Ashirwad Clinic

Ashirwad Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ashirwad Clinic, Medical and health, ASHIRWAD CLINIC. Shop No 7, A3/A4 Chandresh Corner, Opp. Police Station, Near Saidham Mandir, Station Road, Nallasopara(west). Tal-Vasai. Dist-Palghar, Nala Sopara.

01/08/2026

*चंडीपुरा व्हायरस - सीमारेषेवर रोरावणारे भयाण वादळ ! 👹*

*( ©️ही पोस्ट आपण कोणताही बदल न करता नावासह अग्रेषित करू शकता )*

*🌹डॉ. पद्मनाभ केसकर*
आत्ययिक चिकित्सा तज्ञ , पुणे
Mobile - 9762258650

आपल्याला सर्वांना माहीतच असेल की महाराष्ट्राच्या सीमारेषेला लागून असलेल्या गुजरातमध्ये सध्या एका भयानक व्हायरसने उच्छाद मांडला आहे आणि त्या व्हायरस चे नाव आहे - *'चंडीपुरा व्हायरस'*

या आजाराच्या आत्तापर्यंत गुजरात मध्ये सुमारे 84 केसेस आढळल्या आहेत आणि त्यापैकी 32 बालकांचा मृत्यू या आजारामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून हा चंडीपुरा व्हायरस किती धोकादायक आहे हे आपल्या लक्षात आलेच असेल! ... *या आजाराचा मृत्यू दर 56 ते 75 टक्के आहे.*

असे लक्षात आले आहे की हा चंडीपुरा व्हायरस शक्यतो लहान मुलांना ( नऊ महिने ते पंधरा वर्ष ) बाधित करतो. आणि त्यांच्या मेंदू ( ) आणि चेतासंस्थेवर हल्ला करतो.

*⭕हा विषाणू Rhabdoviridae प्रजातीचा आहे* आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे rabies virus पण याच प्रजातीचा आहे. आणि दोघेही रुग्णाच्या Nervous System वरती हल्ला करतात.

*🤔 हा व्हायरस नव्यानेच उत्पन्न झालेला आहे का ?*

नाही ..
चंडीपूरा हा नवीन विषाणू नसून *नागपूर परिसरातील चंडीपुर या भागात 1965 साली या व्हायरस मुळे बाधित झालेले रुग्ण प्रथम आढळले म्हणून या व्हायरस चे नाव चंडीपुर व्हायरस असे ठेवण्यात आले.* याआधी पण 2003 - 04 साली या व्हायरसच्या उद्रेका मुळे महाराष्ट्र , आंध्र प्रदेश , गुजरात मध्ये 300 बालकांचा जीव गेलेला होता . याच आजाराला *चंडीपुर मेंदूज्वर* असे पण म्हणतात.

*🌸चंडीपुर विषाणूचा प्रसार एका बालकाकडून दुसऱ्या बालकाकडे कसा होतो ?*

चंडीपूरा आजाराच्‍या विषाणूचा प्रसार *सॅन्‍डफलाय माशी* चावल्‍यामुळे होतो. सॅन्‍डफलाय ही माशी डासापेक्षा लहान असून तिचा रंग वाळूसारखा भुरकट असतो. माशीचे पंख केसाळ असतात. माशीचा आकार १.५ ते २.५ मिलीमिटर असतो. सॅन्‍डफलाय या माश्‍या राञीच्‍या वेळी जास्‍त क्रियाशील असतात व त्‍यांचा चावा अत्‍यंत वेदनादायक असतो. त्‍या क्‍वचितच दृष्‍टीपथास पडतात. दिवसा सॅन्‍डफलाय माश्‍या घरातील अंधा-या जागा, भिंतीमधील भेगा व खड्डे यामध्‍ये राहतात. सॅन्‍डफलाय राञी क्रियाशील होऊन घरातील व्‍यक्‍तीचा चावा घेतात.

मादी माशीला दर ३ किंवा ४ दिवसांनी अंडी घालण्‍याकरीता रक्‍ताची आवश्‍यकता असते.*फक्‍त मादी सॅन्‍डफलाय माशीला अंडीच्‍या पोषणाकरीता रक्‍ताची आवश्‍यकता असते त्‍यामुळे तिने चावा घेतल्याने विषाणूचा प्रसार होतो.*

तसेच डेंगी साठी कारणीभूत असलेल्या *एडीस इजिप्ती* या डासामार्फत तसेच प्राण्यांच्या अंगावरील *टीक* मार्फत सुद्धा या विषाणूचा प्रसार होऊ शकतो.

*🍁अधिशयन काळ ( Incubation period )*
या आजाराचा अधिशयन काळ काही तास ते २ – ३ दिवस असतो. म्हणजे विषाणू रक्तात गेल्यापासून त्वरित लक्षणे दिसायला सुरुवात होते.

*🍁चंडीपुर विषाणू बाधेची लक्षणे काय असतात ?*

या आजारामध्ये रोगाची लक्षणे अचानक सुरु होतात.

➡️तीव्र ताप ( High grade Fever )
➡️तीव्र डोकेदुखी ( Severe headache )
➡️उलटी ( Vomiting )
➡️झटके येणे ( Convulsion )
➡️अर्धबेशुध्दावस्था ( Loss of consciousness )
➡️मेंदूला सूज येणे ( Encephalitis )

*⭕Neurological deficit* (examples include an inability to speak, loss of balance, vision changes)

*🌸निदान ( Diagnosis) -*

RT - PCR टेस्ट द्वारे या आजाराचे निदान करता येते. ती सुविधा पुण्यामधील NIV येथे उपलब्ध आहे.

*💊उपचार पद्धती*

चंडीपुरा मेंदूज्वरासाठी ( CHPV ) सुनिश्चित चिकित्सा पद्धती ( Specific treatment ) अस्तित्वात नाही. There is no definitive treatment available for CHPV.

वेळेवरती या आजाराचे निदान करून रुग्णाला हायर सेंटर ला रेफर करणे आणि त्याला लक्षणाप्रमाणे उपचार करणे तसेच त्याच्यामध्ये जीवाला धोका उत्पन्न होईल अशी गुंतागुंत टाळणे हे अतिशय महत्त्वाचे असते. *( Timely referral to higher center to avoid life threatening Complications is very important )*

*⭕सध्या तरी चंडीपुरा विषाणूसाठी कोणतीही विशिष्ट लस किंवा अँटीव्हायरल उपचार नाही.*

*या आजाराचा मृत्युदर ( 55 - 75 %) जास्ती असल्याने* मृत्यू टाळण्यासाठी लवकर या आजाराचे निदान होणे महत्त्वाचे असते आणि बरोबरीने हॉस्पिटलायझेशन आणि लक्षणात्मक काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

*पेशंटला वेळीच रुग्णालयात दाखल करणे ( Hospitalisation)* : गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.

*हायड्रेशन ( Hydration )* : रुग्णाला योग्य हायड्रेशन सुनिश्चित करणे महत्वाचे आहे, विशेषत: ज्या रुग्णां मध्ये उलट्या तीव्र स्वरूपाच्या असतात त्यांच्यामध्ये डीहायड्रेशन होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते.

*गहन काळजी ( Critical Care )* : गंभीर न्यूरोलॉजिकल लक्षणांमध्ये, रुग्णाच्या श्वसन आणि न्यूरोलॉजिकल गुंतागुंतीचे व्यवस्थापन करण्यासाठी आय सी यु मध्ये ऍडमिशन करून काळजी घेणे आवश्यक असते.

*ताप कमी करण्यासाठी औषधोपचार ( Antipyretics ) हे आवश्यक आहेत.*

या आजारामध्ये रुग्णाला फिट येतात त्या थांबवण्यासाठी वेळीच औषधोपचार *( Anticonvulsants)* गरजेचे आहेत.

*🌸प्रतिबंधात्मक उपचार -*

प्रतिबंधात्मक उपायांचा उद्देश प्रामुख्याने वाळूमाशांच्या ( Sandflies ) वर नियंत्रण ठेवणे तसेच रुग्णाशी त्याचा संपर्क कमी करणे महत्त्वाचे आहे.

सँडफ्लाय ( Sandflies ) / एडिस इजिप्ती डासाचे चावे ( Bite ) टाळण्यासाठी : डास चावणे कमी करण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे. झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे.

कीटकनाशके ( Insecticides ) : सँडफ्लाय / डास चावण्याचा धोका कमी करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर सुद्धा करणे महत्त्वाचे आहे.

*परिसर स्वच्छ ठेवा* : आपला परिसर स्वच्छ ठेवा. तुमच्या परिसरात सँडफ्लाय प्रजनन स्थळे नाहीत याची खात्री करा.

या प्रतिबंधात्मक उपायांनी चंडीपुरा व्हायरस चा फैलाव टाळण्यासाठी मदत होते.

जर का योग्यवेळी आजाराचे निदान होऊन वेळीच रुग्णाला वैद्यकीय मदत दिली गेली तर रुग्णाचा जीव नक्की वाचू शकतो. आणि आपल्याकडे जी म्हण आहे *PREVENTION IS BETTER THAN CURE !* ती लक्षात ठेवून मुळात या विषाणूचे संक्रमण होऊ नये यासाठी वर काळजी जर का घेतली तर नक्कीच या डेडली आजारावरती आपण मात करू शकू.

*( ©️ही पोस्ट आपण कोणताही बदल न करता नावासह अग्रेषित करू शकता )*

*🌹डॉ. पद्मनाभ केसकर*
आत्ययिक चिकित्सा तज्ञ , पुणे
Mobile - 9762258650

30/05/2026

*📌इबोला व्हायरस साथीला WHO ने जागतिक आणीबाणी घोषित केली आहे. या व्हायरसचा धोका भारताला किती आहे आणि हा आजार नक्की आहे काय ?*

*🍁डॉ. पद्मनाभ केसकर*
आत्ययिक चिकित्सा तज्ञ , पुणे
Mobile - 9762258650

*©️आपण हा लेख कोणताही बदल न करता माझ्या नावासह पुढे अग्रेषित करू शकता.*

जागतिक आरोग्य संघटनेने इबोला साथीला *'आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी' म्हणजेच PHEIC (Public Health Emergency of International Concern)* असे घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.

हा संसर्ग सध्या काँगो आणि युगांडा या दोन देशांमध्ये आढळला आहे. यावेळी आफ्रिकेतील परिस्थिती 'परफेक्ट स्टॉर्म' (अतिशय गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक) बनली आहे.

एखादा आजार दूर देशामध्ये असतो तेव्हा आपल्याला त्याविषयी काही वाटत नाही पण आता ग्लोबलायझेशन मुळे कोणतीच गोष्ट किंवा धोका आता दूर राहिलेला नाही. त्यामुळे जगाच्या एका कोपऱ्यात घडलेली घटना कधी आपल्या दरवाजामध्ये येईल हे सांगता येत नाही.

इबोला हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. Ebola is a hemorrhagic viral fever . म्हणजेच या व्हायरल आजारामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव होतो

१९७६ मध्ये आफ्रिकेतील झाईर (आताचे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो) येथे तज्ञांनी ऑर्थो इबोला व्हायरस या इबोलास कारणीभूत विषाणू चा पहिल्यांदा शोध लावला. या जीवघेण्या व्हायरल आजाराचा प्रादुर्भाव आफ्रिकन देशांमध्ये नियमितपणे होत असतो.

इबोलाचा सर्वात मोठा प्रादुर्भाव २०१३ ते २०१६ दरम्यान झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत या आजाराचे जगभरात एकूण २८,६५२ रुग्ण आढळले असून, १० देशांमध्ये ११,३२५ मृत्यूंची नोंद झाली आहे.

*⭕इबोलाचे चार वेगवेगळे प्रकार आहेत*

*📌बुंदीबुग्यो इबोलाव्हायरस (बुंदीबुग्यो व्हायरस) BDBV :*

इतर प्रकारांच्या तुलनेत यामुळे मृत्यू होण्याची शक्यता कमी असते.

*📌सुदान इबोलाव्हायरस (सुदान व्हायरस) SVD :*

हा रोग प्राणघातक असण्याची अधिक शक्यता असते.

*📌ताई फॉरेस्ट इबोला विषाणू (Taï Forest virus) TAFV :*

हे इबोलाचे सर्वात दुर्मिळ कारण आहे.

*📌झायर इबोला व्हायरस (इबोला विषाणू) EVD :*

यामुळे इबोला विषाणूजन्य रोग (EVD) होतो. इबोलाच्या साथी आणि मृत्यूंचे EVD हे सर्वात सामान्य कारण आहे.

*🔺इबोला व्हायरसच्या इन्फेक्शन ची मुख्य लक्षणे कोणती?* (What are the main symptoms of Ebola?)

*इबोलाची लागण झाल्यानंतर २ ते २१ दिवसांच्या आत लक्षणे दिसू लागतात* ( Incubation period - 2 to 21 days )

➡️ अचानक तीव्र ताप आणि थकवा.
➡️ स्नायू, डोके आणि घशात तीव्र वेदना.
➡️ उलट्या, अतिसार (जुलाब) आणि पोटदुखी.
➡️ त्वचा लाल होणे, तसेच नाक, तोंड किंवा डोळ्यातून अंतर्गत किंवा बाह्य रक्तस्त्राव होणे.

*🔺 नंतरच्या टप्प्यात दिसणारी इबोलाची गंभीर लक्षणे :*

➡️काळी, डांबरासारखी विष्ठा ( Melena )
➡️रक्तस्त्राव तसेच गोंधळाची स्थिती निर्माण होणे
➡️रक्तमिश्रित जुलाब
➡️त्वचेखाली पुरळ किंवा रक्ताचे डाग ( Petachiae & purpura )
➡️लाल किंवा रक्तवर्णीय डोळे
➡️रक्ताळलेली किंवा कॉफीच्या चोथ्यासारखी दिसणारी उलटी ( कॉफी ग्राउंड एमेसिस )

*🔺इबोलाचे अति गंभीर टप्पे :*

➡️मेंदूचा दाह ( एन्सेफलायटिस )
➡️अवयव निकामी होणे ( multi orgon failure)
➡️झटके ( Convulsions )
➡️ रक्तदाब अति प्रमाणात कमी होणे आणि परिणामतः Shock

*💢 इबोला व्हायरस चा संसर्ग कसा होतो? (Transmission)*

हा आजार हवेतून पसरत नाही. बाधित व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या शरीरातील द्रव (रक्त, लाळ, घाम, लघवी इ.) थेट संपर्कात आल्यास पुढील व्यक्तीस संसर्ग होतो.

बाधित व्यक्तीच्या वापरातील वस्तूंना (उदा. सुया, कपडे) स्पर्श केल्यानेही रोग पसरू शकतो.

मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारादरम्यान त्यांच्या शरीराला स्पर्श केल्याने संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

*♻️प्रतिबंध आणि उपाय (Prevention)*

➡️आजारी किंवा संशयित व्यक्तीच्या थेट संपर्कात येणे टाळावे.

➡️वारंवार हात साबणाने किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने स्वच्छ धुवावेत.

➡️आफ्रिकन देशांमधून प्रवास करताना विशेष खबरदारी बाळगून स्थानिक आरोग्य यंत्रणांच्या सूचनांचे पालन करावे.

*💊इबोला आजारासाठी उपचार आहेत का?💉*

होय, इबोलावर उपचार उपलब्ध आहेत. त्यासाठी इबोला व्हायरसच्या इन्फेक्शनचे निदान लवकर होणे गरजेचे आहे.

*🩸इबोला विषाणू रोगासाठी दोन मोनोक्लोनल अँटीबॉडी उपचार पद्धती वापरतात.*

मोनोक्लोनल अँटीबॉडीज रोगप्रतिकार प्रणालीच्या नैसर्गिक अँटीबॉडीजप्रमाणे कार्य करतात . जोपर्यंत शरीर या व्हायरस पासून स्वतः चा बचाव करण्यासाठी स्वतःची संरक्षण यंत्रणा तयार करत असते तोपर्यंत, त्या संसर्गाशी लढण्यासाठी या बाहेरून दिलेल्या मोनोक्लोनल अँटीबोडी मदत करतात.

*🧬मोनोक्लोनल अँटीबॉडी उपचारांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:*

*💉एबांगा :* .हे एक एकल ( single ) मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे.

*💉इन्माझेब :* हे तीन ( triple ) मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे मिश्रण आहे.

*⭕तज्ञांनी या उपचारपद्धतींची चाचणी केवळ झाईरमधील इबोला विषाणू संसर्गावर केली आहे.*

बाकी उपचार हे लाक्षणिक उपचार आहेत तसेच पेशंटमध्ये ज्या गुंतागुंती निर्माण होत आहेत त्याप्रमाणे पेशंटला आय सी यु मध्ये ट्रीटमेंट दिली जाते.

*⭕ इबोला या साथीच्या रोगामध्ये मृत्यू दर किती आहे ?*

*🚫उपचार न केल्यास, इबोला विषाणूची लागण झालेल्या १० पैकी ९ लोकांचा मृत्यू होऊ शकतो.*

*🚫सुदान विषाणू सुमारे निम्म्या प्रकरणांमध्ये प्राणघातक ठरतो.*

*🚫बुंदीबुग्यो विषाणू सुमारे १० पैकी ३ प्रकरणांमध्ये प्राणघातक ठरतो.*

सर्वसाधारण पणे इबोलाचा मृत्यू दर हा 50% च्या आसपास आहे.

त्यामुळे हा प्राणघातक आजार आपल्या देशात प्रवेश करू नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. सध्या विशेषता आफ्रिकन देशांमधून जे प्रवास करून येत आहेत त्यांच्यामध्ये जर का आजाराची लक्षणे आढळली तर त्यांच्या तपासण्या आणि विलगीकरण केले जात आहे तसेच दुबई आणि बँकॉक या देशातून जे प्रवास करून येत आहेत त्यांच्या तपासण्या एअरपोर्ट वरती केल्या जात आहेत.

सध्या जगावरती अनेक संकटे कोसळत आहेत आणि देव करो आणि ही ईबोलाची इडा पिडा टळो असेच आता म्हणावे लागेल.

*©️आपण हा लेख कोणताही बदल न करता माझ्या नावासह पुढे अग्रेषित करू शकता.*

आपणास माझे लेख आणि वैद्यकीय लिखाण आवडत असल्यास डॉक्टर मंडळी त्यांच्या प्रॅक्टिससाठी अत्यंत उपयुक्त असलेले - *इमर्जन्सी मॅनेजमेंट इन जनरल प्रॅक्टिस* या माझ्या पुस्तकाची *सहावी आवृत्ती* माझ्याकडून मागवू शकता.

*🍁डॉ. पद्मनाभ केसकर*
आत्ययिक चिकित्सा तज्ञ , पुणे
Mobile - 9762258650

05/05/2026

*⭕उष्माघात म्हणजे काय आणि त्याचे उपचार*

*डॉ. पद्मनाभ केसकर*
आत्ययिक चिकित्सा तद्न्य , पुणे
Mobile - 9762258650

*©️ हा लेख आपण कोणताही बदल न करता माझ्या नावासह अग्रेषित करू शकता.*

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरलेली आहे आणि तापमानाने उच्चांक गाठलेले आहेत. कधीकाळी पुणे नाशिक ही शहरे उन्हाळ्यामध्ये सुद्धा सुखद तापमानाची समजली जात पण या शहरांमध्ये सुद्धा आता तापमानाने सतत 40 डिग्री सेल्सिअस ची पातळी पार केलेली आहे.

महाराष्ट्र सरकारने सुद्धा या वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या उष्माघाताच्या दुर्घटना टाळण्यासाठी गाईडलाईन जारी केलेल्या आहेत तसेच उष्माघाताच्या रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये बेड सुद्धा राखीव ठेवलेले आहेत. तेव्हा आपण या उष्माघातासंदर्भात थोडी माहिती घेऊया.

*🔺उष्माघात त्यालाच सर्वसामान्य जनता हिट स्ट्रोक किंवा सन स्ट्रोक असे म्हणते*

उष्माघात म्हणजे जेव्हा बाह्य वातावरणातील तापमानामुळे किंवा अति श्रमामुळे *शरीराचे अंतर्गत तापमान 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा वाढते ( 40°C or 104°F ) तेव्हा त्याला उष्माघात किंवा सनस्ट्रोक असे म्हणतात ( Body temperature increases more than 40°C or 104°F )*

उष्माघात ही गंभीर परिस्थिती समजली जाते कारण त्यामुळे शरीरातील अवयव निकामी होऊ शकतात ( multi organ failure )

उष्माघात हा वातावरणातील वाढत्या तापमानामुळे पण होऊ शकतो किंवा बाह्य तापमान योग्य असताना सुद्धा अति श्रमा मुळे ( Over extertion ) सुद्धा होऊ शकतो.

अतिश्रमामुळे होणाऱ्या उष्माघातामध्ये ( exertional Heat Stroke ) रुग्णाला अति घाम येणे हे लक्षण दिसते पण classical Heat Stroke मध्ये मात्र ही घाम येऊन तापमान नियंत्रित करण्याची प्रक्रिया बंद पडते आणि रुग्णाला घाम येत नाही आणि त्याला तीव्र स्वरूपाचा उष्माघाताचा त्रास होतो.

उष्माघात हा अचानक ( sudden ) होऊ शकतो किंवा हळूहळू ( gradual ) त्यामध्ये वाढ होत असताना दिसते आणि त्यानंतर त्रास होतो.

Heat Stroke आणि Heat Exhaustion यामध्ये थोडा फरक आहे. Heat Exhaustion हा सौम्य प्रकार आहे ज्यामध्ये उष्माघाता ची बाकी लक्षणे दिसतात पण त्यामुळे multi organ failure होत नाही किंवा तो प्राण घातक नाही.

*⭕उष्माघाताची लक्षणे*

उष्माघाताच्या तीव्रतेप्रमाणे लक्षणे बदलतात पण सर्वसामान्यपणे -

➡️त्वचा लाल होणे
➡️डोके दुखणे
➡️चक्कर येणे
➡️संभ्रम अवस्था निर्माण होणे
➡️उलटी , मळमळ होणे
➡️ अशक्तपणा येणे
➡️चिडचिडेपणा वाढणे
तीव्र स्वरूपाच्या उष्माघातामध्ये शरीरात गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होते आणि -
➡️ अपस्मराचे झटके येणे ( Convulsions )
➡️ स्नायू फाटक जाणे ( Rhabdomyolysis )
➡️ किडनी निकामी होणे
➡️ कार्डियाक अरेस्ट
आणि अंतिम टप्प्यामध्ये विविध अवयव निकामी होणे ( multi organ failure ) आणि मृत्यू हे सुद्धा आढळू शकते.

➡️कोरडी त्वचा (सर्वसाधारण उष्माघात ) किंवा घामाने भिजलेली त्वचा (शारीरिक श्रमामुळे होणारा उष्माघात).

लहान मुलांमध्ये आणि वृद्ध व्यक्तींमध्ये उष्माघाताची तीव्रता जास्त दिसू शकते तसेच लक्षणे पण वेगाने निर्माण होऊ शकतात.

🔺 उष्माघाताची तीव्रता बंद जागेमध्ये आणि ज्या ठिकाणी वायुविजन नाही त्या ठिकाणी जास्ती प्रमाणात जाणवू शकते.

उदाहरणार्थ उन्हामध्ये गाडी असताना आत मध्ये लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना अल्प कालावधी साठी सुद्धा ठेवू नये. बाहेरील तापमान 40 डिग्री सेल्सिअस जरी असले तरी अशा बंद गाडी मधील तापमान 55 ते 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत असण्याची शक्यता असते आणि कमी कालावधीमध्ये उष्माघाताचा तीव्र झटका त्या व्यक्तीला येऊ शकतो.

तसेच काही ठिकाणी घरगुती उद्योग किंवा कामगार अत्यंत छोट्या खोलीमध्ये ज्या ठिकाणी खिडकी नाही किंवा वायु विजनाची सोय नाही अशा ठिकाणी Heat Exhaustion आणि नंतर परिणामी उष्माघाताला बळी पडू शकतात.

*⭕उष्माघाता साठी उपचार आणि उपाययोजना*

*🔺उष्माघातावरील प्रथमोपचार*

उष्माघातामुळे त्या व्यक्तीची शुद्धीवर राहण्याची आणि जागे राहण्याची क्षमता कमी होते . त्यामुळे या रुग्णांना मदतीसाठी आजूबाजूच्या लोकांची गरज भासण्याची शक्यता असते.

*🍁उष्माघाताची लक्षणे असलेल्या व्यक्तीसाठी खालील गोष्टी कराव्यात:*

➡️त्या व्यक्तीला उन्हातून किंवा उष्णतेतून काढून थंड आणि सावलीच्या ठिकाणी न्या.

➡️ रुग्णाच्या शरीरावर थंड पाणी शिंपडा आणि त्यांना वारा घालण्यासाठी उपलब्ध असलेल्या कोणत्याही वस्तूचा वापर करा. जेणेकरून शरीर वेगाने थंड होईल.

➡️एक टॉवेल बर्फाच्या पाण्यात भिजवा आणि शरीर पुसून काढा आणि तो थंड टॉवेल शरीरावर ठेवा.

➡️ रुग्णाच्या शरीराच्या त्वचेचा जास्तीत जास्त भाग झाका. दर मिनिटाला किंवा लवकरात लवकर नवीन भिजवलेले टॉवेल बदला.

➡️ रुग्णाच्या काखेत किंवा मानेवर बर्फ किंवा थंड पट्ट्या लावा.

🚫 ताप कमी करणारी औषधे देऊ नका . ही औषधे उष्माघातावर (हीट स्ट्रोकवर) मदत करत नाहीत. कारण उष्माघातामुळे येणारा ताप हा अन्य तापापेक्षा वेगळ्या कारणांमुळे होतो. तसेच, या औषधांमुळे अवयवांचे नुकसान होण्यासारख्या गुंतागुंती आणखी वाढू शकतात.

🔺 तीव्र उष्माघाताची लक्षणे असणाऱ्या रुग्णाला लवकरात लवकर रुग्णालयातील आपत्कालीन कक्षामध्ये घेऊन जावे जिथे त्याच्यावर सुयोग्य वैद्यकीय उपचार होतील आणि पुढील अवयवाची हानी टाळता येईल.

आपत्कालीन कक्षातील डॉक्टर रुग्णाचे शरीर सुरक्षित तापमानापर्यंत थंड करण्यावर भर देतात. शरीर थंड करण्याच्या सामान्य पद्धतींमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

*➡️थंड पाण्यात बुडवणे -* याचा उपयोग सामान्यतः नेहमीच्या उष्माघाताऐवजी शारीरिक श्रमामुळे होणाऱ्या उष्माघातासाठी केला जातो.

या पद्धतीमध्ये रुग्णाचे डोके सोडून संपूर्ण शरीर थंड पाण्यात किंवा बर्फाच्या पाण्यात बुडवले जाते. यामुळे शरीरातील उष्णता वेगाने बाहेर पडते .

🔺 फक्त हा उपाय करत असताना तो रुग्ण शुद्धीत नसल्यास त्याच्या नाका तोंडात पाणी जाणार नाही ( Aspiration) याची खात्री करावी लागते. म्हणून हा उपाय वैद्यकीय मार्गदर्शनाखाली केला जातो.

➡️ थंड पाण्याचे शरीरावर स्प्रे मारणे आणि बरोबरीने पंखा लावणे . याचा उपयोग सामान्य उष्माघातासाठी केला जातो, परंतु तो दोन्ही प्रकारांसाठी उपयुक्त ठरू शकतो. त्वचेवरून पाण्याची वाफ झाल्यामुळे, तुमच्या तापमान कमी होते.

🔺 आपत्कालीन कक्षातील डॉक्टर गुंतागुंतीच्या लक्षणांसाठी रुग्णाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवतात. त्याचे ब्लड प्रेशर नाडीचे ठोके रक्ताच्या विविध चाचण्या केल्या जातात आणि शरीरामध्ये धोकादायक स्थिती निर्माण होत नाही ना यावर लक्ष ठेवले जाते.

*⭕आवश्यकतेनुसार पुढील उपचार रुग्णाला दिले जातात:*

*➡️ IV द्रव पदार्थ अर्थात सलाईन(शिरेद्वारे) -* जर का रुग्णाला जास्त प्रमाणात डीहायड्रेशन असेल आणि त्याला मेंदूच्या संदर्भामध्ये लक्षणे दिसत असतील तर गरज पडल्यास डॉक्टर रुग्णाला थंड सलाईन ( cold IV fluids ) देण्याचा निर्णय घेऊ शकतात.

➡️ रुग्णाचे श्वसन व्यवस्थित सुरू राहण्यासाठी ऑक्सिजन देणे आणि गरज पडल्यास इंट्यूबेशन करणे.

➡️ शरीरातील विविध अवयवांचे कार्य चालू ठेवण्यासाठी लागणारी योग्य ती औषधे गरजेप्रमाणे रुग्णाला द्यावी लागतात जेणेकरून रुग्ण multi organ failure मध्ये जाणार नाही.

🍁 सर्वात महत्त्वाचे म्हणजे *Prevention is better than cure* हे लक्षात ठेवावे.

त्यामुळे उष्माघात होऊच नये यासाठी सर्वसामान्य लोकांनी काळजी घेणे हे जास्त महत्त्वाचे आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा तापमानाची पातळी खूप जास्ती आहे अशावेळी शक्यतो उन्हात बाहेर जाणे टाळावे.

जर का जाणे गरजेचेच असेल तर शरीराचा जास्तीत जास्त भाग पांढऱ्या कपड्याने झाकून घ्यावा.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्ण - तिखट पदार्थ जास्त खाऊ नयेत तसेच अल्कोहोल - धूम्रपान टाळावे.

वारंवार पाणी पिऊन शरीरामधील पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राहील याची काळजी घ्यावी. दिवसाला कमीत कमी तीन लिटर पाणी प्यावे. ज्यांना किडनीचे आजार आहेत त्यांनी मात्र पाण्याचे प्रमाण किती ठेवावे यासंदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्ती प्रमाणात घाम येतो त्यामुळे केवळ शरीरातील पाणी बाहेर पडत नाही तर क्षार पण बाहेर पडतात आणि सोडियमची कमतरता भासू शकते त्यामुळे केवळ पाणी न पिता - बरोबरीने नारळाचे पाणी , ताजे किंचित मीठ घातलेले ताक तसेच कैरीचे पन्हे आणि फ्रेश ज्यूस यांचा वापर आहारात करावा.

तरुण वर्गाने त्यांच्या नेहमीच्या जीन्स स्लॅक्स इत्यादी घट्ट कपड्यांचा वापर टाळावा. सैलसर पांढरे कपडे घालावेत बाहेर जाताना डोक्यावरती टोपी - स्कार्फ इत्यादी चा वापर करावा.

कामाच्या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित वायुविजन होईल याची खबरदारी घ्यावी.

अशा पद्धतीने जर का काळजी घेतली तर आपण उष्माघाताला बळी पडणार नाही आणि मुख्यता जर का कोणाला उष्माघात होत असताना दिसला तर आपण तो लगेच ओळखू शकू आणि त्यावरील उपचार करू शकू.

*©️ हा लेख आपण कोणताही बदल न करता माझ्या नावासह अग्रेषित करू शकता.*

( असे सहज सोप्या भाषेतील दैनंदिन प्रॅक्टिस साठी उपयुक्त लेख वाचण्यासाठी डॉक्टर मंडळी माझे इमर्जन्सी मॅनेजमेंट इन जनरल प्रॅक्टिस हे पुस्तक वाचू शकता. ज्याच्या पाचव्या आवृत्तीच्या काही निवडक प्रती शिल्लक आहेत )

*डॉ. पद्मनाभ केसकर*
आत्ययिक चिकित्सा तद्न्य , पुणे
Mobile - 9762258650

06/02/2026

“Exercise करतो,
तरी fat का कमी होत नाही?”

हा प्रश्न आजकाल खूप जण विचारतात.

“Sir, चालतो… gym करतो…
तरीही पोटाभोवती चरबी काही कमी होत नाही.”

हे exercise चं अपयश नसतं.
बहुतेक वेळा metabolism exercise ला योग्य प्रतिसाद देत नाही.

चला कारणं समजून घेऊया.

1️⃣ Exercise कमी वेळ, उरलेला दिवस बसून जातो
Exercise 30–45 मिनिटांचा असतो.
बाकीचे 23 तास बसून गेले, तर metabolism fat जाळायला तयार होत नाही.

2️⃣ Muscle काम कमी, cardio जास्त
फक्त चालणं किंवा treadmill पुरेसं नसतं.
Muscle काम केलं नाही, तर sugar वापर कमी आणि fat burning मंदावते.

3️⃣ Exercise नंतर “reward eating”
Exercise केल्यावर “मी मेहनत केली” असं वाटतं. आणि नकळत जास्त खाल्लं जातं.
Metabolism confusion मध्ये जातो.

4️⃣ झोप आणि stress fat loss थांबवतात
झोप कमी, ताण जास्त असेल,
तर शरीर fat साठवणं सुरक्षित समजतं.
Exercise असूनही वजन अडकतं.

5️⃣ Exercise timing आणि meal timing mismatch
कधी exercise, कधी जेवण , याला rhythm नसतो. Metabolism rhythm वर चालतो,
random effort वर नाही.

6️⃣ Fat loss ≠ weight loss
Weight कमी होत नाही म्हणजे fat कमी होत नाही असं नाही. पण waist, कपड्यांची फिट, energy हे बघणं जास्त महत्त्वाचं.

7️⃣ Under-fueling metabolism
खूप कमी खाणं, crash dieting.
शरीर survival mode मध्ये जातं.
Fat जाळण्याऐवजी साठवायला शिकतं.

8️⃣ Hormonal & metabolic resistance
Insulin resistance, fatty liver असल्यावर exercise ला प्रतिसाद कमी मिळतो.
Metabolism आधी सुधारावा लागतो.

Exercise आवश्यक आहे , शंका नाही.
पण exercise एकटा metabolism सुधारत नाही.

Fat loss हा Exercise + daily movement + sleep + stress + food rhythm या सगळ्यांचा मिळून परिणाम असतो.

Dr Ravindra L. Kulkarni,

23/01/2026

“औषध तुमचे आहे, पण कायदा त्यांचा आहे!”
परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीय रुग्णांसाठी एक धोक्याची घंटा.**

*डॉ. मंथन शेठ*
हेल्थ टाइम्स, दर्पण, गुजरात मित्र, १४/०१/२०२६

गेल्या आठवड्यात एक बातमी माझ्या मनात घोळत राहिली. तीव्र पाठदुखीने त्रस्त असलेला एक सामान्य भारतीय नागरिक, भारतात त्याच्या डॉक्टरांनी लिहून दिलेले **ट्रॅमाडॉल** हे औषध घेऊन परदेशात गेला. विमानतळावर त्याला थांबवण्यात आले. चौकशी करण्यात आली. तपासणी झाली. आणि काही मिनिटांतच तो 'रुग्ण' वरून 'आरोपी' बनला. आज ती व्यक्ती तुरुंगात आहे.

त्याचा तस्करी करण्याचा कोणताही हेतू नव्हता.
तो अंमली पदार्थ विकत नव्हता.
तो फक्त आपली वेदना कमी करण्यासाठी औषध घेऊन जात होता.

पण त्या देशात, **ट्रॅमाडॉलला अंमली पदार्थ म्हणून वर्गीकृत केले आहे**.

यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो:
आपल्यासाठी 'उपचार' असलेले औषध दुसऱ्या देशात **गुन्हा** ठरू शकते, हे आपल्याला खरोखरच माहीत आहे का?

देश बदलतात, कायदे बदलतात. औषधे बदलत नाहीत.
भारतात आपण औषधांकडे खूप सहजपणे पाहतो. डॉक्टर ती लिहून देतात, आपण मेडिकल स्टोअरमधून विकत घेतो, घरी ठेवतो आणि प्रवासातही सोबत नेतो. समस्या तेव्हा सुरू होते, जेव्हा आपण असे गृहीत धरतो की **भारताचा कायदेशीर दृष्टिकोन जगभर लागू होतो**. वास्तविक, भारताचे औषध नियंत्रण कायदे वेगळे आहेत; यूएई, जपान, सिंगापूर, सौदी अरेबिया, कतार, इंडोनेशिया - प्रत्येक देशाचे कायदे वेगळे आहेत.

भारतात जे औषध **शेड्यूल एच** किंवा **डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय न मिळणारे औषध** आहे, ते इतरत्र **अंमली पदार्थ** किंवा **मानसिक स्थितीवर परिणाम करणारा पदार्थ** मानले जाऊ शकते. कायदा औषधाकडे पाहत नाही - तो **धोक्याकडे** पाहतो.

अशी अनेक औषधे आहेत, पण **ट्रॅमाडॉल** हे एक उत्तम उदाहरण आहे. भारतातील लाखो रुग्ण ते वापरतात. तथापि, यूएई, इजिप्त, इंडोनेशिया आणि सौदी अरेबियामध्ये ते एक **ओपिओइड अंमली पदार्थ** आहे. केवळ जवळ बाळगल्यास तुरुंगवास होऊ शकतो. अलीकडील प्रकरणात, त्या व्यक्तीकडे फक्त १०-१५ गोळ्या होत्या. कोणताही व्यावसायिक हेतू नव्हता. तरीही कायद्यासाठी, **केवळ औषधाचे अस्तित्व पुरेसे होते**.

"माझ्या डॉक्टरांनी ते लिहून दिले आहे, माझ्याकडे प्रिस्क्रिप्शन आहे" हा युक्तिवाद परदेशात चालत नाही. अनेकांना वाटते की, "माझ्याकडे प्रिस्क्रिप्शन असेल, तर कोणतीही अडचण येणार नाही." पण अनेक देशांमध्ये, प्रिस्क्रिप्शन असूनही, ते औषध बेकायदेशीर असू शकते. का? कारण ते देश अशा औषधांकडे **मादक पदार्थांचा गैरवापर, अवैध व्यापाराचे धोके, तस्करी, सार्वजनिक सुरक्षेला धोका आणि नशा** या दृष्टिकोनातून पाहतात. कायदा तुम्हाला रुग्ण म्हणून पाहत नाही—तो तुम्हाला **नियंत्रित पदार्थाचा ताबा बाळगणारा** म्हणून पाहतो.

---

# # # 🔴 कोणत्या औषधांमुळे भारतीय प्रवासी सर्वाधिक अडचणीत येतात?

**होय—हा एक रेड अलर्ट आहे. परदेश प्रवासाला जाण्यापूर्वी ही औषधे काळजीपूर्वक तपासा.**

भारतीय प्रवाशांना अनेकदा अशा काही औषधांमुळे त्रास होतो, जी भारतात सामान्यपणे वापरली जातात, परंतु अनेक देशांमध्ये ती **मादक, नियंत्रित किंवा बेकायदेशीर** मानली जातात.

* **ट्रॅमाडॉल**: भारतात एक सामान्य वेदनाशामक औषध, परंतु अनेक देशांमध्ये मादक पदार्थ म्हणून वर्गीकृत आहे. केवळ जवळ बाळगल्यास तुरुंगवास होऊ शकतो.
* **कोडीन-आधारित खोकल्याची औषधे**: भारतात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात, परंतु अनेक देशांमध्ये ओपिओइड औषधे म्हणून नोंदणीकृत आहेत आणि व्यसन लावणारे पदार्थ म्हणून त्यांच्यावर कठोर नियंत्रण आहे.
* **अल्प्राझोलम**: चिंता आणि झोपेसाठी वापरले जाते; अनेक देशांमध्ये सायकोट्रॉपिक औषध मानले जाते आणि सरकारी परवानगीशिवाय ते सोबत आणणे गुन्हा ठरू शकते.
* **डायझेपाम**: झोप आणि स्नायू शिथिल करण्यासाठी दिले जाते; अनेक ठिकाणी नियंत्रित औषध म्हणून वर्गीकृत आहे, ज्यासाठी विशेष परवानगी आवश्यक आहे.
* **झोलपिडेम**: निद्रानाशासाठी भारतात सर्रास वापरले जाते, परंतु काही देशांमध्ये ते पूर्णपणे **प्रतिबंधित** आहे.
* **प्रेगॅबॅलिन**: मज्जातंतूंच्या वेदना आणि डायबेटिक न्यूरोपॅथीसाठी वापरले जाते; अनेक देशांमध्ये प्रतिबंधित आहे आणि विशिष्ट मर्यादा व परवानगीशिवाय बेकायदेशीर आहे.
* याव्यतिरिक्त, काही **ADHD औषधे** जी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनसह भारतात कायदेशीर आहेत, ती अनेक देशांमध्ये पूर्णपणे **बेकायदेशीर** आहेत.

आणि दुर्दैवाने, यापैकी अनेक औषधे आपल्या घरांमध्ये सहज आढळतात. ही फक्त काही उदाहरणे आहेत—ही संपूर्ण यादी नाही.

---

# # # ✈️ विमानतळावर काय होते?

तुमच्या सामानाची तपासणी केली जाते. जर एखादे औषध सापडले आणि त्याचे नाव मादक पदार्थांच्या यादीत असेल, तर तुम्हाला बाजूला नेले जाते. त्यानंतर चौकशी होते. मग तपास. अटक. आणि त्यानंतर, कायदेशीर प्रक्रिया सुरू होते.

तुम्ही कदाचित स्पष्टीकरण द्याल:
“मला वेदना होत होत्या.”
“कृपया माझ्या डॉक्टरांशी बोला—हे त्यांचे प्रिस्क्रिप्शन आहे.” पण कायद्याचा फक्त एकच प्रश्न असतो:
**“हे औषध आपल्या देशात कायदेशीर आहे का?”**

जर उत्तर “नाही” असेल, तर बाकी सर्व काही निरर्थक ठरते.

---

# # # 🩺 एक डॉक्टर म्हणून मी हे का लिहित आहे?

माझ्या क्लिनिकमध्ये मी दररोज अनेक रुग्णांना भेटतो. मी त्यांच्या चिंता, द्विधा मनःस्थिती, कथा आणि संघर्षांचे ऐकतो. बरेच जण म्हणतात:
“डॉक्टर, आम्ही आमच्या मुलीला भेटायला दुबईला जात आहोत,” किंवा
“आम्ही काही महिन्यांसाठी आमच्या मुलासोबत राहायला अमेरिकेला जात आहोत.”

आणि त्यासोबतच, ते मला झोपेच्या गोळ्या, मज्जातंतूंची औषधे, वेदनाशामक औषधे सोबत घेऊन जाण्यासाठी लिहून देण्यास सांगतात. पण कोणीही एकदाही विचारत नाही:
**“हे औषध तिथे कायदेशीर आहे का?”**

हे अज्ञान सर्वात मोठा धोका आहे. फक्त पाच मिनिटांत तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता.

---

# # # ✅ परदेश प्रवासापूर्वी पाळायची पाच पावले:

१️⃣ **गुगलवर शोधा.**
उदाहरणार्थ:
“युएईमध्ये ट्रॅमाडॉल कायदेशीर आहे का?”
प्रत्येक औषध आणि प्रत्येक देशासाठी असे करा.

२️⃣ **दूतावासाच्या वेबसाइटला भेट द्या.**
**“प्रतिबंधित औषधांची यादी”** शोधा.

३️⃣ **शंका असल्यास, औषध बदला.**
तुमच्या डॉक्टरांना अधिक सुरक्षित पर्यायाबद्दल विचारा.

४️⃣ **डॉक्टरांचे पत्र/प्रिस्क्रिप्शन सोबत ठेवा**
इंग्रजीमध्ये, ज्यामध्ये औषधाचे **जेनेरिक नाव** नमूद केलेले असेल.

५️⃣ **औषधे मूळ पॅकेजिंगमध्ये ठेवा.**
सुट्या गोळ्या किंवा स्ट्रिप्स सर्वात संशयास्पद दिसतात.

---

# # # 📌 लक्षात ठेवा:

औषध ​​शरीराचे रक्षण करते—पण चुकीच्या देशात, तेच औषध तुमचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकते. परदेश प्रवास म्हणजे फक्त तिकिटे आणि व्हिसा नाही; तर तो कायदा समजून घेण्याबद्दल देखील आहे.

जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी परदेश प्रवास करत असेल, तर कृपया त्यांना हा लेख वाचायला सांगा. एक छोटीशी माहिती आयुष्यभराच्या त्रासापासून वाचवू शकते.

कारण **औषध तुमचे आहे, पण कायदा त्यांचा आहे.**

04/01/2026

८ व्या वर्षी 'पॅड' सांभाळणारी तुमची मुलगी... ही प्रगती की अधोगती? 🩸

परवाची गोष्ट. ओपीडीत एक आई-बाबा आपल्या आठ वर्षांच्या मुलीला घेऊन आले. मुलीच्या एका हातात अजूनही तिची आवडती 'गोड डॉल' होती आणि दुसरीकडे आईच्या डोळ्यात पाणी.

तक्रार काय?
"डॉक्टर, तिला 'पाळी' (Periods) सुरु झाली आहे." 🩸

हे वाचून तुमच्या काळजात धस्स झालं ना?
मला नाही झालं. कारण आता माझ्या क्लिनिकमध्ये हे रोजचं झालंय. ज्या वयात मुलींनी दोरीच्या उड्या मारायच्या, त्या वयात त्या चिमुरड्या जीवांना सॅनिटरी पॅड्सची कटकट आणि पोटाचे क्रॅम्प्स सांभाळावे लागत आहेत.

"आई, मला रक्त का येतंय?" हा ८ वर्षांच्या मुलीचा प्रश्न ऐकून त्या मातेचं काळीज फाटलं होतं... आणि एक डॉक्टर म्हणून माझं डोकं सुन्न झालं होतं.

हे बालपण हिरावून घेणं नाही, तर काय आहे?

एक बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) म्हणून मी तुम्हाला अत्यंत कडू सत्य सांगतो, जे पचवायला तुम्हाला जड जाईल:

आपण आपली मुलं 'वाढवत' नाही आहोत, आपण त्यांना 'फुगवतोय'. 🐔

जसं पोल्ट्री फार्ममध्ये इंजेक्शन देऊन ४० दिवसांत 'ब्रोयलर चिकन' तयार केलं जातं, तशीच काहीशी अवस्था आज आपण आपल्या पोटच्या गोळ्याची केली आहे. ही 'वाढ' नाही, ही शरीराची 'सूज' आहे!

याला जबाबदार कोण? आपली 'मॉडर्न' लाईफस्टाईल आणि पालकांची सोयीस्कर वृत्ती!

बघा आपण नकळत त्यांच्या आयुष्याशी कसं खेळतोय: 👇
🔥 ५०० रुपयांचा पिझ्झा की आयुष्याची होळी?
विकेंडला मॉलमध्ये ५००-८०० रुपयांचा पिझ्झा/बर्गर खाताना तुम्ही फोटो काढून 'इन्स्टा'वर टाकता... "फॅमिली टाईम!"
अहो, तो 'फॅमिली टाईम' नाही, ती तुमच्या पोरांच्या आरोग्याची 'होळी' आहे! तो रबरासारखा मैदा आणि 'प्रोसेस्ड चीझ' म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्सचा कारखाना आहे.

शरीरात जेवढी चरबी जास्त, तेवढं 'इस्ट्रोजेन' जास्त तयार होतं. आणि हेच जास्तीचं हार्मोन त्या ८ वर्षांच्या मुलीच्या कोवळ्या मेंदूला सांगतं, "बाळा, तुझं बालपण संपलं, आता तू बाई झालीस!"

🔥 गरम अन्नासाठी प्लॅस्टिकचा डबा?
स्टीलचा डबा जड वाटतो आणि प्लास्टिकचा डबा फॅन्सी दिसतो, म्हणून तो मुलांच्या माथी मारताय?
जेव्हा तुम्ही त्यात वाफाळलेली गरम भाजी टाकता, तेव्हा त्यातील 'झिनो-इस्ट्रोजेन्स' (Xenoestrogens) अन्नात उतरतात. हे रसायन शरीरात गेल्यावर 'बहुरुपिया' (Imposter) सारखं वागतं. शरीराला वाटतं हे इस्ट्रोजेनच आहे आणि शरीर अकाली वाढायला लागतं.
तुमच्या 'फॅन्सी' सवयीने तुम्ही निसर्गाचं घड्याळच बिघडवून टाकलंय!

🔥 दूध-चिकन की 'हार्मोनल बॉम्ब'?
"डॉक्टर, पोरगी खूप बारीक आहे, तिला नॉन-व्हेज देऊ का? दूध किती पाजू?"
तुम्ही तिला खायला नक्की घाला, पण बाजारातलं ते ४० दिवसात फुगलेलं 'ब्रॉयलर' कोंबडं आणि पिशवीतलं 'केमिकल' दूध देताना शंभर वेळा विचार करा.

* चिकन: त्या कोंबडीला लवकर मोठं करण्यासाठी 'ग्रोथ हार्मोन्स'चे हेवी डोस दिले जातात. तेच तिच्या पोटात जातात. यामुळेच आजकाल चौथीतल्या मुलींच्या ओठांवर लव (Facial Hair) येते. हे PCOD चं पहिलं लक्षण आहे!

* दूध: गाई-म्हशींना जास्त दुधासाठी दिलेली 'ऑक्सिटोसिन'ची इंजेक्शन्स दुधावाटे तुमच्या मुलीच्या इवल्याशा गर्भाशयाला 'मोठं होण्याचे' चुकीचे सिग्नल देतात.

तुम्ही 'प्रथिने' समजून जे खाऊ घालताय, ते प्रत्यक्षात 'हार्मोनल बॉम्ब' आहेत!

💉 सर्वात भयानक वास्तव:
या वयात पाळी सुरू झाली म्हणजे तिची हाडं लवकर जुळणार आणि उंची कायमची थांबणार. हे थांबवण्यासाठी मग उपाय काय? "हार्मोन सप्रेशन थेरपी!"

कल्पना करा... त्या ८ वर्षांच्या कोवळ्या फुलाला, तिची पाळी थांबवण्यासाठी पुढची ३-४ वर्षे दर महिन्याला एक वेदनादायक, जाड सुईचं इंजेक्शन घ्यावं लागणार! 💉😭
तुमची लाडकी लेक दर महिन्याला त्या सुईच्या भीतीनी थरथर कापणार आणि तुम्ही हतबल होऊन ते बघणार.

विचार करा पालकांनो...
१० वर्षांनंतर जेव्हा ती तुम्हाला विचारेल: "आई-बाबा, तेव्हाच का नाही लक्ष दिलं? त्या पिझ्झा-बर्गरपेक्षा माझं आयुष्य महत्त्वाचं नव्हतं का?” तेव्हा तुमच्याकडे काय उत्तर असेल?

अजूनही वेळ गेलेली नाही... सुधरा! ⚠️

✅ किचनमधून 'व्हाईट पॉयझन' (मैदा, साखर) फेकून द्या.
✅ प्लॅस्टिकच्या डब्याला काडी लावा: फक्त स्टील वापरा.
✅ मुलांना 'ब्रॉयलर' बनवू नका: त्यांना मातीत खेळू द्या, उन्हात धावू द्या.
✅ लाड करणं म्हणजे विष खाऊ घालणं नाही, हा निष्काळीजपणा आता थांबवा!

हा लेख वाचून विसरू नका. ही माहिती प्रत्येक फॅमिली ग्रुपमध्ये पोहोचवणं हे तुमचं नैतिक कर्तव्य आहे.
आपल्या मुलींचं बालपण वाचवण्यासाठी हे पाऊल उचलायलाच हवं.

तुम्हालाही तुमच्या आजूबाजूला अशी परिस्थिती दिसते का? तुमचे अनुभव खाली नक्की मांडा.

डॉ. सुजित भरत पाटील
बालरोगतज्ज्ञ, पुणे


Address

ASHIRWAD CLINIC. Shop No 7, A3/A4 Chandresh Corner, Opp. Police Station, Near Saidham Mandir, Station Road, Nallasopara(west). Tal-Vasai. Dist-Palghar
Nala Sopara
401203

Opening Hours

Monday 10am - 1pm
6pm - 10pm
Tuesday 10am - 1pm
6pm - 10pm
Wednesday 10am - 1pm
6pm - 10pm
Thursday 10am - 1pm
6pm - 10pm
Friday 10am - 1pm
6pm - 10pm
Saturday 10am - 1pm
6pm - 10pm

Telephone

+91 90286 08768

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashirwad Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share