29/09/2026
वनस्पती 🌿दर्शन पर्व सहावे
नेहमीप्रमाणेच यावर्षी आंबा येथे रविवारी आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी वनस्पतींची गोडी लागावी आणि निसर्गाचे ज्ञान वाढावे यासाठी प्रत्यक्ष जंगलामध्ये फिरून वनस्पती दाखवता आल्या. यासाठी वैद्य #सुधाकर शिंगाडे आणि वैद्य #मधुरा शिंगाडे नेहमी तत्पर असतात . वैद्य #शशिकांत कुंभार यांनी वनस्पतींची ओळख आणि त्याचे औषधी उपयोग सांगितले .वैद्य #मंगेश ठमके यांनी रसशास्त्राच्या दृष्टिकोनातून वनस्पतींचा उपयोग अधोरेखित केला तर निसर्गपुत्र #प्रमोद माळी यांनी एकूणच जंगल कसे वाचावे याचे मार्गदर्शन केले . आंब्यामधील देवराई 🌳 , प्रमोद माळी यांच्या " तव्यातून तळ्यात " या स्थानिक मत्स्य संगोपनाची व संवर्धनाची कार्यशाळा तसेच त्यांनी लावलेल्या अनेक वृक्षांची माहिती घेऊन केर्लीच्या धबधब्याजवळील वनस्पतींचा अभ्यास केला.
विद्यार्थ्यांचा शिकण्याविषयीचा उत्साह खूप छान 👌 होता . वनस्पतींचा वापरच नव्हे तर त्याचे संवर्धन करण्यासाठी काय करावे यावर छानच चर्चा झाली.