आयुष्मान आरोग्य मंदिर-कौलाळे

  • Home
  • India
  • Jawhar
  • आयुष्मान आरोग्य मंदिर-कौलाळे

आयुष्मान आरोग्य मंदिर-कौलाळे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आयुष्मान आरोग्य मंदिर-कौलाळे, Health & Wellness Website, Gangapur, Jawhar.

आज दिनांक 13/06/2026 रोजी जव्हार तालुक्यातील प्रा. आ. केंद्र साकुर ,अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर  -कौलाळे ,येथे आज NQAS...
14/06/2026

आज दिनांक 13/06/2026 रोजी जव्हार तालुक्यातील प्रा. आ. केंद्र साकुर ,अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर -कौलाळे ,येथे आज NQAS National Assessment करण्यात आले. यावेळी माननीय Dr.Atul Gupte Sir व Dr.Devendra Sharma Sir तसेच Dr.Prajali Save madam (DPM PALGHAR) व Dr Ritesh Patel Sir (THO JAWHAR), डॉ.Sarfale (MO SAKUR PHC) व ग्रापंचायत सरपंच श्री.कैलास पागी व उपसरपंच आणि इतर ग्रा.सदस्य व VHNSC अध्यक्ष उपस्थित होते ,Assessment बाबत समाधान व्यक्त करण्यात आले व शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन करण्यात आले.

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” हे फक्त एक अभियान नाही, तर आपली जबाबदारी आहे. शुद्ध पाणी आणि स्वच्छ हात या साध्या सवयींमुळे...
29/04/2026

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” हे फक्त एक अभियान नाही, तर आपली जबाबदारी आहे. शुद्ध पाणी आणि स्वच्छ हात या साध्या सवयींमुळे आपण अनेक आजारांपासून कायमची मात करू शकतो.

प्रत्येकाने स्वच्छतेची काळजी घेतली, सुरक्षित पाण्याचा वापर केला, तर आपलं गाव निरोगी, आनंदी आणि मजबूत बनेल.

आजची स्वच्छता हीच उद्याच्या आरोग्यपूर्ण भविष्याची हमी आहे.

#माझंगावआरोग्यसंपन्नगाव #शुद्धपाणी #स्वच्छहात #निरोगीजीवन #स्वच्छताअभियान

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानांतर्गत डासजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी स्वच्छता, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि ...
26/04/2026

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानांतर्गत डासजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी स्वच्छता, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सक्रिय लोकसहभाग यांना प्राधान्य.
डेंग्यू व मलेरियामुक्त, स्वच्छ आणि निरोगी गाव घडविण्याचा दृढ संकल्प.

आजच आपल्या परिसरात स्वच्छता राखा, साचलेले पाणी टाळा आणि या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवा!

जागतिक लसीकरण सप्ताह २४ ते ३० एप्रिल २०२६ "प्रत्येक पिढीसाठी लसीकरण प्रभावी"सगळ्या कुटुंबाची जबाबदारी एकच, करु बाळाचे लस...
26/04/2026

जागतिक लसीकरण सप्ताह
२४ ते ३० एप्रिल २०२६

"प्रत्येक पिढीसाठी लसीकरण प्रभावी"

सगळ्या कुटुंबाची जबाबदारी एकच, करु बाळाचे लसीकरण वेळेतच.
जवळच्या आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकांशी संपर्क करा आणि संपूर्ण लसीकरणाने बाळाचे आरोग्य सुदृढ बनवा.

आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये सर्व लसीमोफत दिल्या जातात.

 #जागतिकहिवतापदिन (२५ एप्रिल) निमित्त हिवताप निर्मूलनासाठी आपली सामूहिक जबाबदारी अधिक दृढ करण्याचा हा संकल्प दिवस आहे. “...
26/04/2026

#जागतिकहिवतापदिन (२५ एप्रिल) निमित्त हिवताप निर्मूलनासाठी आपली सामूहिक जबाबदारी अधिक दृढ करण्याचा हा संकल्प दिवस आहे.

“हिवताप दुरिकरणासाठी कटिबद्ध : आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे” या संदेशाला अनुसरून प्रत्येकाने आपल्या परिसरात कोरडा दिवस पाळून डासांची उत्पत्ती रोखणे अत्यावश्यक आहे.

स्वच्छता, प्रतिबंध आणि जनजागृती यांच्या माध्यमातून आपण हिवतापमुक्त समाजाच्या दिशेने वाटचाल करू शकतो.

चला, “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या ध्येयाने प्रेरित होऊन निरोगी आणि सुरक्षित भविष्य घडवूया.

जागतिक लसीकरण सप्ताह (२४ ते ३० एप्रिल २०२६) निमित्त “प्रत्येक पिढीसाठी लसीकरण प्रभावी” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात ...
26/04/2026

जागतिक लसीकरण सप्ताह (२४ ते ३० एप्रिल २०२६) निमित्त “प्रत्येक पिढीसाठी लसीकरण प्रभावी” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी १४ ते १५ वर्षांखालील मुलींनी एचपीव्ही लस घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही लस सर्व शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये विनामूल्य उपलब्ध असून पालकांनी आपल्या मुलींचे वेळेत लसीकरण करून सुरक्षित भविष्यासाठी पुढाकार घ्यावा.

Ministry of Health and Family Welfare, Government of India Governor of Maharashtra CMOMaharashtra Prakash Abitkar Meghna Sakore Bordikar Maharashtra DGIPR

जागतिक लसीकरण सप्ताह २४ ते ३० एप्रिल २०२६ "प्रत्येक पिढीसाठी लसीकरण प्रभावी"क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात बीसीजी लस प्रभावी...
26/04/2026

जागतिक लसीकरण सप्ताह
२४ ते ३० एप्रिल २०२६

"प्रत्येक पिढीसाठी लसीकरण प्रभावी"

क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात बीसीजी लस प्रभावी संरक्षण देते. १८ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करून स्वतःचे संरक्षण सुनिश्चित करावे. चला, एकत्रित प्रयत्नांतून टीबीमुक्त भारत घडवूया—टीबी हरेल, देश जिंकेल!

*आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्व आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश*मुबई...
26/04/2026

*आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्व आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश*

मुबई (26.04.26) : राज्यातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या, रुग्ण कल्याण समिती (RKS), जन आरोग्य समिती (JAS), महिला आरोग्य समिती (MAS), ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (VHNSC), या समित्यांची जबाबदारी महत्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगली व परिणामकारक आरोग्य सेवा देण्यासाठी या सर्व समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकाना विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्यसेवा दिल्या जातात. या सर्व लोकहिताच्या योजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात व नागरिकाना अधिक चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आरोग्य समित्यांची भूमिका महत्वाची असते.

ग्रामीण भागासाठी ‘ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (VHNSC)” व शहरी भागासाठी “महिला आरोग्य समिती (MAS)” कार्यरत आहे. या समित्या स्वच्छता, पोषण, पाणीपुरवठा, तसेच प्राथमिक आरोग्य सेवा देण्यात महत्वाची भूमिका बजावत असतात.

त्याचप्रमाणे “जन आरोग्य समिती (JAS)” व “रुग्ण कल्याण समिती (RKS)” या समित्या आरोग्य संस्थांमध्ये रुग्णकेंद्रित सेवा, सेवेची गुणवत्ता व निधीच्या पारदर्शक वापरासंबंधी लक्ष ठेवण्याची भूमिका बजावतात.

ग्रामीण भागासाठी कार्यरत असलेल्या "ग्राम आरोग्‍य पोषण पाणीपुरवठा स्‍वच्‍छता समिती (VHNSC)" मध्ये अशासकीय सदस्य म्हणून ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य (प्राधान्याने महिला), बचत गट, तरुण मंडळ, वन सुरक्षा समिती, महिला मंडळ, सामाजिक संस्था, गरोदर माता, स्तनदा माता, तीनवर्षा पर्यंतचे मुल असलेली माता व शासकिय रुग्णालयात आरोग्‍य सेवा घेणारे किंवा बरे झालेले दिर्घकालीन आजाराचे रुग्ण यांचा सदस्य म्हणून समावेश असणे अपेक्षितआहे.

शहरी भागासाठी कार्यरत असलेल्या "महिला आरोग्य समिती (MAS)' मध्ये समाजकल्याण, सामाजिक बांधिलकी व नेतृत्व कौशल्य असलेल्या स्थानिक झोपडपट्टी भागातील जास्तीत जास्त वीस महिला सदस्यांचा समावेश अपेक्षित आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत "जन आरोग्य समिती" कार्यरत आहे. या समितीमध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा स्वच्छता समिती (VHNSC) अध्यक्ष/महिला सदस्य, महिला बचत गट अध्यक्ष, शालेय आरोग्यदूत, युवाकेंद्र युवा प्रतिनिधी, क्षयरोगमुक्त नागरिक, तसेच एक किंवा दोन मुलानंतर नसबंदी केलेला पुरुष यांचा विशेष निमंत्रित म्हणून समावेश अपेक्षित आहे.

शहरी भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी आरोग्य वर्धीनी केंद्र (UPHC/UHWC) मध्ये कार्यरत असलेल्या जन आरोग्य समितीमध्ये स्थानिक नगरसेवक, नागरी स्वराज्य संस्थेतील आरोग्य समिती अध्यक्ष, नेहरू युवा स्वयंसेवक प्रतिनिधी, एनजीओ प्रतिनिधी, महिला आरोग्य समितीचे अध्यक्ष, शालेय आरोग्य दूत, व दोन प्रतिष्ठित नागरिक यांचा समावेश असणार आहे.

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या जन आरोग्य समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत आरोग्य उपससमिती सभापती /सदस्य, उपकेंद्र जनआरोग्य समितीचे अध्यक्ष, नेहरू युवा, युवा स्वयंसेवक प्रतिनिधी, एनजीओ स्वयंसेवी संस्थेचे दोन प्रतिनिधी, क्षयरोगमुक्त नागरिक, एक किंवा दोन मुलानंतर नसबंदी केलेला पुरुष विशेष निमंत्रित असतो. तसेच VHNSC चे अध्यक्ष व महिला सदस्य यांचा आळीपाळीने सदस्य म्हणून समावेश अपेक्षित आहे.

जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या रुग्ण कल्याण समितीमध्ये जिल्हा परिषद आरोग्य सभापती, पंचायत समिती सदस्य, एनजीओ प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, देणगीदार यांचा समिती सदस्या मध्ये समावेश आहे. शहरी भागातील रुग्ण कल्याण समितीमध्ये स्थानिक नगरसेवक व संबंधित कार्यक्षेत्रातील एनजीओच्या प्रतिनिधींच्या समावेश करण्यात आला आहे.

या सर्व समित्यांच्या पुनरुज्जीवन करण्याच्या प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच समाजातील सेवाभावी नागरिक यांनी सहभागी व्हावे. आरोग्यसेवा अधिक परिणामकारक होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असून, समित्यांच्या माध्यमातून स्थानिक गरजा ओळखून अंमलबजावणी तसेच त्रुटीबाबत त्वरीत उपाययोजना केल्यास नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देऊन, नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

समितीमध्ये नियुक्त सदस्यांनी नियमित बैठका घेवून स्थानिक समस्यांवर कृती आराखडे तयार करावेत. सदस्यांचे प्रशिक्षण व क्षमता बांधणी करावी तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधावा. सर्व लोकप्रतिनिधी,खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य यांनी या प्रक्रियेत सहभाग घ्यावा. आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी आवश्यक सहकार्य करावे.
राज्यातील सर्वांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहभागी होऊन आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
Maha Arogya IEC Bureau
Phc Tigaon
Phc Keshori
Phc Bangaon
Phc Indora Bk
Phc Korambhitola
Phc Kati
Phc Chikhali
Phc Dasgaon
Phc Dhabepauni
Phc Kalimati Aam Kalimati
Phc Khodshivani
DrPurushottam Patle
Abhijeet Golhar
Arvindkumar Waghmare
Roshan Raut

संसर्ग अनेक प्रकारचे असू शकतात पण माहिती हा एकच उपाय आहे.लैंगिक संक्रमित संसर्ग (STI) हे केवळ एकाच प्रकारचे नसून ते जिवा...
17/04/2026

संसर्ग अनेक प्रकारचे असू शकतात पण माहिती हा एकच उपाय आहे.

लैंगिक संक्रमित संसर्ग (STI) हे केवळ एकाच प्रकारचे नसून ते जिवाणू, विषाणू किंवा परजीवी अशा विविध माध्यमांतून पसरू शकतात. हे प्रकार जाणून घेतल्यास आपल्याला योग्य उपचार आणि खबरदारी घेण्यास मदत होते


#एसटीआयजागरूकता #लैंगिकआरोग्य #योग्यमाहिती #आरोग्यजागरूकता #एसटीआयप्रतिबंध #एचआयव्हीजागरूकता #जागरूकराहा #सार्वजनिकआरोग्य #आरोग्यशिक्षण #सुरक्षितनिवड

14/04/2026

मनात शंका घेऊन जगण्यापेक्षा, वास्तवाचा सामना करा.
मी सुरक्षित आहे का? हा प्रश्न जर तुम्हाला सतावत असेल तर त्याचे उत्तर फक्त चाचणी देऊ शकते. भीतीला मागे टाका आणि आपल्या आरोग्यासाठी पहिलं पाऊल उचला.

आजच चाचणी करा, सुरक्षित व्हा!
अधिक माहितीसाठी राष्ट्रीय एड्स टोलफ्री हेल्पलाइन नंबर १०९७ वर कॉल करा.

#एचआयव्हीजागरूकता #एचआयव्हीचाचणी #आपलीस्थितीजाणूनघ्या #लवकरचाचणी #सुरक्षितराहा #आरोग्यजागरूकता #आजचचाचणी #जागरूकनागरिक #एचआयव्हीप्रतिबंध #आरोग्यपहिले

Address

Gangapur
Jawhar
401603

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आयुष्मान आरोग्य मंदिर-कौलाळे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share