24/08/2026
भगंदर का होतो? ही आहेत भगंदर होण्याची मुख्य कारणे!
भगंदर (Fistula in Ano) हा वारंवार होणारा आणि त्रासदायक आजार आहे, पण तो नेमका का होतो हे अनेकांना माहित नसते.
या व्हिडिओमध्ये Dr. Amit Kashid, Ashtang Ayurved Hospital सांगत आहेत भगंदर होण्याची आयुर्वेदिक आणि आधुनिक शास्त्रानुसार कारणे.
आयुर्वेदानुसार भगंदराची कारणे:
🔹 पोटातील जंत
🔹 अस्थिशल्य - उदा. माशाचा काटा खाताना आतमध्ये जाऊन गुदभागात जखम करणे
🔹 अतिप्रमाणात शरीरसंबंध ठेवणे
🔹 शौचाला खूप जोर लावणे
🔹 कठीण जागेवर बसून सतत प्रवास करणे
🔹 गुदमार्गावर मार लागणे / आघात होणे
🔹 मधुमेह (Diabetes) आणि इतर आजार
आधुनिक शास्त्रानुसार (Modern Science) 2 मुख्य कारणे:
1. Cryptoglandular Infection: गुदनलिकेतील ग्रंथींना (A**l Glands) इन्फेक्शन होणे.
2. आधी झालेला गळू (Abscess): आधी गळू झाला असेल तर त्यातून भगंदर तयार होणे.
याव्यतिरिक्त इतर कारणे:
👉 बद्धकोष्ठता (Chronic Constipation) किंवा सततचा अतिसार (Chronic Diarrhea)
👉 चुकीचा आहार - अति तिखट, मसालेदार, जंक फूड खाणे
👉 बैठी जीवनशैली - तासंतास एकाच जागी बसून काम करणे
👉 गुदभागात अतिरिक्त उष्णता आणि रक्तसंचय होणे
वेळीच कारण ओळखून योग्य उपचार घेतल्यास भगंदर पूर्णपणे बरा होऊ शकतो. आयुर्वेदातील क्षारसूत्र उपचार हा भगंदरसाठी अत्यंत प्रभावी उपचार आहे. तुम्हाला या संदर्भात काही त्रास असेल तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. अधिक माहिती व उपचारासाठी संपर्क साधा.
📍 पत्ता: अष्टांग आयुर्वेद चिकित्सालय, वरील आळी, शनी-मारुती मंदिरामागे, ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे
🌐 वेबसाईट: www.ashtangayurvedhospital.com
📞 संपर्क: 9941736736 / 99417637631
#आयुर्वेदिकउपचार #आयुर्वेद