Archana Rairikar- NutriSatwa

Archana Rairikar- NutriSatwa good health with nutrition and lifestyle management

*सकाळी उठल्यावर काय प्यावे* ?  _दिवस चांगला सुरू झाला की पुढे छान वाटणारच_ रात्री ७–८ तास झोपल्यानंतर शरीर सौम्य डिहायड्...
09/09/2026

*सकाळी उठल्यावर काय प्यावे* ?

_दिवस चांगला सुरू झाला की पुढे छान वाटणारच_

रात्री ७–८ तास झोपल्यानंतर शरीर सौम्य डिहायड्रेशन अवस्थेत असते. त्यामुळे दिवसाची सुरुवात ३००–५०० ml साध्या किंवा कोमट पाण्याने करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

यामागचं विज्ञान

* हायड्रेशन: रात्री lost झालेले द्रव भरून निघतात.
* मेंदू व ऊर्जा: पुरेसं पाणी घेतल्याने एकाग्रता, सतर्कता आणि ताजेतवानेपणा सुधारतो.
* पचन: पाण्यामुळे आतड्यांची नैसर्गिक हालचाल (Gastrocolic Reflex) सक्रिय करण्यास मदत होते त्यामुळे शौचास मदत होऊ शकते.
* किडनी: शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला आधार मिळतो.

पाण्या व्यतिरिक्त

* *लिंबूपाणी* : व्हिटॅमिन C मिळते; पण ते चरबी वितळवत नाही किंवा “डिटॉक्स” करत नाही.
* त्यात मध घ्यायची गरज नाही
* *जिरे–धणे भिजवलेलं पाणी:* पचनाला काही प्रमाणात मदत होऊ शकते.

हर्बल काढे घरी असलेले पदार्थ वापरून करता येतात
त्याच्या रेसिपी आणि फायदे आपण पुढे पाहुत.😊

सध्या.....

> निष्कर्ष: सकाळची सर्वोत्तम सवय म्हणजे साधं पाणी. लिंबूपाणी किंवा जिरे–धणे पाणी हे आवडीनुसार कधीमधी घेऊ शकता.

30/08/2026

३० ऑगस्ट हा भारताचा National Millets Day (राष्ट्रीय लघु धान्य दिवस) आहे. 🌾
National Millets Day

आजचा संकल्प — एक जेवण मिलेट्ससोबत 🌾

ज्वारी, बाजरी, नाचणी आणि कोदो यांसारखी लघु धान्ये फायबर, प्रथिने, लोह आणि कॅल्शियमने समृद्ध असतात.
ती पचन, रक्तातील साखरेचे संतुलन आणि दीर्घकाळ पोट भरल्याची भावना यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
आजचं चॅलेंज
आजच्या जेवणात ज्वारी/बाजरी/नाचणीचा एक पदार्थ घ्या आणि त्याचा फोटो ग्रुपमध्ये शेअर करा.
📸

हो, ३० ऑगस्ट हा भारताचा National Millets Day (राष्ट्रीय लघु धान्य दिवस) आहे. 🌾National Millets Dayआजचा संकल्प — एक जेवण ...
30/08/2026

हो, ३० ऑगस्ट हा भारताचा National Millets Day (राष्ट्रीय लघु धान्य दिवस) आहे. 🌾
National Millets Day

आजचा संकल्प — एक जेवण मिलेट्ससोबत 🌾

ज्वारी, बाजरी, नाचणी आणि कोदो यांसारखी लघु धान्ये फायबर, प्रथिने, लोह आणि कॅल्शियमने समृद्ध असतात.
ती पचन, रक्तातील साखरेचे संतुलन आणि दीर्घकाळ पोट भरल्याची भावना यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
आजचं चॅलेंज
आजच्या जेवणात ज्वारी/बाजरी/नाचणीचा एक पदार्थ घ्या आणि त्याचा फोटो ग्रुपमध्ये शेअर करा.
📸

13/08/2026

*श्रावण आणि आपला आहार — वेदांपासून विज्ञानापर्यंत**

"भिजुनी उन्हे चमचमती,
क्षण दिपती क्षण लपती,
नितळ निळ्या अवकाशी,
मधुगंधी तरल हवा…
ऋतू हिरवा, ऋतू बरवा …”

श्रावण आला की निसर्ग जसा बदलतो,तसंच आपल्या शरीराची आणि पचनशक्तीची गरजही बदलते.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहाराकडे केवळ पोट भरण्याचं साधन म्हणून पाहिलं नाही.

*“ _उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म_* .”
अन्न हे केवळ उदरभरण नाही, तर एक संस्कार आहे, एक पवित्र कर्म आहे.

आपल्या वेदांमध्येही अन्नाला अत्यंत महत्त्व दिलं आहे —
“ *अन्नं ब्रह्म* ” — अन्नाला पवित्र स्थान दिलं गेलं आहे.

आयुर्वेदानेही आहार हा ऋतू, प्रकृती आणि पचनशक्तीनुसार असावा, हे सांगितलं आहे.
म्हणून श्रावण आला की फक्त,
“उपवासाला काय खायचं?”
हा प्रश्न न विचारता,
“या ऋतूमध्ये माझ्या शरीराला काय योग्य आहे?”
हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.

पावसाळ्यात हवामान दमट असतं आणि अन्नामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होण्याची शक्यता वाढते. त्

13/08/2026

*श्रावण आणि आपला आहार — वेदांपासून विज्ञानापर्यंत**

"भिजुनी उन्हे चमचमती,
क्षण दिपती क्षण लपती,
नितळ निळ्या अवकाशी,
मधुगंधी तरल हवा…
ऋतू हिरवा, ऋतू बरवा …”

श्रावण आला की निसर्ग जसा बदलतो,तसंच आपल्या शरीराची आणि पचनशक्तीची गरजही बदलते.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहाराकडे केवळ पोट भरण्याचं साधन म्हणून पाहिलं नाही.

*“ _उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म_* .”
अन्न हे केवळ उदरभरण नाही, तर एक संस्कार आहे, एक पवित्र कर्म आहे.

आपल्या वेदांमध्येही अन्नाला अत्यंत महत्त्व दिलं आहे —
“ *अन्नं ब्रह्म* ” — अन्नाला पवित्र स्थान दिलं गेलं आहे.

आयुर्वेदानेही आहार हा ऋतू, प्रकृती आणि पचनशक्तीनुसार असावा, हे सांगितलं आहे.
म्हणून श्रावण आला की फक्त,
“उपवासाला काय खायचं?”
हा प्रश्न न विचारता,
“या ऋतूमध्ये माझ्या शरीराला काय योग्य आहे?”
हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.

पावसाळ्यात हवामान दमट असतं आणि अन्नामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अन्नाची स्वच्छता, ताजेपणा आणि पचनास सुलभता याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं ठरतं.

कदाचित म्हणूनच आपल्या पूर्वजांनी या ऋतूमध्ये आहारात काही विशिष्ट बदल करण्याची परंपरा निर्माण केली असावी.

_*आणि सर्वात महत्त्वाचं_* —
उपवास म्हणजे दिवसभर उपाशी राहून संध्याकाळी साबुदाणा वडा, बटाट्याची भाजी आणि तळलेले पदार्थ भरपूर खाणं नाही!
*उपवासाच्या संकल्पनेत संयम, मिताहार आणि शरीर-मनाला विश्रांती यांचाही विचार आहे* .

पण उपवास करतानाही शरीराला *आवश्यक पोषण* मिळालंच पाहिजे.

म्हणून या श्रावणात भक्तीबरोबरच
आहाराची शुद्धता, प्रमाण, संतुलन आणि ऋतूनुसार आहार यांचीही काळजी घेऊया.

निसर्गाचा ऋतू हिरवा झाला आहे…
आता आपल्या ताटालाही आरोग्याच्या रंगांनी सजवूया! 🌿🙏

*रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आणि तुमचं वय दिसण्यावर होणारा परिणाम* “तुम्हाला तुमच्या वयापेक्षा थोडं तरुण दिसायचं आहे ना?” 😊...
13/08/2026

*रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आणि तुमचं वय दिसण्यावर होणारा परिणाम*

“तुम्हाला तुमच्या वयापेक्षा थोडं तरुण दिसायचं आहे ना?” 😊
माझ्या पेशंट्सना मी नेहमी सांगते फक्त क्रीम आणि स्किनकेअर पुरेसं नाही… ताटात काय आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे!

पांढरा ब्रेड, मैद्याचे पदार्थ, बिस्किट्स, केक, पेस्ट्री यांसारखे रिफाइंड कार्बोहायड्रेट्स वारंवार आणि जास्त प्रमाणात घेतल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे ग्लायकेशन आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढू शकतो, ज्याचा परिणाम कोलेजनवर होऊन त्वचा झपाट्याने वृद्ध होऊ लागते.

म्हणून मी सांगते—
❌ मैदा आणि रिफाइंड कार्ब्स कमी करा
✅ मिलेट्स, ओट्स, संपूर्ण धान्य, कडधान्ये, भाज्या आणि फायबरयुक्त पारंपरिक पदार्थ निवडा.

कारण… Anti-ageing फक्त बाहेरून नाही, आतूनही सुरू होतं! 🌿

— NutriSATVA | Where Science Meets Traditional Nutrition

वय तर वाढतच राहतेपण लवकर वय दिसायला नको ना?मग साखर कमी करा…! 🍬🍬 *साखर — जी तुमच्या त्वचेचं तारुण्य कमी करू शकते* आपल्या ...
12/08/2026

वय तर वाढतच राहते
पण लवकर वय दिसायला नको ना?
मग साखर कमी करा…! 🍬

🍬 *साखर — जी तुमच्या त्वचेचं तारुण्य कमी करू शकते*

आपल्या शरीरात कोलाजेन नावाचं एक महत्त्वाचं प्रोटीन असतं.
समजा, आपल्या त्वचेच्या घराला आधार देणारी एक मजबूत जाळी आहे—ती म्हणजे कोलाजेन.
हे कोलाजेन त्वचेला घट्टपणा, लवचिकता आणि गुळगुळीतपणा देतं. त्यामुळे त्वचा तरुण, तजेलदार दिसते आणि सैल पडत नाही
पण आपण वारंवार जास्त साखर खाल्ली, तर रक्तातील अतिरिक्त साखर कोलाजेनला चिकटू शकते. *या प्रक्रियेला Glycation म्हणतात.*
यामुळे कोलाजेन हळूहळू कडक आणि कमी लवचिक होऊ शकतं.
मग त्वचेचा आधार कमी होतो आणि सुरकुत्या, सैलपणा आणि त्वचेचा तजेला कमी होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.
म्हणूनच साखर फक्त वजन आणि diabetes नाही ती त्वचेच्या तारुण्यावरही परिणाम करू शकते.

Address

Kothrud
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Archana Rairikar- NutriSatwa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category