कल्प दुधाबरोबर द्यावा.


ऐरण हे एक मोठे झुडुप आहे. हे जवळपास 30 फुटांपर्यंत उंच वाढते. फिक्कट खाकी रंगाच्या फांद्या असलेल्या या झाडाला समोरासमोर ...
28/11/2021

ऐरण हे एक मोठे झुडुप आहे. हे जवळपास 30 फुटांपर्यंत उंच वाढते. फिक्कट खाकी रंगाच्या फांद्या असलेल्या या झाडाला समोरासमोर गोलाकार त्रिकोणी पाने असतात. याला पांढरी, सुवासिक फुले येतात. फळे लंबगोलाकार करवंदाएवढी असतात. मुळे आणि पाने ही या झाडाची उपयोगी अंगे आहेत.
ऐरण तिखट, कडू, उष्ण, मधुर, तुरट, अग्निदीपक आहे. वायु, पडसे, सूज, कफ, अर्श, आमवात, मलावरोध, अग्निमांद्य, पंडुरोग, विषदोष, मेदोरोग इत्यादि रोगांचा नाश करते. वायु, कफ, सूज ज्या ज्या रोगात असतात त्या रोगात ऐरण वापरतात. दशमुळात ऐरण मूळ वापरले आहे. त्याचा मुख्य उद्देश शोथ कमी करणे हा आहे.
आमवातात व अंतरीज्वरात ऐरणमूळ सुंठ-मिर्यांबरोबर देतात. जलशोथात हिचा लेप करतात. वातरोगावर मुळाचे तेल बनवून लावतात. तसेच पक्षाघात, संधिवात व सुजेवर देखील मुळाचे तेल उपयुक्त आहे. शीत पित्तावर मुळाचे चूर्ण तुपाबरोबर दिले जाते. वसामेह व गुल्मावर मुळाचा काढा देतात.
संधा मुरगळल्यास सुजेवर किंवा वार्‍याने झालेल्या अंगदुखीत पाने ठेचून त्याचा लेप तयार करतात. शीतज्वरावर पाला मस्तकावर बांधतात. वाघचावड्यास पाला मीठ घालून वर बांधावा.




पाटला हा एक उंच, मोठा वृक्ष आहे. याची साल राखाडी रंगाची आणि जराशी खडबडीत असते. याची पाने संयुक्त असतात. फुले मोठी, विरळ,...
25/11/2021

पाटला हा एक उंच, मोठा वृक्ष आहे. याची साल राखाडी रंगाची आणि जराशी खडबडीत असते. याची पाने संयुक्त असतात. फुले मोठी, विरळ, सुवासिक, मळकट जांभळी आणि किरमिजी रंगाची असतात. या वृक्षाची साल, मुळे, आणि फुले याची उपयोगी अंगे आहेत.
याची साल कफघ्न व वातहर आहे. पाटला दशमुळापैकी एक आहे. फुले वाजीकर, पौष्टिक व शीतल आहेत. पाटला कफ आणि वातप्रधान रोगात वापरतात. मुळाच्या सालीचा घनवट भाजलेल्या व्रणांवर चोळतात. मूत्राघात या विकारात फुलांचा रस मधाबरोबर देतात. याच्या फुलांचा गुलकंद खाल्ल्याने पचनशक्ती वाढते. मुळे, पाने व फुले यांचा रस तापावर देतात.


कारवी हे एक बहुगुणी, महत्त्वपूर्ण झुडुप आहे. सह्याद्रीच्या डोंगरांत हे झुडुप नेहमी आढळते. या वनस्पतीने सह्याद्रि मध्ये ज...
12/11/2021

कारवी हे एक बहुगुणी, महत्त्वपूर्ण झुडुप आहे. सह्याद्रीच्या डोंगरांत हे झुडुप नेहमी आढळते. या वनस्पतीने सह्याद्रि मध्ये जमिनीची धूप रोखण्याचे मोठे कार्य केले आहे. उन्हाळ्यात जंगलातील चारा कमी झाल्यावर गवे, सांबर कारवीची कोवळी पाने खातात. तसेच या वनस्पतीच्या फुलांवर अनेक किटकही पोसले जातात.

या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे हिची पूर्ण वाढ होण्यास 7 वर्षांचा कालावधी लागतो. आणि तब्बल 8 व्या वर्षी ही वनस्पती जांभळ्या फुलांनी बहरते. या वनस्पतीला फक्त एकदाच फुले येतात. आणि हा बहर संपला की ही वनस्पती सुकून जाते.

कारवीची पाने विषारी असतात. ती माणसाला सेवन करण्यास जरी योग्य नसली तरी स्थानिक आदिवासी जमातींमध्ये हिचा वापर अनेक दाहक रोगांवर पारंपारिक औषध म्हणून करतात. पोटाच्या अनेक विकारांवर या वनस्पतीच्या पानांचा रस एक खात्रीशीर इलाज मानला जातो. कारवीचे औषधी उपयोग वैज्ञानिक संशोधनातून देखील सिद्ध झाले आहेत.




पुनर्नवा ही एक जमिनीवर सरपटत वाढणारी बहुवर्षायू, झाळकट, औषधी वनस्पती आहे. बारीक काळसर लाल फांद्या, जाड पांढरट मूळ, अंडाक...
22/07/2021

पुनर्नवा ही एक जमिनीवर सरपटत वाढणारी बहुवर्षायू, झाळकट, औषधी वनस्पती आहे. बारीक काळसर लाल फांद्या, जाड पांढरट मूळ, अंडाकृती पाने आणि लहान लाल-गुलाबी फुले असणारी ही वनौषधी सर्व प्रकारच्या जमीनिंत उगवते. हिला लहान आणि टोकाकडे रुंद, चिकट फळे सुधा येतात.

हिचे पंचांग औषधी आहेत. ही वनस्पती विरेचक, मूत्रजनक, दीपक, स्वेदजनक, कफघ्न, वामक आणि शोथहर आहे. अंतर्शोथ, बाह्यशोथ, हृदोगातील कास, श्वास, जलोदर या विकारात या वनस्पतीच्या मुळाचे चूर्ण, किंवा काढा देतात. पुनर्नवास सुथघ्न किंवा शोथघ्नी म्हणले जाते, याचा अर्थ जलोदर नष्ट करणारा असा होतो.

सुजेवर देखील पुनर्नवाचा उपयोग करतात. कुठल्याही कारणाने अंगावर सूज आल्यास पुनर्नवा, देवदार, सुंठ आणि वाळा यांचा काढा देतात. पुनर्नवाने आतड्यांची सूज देखील कमी होते, तसेच मुत्राघात किंवा मूत्रकृच्छ देखील बरे होते. काविळीत पित्त काढून टाकण्यासाठी पुनर्नवा देतात. दमा व श्वासनलिकाशोथात पुनर्नवा वेखंडाबरोबर देतात. कुपचनात पाल्याची भाजी देतात.

रातांधळेपण, डोळ्यातील फूल, खुपर्‍या ई. सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या समस्यांमध्ये याची ताजी मुळी योग्य मात्रेत उगाळून, पाण्यात किंवा मधात मिसळून अंजनासारखी डोळ्यात देतात. त्वचारोगात मूळ उगाळून लेप लावतात. ही वनौषधी रेचक असून शरीरात थंडावा आणते.



काळी मुसळी हे एक बहुवार्षिक, कंदवर्गीय क्षुप आहे. याचे कंद जमिनीत एक फुटापर्यन्त लांब वाढतात. ते बोटाएवढे जाड आणि आतून प...
05/07/2021

काळी मुसळी हे एक बहुवार्षिक, कंदवर्गीय क्षुप आहे. याचे कंद जमिनीत एक फुटापर्यन्त लांब वाढतात. ते बोटाएवढे जाड आणि आतून पांढरे असतात तर वरील बाजूस काळसर-उदी रंगाचे आवरण असते. जमिनीलगत निघणार्‍या लहान वृंतावर पिवळी फुले येतात. काळी मुसळी पावसाळ्यात खडकाळ डोंगर उतारावर रानावनात सर्वत्र भरपूर प्रमाणात आढळते.

काळ्या मुसळीचे कंद तीचे उपयोगी अंग आहे. ही स्नेहक, मूत्रजनक, बल्य व काहीशी वृष्य आहे. हिची क्रिया विशेषकरून मूत्रमार्गावर होत असते. ही वनौषधी नपुंसकत्वावर अतिशय प्रभावी आहे. दमा, कावीळ व मूळव्याधीवर कंद उगाळून देतात. जखमा भरून काढण्यासाठी व रक्तस्त्राव थांबविण्यासाठी देखील काळ्या मुसळीचा उपयोग करतात. विषयवासना वाढविणार्‍या औषधात कंदाचा उपयोग करतात. या वनस्पतीची दुधाबरोबर केलेली पेज परमा, मूत्रकृच्छा आणि अत्यार्त या विकारांत देतात.



14/06/2021
भारंगी ही एक तीन ते सहा फूट वाढणारी बहुवार्षिक झुडुप वर्गीय औषधी वनस्पती आहे. चौकोनी फांद्या असणार्‍या या वनस्पतीला लम्ब...
18/05/2021

भारंगी ही एक तीन ते सहा फूट वाढणारी बहुवार्षिक झुडुप वर्गीय औषधी वनस्पती आहे. चौकोनी फांद्या असणार्‍या या वनस्पतीला लम्ब वर्तुळाकार पाने, निळसर-पांढरी फुले आणि गोल जांभळी फळे येतात.

मूळ आणि पाने ही या वनस्पतीची उपयोगी अंगे आहेत.

भारंगीचे मूळ ऊष्ण, कडवट, कटू पाचक, दीपक, कफघ्न, ज्वरघ्न, श्वसहर, वातहर आणि शोथघ्न आहे.

भारंगीचे मूळ ज्वर किंवा कफ असलेल्या रोगात देतात. कफ जास्त वाढल्याने होणारा दमा, खोकला या विकारांत भारंगमूळ प्रामुख्याने वापरतात. सर्दी व घशातील शोष यावर भारंगमूळ सुंठ अथवा वेखंडाबरोबर देतात.

दम्यावर भारंगमूळ ज्येष्ठमध, बेहडा व अडुळसाची पाने यांचा काढा करून देतात.
भारंगीच्या पानांची भाजी दमा होऊ नये म्हणून आजही कोकणात वापरतात.

याच्या कोवळ्या पानांची भाजी चवीला रुचकर असते. सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारांत या भाजीचा उपयोग होतो.

भारंगीत श्वासनलिकेचे संकोचन करण्याचा उत्तम गुण आहे.

मंदताप, अंग जड होणे, खोकला, कफ, अन्नाची इच्छा नसणे, लघवीस भरपूर होणे, शौचास आव पडणे अशा अवस्थेत भारंगमुळाचे आणि काळी मिरीचे चूर्ण मधाबरोबर वाटून देतात.

तसेच उचकीवर भारंगमुळाचे चूर्ण साखरेच्या पाकातून देतात.

कानात व्रण झाल्यास मूळ मधात उगाळून कानात घालतात.

मस्तकशूल व डोकेदुखीवर भारंगमूळ व अनंतमूळ यांचा लेप उपयोगी आहे.
मुळाचा काढा मलेरियावर देतात.

पोटात कृमी झाल्यास भारंगीची पाने उकळून त्याचे पाणी गाळून देतात.

टीप: वैद्यकीय सल्ल्यानुसार सेवन करावे.


Greetings from "Somnath Ayurved Rasshala"Hope you fine and safe!Because of COVID restrictions, our online order processi...
05/05/2021

Greetings from "Somnath Ayurved Rasshala"

Hope you fine and safe!

Because of COVID restrictions, our online order processing on amazon may get delayed.

We have tie ups with courier services which allow us to deliver medicines to needy person.

If amazon delivery is not available - please feel free to drop message on WhatsApp business account - +91 8379074956.

We are thankful for your support. 🙂

Govind vednahar Tel: ( Massage oil for knee, lower back pain )
https://www.amazon.in/Govind-Vednahar-Tel/dp/B07MFVT4NM

Somarsh Tablet: ( For piles problems)
https://www.amazon.in/Somarsh-Tablet-Gives-relief-bleeding/dp/B08HKB2XR9

Acisom Tablet: ( For acidity)
https://www.amazon.in/Acisom-Tablet-Acidity-Ayurvedic-Antacid/dp/B083V5JFWH

Address

Solapur
413003

Opening Hours

Monday 10am - 5am
Tuesday 10am - 5am
Wednesday 10am - 5am
Thursday 10am - 5am
Friday 10am - 5am
Saturday 10am - 5am
Sunday 10am - 5am

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Somnath Ayurved Rasshala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Somnath Ayurved Rasshala:

Shortcuts

Share