Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar

Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar We are Non-Goverment organization working for Empowerment of Disabled from last 30 years.

01/08/2026
स्टेट बँक ऑफ इंडियाचा मदतीचा हात! 🤝अमरावती येथील SBI प्रशासकीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निवासी मतिमंद विद्यालय, आसे...
19/03/2026

स्टेट बँक ऑफ इंडियाचा मदतीचा हात! 🤝
अमरावती येथील SBI प्रशासकीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निवासी मतिमंद विद्यालय, आसेगाव पूर्णा ला ₹३.४८ लक्ष रुपयांचा CSR निधी प्रदान.
बँकेचे मुख्य महाप्रबंधक (MH) श्री. नंद किशोर सिंघ, महाप्रबंधक श्री. राकेश कुमार यादव आणि उपमहाव्यवस्थापक श्री. शशी रंजन , श्री भूपेश शेरेकर यांच्या हस्ते निधी सुपूर्द.
अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. उज्वल जाधव आणि मुख्याध्यापक श्री. सुभाष ठाकरे यांनी स्वीकारला निधी.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे आभार! 🙏

आदर्श निवासी अस्थिव्यंग विद्यालय टेंब्रुसोंडा येथे मा.जिल्हाधिकारी आणि मा . मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती यांनी दिली स...
25/12/2025

आदर्श निवासी अस्थिव्यंग विद्यालय टेंब्रुसोंडा येथे मा.जिल्हाधिकारी आणि मा . मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती यांनी दिली सदिच्छा भेट.

मा.श्री आशीष येरेकर, साहेब जिल्हाधिकारी अमरावती आणि मा. संजीता महापात्रा मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी आज दि.24.12.2025 रोजी #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचलित आदर्श निवासी अस्थिव्यंग विद्यालय टेंब्रुसोंडा येथे सदिच्छा भेट दिली. विद्यार्थ्याना शालेय वस्तूंचे वाटप करून संवाद साधला. शालेय कामकाज पाहून आनंद व्यक्त केला आणि सोयी सुविधे बाबत समाधान व्यक्त करून संस्थेद्वारा सुरू असलेल्या कार्याची प्रशंसा करून उत्तम कार्यास शुभेच्छा दिल्या.


26/08/2025

📍 #मुंबई |

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी मातंग कार्यकर्ता संवाद मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपस्थित राहून मातंग समाज बांधवांशी संवाद साधला.
सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. महायुती सरकारने मातंग समाजाला दिलासा देणारे अनेक निर्माण घेतले असून त्याद्वारे या समाज बांधवांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्याना आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांची आठवण म्हणून दानपट्टा भेट म्हणून दिला. या दानपट्ट्याचा उपयोग अन्यायाविरोधात आसूड ओढण्यासाठीच माझ्या हातून घडेल असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला. शासनाच्या माध्यमातून मातंग समाजाचे प्रश्न यापुढेही प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही याप्रसंगी दिली.

यावेळी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे तसेच लहुजी सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#अण्णा

18/08/2025
शोषित, वंचित, कष्टकरी, कामगार वर्गाचं जगणं आपल्या लेखणीतून  मांडणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी मराठी साहित्य विश्व...
01/08/2025

शोषित, वंचित, कष्टकरी, कामगार वर्गाचं जगणं आपल्या लेखणीतून मांडणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी मराठी साहित्य विश्व समृध्द केलं. कथा, नाट्य, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, वग, गवळण असे चौफेर लिखाण करत असतानाच सामान्य कष्टकरी जनतेला त्यांनी केंद्रस्थानी ठेवलं. संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो की, गोवा मुक्ती संग्राम... प्रत्येक लढा, चळवळींना त्याच्या शाहिरीने नवी ऊर्जा दिली. 'जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव' या त्यांच्या ओळींनी तर वंचित समुहाचं आत्मभान जागृत केलं.

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#अण्णा
--

27/04/2025

प्रवेश देणे सुरु आहे....
आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar

Address

Asegaon Purna
Chandur Bazar
444806

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+918975028158

Alerts

Be the first to know and let us send you an email when Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar:

Shortcuts

Share