गोदाकाठ मेडिकल असोसिएशन

  • Home
  • India
  • Saikhede
  • गोदाकाठ मेडिकल असोसिएशन

गोदाकाठ मेडिकल असोसिएशन सामाजिक संस्था

05/07/2026
गोदाकाठ मेडिकल असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर एक जुलै रोजी डॉक्टर दिनानिमित्त श्रीरंग लॉन्स येथे पार पडलेल्या सर्वसाधा...
03/07/2026

गोदाकाठ मेडिकल असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर

एक जुलै रोजी डॉक्टर दिनानिमित्त श्रीरंग लॉन्स येथे पार पडलेल्या सर्वसाधारण वार्षिक सभेत गोदाकाठ मेडिकल असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर झाली यामध्ये अध्यक्षपदी सर्वानुमते डॉ. सुभाष पिंगळ यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी डॉ. बापू खालकर, डॉ. गणेश लोखंडे तसेच महिला उपाध्यक्षपदी डॉ. भावना दळवी यांची निवड करण्यात आली. सचिव पदी श्री योगेश केकाण तर सहसचिव पदी श्री समाधान टर्ले यांना या पदावर कायम ठेवण्यात आले. तर खजिनदारपदी डॉ. विश्वास टरले सहखजिनदारपदी डॉ. नंदा दळवी, समन्वयक डॉ. अनिल बोराडे, डॉ. दगु हाडपे, डॉ.गोकुळ मालपुरे यांची निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. प्रमोद वडजे यांनी काम बघितले

या कार्यक्रमावेळी नाशिक जिल्हा विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार मा. गोकुळ भाऊ गीते यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी आमदार गोकुळ भाऊ गीते यांनी देखील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. व गोदाकाठ मेडिकल असोसिएशन करत असलेल्या समाज उपयोगी विविध कामांचा गौरव केला.
यावेळी असोसिएशनचे मावळते अध्यक्ष डॉ. शरद दळवी उपाध्यक्ष डॉ. शिल्पा माळी डॉ. किरण खालकर योगेश पगारे इतर पदाधिकारी डॉ. संजय मतसागर डॉ. विजय डेरले डॉ. सुमंत दीक्षित डॉ. राजेंद्र जगताप डॉ. अश्विनी कांडेकर व इतर सदस्य डॉ. नितीन गीते डॉ.वायकर डॉ. हेमंत दळवी डॉ. राजेंद्र पवार डॉ. तुषार घुगे डॉ. प्रल्हाद डेरले डॉ. अनिल महाजन डॉ. प्रशांत कांडेकर डॉ. ज्ञानेश्वर बोराडे डॉ.आबा पाटील डॉ. कौस्तुभ बोढाई डॉ. योगेश सांगळे डॉ. राहुल माळी डॉ.योगेश धारराव डॉ. शिरीष कोठावदे डॉ. सुदर्शन बोरसे डॉ. उत्तम फरताळे डॉ. उत्कर्ष शिंदे डॉ. विक्रांत वाघ डॉ. विद्या गीते डॉ .मीनाक्षी बोराडे डॉ.रोहिणी टरले डॉ. माधुरी पिंगळ श्री हेमंत सावंत डॉ.संतोष क्षीरसागर डॉ. विलास जाधव डॉक्टर सुनील वाघ व नासिक येथील जगदंब हॉस्पिटल चे संचालक डॉ. वैभव पवार डॉ. शिवप्रसाद टरले डॉ.सचिन भाबड व इतर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव योगेश केकाण यांनी केले तर मावळते अध्यक्ष डॉ. शरद दळवी यांनी आभार मानले.

03/07/2026
14/10/2025

गोदाकाठ मेडिकल असोसिएशन तर्फे दिवाळीनिमित्त फराळ वाटप व आरोग्य शिबिर संपन्न

गोदाकाठ मेडिकल असोसिएशन दरवर्षी दिवाळीनिमित्त पेठ तालुक्यामध्ये गरजू पर्यंत पोहोचून आरोग्य शिबिर व फराळ वाटप करतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पहिला दिवा गरजूंच्या दारी याप्रमाणे गोदाकाठ मेडिकल असोसिएशन व गंगाबिसनजी भुतडा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सायखेडा यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच सोशल नेटवर्क फोरम च्या सहकार्याने पेठ तालुक्यातील निरगुडे या गावात फराळ वाटप व मोफत आरोग्य शिबीर घेऊन मोफत औषधे देण्यात आले. सोबत येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे मोफत रक्तगट तपासणी करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीकडून आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोदाकाठ मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शरद दळवी, उपाध्यक्ष डॉ. किरण खालकर, सचिव श्री योगेश केकाण, खजिनदार डॉ.संजय मतसागर, इतर सदस्य डॉ .सुमंत दीक्षित, डॉ. उत्तम फरताळे, डॉ. विश्वास टरले, डॉ. विलास जाधव,डॉ.कौस्तुभ बोढाई डॉ.मीनाक्षी बोराडे, डॉ.माधुरी पिंगळ, डॉ. वंदना वाघ, डॉ. भावना दळवी, मनोहर ढेपले तसेच गंगाबिसनजी भुतडा नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन नरेंद्र दिगंबर गीते, संचालक घनश्याम जोंधळे, अविनाश महाजन, दिलीप शिंदे, व्यवस्थापक शंकर कुटे, लिपिक वसंत जोशी, रवींद्र वाघ तसेच निफाड सहकार अधिकारी श्रेणी 2 चे श्री कैलास सोनवणे साहेब हे उपस्थित होते. निरगुडे ग्रामपंचायतच्या महिला सरपंच बेबीनंदा खंबाईत, पोलीस पाटील विठू नारायण खंबाईत, सुरेश खंबाईत, सुधाकर गांगुर्डे कैलास भोये, तसेच आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री येवला सर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

⚫ *तीव्र निषेध* ⚫ *निषेध* ⚫ *निषेध* ⚫पश्चिम बंगाल कोलकत्ता येथील आर.जी.कार मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर युवतीवर सामुहिक बलात्...
18/08/2024

⚫ *तीव्र निषेध* ⚫ *निषेध* ⚫ *निषेध* ⚫

पश्चिम बंगाल कोलकत्ता येथील आर.जी.कार मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर युवतीवर सामुहिक बलात्कार करून तीचा खून करण्यात आला, या घृणास्पद कृत्याचा गोदाकाठ मेडिकल असोसिएशनच्या वतीने दिनांक 17/8/2024 रोजी
तीव्र निषेध करीत असून नराधमना कठोर शासन करावेत यासाठी सायखेडा पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले.
सन्माननीय
*गोदाकाठ मेडिकल असोसिएशन कार्यकारणी*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Address

Saikhede
422210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गोदाकाठ मेडिकल असोसिएशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share