05/08/2026
आईच्या दुधाइतका अमूल्य आहार दुसरा नाही!
बाळाचा जन्म झाल्यानंतरचे पहिले काही दिवस खूप महत्त्वाचे असतात. या काळात मिळणारे आईचे पहिले दूध (कोलोस्ट्रम) हे बाळासाठी नैसर्गिक संरक्षण कवच असते. यालाच बाळाचे पहिले लसीकरण असेही म्हटले जाते.
आईचे दूध बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, मेंदूच्या विकासाला मदत करते, पचन सुधारते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई-बाळाच्या नात्यात वाढतो जिव्हाळा.
१ ते ७ ऑगस्ट – जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त, प्रत्येक आईला आणि कुटुंबाला एकच संदेश...
बाळाला जन्मानंतर शक्य तितक्या लवकर स्तनपान सुरू करा.
पहिले दूध (कोलोस्ट्रम) नक्की द्या.
पहिले सहा महिने फक्त आईचे दूध द्या.
चला, निरोगी बालपणाची सुरुवात आईच्या दुधापासून करूया!
Dr. Pooja Pol
Fetal Medicine Specialist
Sono-Fitz, Ahilyanagar
#स्तनपान #जागतिकस्तनपानसप्ताह #आईचेदूध