03/06/2026
ध्यानाने चिंता विकारावर( Anxiety) नियंत्रण
"मेडिटेशन सही है" या सिरीजच्या दुसऱ्या भागात तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे!
मागील भागात आपण मेडिटेशन आणि स्ट्रेस (Stress) यांचा संबंध समजून घेतला. भाग 2 मध्ये, डॉ. मनोज देशपांडे आपल्याला अँझायटी Anxiety - चिंता/काळजी या वाढत्या समस्येवर मेडिटेशनच्या माध्यमातून कशाप्रकारे विजय मिळवता येतो, याबद्दल अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन करत आहेत.
या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत?
काळजी घेणे आणि काळजी करणे यातला फरक: सततच्या नकारात्मक विचारांच्या चक्रात अडकल्याने काळजीचे रूपांतर आजारात (Anxiety) कसे होते?
अँझायटीची लक्षणे: अतिविचार (Overthinking), निर्णय घेताना कच खाणे, सारखे वाईट घडण्याची भीती वाटणे, नकारात्मकता आणि विविध व्यसनांच्या आहारी जाणे.
शारीरिक परिणाम (Psycho-somatic Disorders): चिंता विकारामुळे हृदयाची धडधड वाढणे, तोंड कोरडे पडणे, विनाकारण थकवा येणे, निद्रानाश (Insomnia), आणि पोटाचे विकार (उदा. IBS) कसे उद्भवतात.
ध्यानाचे आधुनिक विज्ञान (Science of Meditation): अवघ्या ५ ते १० मिनिटांच्या ध्यानामुळे आपली व्हेगस नर्व (Vagus Nerve) कशी ऍक्टिव्हेट होते, अमेगडाला (Amygdala) मधील अनावश्यक भीती कशी कमी होते आणि मेंदूला 'मी सुरक्षित आहे' (I am safe) असा संदेश कसा मिळतो.