Samta Sainik Dal

Samta Sainik Dal The Organisation Runs On Pure Thought Of Dr. Babasaheb Ambedkar
Democratic Organization

समता सैनिक दल शताब्दी महोत्सव समिती घेऊन येत आहे भव्य बुद्धी बळ स्पर्धा येत्या 30 ऑगस्ट 2026 रोजी स्पर्धे करिता आपला देण...
17/08/2026

समता सैनिक दल शताब्दी महोत्सव समिती घेऊन येत आहे भव्य बुद्धी बळ स्पर्धा येत्या 30 ऑगस्ट 2026 रोजी
स्पर्धे करिता आपला देण्यासाठी त्वरित नावे द्यावीत...
जय भीम...🙏🙏

समता सैनिक दल जिल्हा चंद्रपूर तर्फे 80 व्या भारतीय स्वतंत्रता दिवसा प्रित्यर्थ प. पु.  डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या शह...
15/08/2026

समता सैनिक दल जिल्हा चंद्रपूर तर्फे 80 व्या भारतीय स्वतंत्रता दिवसा प्रित्यर्थ प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहराच्या माध्यभागातील पूर्णकृती पुतळ्याला माणवंदना 💐💐🙏🙏

समता सैनिक दल विध्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहानीचा तीव्र निषेध करत CJP च्या चालू असलेल्या आंदोलनास आणि आज दिनांक 23...
23/07/2026

समता सैनिक दल विध्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहानीचा तीव्र निषेध करत CJP च्या चालू असलेल्या आंदोलनास आणि आज दिनांक 23.07.2026 रोजी महाराष्ट्र बंद ला सुद्धा पुरजोर पाठींबा देऊन आंदोलनात सहभागी होत आहे...🙏

भव्य निबंध स्पर्धा २०२६समता सैनिक दल शताब्दी महोत्सव समिती, चंद्रपूर' द्वारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त ए...
17/06/2026

भव्य निबंध स्पर्धा २०२६

समता सैनिक दल शताब्दी महोत्सव समिती, चंद्रपूर' द्वारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त एका भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. "शिक्षण, समता, संघटन आणि संघर्ष" या विचारांना बळ देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हा !

निबंधाचा विषयः

"समता सैनिक दलाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात जबाबदारी"

आकर्षक बक्षिसेः

प्रथम पारितोषिक: ₹ ३,०००/- रोख रक्कम + स्मृतिचिन्ह

द्वितीय पारितोषिक: ₹ २,०००/- रोख रक्कम + स्मृतिचिन्ह

तिसरे पारितोषिक: ₹ १,०००/- रोख रक्कम + स्मृतिचिन्ह

+ प्रोत्साहनपरः १० सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे

सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल!

स्पर्धेचे गटः

१) १८ वर्षांखालील
२) १८ वर्षांवरील

दिनांक: रविवार, २८ जून २०२६
वेळ: सकाळी ११.०० ते दुपारी १.००
स्थळ: ब्राईट इंग्लिश स्कूल, चोरखिडकी, चंद्रपूर.

प्रवेश शुल्कः ₹ ५०/- मात्र

महत्त्वाच्या सूचनाः

•स्पर्धेत दोन गट असतीलः १८ वर्षांखालील आणि १८ वर्षांवरील स्पर्धकांनी आपापले writings pad आणि पेन सोबत आणावे.
• स्पर्धा अगदी वेळेवर सुरू होईल, ११ वाजल्यानंतर कोणालाही स्पर्धेला बसता येणार नाही.
• दिलेल्या रोल नंबरवर स्पर्धकाला बसावे लागेल. पहिल्या १०० स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येईल.
• सर्वांना निबंध लिहिण्याकरिता रेघाटी पेपर्स उपलब्ध करून देण्यात येईल.

निबंध ५० मार्क्सचा राहील.

संपर्कासाठी (मार्शल):
धम्मदीप मेश्राम - 7020947349
अनंत बाबरे - 9881952758
धीरज तेलंग - 7020453091
गौरव धाकडे - 96372 00434
संगीता तावडे - 7038380196
अमित वाघमारे- 9359239245

*आयोजक: समता सैनिक दल शताब्दी महोत्सव समिती, चंद्रपूर*

29/05/2026

A historic day at Veluvan Buddha Vihar, Chandrapur. 🙏✨
The grand inauguration of the statue of the architect of our constitution, Dr. Babasaheb Ambedkar. His legacy lives on, guiding us toward equality, wisdom, and compassion. 💙

BabasahebAmbedkar DrAmbedkar

“ ” Join us on 31st May. Thane, Mumbai.------------------------------------------------------     आधुनिक भारताचा इतिहास ...
15/05/2026

“ ” Join us on 31st May. Thane, Mumbai.
------------------------------------------------------

आधुनिक भारताचा इतिहास भारत राष्ट्र निर्माणाचा उद्देश घेऊन लढणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीचा इतिहास आहे. जाती, धर्म, पंथ, लिंग, भाषा आणि संस्कृती यांच्यात आणि छोट्या छोट्या संस्थानांमध्ये विभागलेल्या, कधीही राष्ट्र नसणाऱ्या या विस्तीर्ण भौगोलिक प्रदेशाला राष्ट्र बनवण्याच्या महान दर्शनाचा आहे.
गुलामांपेक्षाही हीन-दीन जीवन जगण्यास भाग पाडणाऱ्या धर्मांध संस्कृतीला उध्वस्त करत चिरस्थायी मानवी मूल्यांना कायद्याचे संरक्षक कवच प्रदान करण्यासोबतच सबंध भारतीयांसाठी कल्याणकारी राज्य निर्माणाचा आहे.
शोषणाच्या सनातन शृंखला आपल्या बुद्धीच्या जोरावर तोडून इथल्या सर्व मूकनायकांच्या नैसर्गिक हक्कांचे श्वास मोकळे करण्याचा आहे.
समता सैनिक दल भारत राष्ट्र निर्माणाचे
एक अभिन्न अंग आहे. दलाच्या या सैनिकांनी डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्याच्या प्रक्रियेत आपले सर्वस्व सहर्ष अर्पण केले. अमानुषतेच्या भेदाभेदातून इथल्या माणसांना सर्वप्रकारे स्वतंत्र, स्वावलंबी आणि आत्मोद्धारासोबतच मानवी विकासासाठी सिद्ध केले.
आज भारत राष्ट्र विरुद्ध धर्म राष्ट्र असा संघर्ष परत नव्याने सुरू झाला आहे. त्याचे प्रत्यंतर दररोज आपल्या आजुबाजूला आपणास दिसून येते. भारतीय प्रजेला जाती, धर्माने दिलेली हीन ओळख पुसून नव्याने आम्ही भारताचे लोक म्हणून जी ओळख 1950 ला प्राप्त झाली आहे; ती
बाबासाहेबांनी दिली आहे आणि बाबासाहेबांच्या या सबंध आंदोलनात समता सैनिक दलाचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या अर्थाने भारत राष्ट्र निर्माणात समता सैनिक दलाचे योगदान अनन्यसाधारण आहे.
संघटन हे माणसांच्या जगण्यातील
उद्देशांना महानता प्रदान करणारी शक्ती आहे. ज्यांना हे कळले त्यांच्या पिढ्यांनी
अविचारानेही या जगावर राज्य केले. ज्यांना
हा विचार त्याग समर्पण आणि निष्ठांचा उंचीवर आकलन करत आला नाही ते सगळे
भारतीय या त्यांच्या कल्याणकारी अस्तित्वाला परत हरवून बसतील;अशी शक्यता निर्माण झाली आहे.
आपली ओळख ही निस्वार्थ लढवय्यांची आहे. ती समता सैनिक दलाच्या मुशीतून तयार झाली आहे. आपल्या भारतीय असण्यात आपली मानवी मूल्ये सुरक्षीत राहणार आहेत. येणाऱ्या पिढ्यांनी भारत राष्ट्रात भारतीय म्हणून जगण्यासाठी आपण
समता सैनिक दलात मोठ्या संख्येत सहभागी होऊन आपली नागरिक म्हणून जबाबदारी सांभाळण्याची ही वेळ आहे.

भारत राष्ट्र... जिंदाबाद!
समता सैनिक दल... जिंदाबाद!

------------------------

जय ज्योती...🙏जय भीम...🙏
11/04/2026

जय ज्योती...🙏
जय भीम...🙏

07/04/2026

“समतेचा सूर्य तळपला... ☀️संजयनगर (MEL) येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या मंगल प्रसंगी बाबासाहेबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. 💙 ”

21/03/2026

प्रियंदर्शी इतिहास सूर्य सम्राट अशोक यांच्या जयंती प्रित्यर्थ समता सैनिक दल शताब्दी महोत्सव समितीने विशेष व्याख्यानाचे आयोजन दि. 22.03.2026 रोजी सायंकाळी 5:30 ला आयोजित केलेले आहे
प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय महेंद्र शेगावकर सर यांना पाचरित केले आहे
सर्वांनी या संधीच सोन करत या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती जय भीम...

Address

Chandrapur
442402

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samta Sainik Dal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samta Sainik Dal:

Shortcuts

Share