14/04/2026
"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा"!
असा प्रेरणादायी मूलमंत्र सर्व जगाला ज्यांनी दिला असे ,
भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर (बाबासाहेब आंबेडकर) यांची आज दि.१४/०४/२०२६ रोजी १३५वी जयंती.
अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटल मध्ये मोठ्या उत्साहात डॉ.बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली.
तसेच बाबासाहेबांचे विचार आणि जीवनाचा प्रसार, काही विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या पथनाट्यातून केला.
कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख अतिथी रेहाना परवीन बेग मॅडम , तसेच कॉलेजचा अकॅडमिक इन्चार्ज डॉ. बेग मॅडम, प्राचार्या डॉ. कासट मॅडम , डॉ. खेडकर सर, डॉ. जावरे सर, डॉ.नवथर सर, डॉ.शेळके सर, डॉ.बोराडे मॅडम , तसेच सर्व स्टाफ आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.