Vedamrut Clinic & Panchakarma Centre

Vedamrut Clinic & Panchakarma Centre Ayurvedic &Panchakarma treatments
Mindfulness Counsellor

संध्याकाळची वेळ होती. Opd मध्ये 25 - 26 वर्षाचा एक तरुण व्यक्ती आला होता, ऍसिडिटी पोट बिघडणं, अपचन वारंवार होणे, कधी डोक...
08/08/2026

संध्याकाळची वेळ होती. Opd मध्ये 25 - 26 वर्षाचा एक तरुण व्यक्ती आला होता, ऍसिडिटी पोट बिघडणं, अपचन वारंवार होणे, कधी डोकं दुखणं अशा छोट्या मोठ्या तक्रारीं होत्या. हिस्टरी घेताना आणि गप्पा मारताना त्याच्या पाठीमागचं कारण लक्षात आलं...
आणि ते होतं म्हणजे मनावरचा ताण.. अति आणि अनावश्यक.... हो बरोबर.. अनावश्यक. काहीही कारण नसताना उगाचच आपल्या मनाला थकवणे म्हणजे अनावश्यक हो.ना.....
चांगल्या प्रकारचा किंवा आवश्यक ताण आपल्या आयुष्यासाठी नवीन आव्हान दिशा वाटा दाखवतो, यशस्वी करतं
पण उगाचचा व अति ताण तर मनाला थकवतो.
अगदी आवडीच्या गोष्टी करताना सुद्धा मनाला आनंद वाटत नाही. एक अनामिक दडपण जाणवतं.
सगळं काही बरं चाललंय असं वाटतं. पण आनंदी राहता येत नाही आणि दुःख सुद्धा होत नाही
एखादं काम करताना फोकस राहता येत नाही
शारीरिक थकवा जाणवतो
कुठलीच एक्साईटमेंट जाणवत नाही.
सकाळी उठल्यावर फ्रेश जाणवत नाही

कोणत्या डॉक्टरची मदत मागायला जावे तर तेवढे कारण major ही वाटत नाही
अशा कमी जास्त तक्रारी सध्या सगळीकडे दिसतात कोणी त्यावर कोणी जास्त बोलत नाही सगळ्यांचं routine चालू असतं
पण लक्षात घ्या अशा व्यक्तींचा हा त्रास वारंवार होत असेल तर डिप्रेशन / नैराश्य लांब नाही...

त्याच्यावर एकच उपाय: 'Mindful living '

या छोट्या टीप उपयुक्त ठरतात - -
* वर्तमान काळामध्ये लक्ष ठेवणे
*कोणतेही काम करताना सजगतेने करणे उदाहरणार्थ excerise, पुस्तक वाचन, स्वयंपाक करणे अगदी स्वतःची आंघोळ आणि जेवण करणं सुद्धा
*आवडणाऱ्या गोष्टींमध्ये किंवा छंद मध्ये रममाण होऊन जाणे
*screen time कमी करणे

तुम्हाला अशी लक्षणे स्वतःमध्ये ते जाणवत नाही ना आणि तसं वाटत असेल तर नक्की जॉईन करा minful living 1:1 programme.
खाली दिलेल्या लिंक वर नक्की जॉईन करा आणि तुम्हाला कसे वाटले ते मला कळवा

https://vedamrut-clinic.lovable.app/

धन्यवाद
संपर्क वैद्य मेधा प्रभुणे
वेदामृत क्लिनिक व पंचकर्म सेंटर कर्वेनगर

तणावमुक्त, शांत आणि आनंदी जीवनासाठी वैद्य मेधा प्रभुणे यांचा विशेष ऑनलाइन योग व आयुर्वेद कार्यक्रम.

29/07/2026
दि. 21 जून 2024 रोजी योगाश्रम कर्वे रोड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने 'माइंडफुलनेस मेडिटेश...
22/06/2026

दि. 21 जून 2024 रोजी योगाश्रम कर्वे रोड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने 'माइंडफुलनेस मेडिटेशन' या विषयावर माझे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या सत्रात माहितीपूर्ण आणि प्रात्यक्षिकांसह सराव करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल तृप्तीचे आभार मानते.
श्रोत्यांनाही धन्यवाद. विविध विषयांवर व्याख्याने आयोजित करावीत अशी सदिच्छा आहे.
Keep it up Trupti.....All the best...

20/06/2026
उन्हाळ्यात त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपण स्वतःला ताजातवाना ठ...
23/04/2026

उन्हाळ्यात त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपण स्वतःला ताजातवाना ठेवू शकता.
पुणे शहरात उन्हाळ्याच्या काळात पिंपल्स, फोड आणि काळवंडलेल्या त्वचेच्या समस्या वाढतात, परंतु घाबरू नये.

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्वचा रुक्ष होते, परंतु काही सोपे आणि घरगुती उपायांनी आपण त्वचेचे आरोग्य उत्तम राखू शकतो.
बाहेर जाताना सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझरचा वापर,

उन्हातून आल्यानंतर शरीराचे तापमान सामान्य झाल्यावर पाणी पिणे बर्फाच्या वापराने त्वचा ताजीतवानी ठेवता येते.

याशिवाय संत्र्याच्या साली, ज्येष्ठमध, बाळा, आंबेहळद आणि मुलतानी मिट्टी यांचा फेसपॅक लावून त्वचा स्वच्छ आणि तरुण ठेवता येते.
गुलाब पाण्याच्या पट्ट्या त्वचेला थंडावा देतात आणि उष्णता कमी करतात. पाण्याचे प्रमाण कायम ठेवण्यासाठी योग्य आहार घेतल्याने त्वचा तजेलदार राहते. या उपायांनी आपण उन्हाळ्यातही त्वचेचे आरोग्य उत्तम राखू शकतो. 🌸💆‍♀️🌞😊👍

वातावरणामध्ये उष्णता आणि रुक्षता सगळीकडे जाणवायला लागलेली आहे त्यामुळे , भूक कमी होणे आणि तहान जास्त लागणे अशा तक्रारी स...
08/04/2026

वातावरणामध्ये उष्णता आणि रुक्षता सगळीकडे जाणवायला लागलेली आहे त्यामुळे , भूक कमी होणे आणि तहान जास्त लागणे अशा तक्रारी सुरुवात झाली आहे तहान शमवण्यासाठी वेगवेगळ्या औषधी पाण्याचा आपण कशा पद्धतीने करून घेऊ शकतो हे बघुया - -
*पाणी वापरताना स्वच्छ आणि माठातील पाण्याचा वापर करावा फ्रीजमध्ये थंड पाणी टाळावे.
*पाण्यामध्ये वाळा, मोगऱ्याची फुलं गुलाब पाणी टाकून सुगंधित करू शकतो. (Flavoured water) कोणत्याही आयुर्वेदिक औषधाच्या दुकानांमध्ये वाळा चूर्ण सहज मिळू शकते. उन्हाळ्यातील घामाला जो वास येतो तो कमी करण्यासाठी हे पाणी उपयुक्त ठरते

* फोडणीसाठी वापरणारी जिरे, धने एकत्रित कुटून त्याची भरड आणि पाणी एकत्र करून घ्यावे.
चहा त्या पाण्याला उकळू द्यावे, गाळून घेऊन त्याचा सुद्धा वापर दिवसभरात करू शकतो. विविध लघवीच्या तक्रारी किंवा उन्हाळी लागणे यासाठी अतिशय उपयुक्त ठरते

*चिंचा पानक -

आयुर्वेदातील ही पाण्याची संस्कारित पद्धती वर्णन केलेली आहे. त्याचा वापर अन्नपचन न होणे, तोंडाला चव नसणे अजीर्ण यावेळी करू शकतो.
पद्धती - चिंच दोन ते तीन तास भिजवून ठेवावी व त्याचा कोळ एक मोठा चमचा घ्यावा. पाणी एक लिटर व चिंचेचा कोळ एकत्र करून त्यामध्ये जिरेपूड व बडीशेप पूड एकत्र करून घ्यावी

'
*पोट खराब होणे किंवा जुलाब होणे अशा तक्रारींसाठी साळीच्या लाह्यांचे( दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेसाठी वापरतात) पाणी अतिशय उपयुक्त ठरते. दोन कप पाण्यामध्ये साळीच्या लाह्या भिजत टाकाव्यात. त्या चांगल्या भिजल्या की कुस्करून पाण्यामध्ये थोडे जिरेपूड टाकून ते पाणी थोडे थोडे करून प्यावे. उन्हाळ्यामुळे येणारा थकवा ह्या पाण्याने कमी होते

विविध प्रकारची सरबते - कोकम वाळा, लिंबू, यांच्या वापराबरोबरच या दोन संस्कारीत पाण्याचा वापर नक्की कसा होतो ते मला सांगा...

वैद्य मेधा प्रभुणे
वेदामृत क्लिनिक व पंचकर्म सेंटर कर्वेनगर
संपर्क :9881375110

Address

Misal Building Shop No3. Opp Sahawas Society Gulabrao Tathe Chowk. Karvenagar Pune/30
Pune
411052

Opening Hours

Monday 10:30am - 8pm
Tuesday 10:30am - 8pm
Wednesday 10:30am - 8pm
Thursday 10:30am - 8pm
Friday 10:30am - 8pm
Saturday 10:30am - 8pm

Telephone

+919881375110

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vedamrut Clinic & Panchakarma Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vedamrut Clinic & Panchakarma Centre:

Shortcuts

Share