Marathi ayurved

Marathi ayurved डॉ.प्रज्वल झेंडे (BAMS) आयुर्वेद माहिती साठी फॉलो करा
8830717385 saswad

13/08/2026

ही अंडी कोणाची ❓❓❓

शेततळ्या शेजारी माती उकरताना आम्हाला ही अनोळखी अंडी सापडली, ही कसली अंडी आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?🤔

आम्हाला ह्या अंड्या बद्दल माहिती नाही तरी आम्ही ती अंडी जशी होती तशीच पुन्हा तिथे सुरक्षित ठेवून दिली.

Egg eggs nature natural farming farm animals wild wildlife eggs reptiles

तुम्हाला कधी सापडली का जमिनीत अंडी 🥚❓

09/08/2026

🌿आयुर्वेदानुसार बद्धकोष्ठता आणि कडक शौच🌿

हा व्हिडिओ माहिती साठी आहे वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी जवळील आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे

जेव्हा शरीरात वात दोष वाढतो, तेव्हा त्याचे कोरडे (Ruksha) आणि थंड गुणधर्म मोठ्या आतड्यातील आर्द्रता (Moisture) शोषून घेतात, ज्यामुळे मल कडक होतो.

याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

आहारविषयक कारणे

🌿कोरडे पदार्थ खाणे: आहारात जास्त प्रमाणात कोरडे पदार्थ (उदा. लाह्या, बिस्किटे, फरसाण) किंवा अतिशय तिखट आणि कडू पदार्थांचे सेवन करणे.

🌿पाण्याचे कमी प्रमाण: शरीराला आवश्यक तितके पाणी किंवा द्रव पदार्थ न मिळाल्यास आतड्यांमधील ओलावा कमी होतो.

🌿शिळे अन्न: खूप दिवसांचे किंवा फ्रिजमधील थंड आणि शिळे अन्न खाल्ल्याने वात वाढतो.

🌿आहारात पालेभाज्या आणि फळांचा समावेश कमी असणे, व कडधान्य जास्त खाणे.

‼️‼️आयुर्वेदानुसार काही सोपे उपाय:‼️‼️

🌿स्नेहन (Oiling): आहार मधे २चमचे शुद्ध गाईचे तूप घेणे ,हे आतड्यांना वंगण देण्याचे काम करते.

🌿पाणी पिण्याची पद्धत: दिवसभर तहान लागेल तेव्हा कोमट पाणी पिणे वात कमी करण्यासाठी उत्तम ठरते.

🌿तेलाचा वापर: आहारात तेल किंवा तुपाचा वापर वाढवावा.

‼️जीवनशैलीतील बदल‼️

🌿वेग विधारण टाळा: शौचाला आल्यावर ती रोखून धरू नका.
🌿नियमित व्यायाम: वज्रासन किंवा पवनमुक्तासन यांसारखी योगासने पचनासाठी उत्तम आहेत.
🌿झोप: रात्री वेळेवर झोपणे आणि पुरेशी झोप घेणे वात संतुलित ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

‼️जर हा त्रास जुनाट असेल किंवा तुम्हाला मूळव्याध (Piles) सारखी लक्षणे जाणवत असतील, तर जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला नक्की घ्या.

Ayurved ayurveda care health healthy lifestyle marathi marathireel reel video bams jointpain painrelief digestion medicinal plants leaves grow ayurvedic piles digestion skin care digestive system hairfall

#मराठी

Address

Nairujya Ayurved Chikitsalay Saswad Pune
Pune
412301

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share