19/07/2026
🌿 दुर्गम आदिवासी भागात आरोग्यसेवेचा मायेचा हात आणि ग्रामविकासाचा आदर्श 🌿
आर. एस. सोशल वेल्फेअर फाउंडेशन, तळोदा अंतर्गत कार्यरत आर. एस. चॅरिटेबल हॉस्पिटल हे तापी नदीच्या उत्तरेकडील तळोदा, अक्कलकुवा, धडगाव आणि शहादा तालुक्याच्या पश्चिम भागातील गरजू, आदिवासी व BPL रुग्णांसाठी निस्वार्थपणे आणि सातत्याने आरोग्यसेवा देत आहे. डॉ. बरखा गाडपले-पाडवी (MBBS, MD) यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय सल्ला, तपासणी आणि धर्मादाय उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.
याच सेवाभावातून मुख्यमंत्री मदत कक्ष व मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF) याविषयी जनजागृतीसह सिंगपूर बुद्रुक, ता. अक्कलकुवा येथे वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले. सरपंच सौ. दुर्गा प्रदीप पाडवी (दुर्गाताई) यांच्या पुढाकाराने व मोलाच्या सहकार्याने ग्रामस्थांची आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला, औषधोपचार तसेच पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
गेल्या सुमारे २० वर्षांतील जुने सिंगपूर आणि आजचे सिंगपूर पाहता गावाचा झालेला कायापालट अत्यंत उल्लेखनीय आहे. स्वच्छता, सुंदर परिसर, सार्वजनिक सुविधांची योग्य देखभाल, नीटनेटके नियोजन आणि शिस्तबद्ध ग्रामपंचायत व्यवस्थापन यामुळे सिंगपूर बुद्रुकने पंचायतराज व लोकसहभागातून ग्रामविकासाचा आदर्श निर्माण केला आहे.
शिबिराच्या निमित्ताने CRP, महिला बचतगट, SHG आधारित स्वयंरोजगार, कृषीपूरक व्यवसाय, अॅग्रोफॉरेस्ट्री, जलसंधारण, पर्यावरण संरक्षण, सामाजिक स्वच्छता, सॅनिटेशन आणि ग्रामविकासातील लोकसहभाग या विषयांवरही सखोल चर्चा झाली.
प्रमुख आयोजक व सहकारी: सौ. दुर्गा प्रदीप पाडवी; डॉ. बरखा गाडपले-पाडवी; इंजी. देवेंद्र रूपसिंग पाडवी—अध्यक्ष, आर. एस. सोशल वेल्फेअर फाउंडेशन; डॉ. काजल सावळे; श्री. विलास पराडके—शिबिर समन्वयक व आदिवासी समाजसेवक; सिस्टर अंकिताताई वसावे; सिस्टर अनिताताई वळवी; श्री. अक्षय शिरसाठ आणि श्री. मुनिराज पाडवी—उपसरपंच, मांडवी आंबा.
दुर्गाताई, ग्रामपंचायत सदस्य, CRP, बचतगटातील महिला, आरोग्यसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार.
सेवा हीच साधना, लोकसहभाग हीच शक्ती आणि निरोगी व स्वावलंबी आदिवासी समाज हेच ध्येय! ❤️
Zilla Parishad, Nandurbar Collector Office Nandurbar Devendra Fadnavis PMO India Ministry of Tribal Affairs, Government of India