Aarogya360

Aarogya360 Family health information

उन्हाळ्यात लहान मुलांची काळजी1. सैल, फिकट रंगाचे सुती कपडे वापरा आणि2. दुपारी १२ ते ४ बाहेर जाणे टाळा 3. उष्माघातापासून ...
25/03/2026

उन्हाळ्यात लहान मुलांची काळजी

1. सैल, फिकट रंगाचे सुती कपडे वापरा आणि
2. दुपारी १२ ते ४ बाहेर जाणे टाळा
3. उष्माघातापासून वाचवण्यासाठी मुलांच्या शरीराचे तापमान योग्य राहील याची काळजी घ्या, त्यांना सावलीत खेळवा आणि नियमित आंघोळ घाला.
4. भरपूर पाणी पाजा: मुले पाणी पित नसतील तर त्यांना खेळाच्या रूपात किंवा चमच्याने पाणी द्या. त्यांना जास्तीत जास्त हायड्रेटेड ठेवा. पाणी, ताक, नारळ पाणी, लिंबू सरबत, आणि फळांचा रस असे पदार्थ मुलांच्या शरीराला थंडावा देतात.
5. सैल सुती कपडे: मुलांच्या अंगावर घाम सुकवणारे, हलके आणि सुती कपडे वापरा. यामुळे घामोळ्या (Heat rash) किंवा त्वचेच्या समस्या कमी होतात.
6.दुपारचे ऊन टाळा: सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत थेट सूर्यप्रकाशात खेळू देऊ नका. बाहेर जाणे अनिवार्य असल्यास मुलांच्या डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरा.
7. डीहायड्रेशनची लक्षणे ओळखा: बाळ खूप रडत असेल, लघवीचा रंग गडद पिवळा असेल, सुस्त असेल किंवा त्वचा लाल झाली असेल तर त्याला उष्णतेचा त्रास होत असण्याची शक्यता असते, अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
8. स्वच्छता आणि त्वचा: उन्हाळ्यात घाम येतो, त्यामुळे दररोज स्वच्छ आंघोळ घाला.
9. डायपर रॅशेस टाळण्यासाठी डायपर लवकर बदला किंवा शक्यतो वापरू नका.
10. योग्य आहार: आहार हलका आणि पचायला सोपा असावा, जसे की कलिंगड, काकडी, पेरू, शहाळ्याचे पाणी.
11. उन्हाळ्यातील आजारांपासून संरक्षण:उष्माघात (Heat Stroke): जर मुलाला खूप ताप, चक्कर किंवा चक्कर येत असेल, तर त्यांना त्वरित सावलीत किंवा थंड ठिकाणी न्या.
12. अतिसार (Diarrhea): बाहेरचे उघडे पदार्थ, दूषित पाणी पिणे टाळा.
13. स्वच्छता: मुलांचे हात वारंवार धुवा.

🌀 डोके फिरतेय? बेडवर वळताना चक्कर येतेय? — हे BPPV असू शकते!अनेक रुग्ण क्लिनिकमध्ये येऊन सांगतात —�“डॉक्टर, सकाळी उठताना...
12/02/2026

🌀 डोके फिरतेय? बेडवर वळताना चक्कर येतेय? — हे BPPV असू शकते!
अनेक रुग्ण क्लिनिकमध्ये येऊन सांगतात —�“डॉक्टर, सकाळी उठताना किंवा बाजू बदलताना अचानक जोरात चक्कर येते.”�ही समस्या खूप सामान्य आहे आणि यालाच BPPV (Benign Paroxysmal Positional Vertigo) म्हणतात.
🔍 BPPV म्हणजे काय?
आपल्या कानाच्या आत समतोल राखणारी एक व्यवस्था असते.�त्यातले छोटे कॅल्शियम क्रिस्टल्स (otoliths) हलून चुकीच्या जागी गेले की�डोक्याची पोजिशन बदलली की चक्कर येते.
ही जीवघेणी नाही, पण खूप त्रासदायक असते.

⚠️ BPPV ची मुख्य लक्षणे
✔️ बेडवर वळताना चक्कर�✔️ वर बघताना चक्कर�✔️ खाली वाकल्यावर चक्कर�✔️ 30–60 सेकंदात कमी होते�✔️ उलटी किंवा मळमळ होऊ शकते�✔️ ऐकू येण्यात त्रास नसतो
जर चक्कर फक्त पोजिशन बदलल्यावरच येत असेल तर�बहुधा BPPV असण्याची शक्यता जास्त असते.

❓ ही समस्या का होते?
* वय वाढल्यावर
* डोक्याला दुखापत झाल्यावर
* जास्त वेळ बेडरेस्ट
* व्हिटॅमिन D कमी
* कधी कधी कारण नसताना

🩺 तपासणी कशी करतात?
क्लिनिकमध्ये Dix-Hallpike test नावाची साधी तपासणी करून�BPPV लगेच ओळखता येते.
ही तपासणी:
* 1–2 मिनिटांत होते
* वेदनारहित आहे
* सुरक्षित आहे

💊 उपचार काय?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे�👉 Epley manoeuvre (विशेष व्यायाम)
ही एक साधी प्रक्रिया आहे जी क्लिनिकमध्ये केली जाते.�यामुळे हललेले क्रिस्टल्स परत योग्य जागी जातात.
🟢 80–90% रुग्णांना 1–2 सिटिंगमध्ये पूर्ण आराम मिळतो.
औषधे फक्त तात्पुरता आराम देतात —

Dr. Paras lad
Family physician
B.A.M.S.

Tele consultation available
📞 8329126408

⚠️ “पोटात दुखणे कधी धोकादायक असते?” ⚠️(हे नक्की वाचा आणि शेअर करा)आपल्याला अनेकदा पोटात दुखतं… गॅस, अपचन, आम्लपित्त असं ...
20/01/2026

⚠️ “पोटात दुखणे कधी धोकादायक असते?” ⚠️
(हे नक्की वाचा आणि शेअर करा)
आपल्याला अनेकदा पोटात दुखतं… गॅस, अपचन, आम्लपित्त असं समजून आपण दुर्लक्ष करतो.
पण काही वेळा पोटदुखी ही गंभीर आजाराची खूण असू शकते.
👉 खालील लक्षणे असतील तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवा:
🔴 खूप तीव्र आणि अचानक सुरू झालेले दुखणे
→ अपेंडिक्स, आतड्यांची अडचण, पॅन्क्रियाटायटिस असू शकते.
🔴 पोटदुखीसोबत उलट्या, ताप किंवा थंडी वाजणे
→ संसर्ग (infection) ची शक्यता.
🔴 उलटीत किंवा शौचेत रक्त जाणे
→ आतड्यात जखम, अल्सर किंवा गंभीर समस्या.
🔴 पोट कडक होणे आणि स्पर्श केला तरी खूप दुखणे
→ पोटात सूज किंवा perforation ची शक्यता.
🔴 गर्भवती महिलांमध्ये पोटदुखी
→ ectopic pregnancy किंवा इतर धोका असू शकतो.
🔴 लहान मुलांमध्ये सतत रडणे + दूध न पिणे + पोटदुखी
→ तातडीने तपासणी गरजेची.
🔴 वृद्ध व्यक्तींमध्ये पोटदुखी + कमजोरी/चक्कर
→ हृदयविकार किंवा आतड्यांचा रक्तपुरवठा कमी होणे सुद्धा कारण असू शकते.
❗ कधी दुर्लक्ष करू नये?
जर पोटदुखी
✔️ 6–8 तासांपेक्षा जास्त टिकत असेल
✔️ वारंवार होत असेल
✔️ औषध घेऊनही कमी होत नसेल
तर स्वतः औषध न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
✅ वेळेवर तपासणी = मोठा धोका टाळता येतो
लवकर निदान केल्यास अनेक गंभीर आजार टाळता येतात.
📍 Vihan Clinic – तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी सदैव तत्पर
👨‍⚕️ Dr. Paras Lad (Family Physician)
👉 ही माहिती उपयोगी वाटली तर नक्की शेअर करा.
कारण एक शेअर एखाद्याचे प्राण वाचवू शकते. 🙏

🧠 डोपामिन सर्ज – आनंदाचा भास की आरोग्याची घसरण?(लेखक: डॉ. पारस लाड, विहान क्लिनिक)आपण सगळेच आयुष्यात थोडासा आनंद, थोडसं ...
14/07/2025

🧠 डोपामिन सर्ज – आनंदाचा भास की आरोग्याची घसरण?

(लेखक: डॉ. पारस लाड, विहान क्लिनिक)

आपण सगळेच आयुष्यात थोडासा आनंद, थोडसं समाधान, आणि मानसिक शांतता शोधत असतो. काहींसाठी तो आनंद गोड खाण्यात असतो, काहींसाठी सोशल मीडियावर “लाइक” मिळण्यात, तर काहींसाठी मोबाईल गेम्स किंवा सतत ऑनलाइन काहीतरी नवीन बघण्यात. ही सगळी साधनं आपल्या मेंदूला थोडक्यात "धक्का देतात" — पण आनंददायक वाटणारा हा धक्का खरंच आपल्यासाठी फायदेशीर आहे का?

आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत महत्वाचा पण कमी समजला गेलेला विषय — डोपामिन सर्ज (Dopamine Surge).

🧠 डोपामिन म्हणजे काय?
डोपामिन हे आपल्या मेंदूत तयार होणारं एक महत्त्वाचं रसायन आहे, ज्याला वैज्ञानिक भाषेत "neurotransmitter" म्हणतात. या रसायनाचं काम म्हणजे, आनंदाची जाणीव, प्रेरणा, सवयी तयार करणं, लक्ष केंद्रीत करणं आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवणं.

जेव्हा आपण काही छान, मजेशीर किंवा रोमांचक गोष्ट करतो — जसं की एखादं आवडतं गाणं ऐकणं, गोड खाणं, नवीन काहीतरी शिकणं — तेव्हा आपल्या मेंदूत डोपामिनचं प्रमाण वाढतं. यामुळे आपल्याला समाधान, स्फूर्ती आणि उत्साह वाटतो.

🔺 डोपामिन सर्ज म्हणजे काय?
डोपामिन सर्ज म्हणजे अचानक खूप मोठ्या प्रमाणात डोपामिन तयार होणं.
ही सर्ज साधारणतः अशा गोष्टींमुळे होते ज्या मेंदूला अनैसर्गिक किंवा अतिशय तीव्र आनंद देतात.

उदाहरणार्थ, सोशल मीडिया स्क्रोल करताना अचानक एखादा भन्नाट व्हिडिओ दिसतो — त्या क्षणी मेंदूत डोपामिन वाढतं. असे अनुभव वारंवार आले की, मेंदू त्यावर "अडकतो" आणि आपल्याला पुन्हा पुन्हा तो अनुभव घ्यावासा वाटतो. हेच पुढे जाऊन मानसिक व्यसन (behavioral addiction) तयार करतं.

⚠️ डोपामिन सर्ज करणाऱ्या सामान्य सवयी कोणत्या?
१. मोबाईल गेम्स व व्हिडिओ गेम्स

गेम्समध्ये मिळणारी विजयी भावना, पॉईंट्स, लेव्हल्स – हे सगळं सतत डोपामिन वाढवतं.

२. सोशल मीडिया (Facebook, Instagram, WhatsApp Status)

प्रत्येक नोटिफिकेशन, लाईक, कमेंट हे आपल्याला छोटा आनंद देतं – डोपामिन वाढवतं.

३. रात्री उशिरा Reels, Shorts बघणं

हा प्रकार मेंदूला अतिशय वेगाने आनंद देतो – पण टिकाऊ नसतो.

४. जंक फूड / गोडधोड / मसालेदार खाणं

जास्त मीठ, साखर, तेल यामुळे तात्पुरता आनंद मिळतो पण आरोग्यावर परिणाम होतो.

५. ऑनलाइन खरेदी / डील्स / जाहिराती सतत पाहणं

नवीन वस्तू बघणं, ऑर्डर करणं यामुळे "नवीनपणाचा" डोपामिन सर्ज होतो.

६. वेबसिरीज / टीव्ही बिंज वॉचिंग

एक एपिसोड संपला की लगेच पुढचा बघण्याची इच्छा होते – मेंदू तिथे अडकतो.

😟 सतत डोपामिन सर्ज झाल्यास काय होते?
जर डोपामिन सर्ज वारंवार झाली, तर मेंदू त्या प्रमाणात संवेदनशील राहात नाही.
यालाच डोपामिन डीसेंसिटायझेशन (desensitization) म्हणतात.

👉 त्याचे परिणाम:

साध्या गोष्टीत रस उरत नाही
निसर्ग, गप्पा, पुस्तक, अभ्यास – सगळं फिकट वाटायला लागतं.
लक्ष न लागणं, विसरभोळेपणा वाढतो
मेंदू "झटक्यात आनंद देणाऱ्या गोष्टी" शोधत राहतो.
चिडचिड, अस्वस्थता, मानसिक थकवा
कारण मेंदूला अपेक्षित आनंद मिळत नाही.
स्वतःवरचा ताबा कमी होतो
निर्णय घेताना घाई, आत्मनियंत्रण हरवलेलं वाटतं.
दिवसाचे तास वाया जातात
"फक्त 5 मिनिटं" म्हणत सुरुवात होते, पण 2-3 तास निघून जातात.
झोपेचा त्रास, डोळ्यांवर ताण, सतत थकवा
कारण स्क्रीन टाइम आणि मेंदूचा ताण वाढतो.
💡 मग काय करावं? — डोपामिन डिटॉक्स
"डोपामिन डिटॉक्स" म्हणजे मेंदूला पुन्हा नैसर्गिक गोष्टींमधून आनंद घेण्याची सवय लावणं.

🛠️ काही सोपे उपाय:

✅ मोबाईल वेळ मर्यादित ठेवा

दिवसातून 2 वेळा 15-20 मिनिटेच सोशल मीडिया
झोपण्याआधी 1 तास मोबाईल पूर्ण बंद
✅ रोज 30 मिनिटे व्यायाम / चालणं / योगा

नैसर्गिक डोपामिन स्राव वाढवतो
✅ सकाळी उठल्यावर 10 मिनिटं ध्यान / श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करा

मेंदू शांत होतो, निर्णय क्षमता वाढते
✅ वाचन करा — हलकं फुलकं किंवा प्रेरणादायी

मन वेगळ्या जगात जातं आणि आनंद देतं
✅ हस्तकला, बागकाम, संगीत, नृत्य यासारखे छंद जोपासा

यामुळे मेंदू सक्रिय पण स्थिर राहतो
✅ एक वेळा “नो-स्क्रीन टाइम” ठरवा — स्वतःसाठी, कुटुंबासाठी

माणसांशी संवाद हा सर्वात स्थिर आणि टिकाऊ डोपामिन स्त्रोत आहे
🌱 आयुष्य बदलण्यास सुरुवात इथूनच होते!
आपण जर आपल्या डोपामिन सर्ज करणाऱ्या सवयींवर नियंत्रण ठेवू लागलो, तर काही आठवड्यांतच आपल्यात हे बदल जाणवतात:

लक्ष केंद्रित होतं
मानसिक स्पष्टता वाढते
निर्णय घ्यायची क्षमता सुधारते
झोप आणि आरोग्य सुधारतं
माणसांशी संबंध अधिक सखोल होतात
छोट्या गोष्टीत आनंद वाटू लागतो
💬 निष्कर्ष:
डोपामिन म्हणजे आपल्या मेंदूचा "गिफ्ट सिस्टम" आहे — पण जर आपण त्याचा गैरवापर केला, तर तोच आनंद आपल्याला व्यसनात आणि मानसिक थकव्यात ढकलतो.
जाणूनबुजून केलेल्या सवयी, थोडं संयम, आणि थोडा प्रयत्न — हे आपल्याला मानसिक, शारीरिक आणि सामाजिकदृष्ट्या समृद्ध करतात.

🙏 विहान क्लिनिककडून आवाहन:

"मनाचं आरोग्य हसतं-खेळतं असलं, की शरीर स्वतःच बरे होण्यास सुरुवात करतं.
आपल्या डोपामिन सर्ज सवयींवर लक्ष ठेवा – कारण आरोग्य केवळ तपासण्यानेच नव्हे, तर विचार बदलण्याने टिकतं."

🌧️ पावसाळ्यात जुलाबाची समस्या? काळजी घ्या! 💧पावसाळ्यात दूषित पाणी आणि अस्वच्छ अन्नामुळे जुलाब (loose motions) होण्याचा ध...
18/06/2025

🌧️ पावसाळ्यात जुलाबाची समस्या? काळजी घ्या! 💧

पावसाळ्यात दूषित पाणी आणि अस्वच्छ अन्नामुळे जुलाब (loose motions) होण्याचा धोका वाढतो. वेळेवर योग्य उपचार न घेतल्यास शरीरात पाणी व क्षारांची कमतरता होऊ शकते.

🩺 लक्षणे:
• वारंवार सैल शौच
• थकवा व अशक्तपणा
• पोटात मुरडा किंवा वेदना
• उलट्या किंवा ताप

✅ काय करावे?
• उकळलेले/फिल्टर पाणी प्या
• ORS घ्या – शरीरातील पाणी व क्षार भरून काढतो
• हलके, पचायला सोपे अन्न घ्या
• डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक!

🚫 काय टाळावे?
• उघड्यावर मिळणारे अन्न
• थंड पेय आणि बर्फ
• दूध किंवा दूधजन्य पदार्थ

17/06/2025
🌧️ पावसाळ्यातील संसर्गजन्य आजार: लेप्टोस्पायरोसिसलेप्टोस्पायरोसिस हा एक बॅक्टेरियल आजार आहे जो पावसाळ्यात अधिक प्रमाणात ...
17/06/2025

🌧️ पावसाळ्यातील संसर्गजन्य आजार: लेप्टोस्पायरोसिस

लेप्टोस्पायरोसिस हा एक बॅक्टेरियल आजार आहे जो पावसाळ्यात अधिक प्रमाणात दिसतो. हा आजार प्रामुख्याने प्रदूषित पाणी, चिखल किंवा संक्रमित प्राण्यांच्या लघवीच्या संपर्कातून पसरतो.

🧬 आजाराचा स्रोत:
हा आजार Leptospira नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. संक्रमित प्राण्यांमध्ये प्रामुख्याने:

उंदीर 🐀
कुत्रे 🐕
गुरे-ढोरे 🐄
हे प्राणी त्यांच्या लघवीनं बॅक्टेरिया पसरवतात. जर व्यक्तीच्या शरीरावर जखम असेल किंवा मोकळी त्वचा असेल आणि ती त्या पाण्यात आली, तर संसर्ग होतो.

⚠️ कोणत्या व्यक्तींना धोका अधिक?

पूरग्रस्त भागात राहणारे
चिखलात काम करणारे मजूर / शेतकरी
नगरपालिका सफाई कर्मचारी
उघड्या पायाने चालणारे लोक
घरात उंदीर वावरत असलेले

🤒 प्रमुख लक्षणे:

अचानक तेज ताप (१०२-१०४°F)
डोकेदुखी आणि स्नायूंना तीव्र वेदना (विशेषतः मांडी व पाठीवर)
डोळे लालसर दिसणे
उलटी, मळमळ, खाण्याची इच्छा नसणे
अशक्तपणा, थकवा
कधी कधी त्वचेला पिवळसरपणा (जॉन्डिससारखा)
लघवीत अडथळा किंवा लघवी बंद होणे (किडनीवर परिणाम)
गंभीर रुग्णांमध्ये मेंदू, यकृत, फुफ्फुसांवर दुष्परिणाम

🧪 तपासण्या:
CBC – वाढलेले WBC
LFT/RFT – यकृत व मूत्रपिंड कार्य तपासणी
Leptospira IgM ELISA – बॅक्टेरियाची खात्री करण्यासाठी

💊 उपचार:
लवकर निदान झाल्यास Doxycycline किंवा Azithromycin गोळ्यांनी बरे होते
गंभीर रुग्णांना IV सेफ्ट्रियाक्सोन इंजेक्शन
काही वेळा रुग्णालयात भरती व IV fluids आवश्यक
वेळेवर उपचार घेतल्यास पूर्ण बरे होऊ शकते

🛡️ प्रतिबंध आणि काळजी:

पावसाळ्यात गमबूट वापरणे – चिखल व पाण्यातून चालताना
अंगावर जखम असल्यास पाण्यात जाणे टाळा
उकळलेले/फिल्टर केलेले पाणी वापरा
उंदीर आणि कुत्र्यांचा साठा टाळा, स्वच्छता ठेवा

🚨 डॉक्टरांकडे कधी जायचं?
ताप ३ दिवसांहून अधिक टिकत असेल
स्नायूंमध्ये तीव्र वेदना, पिवळसरपणा किंवा डोळे लालसर
लघवीत अडचण, कमी प्रमाणात लघवी

Dr. Paras lad
BAMS
Reg. no I-78563-A
Mob no 8329126408

🔥 अॅसिडिटी – पोटातील जळजळ का होते? उपाय काय?📍 Vihan Clinic, Pune😣 वारंवार ढेकर येणे, छातीत जळजळ, पोटात मळमळ – ही अॅसिडिट...
06/06/2025

🔥 अॅसिडिटी – पोटातील जळजळ का होते? उपाय काय?
📍 Vihan Clinic, Pune

😣 वारंवार ढेकर येणे, छातीत जळजळ, पोटात मळमळ – ही अॅसिडिटीची मुख्य लक्षणं!

🧪 अॅसिडिटी का होते?
• उपाशीपोटी राहणे
• वेळच्यावेळी जेवण न करणे
• खूप तळलेले/तिखट पदार्थ खाणे
• चहा-कॉफी, कोल्डड्रिंकचे अतिसेवन
• तणाव, झोपेचा अभाव

💡 लक्षणं:
✅ छातीत जळजळ किंवा आग होणे
✅ आंबट ढेकर येणे
✅ गॅस व पोट फुगणे
✅ घशात आंबटपणा जाणवणे
✅ अन्न गिळताना त्रास होणे

✅ काय करावे?
• वेळेवर आणि हलकं जेवण घ्या
• जास्त तिखट, मसालेदार पदार्थ टाळा
• जेवणानंतर लगेच झोपू नका
• रोज 30 मिनिटे चालण्याचा व्यायाम ठेवा
• गरज असल्यास अॅसिडिटीची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या

⚠️ लक्षणं वारंवार दिसत असल्यास दुर्लक्ष करू नका – तपासणी गरजेची आहे.

📞 अॅसिडिटीसाठी सल्ला व उपचारासाठी संपर्क करा:
👉 Vihan Clinic, Pune
📲 8329126408

🟠 वारंवार पेनकिलर घेता? सावध रहा!➖➖➖➖➖दर्दनाशक गोळ्या (Analgesics) म्हणजेच पेनकिलर गोळ्या आपण डोकेदुखी, सांधेदुखी, पाळीत...
05/06/2025

🟠 वारंवार पेनकिलर घेता? सावध रहा!
➖➖➖➖➖
दर्दनाशक गोळ्या (Analgesics) म्हणजेच पेनकिलर गोळ्या आपण डोकेदुखी, सांधेदुखी, पाळीतील वेदना, किंवा कुठल्याही आजारात लगेच घेतो. पण या गोळ्या वारंवार घेत राहिल्यास शरीरावर काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

🔴 लांब पल्ल्याचे दुष्परिणाम:
✅ पोटाचे विकार – आम्लपित्त, अल्सर
✅ मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका
✅ लिव्हरवर ताण
✅ उच्च रक्तदाब
✅ हृदयविकाराचा धोका
✅ औषधांप्रती शरीराची सवय (Drug dependence)

💊 पेनकिलर म्हणजे तात्पुरती आराम – पण मूळ कारण शोधून योग्य उपचार घेणे महत्त्वाचे!

🩺 नियमित वेदना असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःहून गोळ्या घेणे टाळा.

🌿 सुरक्षित आयुष्यासाठी विचारपूर्वक औषध सेवन करा!

📍 तपासणीसाठी भेट द्या –
Vihan Clinic,
Manjari budruk
Pune
📞 8329126408

स्पॉन्डिलायसिस(Spondylosis)  हा मणक्याचा (spine) एक क्षीण होणारा आजार आहे, जो प्रामुख्याने कशेरुका डिस्क्सवर (Vertebral ...
04/06/2025

स्पॉन्डिलायसिस(Spondylosis) हा मणक्याचा (spine) एक क्षीण होणारा आजार आहे, जो प्रामुख्याने कशेरुका डिस्क्सवर (Vertebral disc) परिणाम करतो . हे बहुतेकदा वयाशी संबंधित झीज होते, ज्यामुळे सांधे (joint) आणि कूर्चाचा (cartilage) ऱ्हास होतो.

सामान्य प्रकार:
1) सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस (मान) Cervical spondylosis
2) लंबर स्पॉन्डिलायसिस (पाठीचा खालचा भाग) Lumbar spondylosis

लक्षणे:
वेदना आणि कडकपणा: एक प्राथमिक लक्षण, विशेषतः मान किंवा पाठीच्या खालच्या भागात.
उत्सर्जित वेदना, सुन्नपणा किंवा मुंग्या येणे: हे हात, पाय किंवा हातात येऊ शकतात.
कमकुवतपणा: हात आणि पायांमध्ये, मूत्राशय/आतड्यांचे संतुलन राखण्यात किंवा नियंत्रणात अडचण येण्याची शक्यता असते.

कारणे:
वयानुसार होणारे झीज: सर्वात सामान्य कारण, ज्यामुळे पाठीच्या डिस्क आणि सांधे खराब होतात.
ऑस्टियोआर्थरायटिस: संधिवाताचा एक प्रकार जो मणक्यावर परिणाम करू शकतो.
दुखापती: मागील पाठीच्या दुखापती किंवा शस्त्रक्रिया स्पॉन्डिलायसिसमध्ये योगदान देऊ शकतात.
अनुवांशिक पूर्वस्थिती: कौटुंबिक इतिहासामुळे धोका वाढू शकतो.
इतर घटक: लठ्ठपणा, बैठी जीवनशैली आणि धूम्रपान हे देखील यात भूमिका बजावू शकतात.

उपचार:
व्यायाम : स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि लवचिकता सुधारण्यासाठी व्यायाम.
औषधे: वेदनाशामक (वेदना कमी करणारे) आणि स्नायू शिथिल करणारे.
फिजिओथेरपी: IFT आयएफटी थेरपी वेदना कमी करू शकते
जीवनशैलीतील बदल: निरोगी वजन राखणे, सक्रिय राहणे आणि लक्षणे वाढवणाऱ्या क्रियाकलाप टाळणे.
शस्त्रक्रिया: काही प्रकरणांमध्ये तीव्र वेदना किंवा न्यूरोलॉजिकल लक्षणांसाठी आवश्यक असू शकते

Dr. Paras lad
BAMS Reg no I-78563-A
Family physician & surgeon
mob no. 8329126408

Address

Near Shivaji Statue, Near Manjari Police Station, Manjari Budruk
Pune
412307

Opening Hours

Monday 5:30pm - 10pm
Tuesday 5:30pm - 10pm
Wednesday 5:30pm - 10pm
Thursday 5:30pm - 10pm
Friday 5:30pm - 10pm
Saturday 5:30pm - 10pm
Sunday 5:30pm - 10pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarogya360 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share