31/03/2026
EMRS चिखलदरा येथे समुपदेशक हे पद नियुक्ती झाल्यानंतर, आदिवासी विकास विभाग (TDD) कडून पर्यवेक्षक म्हणून कु. रोमा मॅडम व कु. अनुश्री मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आमच्या EMRS शाळेला भेट दिली.
या भेटीदरम्यान शाळेच्या प्राचार्या सौ. धनश्री दर्ने मॅडम यांनी समुपदेशकाच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करत आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात समुपदेशनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची जपणूक, भावनिक आधार, शैक्षणिक मार्गदर्शन आणि त्यांच्या अडचणींचे योग्य निराकरण करण्यासाठी समुपदेशकाची भूमिका कशी उपयुक्त ठरते, याबद्दल त्यांनी सविस्तर विचार मांडले.
त्यांच्या मनोगतातून समुपदेशन सेवेचे महत्त्व व त्याचे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असलेले योगदान स्पष्टपणे जाणवले.