Makarand Tilloo - Laughteryoga Trainer & Motivational Speaker

  • Home
  • India
  • Pune
  • Makarand Tilloo - Laughteryoga Trainer & Motivational Speaker

Makarand Tilloo - Laughteryoga Trainer & Motivational Speaker Makarand Tilloo is a Certified Laughter Yoga Trainer and Motivational Speaker. For more than 29 year.

He is a Happiness Coach who has spread laughter and happiness to more than 12 lakh people with Thousands of Stage shows, Corporate trainings and speaker

..सुमारे 35 वर्षांपूर्वी ICWA करण्यासाठी शिक्षण घेत होतो. एंट्रन्स पास झाली , ग्रुप exam सुरू झाल्या...पण लोकांना हसविण्...
30/05/2026

..सुमारे 35 वर्षांपूर्वी ICWA करण्यासाठी शिक्षण घेत होतो. एंट्रन्स पास झाली , ग्रुप exam सुरू झाल्या...पण लोकांना हसविण्यात जास्त आनंद मिळायचा. निर्णय घेतला ... ICWA थांबले.

Cut 2 : आता ICWA चे CMA इन्स्टिट्यूट झाले. आणि प्रमुख पाहुणा आणि वक्ता म्हणून बोलावणे आले. आज प्रेक्षकात नाही तर व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली.

Cost variance शोधण्या ऐवजी जगण्यातला Happiness variance मांडण्याची संधी मिळाली. Direct, Indirect cost शोधण्या ऐवजी , हास्याचा कंपनी व जगण्यावर होणारा Cause and Effect मांडता आला. मटेरियल वेस्टेज ऐवजी स्ट्रेस मुळे निर्माण होणारे एनर्जी वेस्टेज यावर उपस्थितांना हसवत विचार मांडता आले. CMA भार्गवे सर, जोशी सर, आपटे सर तसेच कॉस्ट आणि मॅनेजमेंटच्या क्षेत्रातील उपस्थित दिग्गजांनी त्याला मनमुराद दाद दिली.

कार्यक्रमानंतर कार्यक्रम ठरविण्यासाठी आवर्जून माझी व्हिजिटिंग कार्ड घेतली. "वाढत्या ताणतणावाच्या काळात इंडस्ट्रीमध्ये टिल्लू तुम्ही सांगत असलेले तत्त्वज्ञान फार महत्वाचे आहे. " असे आवर्जून सांगितले.
..35 वर्षांपूर्वीच्या निर्णयामुळे आज भारतातल्या 700 अधिक कंपन्यांमध्ये हॅपिनेस कोच म्हणून योगदान देता येते आहे याचे समाधान वाटते.

सर्व ऑर्गनायझिंग टीमला मनःपूर्वक धन्यवाद!

- मकरंद टिल्लू
( हॅपिनेस कोच, लाफ्टरयोगा ,मोटिवेशनल स्पीकर)
097663 34277

Photo credit: Jivraj Chole

..सुमारे 35 वर्षांपूर्वी ICWA करण्यासाठी शिक्षण घेत होतो. एंट्रन्स पास झाली , ग्रुप exam सुरू झाल्या...पण लोकांना हसविण्...
30/05/2026

..सुमारे 35 वर्षांपूर्वी ICWA करण्यासाठी शिक्षण घेत होतो. एंट्रन्स पास झाली , ग्रुप exam सुरू झाल्या...पण लोकांना हसविण्यात जास्त आनंद मिळायचा. निर्णय घेतला ... ICWA थांबले.

Cut 2 : आता ICWA चे CMA इन्स्टिट्यूट झाले. आणि प्रमुख पाहुणा आणि वक्ता म्हणून बोलावणे आले. व्यासपीठाच्या दुसऱ्या बाजूला बसण्याची संधी मिळाली.

Cost variance शोधण्या ऐवजी जगण्यातला Happiness variance मांडण्याची संधी मिळाली. Direct, Indirect cost शोधण्या ऐवजी , हास्याचा कंपनी व जगण्यावर होणारा Cause and Effect मांडता आला. मटेरियल वेस्टेज ऐवजी स्ट्रेस मुळे निर्माण होणारे एनर्जी वेस्टेज यावर उपस्थितांना हसवत विचार मांडता आले. CMA भार्गवे सर, जोशी सर, आपटे सर तसेच कॉस्ट आणि मॅनेजमेंटच्या क्षेत्रातील उपस्थित दिग्गजांनी त्याला मनमुराद दाद दिली.

कार्यक्रमानंतर कार्यक्रम ठरविण्यासाठी आवर्जून माझी व्हिजिटिंग कार्ड घेतली. "वाढत्या ताणतणावाच्या काळात इंडस्ट्रीमध्ये टिल्लू तुम्ही सांगत असलेले तत्त्वज्ञान फार महत्वाचे आहे. " असे आवर्जून सांगितले.
..35 वर्षांपूर्वीच्या निर्णयामुळे आज भारतातल्या 700 अधिक कंपन्यांमध्ये हॅपिनेस कोच म्हणून योगदान देता येते आहे याचे समाधान वाटते.

सर्व ऑर्गनायझिंग टीमला मनःपूर्वक धन्यवाद!

- मकरंद टिल्लू
( हॅपिनेस कोच, लाफ्टरयोगा ,मोटिवेशनल स्पीकर)
097663 34277

Photo credit: Jivraj Chole

हास्याची 'एंगेजमेंट' आणि टेन्शन मुक्तीचे 'जजमेंट' कोर्टाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस... मे महिन्याची सुट्टी तोंडावर... आणि...
09/05/2026

हास्याची 'एंगेजमेंट' आणि टेन्शन मुक्तीचे 'जजमेंट'

कोर्टाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस... मे महिन्याची सुट्टी तोंडावर... आणि डोक्यात सतत चालणारे युक्तिवाद! या सगळ्यावर 'स्टे' आणण्यासाठी 'पुणे बार असोसिएशन'ने एक अनोखा कार्यक्रम आयोजित केला होता
​🎈 हॅपिनेस कोच व मोटिवेशनल ट्रेनर मकरंद टिल्लू यांनी त्यांच्या 'हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा' या कार्यक्रमाने संपूर्ण सभागृह हास्याच्या लाटेवर तरंगत ठेवले.
​👨‍⚖️👩‍⚖️ वकिलांनी कपाळावरच्या आठ्या बाजूला सारून, काळा कोट विसरून, आनंदाचे नवे तत्त्वज्ञान सहभागातून समजावून घेतले. या 'हास्य कल्लोळात' ताणतणाव पूर्ण 'डिस्मिस' झाला!
स्थळ : अशोका हॉल,
आयोजन: पुणे बार कौन्सिल
मनःपूर्वक धन्यवाद: अध्यक्ष एडवोकेट काळूराम भुजबळ, एडवोकेट एकनाथ सुगावकर व सर्व आयोजक टीम

लोकांच्या आयुष्यात आनंदाची पखरण करण्याबद्दल दैनिक भास्कर या वृत्तपत्रात आज विशेष लेख छापण्यात आला आहे. आरोग्याच्या या चळ...
07/05/2026

लोकांच्या आयुष्यात आनंदाची पखरण करण्याबद्दल दैनिक भास्कर या वृत्तपत्रात आज विशेष लेख छापण्यात आला आहे.
आरोग्याच्या या चळवळीला सहकार्य केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
शाखा ठिकाण : नवचैतन्य हास्ययोग परिवार,थोरात उद्यान शाखा

शारीरिक मानसिक व सामाजिक आरोग्यासाठी ...आपल्या भागात, सोसायटीत हास्यक्लब सुरू करायचा असेल तर जरूर संपर्क साधा.

- मकरंद टिल्लू (9766334277)
(मुख्य समन्वयक, विश्वस्त: नवचैतन्य हास्ययोग परिवार)

😊 बालगंधर्व रंगमंदिरात घुमला हास्याचा निनाद! 😊​जागतिक हास्य दिनानिमित्त 'नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे' बालगंधर्व रंगमं...
04/05/2026

😊 बालगंधर्व रंगमंदिरात घुमला हास्याचा निनाद! 😊
​जागतिक हास्य दिनानिमित्त 'नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे' बालगंधर्व रंगमंदिर येथे एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. "हसा आणि आरोग्य मिळवा" असा निरामय आरोग्याचा मंत्र यावेळी उपस्थितांना देण्यात आला.
​या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे 'देऊळ बंद २' या चित्रपटातील कलाकारांसोबत रंगलेली दिलखुलास मुलाखत! प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, रमेश परदेशी , अतुल कुडले यांची मकरंद टिल्लू यांनी घेतलेल्या या हास्य आणि गप्पांच्या मैफिलीने पुणेकरांना खळखळून हसवले.
​📍 कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट:
'स्वच्छ पुणे, सुंदर पुणे आणि हसरे पुणे' घडवणे!
आता एकच लक्ष्य...एक लक्ष शाखा सभासद !
हसण्यामुळे समाजात सकारात्मकता निर्माण होते आणि ताणतणाव दूर होण्यास मदत होते, हाच संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
​✨ मान्यवरांची उपस्थिती:
या कार्यक्रमाला माननीय राजेश पांडे, श्रीनाथ भिमाले, प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, प्रकाश धोका, रमेश परदेशी, डॉ. भाग्यश्री कुलकर्णी, डॉ. विनायक देंडगे, किरण दगडे पाटील, श्री विठ्ठल काटे, सुमन काटे व संस्थेचे सर्व विश्वस्त यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
​"समाजात सकारात्मकता निर्माण करणे आणि प्रत्येक पुणेकराच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हेच आमचे ध्येय आहे."
सूत्रसंचालन हर्षदा टिल्लू हिने केले, तर प्रास्ताविक पोपटलाल शिंगवी व आभार प्रदर्शन विजय भोसले यांनी केले.
संस्थेचे उपस्थित विश्वस्त: जयंत दशपुत्रे, अतुल सलाग्रे, दत्तात्रय कुंदेन , प्रमोद ढेपे, एकनाथ सुगावकर, हरीश पाठक, सुनील देशपांडे.
— मकरंद टिल्लू (मुख्य समन्वयक, नवचैतन्य हास्ययोग परिवार)

पुस्तकांच्या जत्रेत घुमणार हास्याचा आवाज! हॅपिनेस कोच मकरंद टिल्लू यांच्यासोबत शिका 'हसण्याची बाराखडी'.​✅ कधी? १ मे, सका...
30/04/2026

पुस्तकांच्या जत्रेत घुमणार हास्याचा आवाज! हॅपिनेस कोच मकरंद टिल्लू यांच्यासोबत शिका 'हसण्याची बाराखडी'.
​✅ कधी? १ मे, सकाळी ११:३० वा.
✅ कुठे? पुणे बालक पुस्तक जत्रा, गणेश कला क्रीडा रंगमंच
​तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि मुलांना सोबत घेऊन नक्की या. प्रवेश सर्वांसाठी खुला! 😊

पुण्यात घुमला ६००० हून अधिक ज्येष्ठांचा हास्यमल्हार! 😃​'निसर्ग छाया' आयोजित ज्येष्ठ नागरिक महामेळाव्यात आज आनंदाचा जणू प...
03/04/2026

पुण्यात घुमला ६००० हून अधिक ज्येष्ठांचा हास्यमल्हार! 😃

​'निसर्ग छाया' आयोजित ज्येष्ठ नागरिक महामेळाव्यात आज आनंदाचा जणू पाऊस पडला! निमित्त होतं हॅपिनेस कोच मकरंद टिल्लू यांच्या 'आनंददायी हास्ययोग' या विशेष सप्रयोग व्याख्यानाचे!

हसण्याचे शारीरिक आणि मानसिक फायदे सांगत, श्री. टिल्लू यांनी ६००० हून अधिक ज्येष्ठांना खळखळून हसवलं. या सोहळ्यात माननीय मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनीही सहभागी होऊन हास्ययोगाचा मनमुराद आनंद लुटला.

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या विसरून जेव्हा हजारो डोळे आनंदाने चमकतात, तेव्हा तो क्षण सोहळा होतो! हॅपिनेस कोच मकरंद टिल्लू यांनी केवळ हास्ययोग शिकवला नाही, तर जगण्याचं सकारात्मक तत्वज्ञान ज्येष्ठांच्या मनात रुजवलं.

इतकं सुंदर आणि भव्य आयोजन केल्याबद्दल अमृता देवगांवकर आणि मंदार देवगांवकर यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन! विठ्ठल काटे,जयंत दशपुत्रे व सर्व नवचैतन्य हास्ययोग परिवाराची यावेळी आवर्जून उपस्थिती होती.

हा आनंदाचा हा महाकुंभ पाहून लोकांचे मन तृप्त झाले!

:9766334277 ...30 वर्षांची हास्यसेवा



03/04/2026

Address

Behind Congress House
Pune
411005

Telephone

+919766334277

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Makarand Tilloo - Laughteryoga Trainer & Motivational Speaker posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Makarand Tilloo - Laughteryoga Trainer & Motivational Speaker:

Share