07/04/2023
*तुम्ही सतत आजारी पडताय का? ही असू शकतात त्यामागची कारणं*
*१) तुमचा आहार योग्य आहे का ?*
आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार.
आपण काय खातो, किती खातो, कधी खातो ह्या सगळ्याला फार महत्व असते.
*२) आपल्याला व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता आहे का?*
आपल्या सतत आजारी पडण्यामागे अजून एक कारण असू शकते ते म्हणजे व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता असणे.
*३) तुम्ही पुरेसे पाणी पिताय ना ?*
आपल्या शरीरात ६० टक्के पाणी असते त्यामुळे शरीराच्या सगळ्याच क्रिया पूर्ण होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.
*४) तुम्हाला पुरेशी झोप मिळते आहे का ?*
आपले शरीर हे कोणत्याही रोगविरुद्ध लढण्यासाठी सक्षम असते. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले शरीर रोग, सूज, जखम ह्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी काही प्रथिने सोडते.
*५) तुम्ही तोंडाची नीट स्वच्छता करता ना ?*
आपले तोंड हा अनेक बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाण्याचा प्रमुख मार्ग आहे. अनेक चांगले वाईट बॅक्टेरिया आपल्या तोंडात वाढतात आणि नंतर आपल्याला ते आजारी पाडतात.
*६) तुमच्या कुटुंबात कुणी सतत आजारी पडते का?*
अनेकवेळा असे दिसून आले आहे की रक्तातील पांढऱ्या पेशी, ज्या कोणत्याही रोगाचा सामना करतात त्यांची संख्या जर कमी असेल तर तो माणूस सतत आजारी पडतो.
*७) तुम्हाला ताण आहे का ?*
आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण-तणाव नसलेला माणूस मिळणे जवळपास अशक्य आहे.
पण जर आपल्याला अतिरिक्त ताण असेल तर त्यामुळे आपल्या शरीराची खूप हानी होते.
*ह्यापैकी जे काही कारण आपल्याला सापडेल ते दूर करून आपण निरोगी आयुष्य जगू शकतो.*