Dr. Ashutosh Sonawane

Dr. Ashutosh Sonawane Consultant Endocrinologist

“१५ किलो वजन कमी एका इंजेक्शनने — खरंच शक्य आहे का?”सकाळची ओपीडी सुरू होती. नेहमीप्रमाणे काही रिपोर्ट्स,काही फॉलो अप… आण...
12/04/2026

“१५ किलो वजन कमी एका इंजेक्शनने — खरंच शक्य आहे का?”

सकाळची ओपीडी सुरू होती. नेहमीप्रमाणे काही रिपोर्ट्स,काही फॉलो अप… आणि दरवाजातून एक रुग्ण आत आले.

“डॉक्टर, मी गेल्या १–२ वर्षांपासून प्रयत्न करतोय — डाएट, चालणं, जिम… पण वजन काही कमी होत नाही. काही प्रमाणात वजन कमी झाले तरी ते पुन्हा वाढतंय.

आता सगळीकडे एक इंजेक्शन पाहतोय… म्हणे १५ किलो वजन कमी होतं. खरंच इतकं सोपं आहे का?”

हा प्रश्न आजकाल खूप सामान्य झालाय.

मी शांतपणे विचारलं —
“तुम्हाला भूक जास्त लागते का?”
ते लगेच म्हणाले — “हो! आणि भूक कंट्रोल पण होत नाही…”

🧠 *शरीराची रचना समजून घेणं महत्त्वाचं आहे*

मी त्यांना समजावलं —

आपण वजन कमी करायला सुरुवात केली की शरीर त्याला “धोक्याचा सिग्नल” समजतं.
👉 metabolism (मेटाबोलीजम) कमी होतं
👉 भूक वाढते

जसं मोबाईल बॅटरी कमी झाली की “power saving mode” चालू होतो, तसंच शरीर सुद्धा Energy वाचवायला लागतं.

म्हणूनच *Obesity ची व्याख्या Chronic, Progressive, Relapsing Disease आहे.*
म्हणजेच, लठ्ठपणा हा दीर्घकाळ असणारा, सतत वजन वाढत जाणारा आणि प्रयत्न करूनही वजन कमी झालं तरी पुन्हा वजन वाढण्याची शक्यता असणारा आजार आहे.

💉 *GLP-1 analogue — काय आणि कसं काम करतं?*

मी पुढे सांगितलं —

हे औषध (GLP-1 analogue) शरीरातील भूक आणि समाधान यावर काम करतं:

✔️ भूक कमी करतं (brain level)
✔️ कमी खाल्ल्यावर जास्त समाधान वाढवतं
✔️ पोट रिकामं होण्याची गती कमी करते — त्यामुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं

👉 त्यामुळे व्यक्ती आपोआप कमी खातो, कमी वेळा खातो, म्हणजेच portion size कंट्रोल करतो.

नवीन काही औषधं (GIP based) शरीरातील चरबी ला ऊर्जा म्हणून वापरायलाही मदत करतात. (fat burning)

⚖️ *मग कोणाला खरंच याचा फायदा होतो?*

मी स्पष्ट सांगितलं —

हे औषध प्रत्येकासाठी नाही.

✔️ *BMI ≥ 30* आणि lifestyle करूनही ≥5% वजन कमी होत नसेल
✔️ *BMI ≥ 27 + इतर आजार* जसे:

* Diabetes
* Hypertension
* PCOS
* Sleep apnea
* Fatty liver

👉 अशा रुग्णांना याचा सर्वाधिक फायदा होतो.

❌ फक्त “zero figure”, “event साठी slim दिसायचं”, “shortcut” — यासाठी हे औषध योग्य नाही.

⚠️ *Side effects — वास्तव काय आहे?*

रुग्णाने लगेच विचारलं — “Side effects आहेत का?”

मी प्रामाणिकपणे सांगितलं —

👉 सुरुवातीला २०–३०% लोकांना:

* मळमळ
* उलटी
* कधी जुलाब / बद्धकोष्ठता

हे विशेषतः डोस वाढवताना आणि सुरुवात करतांना जास्त दिसतं, पण बहुतेक वेळा काही आठवड्यांत कमी होतं.

👉 क्वचित गंभीर त्रास (उदा. pancreatitis, severe dehydration) होऊ शकतो —
विशेषतः चुकीच्या पद्धतीने किंवा अनभिज्ञ व्यक्तीकडून दिल्यास.

*(Long term) दीर्घकाळ भीती आहे का?*

“डॉक्टर, हे दीर्घकाळ घेतलं तर काही नुकसान होईल का?”

मी स्पष्ट सांगितलं —

👉 अभ्यासानुसार हे औषध:

* हृदय, किडनी आणि लिव्हर या अवयवांना protect म्हणजेच संरक्षण करतात
* म्हणजेच या अवयवांना इंजेक्शन मुळे नुकसान तर मुळीच होत नाही.
* तसेच मधुमेह, उच्च रक्त दाब सुधारण्यात मदत करतं.

👉 त्यामुळे योग्य रुग्णात दीर्घकालीन वापर सुरक्षित आणि फायदेशीर असू शकतो.

🏋️ *एक महत्त्वाचा मुद्दा — Muscle loss*

मी त्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली —

“औषध घेतलं आणि खाणं खूपच कमी केलं, पण प्रोटीन (प्रथिने) नाही घेतलं, व्यायाम नाही केला —
तर फॅट सोबत muscle पण कमी होऊ शकतो.”

👉 त्यामुळे:

* शरीर सैल दिसू शकतं, जसे की वृद्धावस्था आली आहे
* थकवा जाणवतो

✔️ उपाय:

* योग्य प्रमाणात प्रोटीन
* strength training

👉 म्हणजे औषधासोबत योग्य जीवनशैली महत्त्वाची आहे.

🔄 *औषध किती काळ घ्यायचं?*

हा सगळ्यात वारंवार येणारा प्रश्न.

👉 याचं एक निश्चीत उत्तर नाही.

कारण —
लठ्ठपणा हा दीर्घकाळ असणारा आजार आहे.
👉 त्यामुळे उपचार देखील **वैयक्तिक आणि दीर्घकालीन** असतो.

काही रुग्णांना काही महिने, काहींना वर्षे तर काहीना नेहमीसाठी लागतो.

औषध बंद केल्यावर काही प्रमाणात वजन परत येऊ शकतं — कारण भूक पुन्हा वाढते.

---
🚫 *आजची मोठी समस्या — चुकीचा वापर*

मी थोडं ठामपणे सांगितलं —

आजकाल:

* वेलनेस सेंटर
* सोशल मीडिया रिल्स
* “१५ किलो कमी करा” जाहिराती

👉 यामुळे हे औषध चुकीच्या लोकांना, चुकीच्या पद्धतीने दिलं जातं.

❗ यामुळे गंभीर साईड इफेक्ट दिसू शकतात.

⚖️ “डॉक्टर, मग हे १५ किलो सगळ्यांचंच कमी होतं का?”
मी हसत म्हणालो —
👉 “नाही… हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे.”
प्रत्यक्षात हे औषध fixed १५ किलो कमी करत नाही
👉 तर साधारणपणे १०–२०% वजन कमी करतं (average around 15%)
म्हणजे:
👉 तुमचं वजन 100 kg असेल → ~15 kg कमी होऊ शकतं
👉 तुमचं वजन 70 kg असेल → ~10 kg कमी होऊ शकतं
👉 आणि हेही प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतं

काहींमध्ये १०%, काहींमध्ये १५%, तर काहींमध्ये २०% पर्यंत परिणाम दिसू शकतो.
💡 म्हणजे काय समजायचं?
👉 “१५ किलो” हा number नाही…
👉 तर percentage reduction (टक्केवारीने वजन कमी होणं) हा खरा concept आहे.

🌱 *शेवटचा संदेश*

रुग्ण शांतपणे ऐकत होते.

मी शेवटी सांगितलं —

“हे इंजेक्शन जादू नाही… आणि शॉर्ट कट तर अजिबात नाही.
हे एक माध्यम आहे — योग्य रुग्णात, योग्य पद्धतीने वापरलं तर खूप उपयुक्त.”

👉 पण:

* योग्य निवड (Who to use)
* योग्य पद्धत (How to use)
* योग्य कालावधी (How long)

हे सगळं ठरवण्यासाठी *तज्ज्ञ डॉक्टर — विशेषतः हार्मोन तज्ञ Endocrinologist — यांचं मार्गदर्शन अत्यावश्यक आहे.*

ते उठले… चेहऱ्यावर स्पष्टता होती.

“डॉक्टर, आता मला समजलं......"

✨ *निष्कर्ष*

👉 *लठ्ठपणा दीर्घकाळ असणारा आजार आहे.*
👉 GLP-1 औषध प्रभावी आहे — पण योग्य रुग्णातच
👉 चांगली जीवनशैली + औषध = सर्वोत्तम परिणाम
👉 आणि सर्वात महत्त्वाचं —

*“हे औषध नेहमी तज्ज्ञ Endocrinologist यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावं.”*

*डॉ आशुतोष सोनावणे*
*हार्मोन तज्ञ*
*नाशिक ©️*

15/01/2026

*“तो टी-शर्ट घालणं टाळत होता… कारण कुणालाच माहीत नव्हतं.”*

१५ वर्षांचा अमोल आई-वडिलांसोबत माझ्या क्लिनिकमध्ये आला.
तक्रार होती — गेल्या चार महिन्यांपासून छातीत येणारी सूज, दुखणं आणि हळूहळू वाढणारा आकार.

पण तपासणीदरम्यान लक्षात आले की ही केवळ शारीरिक समस्या नव्हती.
ती त्याच्या मनावर खोल परिणाम करणारी वेदना होती.

छातीतील बदलांमुळे अमोल स्वतःच्या शरीरावर नाराज झाला होता.
वर्गमित्रांच्या टोमण्यांनी तो दुखावला गेला होता.
हळूहळू त्याने मित्रांसोबत खेळणं बंद केलं.
तो उत्तम जलतरणपटू होता, पण इतरांसमोर कपडे बदलताना लाज वाटू लागली आणि म्हणूनच
टी-शर्ट घालणंही त्याने टाळायला सुरुवात केली.

कुटुंबीय डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून, हॉर्मोन्सचे आजार तपासणाऱ्या तज्ज्ञाकडे — म्हणजेच एंडोक्रायनॉलॉजिस्टकडे — दाखवण्याचा सल्ला दिला.

मी अमोलचा सविस्तर वैद्यकीय इतिहास, जीवनशैली, आहार आणि शारीरिक तपासणी केली.
तो थोडासा लठ्ठ (overweight) होता — जे पालकांच्या लक्षात आले नव्हते.
जंक फूड, तेलकट आणि चुकीचा आहार हा त्याच्या रोजच्या सवयींचा भाग होता.
पालकांनी त्याला अगदी लाडाने वाढवले होते.

पालकांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली.
अमोल वर्गात आधी थोडा बुटका होता, पण अलीकडे अचानक उंची झपाट्याने वाढली होती आणि वयात येणारे बदल स्पष्ट दिसत होते.

मी त्याची वजन उंची व लैंगिक तपासणी केली आणि काही आवश्यक हॉर्मोन तपासण्या सांगितल्या.

दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आले…
सर्व हॉर्मोन्स पूर्णपणे नॉर्मल होते.

निदान स्पष्ट झाले —
Pubertal Gynecomastia, म्हणजेच वयात येताना सेक्स हॉर्मोन्सचा बॅलन्स बिघडल्याने मुलांमध्ये मुलींसारखी स्तनांची वाढ होणे.

लैंगिक हॉर्मोन्समध्ये होणाऱ्या वेगवान बदलांमुळे काही मुलांमध्ये छातीत स्तनाच्या ग्रंथी तात्पुरत्या वाढतात.
ही प्रक्रिया नैसर्गिक असते.
पण त्यावर वजन वाढ, चुकीचा आहार आणि चरबीचे प्रमाण जास्त असल्यास ही समस्या अधिक ठळकपणे दिसते.

मी पालकांना शांतपणे समजावले —
ही गंभीर आजाराची लक्षणे नाहीत, पण वेळेत उपचार आवश्यक आहेत.

उपचारांचा पाया होता —
योग्य आहार, जीवनशैलीत बदल, नियमित व्यायाम
आणि हॉर्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी काही औषधे.

काही महिन्यांतच फरक दिसू लागला.
दुखणं कमी झालं.
गाठ मऊ झाली.
वजन कमी होत गेल्यावर छातीतील स्तनासारखी सूज जवळजवळ नाहीशी झाली.

पण सगळ्यात मोठा बदल होता —
अमोलचा हरवलेला आत्मविश्वास परत आला.

याचे श्रेय एका गोष्टीला जाते —
👉 पालक वेळेत हॉर्मोन तज्ज्ञाकडे आले.

दुर्दैवाने अनेक वेळा “थांबा आणि बघू” या सल्ल्यामुळे उपचाराचा सोन्याचा काळ — पहिले ६ महिने — निघून जातात,
आणि शेवटी शस्त्रक्रियेची गरज निर्माण होते.

महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक वेळी छातीतील स्तनांची वाढ होणे हे साधे नसते.
कधी कधी थायरॉईडचे आजार, लैंगिक हॉर्मोन्सची कमतरता किंवा काही आनुवंशिक विकार यामुळेही
Gynecomastia — म्हणजेच स्तनांची नकोशी वाढ — होऊ शकते,
जी हॉर्मोन तज्ज्ञाकडून तपासली जाणे अत्यावश्यक असते.

तसेच आजच्या काळात लठ्ठपणा वाढल्यामुळे Lipomastia अधिक प्रमाणात दिसते.
यामध्ये स्तनाच्या ग्रंथी वाढत नाहीत, तर त्या भागात फक्त चरबीचे प्रमाण वाढते.

यावर औषधांपेक्षा वजन नियंत्रण आणि आहार सुधारणा हाच खरा उपाय असतो.

Take-home message

मुलांमध्ये छातीत स्तनासारखी सूज दिसल्यास दुर्लक्ष करू नका.
लवकरात लवकर हॉर्मोन तज्ज्ञाचा सल्ला घ्या.
योग्य तपासणी, योग्य निदान आणि वेळेत उपचार केल्यास
शस्त्रक्रिया टाळता येते आणि मुलाचे आयुष्य बदलू शकते.

डॉ. आशुतोष सोनवणे
हॉर्मोन तज्ज्ञ
नाशिक ©️

Address

Mumbai Naka Tajane Anusaya Complex Shop No 5 To 8 Above SBI Insurance
Nashik
422001

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

+918828226607

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Ashutosh Sonawane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dr. Ashutosh Sonawane:

Shortcuts

Share