Narayani Ayurveda

  • Home
  • Narayani Ayurveda

Narayani Ayurveda We, as a team, have more than 10-years of enriching experience in treating several patients successfully.

Through years of hard work and expertise in treating patients with various age groups, we have developed a state-of-art treatment facility at Naraya

21/06/2023
14/06/2023

व्यायामं च व्यवायं च धावनं पानमेव च ।
युद्धं गीतं च पाठं च मुहूर्तं भुक्तवान् त्यजेत् || (आत्रेय)

भोजन झाल्यावर दोन घटका (म्हणजे ४८ मिनिट)
१)व्यायाम
२) व्यवाय (स्त्रीसंग)
३) धावणे
४) पाणी पिणे
५) कुस्ती करणे
६) गाणे
७) अभ्यास करणे
या गोष्टी टाळाव्यात.

14/06/2023

भुक्त्वा उपविशत: तन्द्रा शयानस्य तु पुष्टता ।
आयु: चंक्रममाणस्य मृत्यु: धावति धावतः || ( योगरत्नाकर)

१)जेवण झाल्यावर स्वस्थ बसल्यास आळस येतो.

२)थोडा वेळ वाम-कुक्षी घेतल्यास शक्ती प्राप्त होते.

३)शत-पावली केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते.

४)धावाधाव अगर खूप कष्टाची काम केल्यास त्याच्या मागे मृत्यू धावत येतो म्हणजे त्यास अकाली मृत्यू येतो.

14/06/2023

मात्रया अपि अभ्यवहृतं पथ्यं च अन्नं न जीर्यति ।
चिन्ताशोकभयक्रोधदुःख
शय्याप्रजागरैः ॥
(चरक संहिता)

सांसारिक काळजी,शोक,भीती, संताप-क्रोध, मानसिक दुःख, दिवसा झोप घेणे आणि रात्री जागरण करणे,या कारणांमुळे योग्य प्रमाणात भक्षण केलेल्या व पुष्टीकारक असणाऱ्या अन्नाचे देखील योग्य रीतीने पचन होत नाही .
म्हणूनच भोजनाच्या वेळी घरातील वातावरण प्रसन्न असावे, कोणत्याही मनोविकाराच्या अधीन होऊ नये.शांत व प्रसन्न मनाने केलेल्या भोजनाचे योग्य प्रकारे पचन होते व ते शरीरास हितावह असते.

14/06/2023

प्रायेण आहार वैषम्यात् अजीर्णं जायते नृणाम् ।
तत् मूलो रोगसंघातः तद् विनाशात् विनश्यति || (अष्टांग संग्रह )

बहुतेक वेळा आहाराच्या विषमतेमुळे मनुष्यांना अजीर्ण होते. अजीर्ण अनेक रोगांचे मुख्य कारण आहे. अशा अजीर्णाचा नाश केल्याने सर्व रोगांचा समूह आपोआप नष्ट होतो.

आहाराची विषमता तीन प्रकारची आहे.-
१) शरीराच्या आवश्यकतेपेक्षा अति प्रमाणात खाणे.
२) अगदी अल्प प्रमाणात खाणे.
३) नियमितपणा सोडून भलत्याच वेळी खाणे.
निरोगी राहण्याची इच्छा असणाऱ्यांनी वरील तीन प्रकार कटाक्षाने टाळावेत.

14/06/2023

"जीर्ण भोजिनं व्याधि: न उपसर्पति|"

प्रथम केलेल्या भोजनातील सर्व अन्नाचे पूर्ण पचन झाल्यानंतरच, पुन: भोजन करणाऱ्या मनुष्याकडे रोग फिरकत नाहीत.

14/06/2023

"पथ्यम् अपि अपथ्य अजीर्णे न अश्नीयात्|"

शरीरास अहितकारक आणि प्रमाणाबाहेर अन्न सेवन केल्यामुळे अजीर्ण झाले असता, पूर्णपणे लंघन-उपवास करणे व केवळ कोष्णजल पिणे हा सर्वोत्तम उपाय आहे.

13/06/2023

*पाणी पिण्यासंदर्भात काही महत्त्वाचे नियम:-*

*१) "अजीर्णे भेषजं वारि|"*

अजीर्ण अपचन झाले असता काही न खाता केवळ कोष्ण जलपान करणे हे औषध आहे .

*२) "जीर्णे वारि बलप्रदम्|"*

खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर (म्हणजे भोजनानंतर सुमारे ३ तासानंतर) पाणी पिण्याने पचनक्रियेत अडथळा येत नसल्यामुळे बल प्राप्त होते.

*३) "भोजने च अमृतं वारि|"*

जेवताना मधे-मधे, घोट-घोट पाणी पिण्यामुळे अन्नास रुची येते व ते अमृता समान असते.

*४) "भोजनान्ते विषप्रदम्|"*

जेवण झाल्यावर लगेच पाणी पिल्यास पचनक्रियेत अडथळा येतो म्हणून ते विषाप्रमाणे घातक असते.

07/06/2023

"आयुर्वेदोपदेशेषु विधेय:परमादर:|" (अ.ह्रृ.)

निरोगी दीर्घायुष्याची ईच्छा असणाऱ्यांनी आयुर्वेदामधील आहार-विहार आचार-विचार इत्यादि उपदेशांचा अतिशय आदर ठेवून त्याप्रमाणे आचरण करावे.

Address


Opening Hours

Monday 10:00 - 15:00
16:00 - 21:00
Tuesday 10:00 - 15:00
16:00 - 21:00
Wednesday 10:00 - 15:00
16:00 - 21:00
Thursday 10:00 - 15:00
16:00 - 21:00
Friday 10:00 - 15:00
16:00 - 21:00
Saturday 10:00 - 15:00
16:00 - 21:00

Telephone

9673910561

Alerts

Be the first to know and let us send you an email when Narayani Ayurveda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Narayani Ayurveda:

  • Want your business to be the top-listed Health & Beauty Business?

Share