Owner Of Srushti Enterprises

Owner Of Srushti Enterprises "SRUSHTI ENTERPRISES" IS WORKING IN ORGANIC FARMING INDUSTRY . OUR MISSION IS " ORGANIC INDIA , HEALTHY INDIA , RICH INDIA".

19/04/2019

विदेशी झाडे का नकोत ? -
मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या निलगिरी, १९७२ साली आयात केलेल्या गव्हा ( मिलो ) बरोबर भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस , सप्तपर्णी , रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे .... दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आलेल्या गव्हाबरोबर तिकडचे पार्थेनियम तण बीच्या स्वरूपात आपल्याकडे आले आणि स्थानिक पर्यावरणात या तणाने हाहाकार माजवला .... आपण त्याला गाजर गवत आणि काँग्रेस गवत म्हणतो .... पण ह्याचे निर्मूलन काही आपल्याला करता आले नाही कारण हे स्थानिक तण नसल्याने त्याला खाऊन फस्त करणारे जीवच इथल्या स्थानिक अन्नसाखळीत नांदत नसल्याने, त्याची बेसुमार वाढ झाली .... अशा प्रकारे विदेशी झाडांची केलेली लागवड आपल्या जीवनचक्रावर परिणाम करत असल्याचे दिसत आहे ...
या झाडांच्या फुलात परागकण नाहीत त्यामुळे त्यावर फुलपाखरासारखे कीटक येत नाहीत ... या झाडांच्या मुळांनी जमिनीतील पाणी शोषून घेतल्याने पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे ... या झाडांच्या पानांनी आणि सावलीने आपल्या जमिनी निकृष्ट केलेल्या आहेत ... या झाडांच्या फांद्यांचा, बुंध्यांचा उपयोग आपल्याला नाही ... रातकिडे, वटवाघूळ, चिमणी, घार, गिधाडे, गरुड, घुबड अशा सर्रास दिसणाऱ्या पक्षांचा वावर दुर्मिळ झाला आहे ... एकंदरीत अशा विदेशी झाडांवर होणाऱ्या परागकण प्रक्रियेला आणि पक्ष्यांद्वारे होणाऱ्या बीजप्रसाराच्या कामाला खीळ बसत असून कीटक, किडे, पक्षी जोडणारी निसर्गसाखळी / अन्नसाखळी कमकुवत होतेय ... परदेशी झाडाची पाने, फुले, शेंगा आपल्याकडील गाय ,बैल ,शेळीसुद्धा खात नाहीत .... माकडे देखील परदेशी झाडावर बसत नाहीत. म्हणजे मुक्या प्राण्यांना जे कळते की परदेशी झाडे घातक आहे ते आपल्याला अजून कळलेले नाही हेच मोठे दुर्देव याचमुळे निसर्गाच्या अन्नसाखळीत एकमेकांवर अवलंबून असलेले अनेक जीव नामशेष होण्याच्या मार्गाकडे ढकलले जात आहेत ... या प्राणी, पक्षी आणि वनस्पतींवर उपजीविका करणारे माकड, वाघ, हत्ती, बिबटे, गवे हे प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत ...
ग्लिरिसिडीया सारख्या झाडाच्या फुलावरून उंदीर, घुशी गेल्या तरी ते अपंग होतात ... मरतात ... या झाडाखालुन चालताना धाप लागते ... या झाडापासून विषारी वायु उत्सर्जित केला जातो त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते .... जवळपास ९०% सरकारी जंगले व नर्सरी ग्लिरिसिडीयाने भरलेली आहेत ... १९७० च्या दशकात युरोपियन देशांनी जागतिक बॅंकेचे कर्ज देण्यासाठी भारतासमोर ग्लिरिसिडीया हे झाड भारतीय जंगलात लावण्याची अट घातली तेव्हापासून आपल्याकडे ग्लिरिसिडीया हे झाड आले... तेव्हापासून पावसाचे प्रमाण हळुहळु कमी झालेले आहे ... फायकस या झाडाच्या पानाचा धुर घेतल्यास शरीर सुजते. परदेशी झाडांचे कोणतेही आयुर्वेदीक उपयोग नाहीत .त्यापासुन ऑक्सीजन देखील मिळत नाही ... जिथे मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे आहेत तेथे फिरायला जाणाऱ्या नागरिकांमधे ह्रदय रोगाचे प्रमाण वाढलेले असल्याचे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे .... इतक्या मोठ्याप्रमाणावर परदेशी झाडे लावली गेली आहेत आणि त्यांना मुद्दाम नीलमोहोर ,काशीद ,सप्तपर्णी अशी स्थानिक दिशाभुल करणारी नावे दिलेली आहेत की कोणते झाड परदेशी समजायचे असा गोंधळ निर्माण होतो यासाठी ज्या झाडांवर आपल्याकडील पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत ते झाड परदेशी समजावे ....
आता देशी झाडेच का लावायची ? याबद्दल
अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम।
कपित्थबिल्वा मलकत्रयं च पंचाम्रवापी नरकं न पश्येत्।
अर्थात पिंपळ, कडुलिंब आणि वड यापैकी एक वृक्ष आणि चिंचेची दहा झाडे किंवा कवठ, बेल आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे तीन वृक्ष आणि आंब्याची पाच झाडे जो लावेल, तो नरकात जाणार नाही. हे आपल्या पुराणात सांगून ठेवलेलं आहे ... वडाला, उंबराला देवाचा दर्जा दिला गेलाय ....
देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. त्यांच्या अस्तित्वाशी जुळवून घेतलेली, त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था असते.... या सजीव व्यवस्थेत मनुष्य, प्राणी, पक्षी, कीडे, कीटक सामावलेले असतात.... पक्ष्यांना, किडयांना आणि कीटकांनाही अन्न, निवारा मिळतो ... देशी झाडांच्या गळलेल्या पानांतून जमिनीवर जमणाऱ्या पाचोळयातून तयार होणाऱ्या खतातून जमिनीचा कस वाढत असतो... विघटन झालेल्या पालापाचोळयाच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये पुन्हा झाडाकडे पाठवण्याचे काम झाडांची दूरवर पसरणारी मुळे करत असतानाच खोलवर जाऊन ती जमिनीवरच्या मातीला धरून ठेवतात.... विविध कीटकांना, किडयांना आणि सरपटणाऱ्या जीवांना अशी उत्तम जमीन उपयुक्त ठरते आणि एक परिपूर्ण पर्यावरण निर्माण करते.... ऑक्सिजनचे आणि पावसाचे प्रमाण वाढते ... ढगांना पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असलेला गारवा निर्माण करण्याची क्षमता आपल्या देशी झाडामध्ये आहे ... त्यांचे प्रमाण कमी झाल्याने अवकाळी पाउस, चुकलेले उन्हाळा, पावसाला, थंडी यांचे चक्र आपल्याला वेगाने विनाशाकडे घेवून जात आहे ....
देशी झाडांच्या फांद्या, ढोल्या या विविध पक्ष्यांचा निवारा बनतात.... साधारणपणे ३५० पेक्षा जास्त जातीची झाडे वटवाघळं निसर्गात रोपण करीत असतात यात आंबा, जांभूळ, चिकू, बोर, उंबर, वड, पिप्रण, नांदरूक, मोहा, सीताफळ, रामफळ अशी अनेक फळझाडे असून सर्वात अगोदर फळ पिकते हे वटवाघळाला समजते.... यात पाडाला पिकलेला आंबा सुरुवातीला वटवाघळे खातात आणि मग शेतकरी आंबे उतरवितो आणि मग आडी लावली जाते .... मुक्या प्राण्यांना हे कळते मग माणसाला कधी कळणार ...
पांगारा, सावर, सिताफळ, जांभुळ, कोकम, कडुनिंब, करंज, बहावा, उंबर, वड, पिंपळ, चिंच, आपटा, कांचन, बहावा, कदंब, फणस ,आवळा ,आंबा , कवठ, बेल,कडुनिंब ,मोह, पळस ही झाडे न लावता निव्वळ फोटोसाठी चुकीचे वृक्षारोपण करणाऱ्या लोकांना थांबविणे गरजेचे आहे.... अन्यथा हिरवळ दिसेल, मात्र जैवविविधता दिसणार नाही ...

Post is copied.. मोठी आहे..परंतू छान माहिती आहेकाजू या फळपिकातील संशोधनाचा मागोवा काजू हे मुळचे ब्राझील देशातील पीक. १६ ...
16/03/2019

Post is copied.. मोठी आहे..परंतू छान माहिती आहे

काजू या फळपिकातील संशोधनाचा मागोवा

काजू हे मुळचे ब्राझील देशातील पीक. १६ व्या शतकात पोर्तुगीज लोकांनी भारताच्या पश्चिम किना-यावरील प्रदेशात मुख्यत्वे जमिनीची धूप थांबविण्यासाठी तिथे लावले. साहजिकच एक महत्त्वाचे फळपीक म्हणून या पिकाकडे पाहिले जात नव्हते आणि २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत यामध्ये फारसा बदल झाला नव्हता.

सन १९५२ ते ५५ च्या सुमारास भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने त्यावेळेच्या मुंबई, मद्रास आणि त्रावणकोर राज्यामध्ये काजू पिकावर संशोधन करण्यासाठी तीन संशोधन केंद्रांची स्थापना केली. या केंद्रामार्फत त्यावेळी फक्त त्या त्या भागातील काजूचे वाण गोळा करणे व त्यांचा अभ्यास करणे ही कामे केली जात होती. सन १९५७ मध्ये वेंगुर्ले येथे प्रादेशिक फळ संशोधन केंद्राची स्थापना केली. या केंद्राने सुरुवातीच्या काळामध्ये कोकण विभागात आढळणारे काजूचे निरनिराळे वाण गोळा करून त्यांचा अभ्यास करणे आणि त्यातून चांगल्या वाणची जात म्हणून निवड करणे. काजू झाडाची खताची गरज ठरविणे इत्यादी कामे हाती घेतली.

सन १९८० पूर्वीची काजू लागवड व प्रामुख्याने रोपे लावूनच झालेली असल्याने काजूचे उत्पादन फारच कमी आहे. तसेच रोपापासून लावलेले प्रत्येक झाड हे गुणधर्माने भिन्न असते. त्यामुळे बीचा आकार, बोंडुचा रंग व झाडांचा विस्तार इत्यादी देखील भिन्न असतात.

काजूचे उत्पादन वाढविण्यासाठी कलमे करणे गरजेचे होते म्हणून काजुची शाखीय पद्धतीने अभिवृद्धी करण्यासाठी सोपी, सुलभ आणि कमी खर्चाची पद्धत प्रमाणित करण्याचे काम प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे हाती घेण्यात आली. त्यावेळी काजूची गुटी कलम, भेट कलम, व्हिनिअर कलम पद्धतीने अभिवृद्धी करण्याचे प्रयोग हाती घेतले. तथापि या पद्धती खर्चीक तर होत्याच परंतु या पद्धतीने निर्माण केलेली कलमे शेतावर लावल्यानंतर त्यांचे जगण्याचे प्रमाणही कमी होते.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात काजू तसेच मसाला पीक आणि नारळ, सुपारी इत्यादी फळपिकाचे महत्त्व वाढू लागल्याने भारत सरकारच्या कृषी खात्याने केरळ राज्यातील कासारगोड येथे केंद्रीय रोपण पीक संशोधन संस्था स्थापन केली आणि त्यानंतर काजू पिकाच्या संशोधनास गती आली.

काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पीक आहे. तसेच कोकणातील शेतक-यांचे ते महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाचे महत्त्व ओळखून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे या पिकावर सखोल संशोधन केले आहे. पीक लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि अधिक उत्पादन देणा-या विविध जातींचा विकास करुन प्रसारण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात कलमांची निर्मिती तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. त्यामुळे कलमे मोठय़ा प्रमाणात पुरवठा करणे शक्य झाले.

जोडीला महाराष्ट्र राज्याची शेतक-यांसाठी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली. त्यामुळे सर्वाचा परीणाम म्हणजेच महाराष्ट्रात व विशेषत: कोकणात सध्या झालेली मोठय़ा प्रमाणातील फळबाग लागवड होय. काजू लागवडीस अनुकूल हवामान व जमीन तसेच काजू बियांना बाजारात रास्त भाव मिळत असल्याने तळागाळातील कोकणातील शेतक-यांचे काजू लागवडीकडे विशेष लक्ष आकर्षित झाले. सन १९९० पर्यंत महाराष्ट्रात फक्त २२ हजार हेक्टर क्षेत्रावर काजू लागवड होती. त्यापैकी बहुतांशी लागवड रोपांपासून केली आहे.

परंतु सन २०१४ पर्यंत या पिकाखाली १ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्र व्यापले असून त्यापासून २.२५ लाख मे. टन एवढे उत्पादन मिळत आहे आणि महत्त्वाचे म्हणजे यातील बरेचसे क्षेत्र सुधारीत अधिक उत्पादन देणा-या वेंगुर्ला १, ४, ६, ७ व ८ या काजू जातीच्या लागवडीखाली आहे. कोकणासारख्या काजू पिकवणा-या पारंपरिक भागात अजुनही ३ लाख हेक्टर लागवडीलायक पडीक क्षेत्र आहे. त्यामुळे काजू लागवडीस भविष्यात भरपूर वाव आहे. अशा डोंगर उताराच्या क्षेत्रावर भरघोस उत्पन्न देणा-या व निर्यातक्षम गुणधर्म असणा-या वेंगुर्ला ४, वेंगुर्ला ६, वेंगुर्ला ७, वेंगुर्ला ८ आणि वेंगुर्ला ९ या कलमांची लागवड केल्यास एकूण उत्पादन वाढण्यास निश्चित मदत होईल. त्याचप्रमाणे परदेशातून होणारी काजू बीची आयात थांबून काजू प्रक्रिया करणा-या कारखान्यांची वर्षभर असणारी मागणी पूर्ण करता येईल.

देशात आजमितीस या पिकाखाली १०.२७ लाख हे. क्षेत्र असून त्यापासून ७.४५ लाख मे.टन उत्पादन मिळते. काजू लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता यामध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. काजुच्या प्रति हेक्टर उत्पादकतेमध्ये वाढ करण्यास भरपूर वाव असून त्याकरिता काजू लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. काजू लागवडीचे नवे तंत्र आत्मसात करताना खालील महत्त्वांच्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक ठरेल.

१. लागवडीसाठी जमिनीची निवड व हवामान :

या पिकाची लागवड प्रामुख्याने देशात उष्ण कटिबंधीय किनारपट्टीच्या भागात केली जाते. या पिकाला समुद्रकाठीची जांभ्या दगडापासून तयार झालेली उत्तम निच-याची जमीन मानवते. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीतील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे भागात काजूची वाढ चांगली होऊन उत्पन्नही चांगले मिळते. कोकणात लागवड डोंगर उतारावर किफायतशीर होते. या पिकाला आम्लधर्मीय जमीन मानवते.

काजू पिकाला उष्ण व दमट हवामान फारच अनुकूल आहे. थंड हवामान व धुके पडणा-या भागात हे पीक चांगले येत नाही. समुद्रसपाटीपासून ते ७०० मीटर उंचीचे प्रदेशात आणि कमीत कमी ४०० मिमी आणि जास्तीत जास्त ४००० मिमी पाऊस पडणा-या भागात हे पीक उत्तम प्रकारे येते. काजूच्या वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी स्वच्छ, भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. सावलीमध्ये काजूचे झाड चांगले वाढत नाही.
हवामान घटकांचा काजूच्या उत्पादनावर खालीलप्रमाणे परिणाम होतो :

१. काजू मोहरणे व फळ धरण्याच्या कालावधीत हवामान उष्ण व कोरडे असणे जरुरीचे आहे.

२. मोहोर येण्याच्या कालावधीत ढगाळ हवामान असल्यास काजुवरील ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव वाढून मोहोर जळतो.

३. झाडे मोहोरावर असताना पाऊस पडल्यास पिकांवर अनिष्ट परिणाम होतो.

४. फळाची वाढ होत असताना अचानक जास्त पाऊस वाढला (४०-४३ अंश से.ग्रे.) तर फळाची गळ मोठय़ा प्रमाणात होते.

अलिकडील आठ-दहा वर्षाच्या कालावधीत विशेष करुन पश्चिम किनारपट्टीतील हवामानात बदल घडून त्याचा परिणाम काजुच्या पिकावर होऊ लागला आहे. त्यामुळे या बदलत्या हवामानात चांगल्याप्रकारे वाढणा-या व किडी रोगांना कमी बळी पडणा-या काजू जाती विकसित करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. आणि त्यामध्ये त्यांना यशही मिळाले असून आज निरनिराळ्या भागासाठी ४० हून अधिक जाती विकसित केल्या आहेत.

२. अधिक उत्पादन देणा-या सुधारीत जातीची निवड :

काजू पिकाची लागवड रोपांनी न करता सुधारीत जातीच्या कलमांची करणे फायदेशीर ठरते. काजू पिकामध्ये परपरागीकरणाने बी तयार होत असल्याने जरी सुधारीत जातीच्या बिया लावून लागवड केली तरी मातृवृक्षाप्रमाणे हमखास उत्पन्न मिळेलच याची खात्री देता येत नाही. मातृवृक्षाप्रमाणे गुणधर्म येण्याकरिता टपोरे बी असलेल्या व भरघोस उत्पादन देणा-या काजू जातीची कलमे करुन लागवड करणे फायदेशीर ठरते.

आंतरराष्ट्रीय बाजरपेठेमध्ये मोठय़ा गराला असलेली मागणी तसेच देशांतर्गत सुद्धा काजूगराला वाढती मागणी पाहता प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथून विकसित झालेल्या भरघोस उत्पादन व निर्यातक्षम गुणधर्म असलेल्या वेंगुर्ला ४, वेंगुर्ला ६, वेंगुर्ला ७, वेंगुर्ला ८ आणि वेंगुर्ला ९ या जातीची कलमे लावून लागवड करावी.

कोकणासारख्या काजू पिकविणा-या पारंपरिक भागात अजूनही काजू लागवडीस भरपूर वाव आहे. या लागवडीलायक डोंगर उताराच्या पडीक क्षेत्रावर तसेच जुने रोप लावून लागवड केल्यास क्षेत्रावर भरघोस उत्पन्न देणा-या वेंगुर्ला ४, ६, ७, ८ व ९ या जातींची कलमे लावून लागवड केल्यास एकूण उत्पादन वाढण्यास निश्चित मदत होईल. शिवाय परदेशातून होणारी काजू बीची आयात थांबवून काजू बी वर प्रक्रिया करणा-या कारखान्यांची वर्षभर असलेली बीची गरज भागविता येईल.

३. काजू पिकांचे पोषण

काजू हे पिक पोषण द्रव्यांना चांगला प्रतिसाद देते. परंतु सध्या या पिकास योग्य प्रमाणात प्रमुख व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जात नाही. याकरिता सेंद्रीय तसेच रासायनिक खतांचा वाजवी वापर उत्पादन वाढविण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कलमांची लागवड करताना झाडाच्या जोमदार वाढीसाठी प्रत्येक खड्डय़ात १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व दोन ते तीन घमेली शेणखत घालावे. लागवडीनंतर एक वर्षाने झाडांना ऑगस्ट महिन्यात खालीलप्रमाणे खतांची मात्रा द्यावी.

खते एकेरी खताद्वारे दिली तर फायदेशीर ठरतात. चांगले कुजलेले शेणखत उपलब्ध नसल्यास सेंद्रीय पदार्थाचा पुरवठा करण्यासाठी गिरीपुष्पाचा हिरवा पाला पूर्णवाढ झालेल्या झाडास प्रतिवर्षी २० किलो देणे आवश्यक ठरेल.

खते झाडाच्या विस्ताराप्रमाणे झाडापासून १.५ ते २.० मीटर अंतरावर ३० सें.मी. रुंद आणि १५ सें.मी. खोल गोलाकार बांगडीपद्धतीने चर खोदून कमी पावसाच्या कालावधीत द्यावीत.

४. आंतर मशागत व निगराणी

नवीन लागवड केलेल्या कलमांचे बुंध्याशेजारील जमीन तणविरहीत ठेवावी. पावसाळा संपल्यानंतर कलमांचे बुंध्याजवळील माती हलवून मोकळी करावी. कलमांभोवती पालापाचोळा गवताचे आच्छादन किंवा प्लास्टिक कागदाचे आच्छादन करावे. लागवड केलेल्या क्षेत्रातील जंगली झाडांचे झुडुपांचे राहिलेल्या बुंध्यांपासून येणारी फूट व बुंधे मुळासकट काढून टाकावेत. कारण अशी झुडपे अन्नद्रव्ये व पाण्यासाठी काजू कलमांशी स्पर्धा करतात व पर्यायाने काजू कलमांच्या वाढीवर व उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.

काजू कलमांचे जोडाखाली येणारे फुटवे वेळोवेळी काढून टाकावेत म्हणजे कलमांची वाढ जोमाने होते. हे फुटवे न काढल्यास कलमांच्या फांदीची वाढ खुंटते आणि कालांतराने कलम फांदी मारून जाऊन फक्त खुंटाची वाढ होते. आणि पुढे गावठी वाण/जातीचे झाड होते. त्यामुळे उत्पादन कमी मिळते. सुरुवातीला दोन वर्षात कलमांना योग्य वळण देण्यासाठी तसेच पुढे आंतर मशागतीचे कामे सोईस्कर होण्याकरिता छाटणी करणे आवश्यक आहे.

जमिनीपासून सुमारे १ मीटर उंचीपर्यंत कलमांच्या फांद्या येऊ देऊ नयेत. एक मीटर उंचीचे वर कलमांना चारही बाजूने फांदीची वाढ होऊन झाडांचा आकार घुमटाकार होईल त्याकडे लक्ष द्यावे. दोन ते तीन वर्षातून एक वेळ मोठय़ा झाडावरील सुकलेल्या तसेच वेडय़ावाकडय़ा वाढलेल्या फांद्या छाटून टाकाव्यात व कापलेल्या फांद्यावर बोडरेपेस्ट लावावी.

५. काजू बागेला पाणी

काजू हे कोरडवाहू पीक असले तरी पाण्याला चांगले प्रतिसाद देते. लागवडीनंतर पहिल्या तीन वर्षात पावसाळ्यानंतर पाणी दिल्यास कलमांची वाढ चांगली होते. उपलब्धतेनुसार कलमांना पहिल्या वर्षी १५ दिवसाच्या अंतराने ३० लीटर पाणी दिल्यास कलमांची वाढ चांगली होते. निरनिराळ्या ठिकाणी झालेल्या प्रयोगानुसार असे दिसून आले आहे की, मोठय़ा कलमांना १५ दिवसांच्या अंतराने २०० लीटर पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते.

६. अधिक उत्पादनासाठी काजूची डोंगर उतारावर लागवड

पश्चिम किनारपट्टीतील डोंगर उतारावर साधारण प्रतिच्या पश्चिम उतरणीच्या सुपीक जमिनीत काजू लागवड उपयुक्त ठरल्या आहेत. कोकणात या पिकाची लागवड डोंगर उतारावर किफायतशीर ठरली आहे. सपाटीच्या जमिनीपेक्षा उतारावरील जमिनीत या पिकाखाली निवड केल्याने काजूच्या लागवडीसाठी आवश्यक असलेल्या भरपूर सूर्यप्रकाशाची गरज पूर्ण होते, हवा खेळती मिळते तसेच किडी व रोगांच्या प्रादुर्भाव कमी होऊन उत्पादनात अधिक भर पडते.

फुलो-याच्यावेळी वारंवार धुके पडणा-या द-याखो-यामध्ये उत्पादकतेवर परिणाम होतो. परंतु डोंगर उतारावर जमिनीवर समुद्रापासूह्या ते साद्रीच्या पायथ्यापर्यंतच्या भागात या पिकाचे उत्पादन चांगले घेता येते. पावसाळ्यानंतर धुके पडणा-या भागात उशिरा फुलो-यावर येणा-या जातीची लागवड योग्य ठरते.

७. स्थानिक कमी उत्पादन देणा-या झाडाचे पुनर्जीवन :

प्रचलित काजू बागेतील कमी उत्पन्न देणा-या बारीक बिया असलेल्या तीन ते पंधरा वर्षे वयाच्या काजू झाडाचे रुपांतर सुधारीत जातीमध्ये करण्याचे तंत्र डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत विकसित करण्यात आले आहे. अशा प्रकारची जुनी झाडे जानेवारी ते मे किंवा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जमिनीपासून १ मीटर उंचीवर करवतीने कापावीत किंवा कु-हाडीने तोडावीत. असे करत असताना खोडाच्या सालीला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. झाड तोडल्यानंतर १५ ते २० दिवसांनी झाडाच्या खोडावर फुटवे येण्यास सुरुवात होते. खोडाच्या अगदी वरच्या भागावर येणारे ३-४ फुटवे १० ते १५ सें.मी. लांबीचे झाल्यावर त्यावर मृदकाष्ठ कलम पद्धतीने कलमे बांधावीत. कलम केलेल्या काडय़ातून १५ ते २० दिवसात नवीन फूट येऊ लागते व ती जोमाने वाढू लागते. रुपांतरीत झाडाची जोपासना :

१. कलमे बांधल्यानंतर कलमांच्या जोडाखाली येणारी फूट वेळोवेळी काढावीत.
२. कलमे १ ते १.५ महिन्याची झाल्यावर जोडावरील पट्टी सोडावी.
३. कलमे वा-याने मोडू नये म्हणून झाडाला आधार द्यावा व खुंटावर प्लॅस्टिक पिशवी बांधावी.
४. तोडलेल्या झाडाच्या खुंटावर रोठा लागू नये म्हणून क्लोरोपायरीफॉस १० मिली/लीटर या किटकनाशकाच्या द्रावणाने भिजवावा.

८. काजूची घन लागवड

काजूची लागवड सामान्यत: ७ बाय ७ मीटर किंवा ८ बाय ८ मीटर अंतरावर करतात. याप्रमाणे प्रति हेक्टरी २०० ते १५५ अनुक्रमे झाडे बसतात. काजू झाडाची पूर्णवाढ होऊन वरीलप्रमाणे असलेले लागवडीचे अंतर व्यापण्याकरिता १० वर्षाचा कालावधी लागतो. जर काजूची घन लागवड ४ बाय ४ किंवा ५ बाय ५ मीटर अंतरावर केल्यास हेक्टरी प्रचलित ७ बाय ७ मीटर किंवा ८ बाय ८ मीटर अंतरावरील लागवडीपेक्षा सुमारे दुप्पट झाडे बसतात. शिवाय सदर घन लागवडीपासून दुप्पट उत्पन्नसुद्धा मिळते.

परंतु लागवडीनंतर १० वर्षानंतर मधली एक ओळ काढून टाकणे हे पुढील उत्पादन देण्यासाठी आवश्यक ठरते आणि सदर दोन रांगेमधील एक ओळ न काढल्यास अपु-या सुर्यप्रकाशामुळे तसेच अन्नद्रव्याच्या स्पर्धेमुळे उत्पन्न कमी मिळते. त्याकरिता लागवडीनंतर १० वर्षाने एक ओळ सोडून दुसरी ओळ मुळासह काढून टाकल्यास ८ बाय ८ किंवा १० बाय १० मीटर अंतरावर पुढे उत्पन्न घेता येते. तसेच शिल्लक राहिलेल्या झाडांच्या उंच वाढलेल्या फांद्यांची छाटणी केल्यास अधिक उत्पन्न मिळू शकते.

९. काजू पिकाची छाटणी

हंगाम संपल्यानंतर मे महिन्यात काजू झाडांची छाटणी करणे फायदेशीर ठरते. काजू झाडावरील सुकलेल्या त्याचप्रमाणे वेडय़ावाकडय़ा वाढलेल्या फांद्या छाटून टाकाव्यात व कापलेल्या फांदीच्या टोकावर बोडरेपेस्ट लावावी. काजू पिकामध्ये नवीन पालवीवर मोहर येत असल्याने काजू झाडाची छाटणी केल्यास अधिक फांद्या व पालवी येऊन उत्पन्नात भर पडते.

१०. आंतरपिके :

काजू लागवडीमध्ये सुरुवातीच्या ७-८ वर्षात आंतरपिके घेतल्यास आर्थिक फायदा होतो. तसेच लागवडीवरील खर्च कमी होण्यास मदत होते. आंतरपिके म्हणून वेलवर्गीय भाजीपाला उदा. काकडी, दोडकी, कारली तसेच भोपळा या पिकांची लागवड आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर आढळून आली आहे. त्याचप्रमाणे अननसांची लागवडदेखील सुरुवातीच्या कालावधीत फायदेशीर आहे. नंतरच्या कालावधीत अननस लागवडीमुळे काजू बी गोळा करण्यास त्रास होतो, असे आढळून आले आहे. काजू लागवडीमध्ये कंदपिकांची आंतरपीक म्हणून लागवड करण्याबाबत संशोधन सुरू आहे.

११. मृदू व जलसंधारणचर

अति पाऊस पडणा-या तसेच डोंगर उतारावरील भागात जमिनीची धूप होऊ नये म्हणून ४.५० मी. लांब वरच्या बाजूस ०.६० मी. रुंद व खालच्या बाजूस ०.३० मी. रुंद तर ०.३० मी. खोलीचे चर खोदण्याची शिफारस करण्यात आली आहे.

१२. परागीकरण आणि फलधारणा वाढविण्यासाठी उपाय :

काजूमध्ये अधिक उत्पादनासाठी स्वस्त अशा सुकलेल्या माशांचा अर्क ५०० ग्रॅम १० लीटर पाण्यातून पहिली फवारणी फुलो-यावेळी तर दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी अशी दोनदा करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काजुचे उत्पादन वाढविण्यासाठी १० पी.पी.एम. इथेल या संजिवकाची पहिली फवारणी पालवी आल्यावर व दुसरी फवारणी मोहोर आल्यावर करावी. तसेच काजू मोहर संरक्षणासाठी वापरण्यात येणा-या प्रत्येक किटकनाशकाचे फवारणीसोबत २ टक्के युरिया खत मिसळून फवारले असता काजूच्या उत्पादनात वाढ होते, असे दिसून आले आहे. युरिया खतामुळे पाने करपू नयेत म्हणून द्रावण सतत ढवळावे.

१३. योग्य प्रकारे काढणी व साठवण :

मोहोर आल्यानंतर काजू बिया पक्व होण्यास सुमारे ६० दिवसांचा कालावधी लागतो. काही शेतकरी काजू बी ३० ते ३५ दिवसाचे साधारण राखाडी रंगाचे, बोंडू हिरवा असताना झाडावरून तोडून काढतात. ही पद्धत फारच चुकीची आहे. अशा वेळी बी पूर्ण पक्व झालेली नसल्यामुळे काजुगराची प्रत खालावते, बी सुरकुतली जाते.

बीचे वजन कमी भरते व बोंडुचे नुकसान होते. अशा पद्धतीने अपक्व काजूची तोडणी केल्यास सुमारे ५० टक्के नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून काजू बोंडू पूर्ण पक्व झाल्यावर ते काढून घ्यावे किंवा झाडाखाली पडलेले बोंडू उचलून घेऊन त्यांच्या बिया काढून घेणे योग्य ठरते. काजू बी ताजी असताना त्यात सुमारे २० ते २५ टक्के पाण्याचे प्रमाण असते. ते १२ ते १३ टक्के करण्यासाठी काजू बी ३ ते ४ दिवस प्रखर उन्हात वाळत घालावेत.

चांगले वाळलेले काजू बी पावसाळ्यात साठवून ठेवायचे असल्यास २०० गेज जाडीच्या प्लास्टिक पिशव्यात बंद करून गोणीमध्ये भरून कोरडय़ा जागी साठवून ठेवावेत. वरील प्रमाणे काजू बी साठविल्यास ते ८ ते १० महिने चांगल्या स्थितीत राहू शकते. अशा प्रकारे काजू लागवड करून पिकाची निगराणी घेतल्यास तिस-या वर्षी उत्पादन मिळण्यास सुरुवात होते व प्रत्येक कलमास एक ते दीड किलो बियांचे उत्पन्न मिळते. ९ ते १० वर्षाची बाग झाल्यावर हेक्टरी सरासरी दोन ते अडीच टन उत्पन्न मिळू शकते.

विद्यापीठाने काजू बोंडूपासून विविध टिकाऊ पदार्थ तयार करण्याच्या पद्धती विकसित केल्या आहेत. काजू बियांच्या उत्पन्ना बरोबरच काजू बोंडाचे ५ ते ६ पट अधिक उत्पन्न मिळते. शेतक-यांनी काजू बोंडूचा उपयोग प्रक्रियेकरिता केल्यास उत्पादनात भर पडू शकते.

१४. पीक संरक्षण :

काजू पिकामध्ये संरक्षण काजूचे उत्पादन वाढविण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. काजू पिकावर एकूण ६० प्रकारच्या विविध किडी आढळून आल्या आहेत. परंतु काजुवरील ढेकण्या रोठा व फुलकिडी या प्रमुख असून त्याचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे. काजुवरील ढेकण्या ही कीड पालवी, मोहोर, बोंडू व बी या पिकाच्या सर्व अपस्थांमध्ये उपद्रव करते. त्यामुळे त्यावर योग्य वेळी विद्यापीठाने (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ) शिफारस केलेली फवारणी आवश्यकतेनुसार करावी.

काजू खोड व मूळ पोखरणारी अळी (रोठा) नियंत्रणासाठी प्रादुर्भाव प्राथमिक अवस्थेत असतानाच उपाययोजना केली पाहिजे. या किडीचा प्रादुर्भाव जेवढय़ा लवकर लक्षात येईल तेवढे ते झाड वाचण्याची शक्यता जास्त असते. वेळीच जर योग्य उपाययोजना केली तर कीडग्रस्त झाड नक्कीच जगवता येते.

या किडीच्या प्रादुर्भावामुळे मेलेली झाडे किंवा संपूर्ण पिवळी पडलेली झाडे मुळासकट खणून काढावीत आणि त्यातील अळ्यांचा आणि कोषांचा नायनाट करावा. म्हणजे या किडीच्या प्रसाराला आळा बसतो. बागेतील झाडांच्या खोडालगतचा भाग स्वच्छ ठेवावा व कमीत कमी महिन्याच्या अंतराने बागेची, झाडांची व्यवस्थित पाहणी करावी. झाडाला कीड लागलेली आढळून आल्यास पटाशीच्या सहाय्याने साल काढून शक्य तेवढय़ा अळ्या काढून नष्ट कराव्यात.

तसेच बुंध्यालगतचा संपूर्ण भाग क्लोरोफायरीफॉस २० टक्के प्रवाही (०.२ टक्के – १० मिली/लीटर पाण्यातून) या किटकनाशकाच्या द्रावणाने भिजवावा. तसेच या किडीच्या नियंत्रणासाठी डि.डि.व्ही.पी. ७६ टक्के प्रवाही व रॉकेल (१० मिली + ५० मिली) हे मिश्रण अळीने केलेल्या छिद्रात ओतून हे छिद्र चिखलाने बंद करावे आणि क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही व रॉकेल (१० मिली + ५० मिली) हे मिश्रण अळीने केलेल्या छिद्रातून ओतून हे छिद्र चिखलाने बंद करावे. अशाप्रकारे काळजी घेतल्यास खोडकिडा किंवा रोठा या किडीचे नियंत्रण करता येते. फुलकिडीच्या नियंत्रणासाठी फोझॅलॉन (०.०५ टक्के) किंवा डायमोथोएट (०.०३ टक्के) या किटकनाशकांची फवारणी करावी.

भविष्यातील वाटचाल :

कोकणात काजू लागवडीस भविष्यात भरपूर वाव असून आजमितीस या पिकाखाली २.८४ लाख हेक्टर क्षेत्र असून अजुनही ३ लाख हेक्टर क्षेत्र काजू लागवडीस उपयुक्त आहे. कोकणात आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, केळी, मसाला पिके इत्यादी महत्त्वाच्या पिकासाठी भविष्यात लागवडीयोग्य सदरचे ३ लाख हेक्टर क्षेत्र लागणार असल्याने यापैकी ५० टक्के म्हणजेच १.५० लाख हेक्टर क्षेत्र काजू लागवडीखाली आल्यास वर्षभर लागणारी काजू कारखान्याला लागणारी मागणी पूर्ण करता येईल तसेच परदेशातून होणारी काजू बीची आयात थांबवून काजू उत्पादनात महाराष्ट्र स्वयंपूर्ण होईल.

त्याचप्रमाणे विद्यापीठाने विकसित केलेले नवीन काजू लागवड तंत्रज्ञान काजू बागायतदारांनी आत्मसात केल्यास सध्या मिळणा-या सरासरी १३०० किलो ग्रॅम प्रति हेक्टर उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होऊन काजूचे सरासरी उत्पादन २ टन प्रति हेक्टर यापेक्षा जास्त मिळू शकेल. काजू पिकावरील शेतक-यांना विविध शिफारशी देण्यात आल्या. त्यामुळे एकत्रितरित्या काजू लागवडीखाली क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे उत्पादन व उत्पादकता वाढून रोजगार निर्मिती होऊन शहराकडे जाणारा तरूण वर्ग ग्रामीण भागात स्थिरावेल.

20/01/2019

कोकणचे नशिब फळफळले...ऊसाला पण मागे टाकत..बांबुशेतीने मिळवले अव्वल स्थान..फक्त व्यावसायीक जाती निवडा..एकरी २.५ ते ३.० लाख रुपये कमवा दरवर्षी ५ वर्षापासुन ३० वर्षे सलग ते पण रानात लागवड करुन

व्यावसायीक जाती... बांबूसा आणि डेंड्रोकॅलॅमस या २ जाती प्रमुख असून, यातही यांच्या २ उपजाती आहेत म्हणजे एकुण ४,, महाराष्ट्रात मानवेल, कटांग-काटस, कोंड्या मेस, पिवळा बांबू, चिवळी या प्रजाती आहेत; तर कळक,मेज, चिवा, चिवारी, हुडा बांबू, मोठा बांबू, पिवळा बांबू असे लांबी व गोलाई यांवरून बांबूचे प्रकार पडलेले आहेत. पुर्वी बांबुच्या कांड्या प्रमाणे किंमत ठरत होती आता वजना प्रमाणे २५०० रुपये प्रतीटन आहे वरिल दोन्ही जातीची मिश्र वनशेती एकरी १०० ते १५० टन उत्पादन देते..चीन आणि एशियाच्या इतर भागात वाढणारी ‘मोसो’ (Moso) ही बांबूची जात, त्यापासून अन्य उत्पादने घेण्यासाठी सर्वात योग्य आहे असे मानले जाते. ‘मोसो’ जातीचे बांबू, ७५ फूट उंचीपर्यंत वाढू शकतात. चीनमधील बांबूची शेते यामुळेच एखाद्या जंगलासारखी दिसतात.जगात सर्वात जास्त बांबु चिन मध्दे होतो तर त्याच्या खालोखाल भारतात पण चिनच्या १/८ भाग...भारताच्या बांबु उत्पादन हे भारताला लागणार्य़ा बांबुच्या निम्मे आहे म्हणुन चिन मधुन आयात केले जातात..

वनस्पतीशास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे बांबू हे एक प्रकारचे गवतच आहे. इ.स २०१८ च्या प्रारंभी बांबू हा वृक्ष नाही असे धोरण भारतीय वन कायदा १९२७ च्या कलम २ नुसार सरकारने जाहीर केले.यामुळे बांबुवरची वनविभागाची ्मक्तेदारी संपली आणि वाहतुकीच्या दरम्यान चेकपोष्ट वरची चिरीमीरी पण बंद झाली..बांबु पासुन इथोनेल निर्मितीला केन्द्र सरकारने प्रोसाहन दिले आहे तसेच एकरी २५०००/- रूपये अनुदान देऊ केले आहे..

जमिनीत लावलेल्या कंदापासून बांबूची वाढ होते. [१]बांबूच्या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पिकाला पाणी आणि खते अतिशय कमी प्रमाणात लागतात. तसेच या पिकाची रोगप्रतिबंधक शक्ती जास्त असल्याने पिकासाठी कीटकनाशकांचा वापरसुद्धा कमी होतो.फ्लोअरिंगचे साधारण ५ टक्क्यांपर्यंतचे घाउक मार्केट आता बांबू फ्लोअरिंगने काबीज केले आहे.
बांबूचे फ्लोअरिंग...बांबू एखाद्या नळीसारखा असल्याने त्याच्या लाकडासारख्या चिरून फ़ळ्या करता येत नाहीत. त्यामुळे थोडी निराळी पद्धत अवलंबावी लागते. बांबूच्या पातळ व अरूंद पट्ट्या कापण्यात येतात. या दोन्ही बाजूंनी रंधून सपाट व गुळगुळीत बनवतात. अशा पट्ट्या कुकरमधे शिजवून त्यांच्यातील, कृमी-कीटकांना प्रिय असलेला, स्टार्च काढून टाकला जातो व नंतर त्या भट्ट्यांमध्ये वाळविल्या जातात. वाळविलेल्या पट्ट्याना सरस लावून त्यांचे गठ्ठे केले जातात. हे गठ्ठे प्रचंड दाब व उष्णता यांच्याखाली ठेवण्यात येतात. वाळलेल्या गठ्ठ्यांना रंधून त्यांचे फळ्या किंवा प्लाय-बोर्डचे तक्ते या स्वरूपातले व्यापारी उत्पादन तयार होते. या शिवाय बांबूचे अतिशय छोटे तुकडे सरसामधे भिजवून याच पद्धतीने त्यांच्या विटा किंवा तक्तेही बनवले जातात. या सर्व उत्पादनांना नैसर्गिक रंगही ठेवता येतो किंवा रंग वापरून आपणास पाहिजे ती रंगछटा उत्पादित करता येते.

बांबूचा धागा काढून त्यापासून विणलेल्या कापडाचे बनवलेले शर्ट, मोजे, टॉवेल आणि इतकेच काय डायपरसुद्धा मिळतात. सायकलींच्या फ्रेम्स, स्केटिंग करण्याच्या फळ्या किंवा लॅपटॉप संगणकांचे बाह्य कवच ह्या गोष्टी सुद्धा बांबूंपासून बनवल्या जातात बांबू किती जुना आहे यावर त्याचा कठीणपणा अवलंबून असतो. तज्‍ज्ञांच्या मते ५ ते ६ वर्ष जुने बांबूचे पीक पुरेसे कठीण असते. असा बांबू वापरून व योग्य उत्पादन प्रक्रिया केलेले बांबूचे फ्लोअरिंग हे लाकडापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी दर्जाचे नाही..

कोकणात बांबू लागवड फायद्याची
सह्याद्री पर्वतात बांबूच्या विविध जाती आढळतात. शिवकाळापासून कोकण प्रांतात बांबू उत्पादन घेतले जात आहे. त्या वेळी सैनिक शस्त्र म्हणून भाल्याचा वापर करत. या भाल्यांना लागणारा दांडा हा बांबूचा असे. मोठय़ा प्रमाणावर दांडे उपलब्ध व्हावेत, म्हणून स्वत: शिवाजी महाराजांनीच बांबू लागवडीला प्रोत्साहन दिल्याचे दाखले इतिहासात आढळतात. कोकणात सापडणारा मानगा हा बांबू उंचीने मोठा असतो. अत्यंत मजबूत म्हणून त्याकडे पाहिले जाते. काही वेळा ३० फुटांपर्यंत मानगा वाढतो. घराचे छप्पर, मोठय़ा समारंभाचा मंडप उभारण्यासाठी याचा वापर करतात. हिरवट, तपकिरी कलरच्या या बांबूला आज कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यासाठी मोठी मागणी आहे.कोकणात डोंगरउतारावर होणारा बांबू हा कोणतीही मेहनत न करता नैसर्गिकरीत्या वाढतो. मात्र अजूनही बाजारपेठेतील बांबूच्या किमतीबाबत शेतकरी अनभिज्ञ आहे. रोजगाराच्या दृष्टिकोनातून कोणीही बांबूकडे पाहत नाही. यामुळे हंगामात शेतक-यांकडून अत्यंत अल्प दराने बांबू खरेदी करून दलाल तो चढय़ा भवाने विकतात.

अभिवृद्धी
व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या कळक, मानवेल, माणगा व मेस या प्रजाती राज्यात आहेत. यापैकी कळक व मानवेल संपूर्ण महाराष्ट्रात तर माणगा व मेस कोकणात मोठ्या प्रमाणात आढळतात. अभिवृद्धी बीज, कंद तसेच कांडी (शाकीय) पद्धतीने करता येते. कळक व माणवेलचे बियाणे अलीकडच्या काळात दरवर्षी मुबलक प्रमाणात मिळते. तसेच त्याची रुजण्याची क्षमताही चांगली असते. बीजधारणा केलेली बेटे आढळ्यास फेब्रुवारी ते जून दरम्यान बेटाभोवती पडलेले पक्व बी गोळा करावे. साठवणीसाठी बियांमधील ओलावा ८ ते १० टक्के असावा. या बिया वर्षभर वापरू शकतो. गादी वाफा, कुंडी किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत बिया पेरून रोपे तयार करता येतात. गादीवाफ्यात पाणी आणि खतपुरवठा योग्य होत असल्याने गादीवाफ्यात बांबूच्या बियाणे पेरणी करणे योग्य असते. माती, वाळू आणि कंपोस्ट यांचे सम प्रमाणातील मिश्रण करून तयार केलेल्या वाफ्यामध्ये बिया पेराव्यात. बिया पाण्यात भिजत ठेवल्याने त्यांची उगवण क्षमता वाढते. म्हणून बांबूच्या बिया २४ तास थंड पाण्यात ठेवाव्यात, त्यानंतर बियांची पेरणी करावी. बिया पेरताना ओळीत पेराव्यात. वाफ्यात पसरवू नयेत. बी पेरल्यानंतर मातीच्या मिश्रणाचा एक थर द्यावा.

गटलागवडीला प्रोत्साहन; बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान महाराष्ट्र कंपनीची स्थापना

राज्यात संघटित बांबू बाजाराला चालना देण्यासाठी बांबूचा वापर करून पथदर्शी गावाची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी राज्य शासन आणि टाटा ट्रस्टच्या भागीदारीतून ‘बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान महाराष्ट्र’ ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीद्वारे घरबांधणीत बांबूचा वापर करून पथदर्शी गावाची निर्मिती करणे, बांबू अगरबत्ती प्रकल्प उभारणे, बांबू गटलागवडीला प्रोत्साहन देणे, बांबू ज्ञान व माहिती केंद्र सुरू करून पेसा गावात बांबूचे मूल्यवर्धन व उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
या प्रतिष्ठानमुळे बांबूचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या व राज्यातील निम्मे जंगल असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्हय़ातील आणि कोकण्तील बांबू उद्योगाला सुगीचे दिवस येणार आहेत. पहिल्या तीन वर्षांत कंपनीकडून राज्यात पाच केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सुमारे १० ते १६ गावांचा एक संक्षिप्त आराखडा तयार केला जाणार आहे. कंपनीच्या स्थापनेसाठी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात २० कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे, तर टाटा ट्रस्ट पाच कोटी रुपये देणार आहे.

चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र
चंद्रपूर-मूल मार्गावरील चिचपल्ली येथे बांबू संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या संशोधन केंद्राच्या इमारतीची निर्मिती ही बांबूपासून केली जात आहे.

20/01/2019

कोकणात बिनधास्त करा फळबागा...ते पण वनशेती म्हणुन रानात..
या फळबागे पासुन माकडांना लांब कसे ठेवायचे त्याचे हे १५ उपाय..

खर तर मी वनशेती म्हणुन कोकणातील फळबागांचे माणसांन पासुन कसे रक्षण करता येईल या बाबत पोष्ट बनवायला घेतली होती..त्याप्रमाणे एक स्वगत पण टाकले..पण कोकणातील लोकाना माकडांचेच अधिक भय वाटते ..मला तर माकडांन पेक्षा माणसांचे भय वाटते..चोरी..भाऊबंदकी..तंटा-बखेडा..खुन्नस यातुन फळबागेच माकडांन हुन जास्त नुकसान होऊ शकते.. माकड फक्त फळांचे नुकसान करतात पण माणस संपुर्ण बागेच...असो त्यावर एक वेगळी पोष्ट बनवुन टाकेन...माकडे ही काही फक्त कोकणातच आहेत अस काही नाही..तर ती संपुर्ण जगात आहेत...आणि जगभरातल्या शेतकर्यांना त्रास देतात..तरी पण जगभरात फळबागा फुलतात...माकडांचा बदोबस्त करुन..त्यातिल काही जालिम उपाय मी सांगतो ते करा पहिले.. स्वस्त आहेत..फक्त करायची तैयारी ठेवा..त्यात काही बेसिक आहेत ते करावेच लागतील

बेसिक उपाय...
१) फळबागेला १ ते दिड फुट उंच गडगा असायलाच हवा..त्यावर तारेचे कुंपण हवेच गडग्या खाली १ फुट खोल चर खोदुन त्यात नाव्ह्या कडचे केस आणी काचेचे तुकडे टाका
२) फळबाहेत २४ तास राखणदार हवाच..सोबत २-३ कुत्रे ठेवा..
३) फळबागेतील झाडांन वर रक्ता सारखे लाल पाणि पारदर्शक बाटल्यात भरुन त्या झाडाना टांगा

सहज शक्य करण्या सारखे उपाय..
१. घराजवळ केळि अथवा पपईचे झाड असेल...तर त्याच्या फळाना..कापडाने अलगद गुंडाळुन ठेवा..वानरांना लांबुन दिसता नये..याची काळजी घ्या..

२. या फळांच्या भोवती...मच्छिमारांची फाटलेली जाळी विकत घेऊन..बांधा..वानराना जाळयात फसण्याची भिती असते...म्हणुन लांबच रहातात...

३.झाडा भोवती रंगित रबराचे साप गुंडाळुन ठेवा..किंव्हा टांगा.. वानर सापला घाबरतात जवळ पास पण येत नाहीत..पण जागा सतत बदला...

४.घरा समोर एक कुत्रा तर बागात २ कुत्रे पाळा..वानरांची पहिली चाहुल पहिले कुत्र्याना लागते..
५.बागात दोन कापडी किवा पुतळे वाघ उभे करा..पण जागा बदलत रहा..

६.फळ बागेच्या कुंपणा च्या पलिकडे साधारण ४ फुटाच्या पट्टयात..पाटिल बायोटेकचे..’ भागमभाग ’ पाऊडर पसरवा...या प्राण्यांची घाणेन्द्रिय फार तिव्र असतात...या केमिकलचा उग्रवास त्यांना सहन होत नाही..मग भागमभाग...
PATIL BIOTECH PVT. LTD. Pankaj Patil. 53, Visanji Nagar, Jalgaon, Jalgaon, Maharashtra, India - 425001. Call : 08045132591. Fax : +91-257-2222763.

७.हे शक्य नसेल तर थोडयाश्या पिठात...लालमिर्चीची पाऊडर आणी राईची पुड मिक्स करुन हे मिश्रण पसरवा...त्यावर व्हिनेगरचा स्प्रे मारा..फळ भाज्यांन वर काळी मिरिची पुड फवारा...वानर यांच्या वाटेला जाणार नाही..

८.बागात लाऊडस्पिकर लावा वानर येताच चालु करा...

९.एक जालिम उपाय...सुकी आणी विना काटा सडलेली मच्छी विकत घ्या त्याची छोटी छोटी पार्दशक पाकिटे बनवा...वानर ही पाकीटे फाडुन त्यातिल मासे दोन्ही हाताने धरुन खाण्याचा प्रयत्न करतो...तेव्हा त्याच्या उग्र वासाने तिथेच टाकुन बागातुन पळ काढतो...पण हाताच काय हाताचा वास रहातोच ना...मग वानर खडकावर आपले हात घासायला सुरवात करतो अगदी रक्त येई पर्यंत..आणी मग आपल्या बागे कडे पुन्हा कधिही ढुंकुन सुध्दा येत नाही..

१०.एक पि.व्हि.सि. पाईपची तोफ बनवा...पुढे निमुळता २ इंचाचा पाईप’१ फुट लांब असलेली अलग होणारी..३ इंच पाईप १ फुट लांब..मागचे तोंड बंदकरा...बरोबर मध्ये भोक पाडुण त्यात त्यात ग्यास लाईटर फिक्स करा...आता पुढच्या निमुळत्या पाईपात मागच्या बाजुने एक साधा पेपरचा बोळा कोंबा..आता मोठया पाईपात थोडासाच ब्याडी स्प्रे मारा..बोळा असलेला पाईप मोठया पाईपाला जोडा..वरच्या दिशेने तोंड करुन लाईटरचे बटण दाबा...तोफे सारखा आवाज होतो.. वानर धुम पळतात..मी माझ्या गावच्या घरी बनवुन ठेवली आहे..

आता काही नविन उपाय...बाजारा मिळत असलेले...

१) कुंपणाच्या आत २-३ तारा टाका त्यावर हलका सुक्या मातिचा थर रचा..या तारांन वर दाब पडताच फळबागेत सायरन वाजु लागतात हे सगळे सौर उर्जवर चालते..

२) झटका तार...पातळ तारेत विजप्रवाह असतो १२ व्होल्टचा कुंपणाच्या तारेत एक खाली एक मध्दे आणि एक वर बांधा. याला स्पर्ष झाला की हलकासा झटका लागतो..हे सगळे सौर उर्जवर चालते..

३) हा एक जालीम उपाय आहे चित्रात दाखवल्या प्रमाणे आणि क्यामेंट ब्याक्स मध्दे डिटेल चित्र आहे ते बघा...लोखंडी जाळीचा एक मोठा पिंजरा बनवा...त्याला एक दरवाजा असतो..आपल्या मर्जी नुसार उघडता येतो..आणी बंद करता येतो. या पिजर्यात माकडांचे आवडते खाद्य घाला..७-८ माकड आत आली की दरवाजा बंद करा..वर कापड..गोण्या टाकुन काळोख करा आणि या माकडांना छोट्या पिंजर्यात ट्रान्सपर करा..त्यावर गोणि घालुन मोठ्या पिजर्या पासुन लांब ठेवा...आता पुन्हा मोठ्या पिजर्या वरचे कापड काढुन प्रोसेस रिपिट करा ३-४ पिजरे भरले की बाकीच्या माकडांना फटाके लावुन पळवुन लावा..हे सर्व करताना वेशभुषा वानरमार्यांची असेल आणि हातात एक तिर कमान असेल तर ही वानर तुमच्या वाटेला पण येणार नाहीत कारण वानर यांना घाबरतात..कारण ते यांची शिकार करतात खाण्या साठी

आता या छोट्या पिंजर्यातील वानरांना ३ दिवस उपाशी ठेवा...दिवसा कपडा घालुन रात्री कपडा काढा...४ थ्या दिवशी कपडा काढा आणि यांची वरात
तुमच्या फळबागेतुन जंगला पर्यंत काढा आणि तिकडेच यांची सुटका करा वानरे जंगलात धुम ठोकतील...आणि तुमच्या फळबागेत पुन्हा कधि येणार
नाहीत..

मी या वानरांना मारणायाचा एक ही उपाय सांगितलेला नाही... फक्त पळवण्याचे उपाय सांगीतले आहेत..कारण तोही एक जिव आहे आणी त्याला पण जगण्याचा अधिकार आहे..एक समतोल गोष्ट लक्षात घ्या त्यांना रानात खायला काही मिळत नाही म्हणुन ते आपल्या बागात उतरतात...त्यामुळे आपण खालेल्या बिया..जसे आंब्याचे बाटे..जांभळ..सिताफळ वैगरे अनेक बिया साठवुन ठेवा...पावसाळयात त्या रानात टाका..शेवटि कोकणि माणसाने आपल्या निसर्गाचा सांभाळलेला आहे...झाडा पासुन ते प्राणीमात्रांन सकट

नुसत बघुन वाचुन सोडुन देऊ नका तर संपुर्ण कोकणात शेयर करुन प्रसार करा..

Address

Savantvadi
416512

Telephone

9420153016

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Owner Of Srushti Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share