08/02/2022
Nice DP 😉❣️...good morning 🌞...good night 😴
हे मेसेजेस म्हणजे खरतर खतरे की घंटी😅 अगदी साधी सुरवात होते.दोन्ही कडे हार्मोन्स नाचायला लागतात..its just for some fun ..म्हणत म्हणत कधी मनं गुंतली जातात कळतच नाही...आणि मग सगळाच chaos.वास्तव परिस्थिती आणि आपण निर्माण केलेलं विश्व ..ह्यात नेमकं खर काय हेच समजेनास होत.
अशीच ती एकदा माझ्याकडे आली.पूर्णपणे depressed. कळत होतं मला मी चुकीच्या मार्गाने जातेय पण....हा पण फार घातक असतो. जेव्हा तो वास्तवात आणतो ना तेव्हा खूप जास्त उशीर झालेला असतो.
दोघेही married.. पण एकमेकांच्या जोडीदाराशी न जुळलेले स्वभाव आणि त्यात social media मुळे एकदम क्लिक झाले.मग काय nice DP ने झालेली सुरवात कॉफी टेबल पर्यंत कधी आली कळलंच नाही आणि आता भावनिक गुंतागुंत झाल्यावर जेव्हा त्याला कळलं की आपली family life affect हितेय तेव्हा त्याने अचानक बंद केलेलं संभाषण.
तोपर्यंत तिच्या मेंदूला सारख phone ping कडे लक्ष ठेवायची सवय लागलेली .अत्ता अचानक सगळच बंद.मग रडणं,घर affect होणं,नवऱ्याला संशय येणं आणि मुलांवर राग काढणं हे चक्र.काही sessions नंतर ती नॉर्मल ला आल्यावर तिला तिच्या मध्ये आणि तिच्या नवऱ्या मध्ये कशी compatibility आणता येईल हे लक्ष्यात आणून दिलं. आणि स्वतःच्या संसारवर Focus केल्यावर,स्वतःच सुख स्वतःमधेच शोधल्यावर तिला कुठल्याही Nice DP ह्या comment ची गरज भासणच बंद झालं❤️💝
सगळ्यांना आपला sixth sense कायम जागृत ठेवायची गरज आहे.आणि ही गोष्ट पुरुषांसोबत सुद्धा हल्ली घडते बरं का.So सावधान😅.
By the way... nice DP हा🤭😃
Mrs Manasi Mahajan
Counsellor,Reiki master, Cognitive behavorial therapist, Guided meditation facilitator
U in YOU