Siddhi swast aushadhi Seva generic medicine

Siddhi swast aushadhi Seva generic medicine Try at least once ,definitely your confusions about generic medicine is removed.Same quality,same ef

02/01/2018
20/12/2017

Intellectual Property India

20/12/2017

जेनेरिक औषधाचे चा गुण येत नाही म्हणता, मग सरकार अशा औषधाला कशी परवानगी देते??
दुसरा भाग ब्रँडेड कंपन्या ह्या मार्केटिंग वर आणि डॉक्टर वर सुमारे 20-30% खर्च करतात त्यामुळे हि औषधे महाग असतात, या उलट जेनेरिक औषधे हि सुद्धा अन्न व औषध विभागाकडून विविध तपासण्या करूनच आणि गुणवत्ता तपासूनच (ती कशी व कोठे तपासतात याची चौकशी FDA कडे करू शकता) बाजारात येतात..
आजकालच्या औषध कंपन्या सेल वाढावा म्हणून डॉक्टर लोकांना विविध प्रकारची आमिषे दखवतात (उदा. परदेशवारी, चेक, कॅश, ब्रँडेड कपडे, इलेक्टरोनिक साहित्य इत्यादी).
त्यात पुन्हा कुठली कंपनी किती % देते याची तुलना करतात, त्यावर डॉक्टर लोकांचा ब्रँड ठरतो व तशी औषधें अमाप लिहली जातात व खाली Please do not substitute असा शिक्का मारला जातो. आणि हा ते डॉक्टर पुडीत लाल पांढऱ्या पिवळ्या गोळ्या व प्लास्टिक च्या पाउच मध्ये लाल वाले औषध देतात ते कुठल्या क्वालिटी चे असते हे पण सांगावे..कि डॉक्टर कडे स्वतःची लॅब आहे त्याची गुणवत्ता तपासायला..
येड्यात काढायचे धंदे आहेत सगळे डॉक्टर लोकांचे..
व जरी फार्मासिस्ट ने ब्रँडेड कंपन्यांचे sabstitute दिले तरी हे चुकीचे आहे असे सांगितले जाते...
आजपर्यँत हा निर्णय लागू झाल्यापासून एकही डॉक्टर ने जेनेरिक ची नाव लिहलेले मी प्रेसक्रिप्शन पहिले नाही.
एकीकडे देशाचे प्रधानमंत्री मोदी जेनेरिक औषध चे प्रचार करत असताना व ब्रँड नेम लिहताना जेनेरिक ची ओण लिहावे अशी सक्ती करतात आणि दुरीकडे आरोग्य सेवेतील महत्वाचा घटक म्हणजेच डॉक्टर लोक या आदेशाला केराची टोपली दखवतात किंवा अश्या नियमास धाब्यावर बसवून मनमानी करतात.
वरील बातमी मध्ये जेनेरिक लिहनायच्या सूचना असे अध्यक्षणी म्हटले आहे..
एवढीच जर लोकांची काळजी असेल तर कायदा करा ना जेनेरिक लिहनायच्या. उगाच पोकळ बाता मारून पळवाटा देता डॉक्टर लोकांना.
मी सगळ्याच डॉक्टर ना नावे ठेवत नाही काही लोक आजसुद्धा Ethical practice करतात.
मी स्वतः फार्मासिस्ट आहे, तसेच मार्केटिंग, उत्पादन, क्षेत्रामध्ये काम केलेले आहे.. या क्षेत्रामध्ये आलेल्या अनुभव वरूनच एवढे लिहले आहे..
या विषयी बरेच काही बोलण्यासारखे आहे पण सध्यातरी एवढे पुरेसे आहे.

16/01/2017

शुक्रवार १३ जानेवारी २०१७

गैरसमजुतीमुळे जेनेरिक औषधांकडे पाठ

First Published: 17-September-2014 : 22:47:56
Last Updated at: 17-September-2014 : 23:06:4
नरेंद्र रानडे- सांगली -एखाद्या विक्रीयोग्य वस्तूची माहिती सतत कानावर पडत राहिली, तर तीच वस्तू विकत घेण्याकडे अनेकांचा कल असतो, हे सर्वसाधारण मानसशास्त्र आहे. याचा फायदा अनेकजण घेतात. महागाईच्या काळात ‘ब्रॅँडेड’ औषधांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर चालल्या आहेत. त्याला पर्याय म्हणून ‘जेनेरिक’ औषधे बहुतांशी सर्वच औषध दुकानांतून उपलब्ध आहेत. परंतु गैरसमजुतीमुळे ही औषधे घेण्याकडे रुग्णांचा कल कमी असल्याचे चित्र आहे.

बहुतांश रुग्णांचा विश्वास ‘फॅमिली डॉक्टरां’वरच असतो. साहजिकच त्यांनी लिहून दिलेली औषधे घेण्यालाच ते प्राधान्य देतात. परंतु औषध दुकानात ‘जेनेरिक’ हा प्रकार उपलब्ध असतो आणि ती औषधे खिशाला परवडतील अशा दरात उपलब्ध असतात. परंतु डॉक्टरांनी ती लिहून दिली असल्याने औषध विक्रेत्यांनी सांगूनही ती औषधे घेण्यास नकार दिला जातो, असे सर्रास पहावयास मिळते.

जेनेरिक म्हणजे काय?

जेनेरिक औषध म्हणजे मूळ औषध किंवा औषधाचे मूळ नाव. बाजारात असलेल्या विविध कंपन्या त्या औषधाला स्वत:चे ‘ब्रॅँडनेम’ देऊन त्याची विक्री करतात. साहजिकच प्रत्येक कंपनीनुसार एकाच औषधाच्या दरात तफावत आढळते. बहुतांशी सर्वच रोगांवर जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत.

‘ब्रॅँडेड’ औषधे घेण्याकडेच कल

जेनेरिक औषधांची कोठेही जाहिरात केली जात नाही. परिणामी सामान्यांना त्या औषधांची नावे माहीत नसतात. याउलट ‘ब्रॅँडेड’ कंपन्यांचे आहे. यांच्यापासून निर्मित औषधांची नावे कानावर सतत पडत असतात. त्यामुळे अनेकांचा कल ‘ब्रॅँडेड’ कंपन्यांची औषधे घेण्याकडेच असतो.

जेनेरिक व ब्रँडेड औषधांचे गुणधर्म एकच असतात. तरीही समान गुणधर्म असलेलीच, परंतु वेगळ्या कंपन्यांची औषधे घेतली, तर आरोग्यावर परिणाम होईल, असा विचार मनात डोकावतो. परिणामी खिशाला आर्थिक फटका बसतो. ‘ब्रँडेड’ कंपन्यांच्या तुलनेत ‘जेनेरिक’ औषधे ३० ते ४० टक्के स्वस्त मिळतात. खर्चात बचत होण्याकरिता रुग्णांनी ‘फॅमिली डॉक्टर’शी सल्लामसलत करून जेनेरिक औषधे घेण्यास प्रारंभ केल्यास अनावश्यक खर्च वाचण्यास मदत होऊ शकते.

किंमत कमी असण्याचे कारण

प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. ‘ब्रॅँडेड’ कंपन्यांना करावी लागणारी जाहिरातबाजी, त्यावरील कर, व्यापारी आणि केमिस्ट यांना द्यावे लागणारे कमिशन, वाहतूक खर्च अशा विविध खर्चांचा बोजा अखेरीस रुग्णांवर पडतो. याउलट जेनेरिक औषधे यातील कित्येक खर्चांपासून मुक्त असल्यामुळे ती स्वस्त दरात उपलब्ध होतात.

जेनेरिक औषधे शासकीय रुग्णालयांतून रुग्णांना दिली जातात. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आदेश काढून सर्व औषध विक्रेत्यांकडे ही औषधे विक्रीसाठी ठेवणे बंधनकारक केले पाहिजे. तसेच रुग्णांनीदेखील जेनेरिक औषधांचाच आग्रह धरला पाहिजे
- डॉ. राम हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सांगली.

‘फॅमिली डॉक्टर’नी रुग्णांना जेनेरिक औषध घेण्याचा आग्रह केला पाहिजे. या औषधांना केंद्र शासनाची मान्यता असल्यामुळे औषधे घेण्यात काहीही धोका नाही. बहुतांश औषध विक्रेत्यांकडे जेनेरिक औषधे उपलब्ध असतात. जेनेरिक औषधे घेण्याची लोकांची मानसिकता बनणे गरजेचे आहे.

- मिलिंद भिलवडे, उपाध्यक्ष, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, सांगली.

दरामध्ये तफावत

‘ब्रँडेड’ कंपन्यांचे तापावरील दहा गोळ्यांचे पाकीट बाजारात १५ रुपयांना उपलब्ध आहे, तर जेनेरिक औषधांचे पाकीट आठ रुपयांना उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ‘ब्रॅँडेड’ कंपनीच्या रक्तदाबाच्या १५ गोळ्यांचे पाकीट ५० रुपयांना मिळते, तर जेनेरिक औषधांचे पाकीट ३२ रुपयांना मिळते. ही केवळ वानगीदाखल उदाहरणे.
होम | ताज्या बातम्या | मुख्य वेबसाइट

Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail [email protected]

Good morning...... Have a healthy day
13/01/2017

Good morning...... Have a healthy day

28/01/2016

try generic medicine and ask for generic medicine to dr.

Try at least once ,definitely your confusions about generic medicine is removed.Same quality,same ef

READ MUST
25/01/2016

READ MUST

read all news
25/01/2016

read all news

31/12/2015

Happy new year ...

Address

Anant Plaza , Khardekar Chowk Near To RAM Mandir , Kagal, Dist/kolhapur
Kolhapur
416216

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 11am - 5pm

Telephone

9423060946

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddhi swast aushadhi Seva generic medicine posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share