AmalAyurved

31/07/2026

PCOS ही फक्त हार्मोन्सची समस्या नाही. चुकीचा आहार, बिघडलेले Digestion, Stress आणि Lifestyle यांचा त्यावर मोठा परिणाम होतो.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या PCOS साठी योगाकडे समग्र दृष्टिकोनातून कसं पाहिलं जातं. फक्त एखादं आसन किंवा Social Media वर पाहिलेल्या Reels फॉलो करणं पुरेसं नसतं. योग्य Breathing Exercises, सूर्यनमस्कार, विविध योगासनं आणि शुद्धिक्रिया यांचा संतुलित सराव अधिक उपयुक्त ठरू शकतो.
योग हा फक्त एक Therapy किंवा तात्पुरता उपाय नाही, तर निरोगी जीवनशैलीचा एक भाग आहे.

📌 हा व्हिडिओ Save करा आणि PCOS विषयी योग्य माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवा.

30/07/2026

प्राणायाम हा आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी अभ्यास आहे, पण तो योग्य मार्गदर्शनाखाली आणि योग्य पद्धतीने केला तरच त्याचे फायदे मिळतात.

या पॉडकास्टमध्ये तज्ज्ञांनी सांगितलेला एक अनुभव ऐका—चुकीच्या श्वसन पद्धतीमुळे गंभीर परिणाम कसे होऊ शकतात आणि प्राणायाम करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

✅ प्राणायाम सुरू करण्यापूर्वी योग्य तंत्र शिका.
✅ आपल्या प्रकृतीनुसार आणि प्रशिक्षित मार्गदर्शकाच्या सल्ल्यानेच सराव करा.
✅ चुकीची पद्धत टाळा आणि सुरक्षितपणे योगाचा लाभ घ्या.

📌 हा व्हिडिओ सेव्ह करा आणि प्राणायाम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा.

लवकरच येत आहे... 🎙️
पाहण्यासाठी तयार रहा.

29/07/2026

योग्य आहार घेत असूनही अनेकांना Constipation, Bloating किंवा पचनाच्या तक्रारी का जाणवतात? फक्त आहार पुरेसा आहे का, की Yoga देखील तितकाच महत्त्वाचा आहे?

या खास Podcast मध्ये Yoga च्या दृष्टीने Ama, Agni, Shuddhi Kriya, Kapalbhati आणि Dhanurasana, Pawanmuktasana, Ardha Matsyendrasana, Paschimottanasana यांसारख्या Asanas पचनसंस्थेवर कसा परिणाम करतात, याबद्दल सविस्तर चर्चा केली आहे.

या Asanas शरीरातील Blood Flow, Prana Shakti आणि Digestion सुधारण्यास कशी मदत करू शकतात, तसेच प्रत्येकाने आपल्या Prakruti नुसार Yoga का करावा, हेही या चर्चेत समजेल.

लवकरच येत आहे... 🎙️

पाहण्यासाठी तयार रहा.

Stay Tuned! 🌿

26/07/2026

आजकाल प्रत्येक Recipe मध्ये Paneer, Hung Curd किंवा जास्त Protein असलेले पदार्थ दिसतात. पण खरंच प्रत्येकासाठी हा आहार योग्य आहे का? की Social Media वरील Food Trends मुळे आपण आपल्या पचनशक्ती आणि पारंपरिक आहाराकडे दुर्लक्ष करत आहोत?

या खास Podcast मध्ये आयुर्वेद आणि योगाच्या दृष्टीकोनातून सहा रसांचे महत्त्व, Paneer आणि दुधापासून बनणाऱ्या पदार्थांचा योग्य वापर, "आम" निर्माण होण्यामागील संकल्पना आणि व्हायरल Food Trends बद्दल सखोल चर्चा केली आहे.

जर तुम्हीही Instagram वरील हेल्दी Recipes फॉलो करत असाल, तर हा Podcast नक्की पाहा.

लवकरच येत आहे... 🎙️

पाहण्यासाठी तयार रहा.

Stay Tuned! 🌿

25/07/2026

Instagram वर दिसणारी प्रत्येक हेल्दी रेसिपी खरंच आपल्या शरीरासाठी योग्य असते का? 🤔

Broccoli, Avocado, Zucchini, Olive Oli हे सगळं खरंच प्रत्येकासाठी आवश्यक आहे का? की आपल्या पारंपरिक आहारातच त्यापेक्षा चांगले पर्याय आहेत?

या खास पॉडकास्टमध्ये योगतज्ज्ञ आणि आयुर्वेदतज्ज्ञ सोशल मीडियावरील फूड ट्रेंड्स, व्हायरल रेसिपीज, ऋतूनुसार आहार, लोकल अन्न आणि खरंच आरोग्यासाठी काय योग्य आहे यावर सखोल चर्चा करत आहेत.

काही लोकप्रिय समजुतींना नवीन दृष्टिकोन मिळेल आणि कदाचित तुमच्या रोजच्या आहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलेल.

लवकरच येत आहे... 🎙️

पाहण्यासाठी तयार रहा.
Stay Tuned! 🌿

24/07/2026

पाळी नियमित करण्यासाठी फक्त हार्मोनल गोळ्याच हा एकमेव उपाय असतो का?

अमल आयुर्वेदाकडे उपचारासाठी आलेल्या २७ वर्षीय युवतीची ही केस स्टडी आहे. हार्मोनल औषधं घेतल्यावरच पाळी येत होती आणि औषधं बंद केली की पुन्हा पाळी थांबत होती. आयुर्वेदिक दृष्टीकोनातून पचनशक्ती आणि धातूंच्या पोषणावर काम केल्यानंतर तिची पाळी नियमित होऊ लागली आणि एकूण आरोग्यातही लक्षणीय सुधारणा झाली.

प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, कारणं आणि उपचार वेगळे असतात. त्यामुळे योग्य निदान आणि वैयक्तिकृत उपचारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.



To get a personalised consultation to know which medicine suits you according to your prakriti

DM Amal Ayurveda by Dr.Ojaswini Palnitkar

OR

CALL: +91 8408840206

17/07/2026

वारंवार सर्दी-खोकल्यामागे फक्त हवामानच कारणीभूत असतं असं तुम्हाला वाटतं का?

अमल आयुर्वेदाकडे उपचारासाठी आलेल्या २६ वर्षीय युवतीची ही केस स्टडी आहे. आयुर्वेदिक दृष्टीकोनातून मूळ कारण समजून पचनशक्ती, मलप्रवृत्ती, मासिक पाळी आणि प्रतिकारशक्ती यांवर एकत्रितपणे काम केल्यानंतर तिच्या वारंवार होणाऱ्या सर्दी-खोकल्याच्या तक्रारींमध्ये लक्षणीय सुधारणा झाली.

प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, कारणं आणि उपचार वेगळे असतात. त्यामुळे योग्य निदान आणि वैयक्तिकृत उपचारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.



To get a personalised consultation to know which medicine suits you according to your prakriti

DM Amal Ayurveda by Dr.Ojaswini Palnitkar
OR
CALL: +91 8408840206

16/07/2026

अनेक वर्षांच्या फिशरमागे फक्त बद्धकोष्ठता किंवा शस्त्रक्रियाच हा एकमेव उपाय असतो का?

अमल आयुर्वेदाकडे उपचारासाठी आलेल्या ६० वर्षीय महिलेची केस स्टडी आहे. आयुर्वेदिक दृष्टीकोनातून मूळ कारण समजून पचनसंस्था, आतड्यांचे आरोग्य आणि जीवनशैली यांवर काम केल्यानंतर त्यांच्या फिशरच्या त्रासात लक्षणीय सुधारणा झाली.

प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, कारणं आणि उपचार वेगळे असतात. त्यामुळे योग्य निदान आणि वैयक्तिकृत उपचारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.



To get a personalised consultation to know which medicine suits you according to your prakriti

DM Amal Ayurveda by Dr.Ojaswini Palnitkar

OR

CALL: +91 8408840206

15/07/2026

कधी कधी एकच तक्रार घेऊन आलेल्या रुग्णामागे अनेक कारणे दडलेली असतात.

ही ७२ वर्षीय रुग्णाची केस स्टडी आहे, ज्यामध्ये आयुर्वेदिक दृष्टीकोनातून मूळ कारणावर काम करून त्यांच्या एकूण आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली.

प्रत्येक व्यक्तीची प्रकृती आणि उपचार वेगळे असतात. योग्य मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.



To get a personalised consultation to know which medicine suits you according to your prakriti

DM Amal Ayurveda by Dr.Ojaswini Palnitkar

OR

CALL: +91 8408840206

11/07/2026

प्रत्येक ऋतू बदलला की त्यांच्यासाठी एकच चिंता असायची...

हातांच्या आणि पायांच्या तळव्यांवर पुन्हा सोरायसिससारखे पॅचेस दिसायला सुरुवात व्हायची.

ही माझ्याकडे उपचारासाठी आलेल्या ५० वर्षीय महिलेची केस स्टडी आहे. गेली १० वर्षे त्यांना हा त्रास होत होता. यासोबत Acidity आणि Migraine चाही त्रास होता.

आयुर्वेदिक दृष्टीकोनातून त्यांच्या समस्येकडे संपूर्ण शरीराच्या संदर्भात पाहिलं. पचनसंस्था, रक्तधातूचं संतुलन, रक्ताभिसरण आणि जीवनशैली यांवर एकत्रितपणे काम करण्यात आलं.

नियमित उपचार आणि पथ्य पाळल्यानंतर अनेक ऋतू बदलून गेले, पण त्यांना पूर्वीसारखा त्रास पुन्हा जाणवला नाही आणि त्यांच्या लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली.

प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, आजाराचं कारण आणि उपचार वेगळे असतात. त्यामुळे स्वतःहून औषधोपचार करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

अशा प्रकारचा त्वचेचा त्रास तुम्हालाही होत असेल, तर वैयक्तिकृत आयुर्वेदिक मार्गदर्शन�

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AmalAyurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AmalAyurved:

Shortcuts

Share