24/08/2026
तरुण वयातच देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्षाचा मार्ग स्वीकारून राजगुरूंनी अदम्य धैर्य, राष्ट्रनिष्ठा आणि त्यागाचे सर्वोच्च उदाहरण घालून दिले. भगतसिंग आणि सुखदेव यांच्यासोबत स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी बजावलेली भूमिका भारतीय इतिहासात सदैव प्रेरणादायी राहील.
त्यांचे जीवन आपल्याला राष्ट्रप्रेम, धैर्य आणि मातृभूमीप्रती समर्पणाची प्रेरणा देते. अशा महान क्रांतिकारकांच्या त्यागाचे स्मरण करून राष्ट्रहिताला सदैव सर्वोच्च स्थान देण्याचा संकल्प करूया.
क्रांतिवीर शिवराम हरी राजगुरू यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन.
जय हिंद. वंदे मातरम्