23/08/2026
माझी अनुभूती✨
मध्यंतरी मला अतिविचारामुळे ताण, चिडचिड आणि low energy feel व्हायची. Pause the Mind हे 40 मिनिटांचं session अनुभूती मध्ये जाऊन attend केलं. त्या 40 मिनिटांनंतर मला माझ्या energy मध्ये खूप फरक जाणवला. Actually त्या दिवशी session ला जाताना मी इतकी stressed होते की माहीत असलेला अनुभूतीचा रस्ता चुकले, map लावून पण गोंधळून गेले होते. पण session नंतर मला आतून खूप शांत वाटत होतं. Positive, stress-free, हल्कं feel होत होतं. अनुभूती मधून निघताना मी ताई, दादा सोबत हसत, गप्पा मारून बाहेर पडले.
कधी कधी आपणच अतिविचार करून गुंता वाढवतो याची जाणीव झाली. विचारांना break करुन शांतता अनुभवता आली. अशीच काहीशी सुंदर अनुभूती मला 3 Days of Mindful Living या उपक्रमात सहभागी होऊन मिळाली.
3 दिवस दररोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत 8 activity करत होते. Normally संध्याकाळ नंतर मला low energy feel व्हायची पण या 3 दिवसांत अगदी झोपेपर्यंत ही छान वाटत होतं आपण स्वतःसाठी काहीतरी करतोय हे feeling ही energy देऊन जात होतं. पूर्ण दिवसभर एक सकारात्मकता जाणवत होती.
विशेष म्हणजे पहिल्या दिवशी मला सर्दी चा त्रास होत होता. एरवी सर्दी असेल तर मला सतत शिंका, डोकेदुखी सुरू होते आणि चिडचिड होते. पण मनापासून activity करत होते तर positivity feel होत होती, आपल्यासाठी अनुभूती मध्ये कोणी प्रार्थना करत आहे तर छान वाटत होतं आणि त्याचमुळे चिडचिड जाणवत नव्हती. सर्दीचा त्रास असताना positive feel होण्याची पहिलीच वेळ... त्यामुळे छान वाटलं .
मनापासून Thank you समीर दादा, जुई ताई, पल्लवी ताई आणि प्रियांका .
*Sampada Kaduskar*
_A Grateful Mom_