Kalambi

Kalambi कळंबी,
ग्रामदेवता कळंबाई,
सांस्कृतिक ?

 #मराठा_शौर्यदिन
14/01/2022

#मराठा_शौर्यदिन

आज १४ जानेवारी
हाच तो दिवस १४ जानेवारी १७६१ त्या दिवसापासून अलेक्झांडर पासुन ते अब्दाली पर्यंत खैबर खिंडीतुन उठणाऱ्या अल्लाहो अकबर च्या घोषणा पुर्ण पणे थांबल्या आणि तरी आपलेच लोक म्हणतात की आपण पानिपत मध्ये हरलो. असे म्हणतात की हरणाऱ्याने पण असे हरावे कि जिंकणाऱ्याची मान आणि मन नमन करण्यासाठी झुकली पाहिजे आणि तशीच मान अब्दालीचीे झुकली. आणि जर म्हणयचंच आहे की महाराष्ट्र पानिपतवरती हरला तर हे लक्षात ठेवा महाराष्ट्राला पानिपतवर हरवलं गेलं त्यांच्याच देशबांधवांच्याकडून. संपूर्ण हिंदुस्थानचे स्वतःला शूर म्हणवून घेणारे जेव्हा स्वतःच्या बिळात लपुन बसले होते तेव्हा आमच्या संपूर्ण महाराष्ट्राची एक तरुण पिढी शाडूची माती खावून लढायला उभी राहिली होती आणि देशासाठी कसे लढावे हे दाखवूनच धारातीर्थी पडली. त्यांनी सिद्धच केलं की आम्ही शिवछत्रपती, शंभुछात्रपतींचे वारस आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात असं घर न्हवत कि त्या घरातली चिता जाळली नाही त्या घरातलं कुंकू पुसलं गेलं नाही फक्त कशा साठी तर हिंदुस्थानच्या रक्षण करण्यासाठी ज्या हिंदुस्थानला त्यांच्या पराक्रमाची कदर तेव्हा पण न्हावती आणि आता पण नाही.
पानिपतवर देशरक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या सर्व वीरांना विनम्र अभिवादन.......
__________//\\__________
#मराठा_शौर्यदिन
#खुब_लढे_वो_मरहट्टे

17/04/2018

काल एका मेडीकल स्टोअरवर औषधी घेण्यासाठी मी उभा होतो.

एवढ्यात अंगावर सामान्य कपडे घातलेला, दाढीचे खुंट वाढलेला एक खेडूत वृद्ध
औषधांची चिठ्ठी घेवून तेथे आला.

दुकानदाराने प्रिस्क्रिपशन पाहून एक औषधी पावडरचा मोठा डबा काऊंटरवर ठेवला.

"350 रू....." तो म्हणाला.

वृद्ध व्यक्तीने सद-याच्या खिशातुन पैसे काढले.

ते जेमतेम 310 भरले.

" एव्हढेच आहेत....
बाकीचे नंतर देतो....

आम्ही
दवाखान्यातच आहोत !"...तो म्हणाला.

दुकानदाराने त्याच्याकडे कुत्सित नजरेने पहात
दणक्यात डबा उचलून कपाटात ठेवला.

बाबा अस्वस्थ झाला.
.काय करावे त्याला
समजेनां...

त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले.

जवळच उभ्या असलेल्या एक सदगृस्थाने तात्काळ
सांगितले....

" उरलेले पैसे माझ्या बिलातून घ्या....द्या त्यांना तो डबा !"

दुकानदाराने डबा पुढ्यात ठेवला, पैसे घेतले.

" दादा, बाळाला कसं द्यायचं हे पावडर....

तो तर अजून दोन दिवसांचाच आहे ? वृद्धाने चौकशी केली.

" बाबा, हे बाळासाठी नाही.....त्याच्या आईसाठी
आहे."

" असं होय,
मग वाईच राहू द्या...मी नंतर घेतो."

म्हणत म्हतार्याने डबा परत केला.

दुकानदार पुन्हा चिडला.
.पैसे परत करत त्याने रागाने
म्हातार्याकडे पाहिले व डबा परत ठेवला.

वृद्धाने जास्तीचे पैसे त्या गृहस्थाला परत केले व
चालू लागला.

मी त्यांच्यासोबत चालत त्यांना विचारलं....

" कां परत केला बाबा डबा...?"

चेहर्यावरचा घाम पुसत ते म्हणाले...

"अहो, मले वाटलं तो लेकरासाठी आहे.....
म्हणून घेत होतो...
त्याच्या आईला काय ?....
ती आता बरी आहे...
उद्या बाळाला काही औषध लागलं म्हणजे कुणाकडे हात पसरायचे ?"

मी आवाक झालो......

माझ्या मनात प्रश्न फेरधरुन
नाचू लागले.

परीस्थीने माणूस किती हिशोबी होतो ?

त्याचे प्राधान्यक्रम कसे बदलतात ?

प्रेमाचा प्रवाह कसा झटक्यात दिशा बदलतो ?

लेकीवरचं
त्याचं प्रेम कमी होतं कां ?

गरीबीपुढे माया, ममता
कशी आगतीक होते ?
......या व अश्या असंख्य प्रश्नांनी माझ्या डोक्याला झिणझिण्या आल्या.

हजारो, लाखोंची
उलाढाल करणार्यांसमोर सामान्य माणसांच्या गरजा
किती माफक असतात.

त्या बाबांची अडचण किती
गंभीर होती व नड किती शुल्लक होती.

त्यांनी त्यावर संयमाने किती सहज मार्ग काढला.

परीस्थीतीचा बाऊ नाही, दुकानदारावर राग नाही,

व्यवस्थेविरुद्ध त्रागा नाही.

आहे ती परीस्थिती
स्विकारुन बाबांनी आपले प्राधान्यक्रम ठरवले होते.

माय महत्वाचीच,
पण त्या स्थितीत त्यांना लेकराची अधिक काळजी होती.

तो डबा लेकरासाठी असता तर
कदाचित त्यांनी तो घेतलाही असता.

प्रसंगी दुसर्याकडून मदत मागितली असती.

याचनाही केली असती.

मात्र, आईला तूर्त गरज नाही हे त्यांनी
काढलेलं निदान.

कदाचित ते आगतिकतेतून आले
असेल.

माय, ममता आणि आगतिकता यांचा विचार करतच
मी एका वेगळ्याच तंद्रीत चालत होतो.

" ओ साब, रास्ता छोडो.....बीच रास्तेमे क्यो चल
रहे हो ?"

रिक्क्षावाल्याच्या उद्दाम सूचनेने मी भानावर आलो.

रस्त्याच्या डाव्या बाजूला होत माझी नजर त्या
म्हातार्या बाबांचा शोध घेवू लागली.

ते मात्र, हाॅस्पिटलच्या गर्दीत सहज मिसळून गेले.

काहीच घडलं नाही या अविर्भावात
मी स्वतःशीच म्हणालो....

"ह्याला जीवन ऐसे नाव !
....... .........

To help poor is serve to god .......!.....

देवाच्या नावाने दानधर्म बंद करा आणि समाजातील खरे गरजुवान शोधून त्यांच्या साठी काहितरी करा.

यालाच म्हणतात सत्पात्री दान.

मित्रांनो प्रत्येकाचे दिवस येतात त्यामुळं इतरांना मदत करत चला ....
देव तुम्हाला कधीच कमी करणार नाही.

12/04/2018

“दोष हा कुणाचा?”

एका हाॅटेलमध्ये जेवायला गेलो होतो. शेजारच्या टेबलावर चार मुली बसल्या होत्या. त्यांचं जेवण आटोपलं, वेटर ने बडीशेपचा बाऊल समोर ठेवला. चारही मुलींनी टिश्यू पेपरमध्ये बचकभर बडीशेप भरून घेतली आणि ती पुरचुंडी पर्समध्ये टाकली. आजूबाजूच्या १०० माणसांमध्ये असूनही आणि चांगल्या कुटुंबातल्या असूनही असं करताना त्यांना काहीही वाटलं नाही.

अनेक काॅलेजवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना मी हाॅटेल्समधून चमचे चोरतानाही पाहिलं आहे. विमानातून प्रवास करताना काही मंडळी अक्षरश: ओंजळी भरभरून चाॅकलेट्स किंवा टाॅफीज् घेतात. काही रेल्वे प्रवासात पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना दिल्या जातात. अनेकजण दोन-दोन किंवा तीन-तीन बाटल्या सुद्धा घेतात. रेल्वे प्रवासात (केवळ त्या प्रवासापुरतेच मिळणारे) टर्किश नॅपकिन्स सर्रास बॅगेत भरतात. साॅस किंवा साखरेची ट्रॅव्हलिंग पाऊचेस न विचारता उचलणे, टीबॅग्ज उचलणे, टिश्यू पेपर्सचा गठ्ठाच उचलणे हे प्रकार माणसं अगदी बिनधास्त करतात.

एकदा एका ट्रेक ला गेलो होतो आणि एका रिसाॅर्टवर राहिलो. तिथं आलेल्या एकानं शॅम्पूचे सॅशे आणि साबणाच्या छोट्या वड्यांचा बाॅक्सच उचलून नेला. एका सुशिक्षित, जाणत्या बाईंनी लाॅबीमध्ये सहज म्हणून वाचण्याकरिता ठेवलेली दोन मॅगेझिन्स उचलली आणि पर्समध्ये घातली. हा प्रकार आजूबाजूची माणसं, हाॅटेल व्यवस्थापनातले कर्मचारी पाहत होते. पण कुणी काही विरोध केला नाही.

घराजवळच्या हाॅट चिप्स च्या दुकानात गेलो होतो. दोन मुली आल्या. त्यांनी सात-आठ प्रकारचे वेफर्स टेस्ट करून पाहिले आणि काहीही खरेदी न करता निघून गेल्या. दुकानाचा मालक म्हणाला, “ऐसे तो बहोत लोग आतें हैं , सब के सब पढें-लिखे और अच्छे घर के ही होतें हैं । पता नहीं, ऐसा क्यूॅं करतें हैं?”

रस्त्यावरच्या एखाद्या फळविक्रेत्याकडे गेलात आणि फळं खरेदी करायची असतील तर एखादं फळ चवीपुरतं चाखायला देतो. काहीजण स्वत:च हात पुढं करून सात-आठ फळं तर उभ्या-उभ्या सहजच मटकावतात. चणे विक्रेते किंवा चुरमुऱ्यांची भट्टी चालवणाऱ्यांना तर हा अनुभव दररोज शंभरदा येत असेल. माणसं अगदी स्वत:चा हक्क असल्यासारखा हात घालतात.

मंडईत गेलो होतो. कैऱ्या विकणाऱ्या एका वयस्कर विक्रेतीसमोर एक काकू उभ्या राहिल्या. विक्रेतीनं भाव सांगितला आणि कैरीची एक फोड कापून त्यांच्या हातावर ठेवली. कैरीची फोड खात-खात काकू एक अक्षरही न बोलता निघून गेल्या. आम्ही दोघेही शेजारीच उभे होतो. तो प्रसंग पाहून आम्हालाच कसंतरी झालं.

चांगली शिकली-सवरलेली माणसं अशी का वागत असतील? आपण परदेशातल्या लोकांकडून त्यांची भाषा, राहणीमान, कपडे, फॅशन्स हे सगळं घेतलं पण सार्वजनिक आयुष्यात ती माणसं किती संतुलितपणे वागतात,हे आपण नाही स्वीकारत..!
कॅरीबॅगसाठी दुकानदारांशी हुज्जत घालणारी सुशिक्षित जनता मी पाहतो, तेव्हा मला त्यांच्या सुशिक्षितपणाचाच अर्थ लागत नाही. नुसतंच बाह्यरूप पाॅश करून आपण सुशिक्षित असल्याचा आभास निर्माण करत राहण्याच्याच कृत्रिम देखाव्याच्या चक्रात माणसं अडकली आहेत का?

हा बिनबुडाचा सुशिक्षितपणा केवळ अशा चोऱ्या-माऱ्या आणि उचलाउचलीचे उद्योग करून थांबत नाही. उघडपणे सामाजिक नियम मोडण्यातही हा वर्ग आघाडीवर आहे.

पेट्रोलपंपावर मोबाईल फोनवर गप्पा मारणे, एटीएम सेंटरमध्ये गाॅगल्स, स्कार्फ किंवा टोपी घालून जाणे, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर खुशाल धूम्रपान करणे, सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात बिनदिक्कतपणे थुंकणे, या गोष्टी करून माणसं नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न करत असतात?

नामवंत काॅलेजेसमध्ये शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी पार्किंग आणि नो पार्किंगमधला फरकही ओळखू शकत नाहीत का? सुशिक्षित माणसं मुद्दामच झेब्रा क्राॅसिंगवरच का थांबतात? शिकली-सवरलेली माणसं बसस्टाॅप सोडून भर रस्त्यावर गर्दी करून बसची वाट का पाहतात? खिशात पैसे असूनही बस कंडक्टर ला फसवून विनातिकीट प्रवास का करतात?

लक्ष्मी रस्ता हा जसा बाजारपेठेचा रस्ता आहे तसं ते माणसांच्या अतरंगीपणाची लक्षणं पाहण्याचंही एक ठिकाण आहे. माणसं रस्त्यातच आपली भलीमोठी चारचाकी गाडी थांबवून दुकानासमोर उतरतात आणि ड्रायव्हर ती गाडी रस्त्यातच उभी करून , काचा वर करून, आतमध्ये एसी लावून बसलेला असतो. बाकीची वाहतूक कोलमडून जाऊन याच्या नावानं शंख करत असते, पण हा एकदम कूल..!

माणसं कुल्फी घेतील आणि काड्या रस्त्यावरच टाकतील. मक्याचं कणीस घेतील, उरलेला भाग रस्त्यावरच टाकतील. प्लास्टिकच्या ग्लासात काॅर्नभेळ घेतील, रिकामा ग्लास रस्त्यावरच टाकून मोकळे.. याच रस्त्यावर मोबाईल फोनवर बोलत रस्ता क्राॅस करणारे अनेकजण दिसतील. नो एण्ट्री तून वाहने चालवणारे अनेकजण दिसतील. ही सगळी मंडळी लौकिकार्थानं किमान ग्रॅज्युएट तरी निश्चित असतात. पण, सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं आणि कसं वागू नये, असा कुठला पेपर त्यांच्या कोर्समध्ये नसतो, त्यामुळे त्या विषयाचा त्यांना गंध नसतो. त्यामुळे, सार्वजनिक जीवनात सगळे नापास!

अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या आहेत, तिथले खाद्यपदार्थ विक्रेते संध्याकाळी व्यवसाय संपला की, सांडपाणी थेट रस्त्यावर टाकून देतात. त्यामुळे तो रस्ता अस्वच्छ, चिकट होतो, माशा घोंगावतात. पण सार्वजनिक ठिकाणचं त्यांचं हे वागणं आपण कुणीही मनावर घेत नाही.

भर रात्री बारा वाजता झोपलेल्या जगाला जागं करून वाढदिवस साजरा करणारा एक नवीन वर्ग तयार झाला आहे. ही मंडळीसुद्धा सुशिक्षित असतात. अनेकदा काॅलेजात शिकत असतात. पण, भर रात्री केकच्या दुकानाबाहेरच टोळकं जमवून ज्याचा वाढदिवस आहे अशा उत्सवमूर्तीच्या तोंडाला, डोक्याला येथेच्छ केक फासून, त्याला दारू पाजून लाथाबुक्क्यांनी बदडून काढणे, त्याच्या डोक्यात अंडी फोडणे असे प्रकार करतात. हे सगळं चांगलं वागणं आहे का? आणि एकविसाव्या शतकातल्या समाजाला हे शोभतं का?

ही मंडळी असं का वागतात, याला काहीही उत्तर नसतं.अशी कितीतरी लोकोत्तर व्यक्तिमत्त्वं आपल्याला ठायीठायी दिसतील. ही माणसं उघडपणे चोऱ्या करतात, गरिबांना नाडतात, त्यांना त्रास देतात, स्वत:च्या वागणुकीनं इतरांचं सार्वजनिक आयुष्यही पार खराब करून टाकतात.
आपण यावर कधी आक्षेप घेतला आहे का?
लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसेल पण स्वत:च्या ताटातलं मुसळ दिसणार नाही.

गाय दूध देते तेव्हा ते चांगलंच असतं. पण, आपण ते नीट तापवलं नाही तर ते नासणारच. म्हणून, मग आपण गायीला दोष देणार का? तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दही कळकलं तर दोष दह्याचा नसतो आणि भांड्याचाही नसतो, दोष दही तांब्याच्या भांड्यात ठेवणाऱ्याचा असतो.
आपण नेहमी प्रशासनाकडे, सरकारकडेच बोटं दाखवत राहू, आरोप करत राहू. सरकारकडून आपल्या अपेक्षा फार मोठ्या असतात, पण साध्या साध्या गोष्टी जपण्यातही आपण स्वत: कमी पडतो. स्वत:ला पारखलं आणि स्वत:च्या वागण्यातले दोष दूर करायचं ठरवलं तर प्रगतीला सुरूवात होईल..सगळं मळभ जाऊन आभाळ स्वच्छ होईल..!

समाजाने स्वत: पुढाकार घेऊन या साध्या साध्या गोष्टी सुधारल्या तरी ‘अच्छे दिन’ नक्कीच येतील...!

©मयुरेश डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख,
आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे.

*Why Meditation Necessary?**आपल्या जन्माच्या आधीपासुन मरे पर्यंत आपलं हृदय सतत कार्यरत असतं. हृदय दररोज़ ७००० लीटर रक्त ...
10/04/2018

*Why Meditation Necessary?*

*आपल्या जन्माच्या आधीपासुन मरे पर्यंत आपलं हृदय सतत कार्यरत असतं. हृदय दररोज़ ७००० लीटर रक्त पंप करते (यापैकी ७०% रक्त मेंदुला लागते आणि बाकी शरीराला ३०% रक्त मिळते) आणि ७०,००० किमी पेक्षाही लांब रक्तवाहीन्यांमधे प्रवाहीत करते. १ टन वजन ४२ फूट ऊंची पर्यंत उचलण्यासाठी जितकी शक्ति आवश्यक असते तितकी शक्ति हृदय त्याच्या कार्यातुन दररोज निर्माण करते.*

*आपण थकल्यावर आराम करतो पण हृदयाने जर ४ - ५ मिनीटं आराम केला तर आपला कायमचा आराम होऊन जाईल.*

*न थकता हृदय कसे काय बरे कार्य करत असेल?*

*हृदय सतत कार्य करू शकते कारण ते अनुशासनाच्या, DISCIPLINE च्या आधारावर कार्य करते. सामान्य NORMAL परिस्थितीमधे हृदय ०.३ सेकंद आकुंचन CONTRACTION होते म्हणजे PUMP करते आणि ०.५ सेकंद प्रसरण पावते किंवा आराम करते RELAX होते. या हिशोबाने ०.३ + ०.५ = ०.८ सेकंदात हृदयाचा एक ठोका BEAT पूर्ण होतो म्हणजे एका मिनीटात ७२ ठोके होतात जे सामान्य NORMAL असतात. आरामाच्या ०.५ सेकंदात अशुध्द रक्त फुफ्फुसात जाऊन १००% शुद्ध होऊन येते.*

*जर काही कारणाने शरीराला कमी वेळात जास्त रक्तपुरवठ्याची गरज DEMAND असेल तर हृदय जास्त रक्त PUMP करण्यासाठी आरामाची वेळ कमी करतं. अश्या परिस्थितीत आराम ०.४ सेकंद झाला तर हृदयाचा एक ठोका ०.७ सेकंदा त पूर्ण होऊन दर मिनीटाला ही संख्या ८२ च्या वर जाते आणि केवळ ८०%च रक्त शुध्द होतं.*

*जर आरामाची वेळ ०.३ सेकंद झाली तर ६०% च रक्त शुद्ध होते. म्हणजे अश्या घाईगर्दीच्या असामान्य स्थितीत,२०% किंवा ४०% अशुद्ध रक्त रक्तवाहीन्यांमधे PUMP केलं जातं आणि ती अशुद्धि रक्तवाहीन्यांमधे चिकटुन सामान्यपणे लवचिक ELASTIC स्वरूपाच्या असलेल्या रक्त वाहीन्या कठीण PLASTIC स्वरूपाच्या बनत जातात. कालांतराने रक्तवाहीन्या इतक्या कठीण बनतात कि रक्तात एखादी गाठ वाहत आली (कि पूर्वी धमनीच्या लवचिक स्वभावामुळे सहज निघुन जात असे) कि अडकुन रक्ताचा प्रवाह रोखते किंवा BLOCK करते - या स्थितिला हृदय विकाराचा झटका HEART ATTACK म्हणतात.*

*या हिशोबाने विचार केला तर लक्षात येईल कि हृदय विकाराचे मूळ कारण शरीराकडून किंवा मेंदुकडुन होणारी सामान्यपेक्षा वाढीव रक्ताची मागणी DEMAND हेच आहे. जेव्हा मेंदुची हालचाल ACTIVITY STIMULATE चलायमान होते तेव्हा त्याची रक्तपुरवठयाची मागणी सामान्यपेक्षा खूप वाढते. BRAIN ACTIVITY STIMULATE होण्यासाठी आपला आहार DIET केवळ २५% ते ३०%च जबाबदार आहे आणि ७०% ते ७५% आपले विचार, भावना, दृष्टिकोण, स्मृति जबाबदार आहेत.*

*त्यामुळे ज्यांना आपले हृदय दीर्घकाळ स्वस्थ ठेवायचे असेल तर त्यांनी चिंता, क्रोध, उदासी, घाईगर्दी (जल्दबाजी) आणि भावनात्मकदृष्टया संवेदनशिल SENSITIVE स्वभाव यांच्यापासुन स्वतःला सुरक्षित ठेवावे.*

*या पाच गोष्टींपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतेही औषध MEDICATION उपलब्ध नाही. त्यापासुन सुरक्षित रहाण्यासाठी ध्यानधारणा MEDITATION हाच एकमेव शाश्वत उपाय आहे.*

*म्हणुनच म्हंटलय -SPIRITUAL HEALING IS ONLY TRUE HEALING*

Request - Please Read above message which is scientifically True.

09/04/2018

“ तुझ्या डोळ्यात का पाणी आलय ? “
“ अवो ,काई न्हाई ,चुलीच्या धुरान पाणी आलय जरा , न तुमच्या डोळ्यात का पाणी आलय ?”
“आग ,वावधान उठल न फुफाटा डोळ्यात गेलाय बघ "

दोघांनी एकमेकाला खोटच सांगितलेलं.
तालुक्याला शिकणाऱ्या पोराच पत्र आलेल.
खुशाली कळवली ,अभ्यास नीट करतोय म्हणून सांगितल त्याचा दोघांना आनंद झालेला.

पत्र आलेल डालडाच्या पत्र्याच्या डब्यात भाकरीच्या रिकाम्या फडक्याखाली ठेवलेलं.
त्याला भाकरीचा,लोणच्याचा गंध लागलेला.

काल सकाळी आईन पाठवलेल्या भाकरीच्या खाली डब्याच्या तळाला वडलान लिहिलेलं पत्र वाचून पोराच्या डोळ्यातून पाणी आलेल.

" पाऊस बराय,गहू काढणीला आलाय ,गाईला कालवड झालीय तिचा खरवस पाठवलाय तुझ्या आईन ,तुझ्या मित्रांना पण दे ,बाकी खुशाल ,सुट्टीत आल्यावर बोलू ,काळजी घ्या "

घरच्या जुन्या वहीच्या चतकोर पानावर सातवी पास वडलान लिहिलेलं पत्र.पेनाची कांडी संपली म्हणून शेवटच्या ओळी पेन्सिलन लिहिलेल्या.

पण त्या अक्षरांना गंध असायचा ,मायेचा ओलावा असायचा.भाकरीचा,भाजीचा,चटणीचा आणि आईवडिलांच्या मायेचा गंध.

हजारो पत्र्याचे डबे रोज एसटीने अशी आईबापाची खुशाली पोरांना न पोरांची खुशाली आईबापाला कळवत असायचे.

लांबच्या गावात शिक्षणाला असलेल्या पोराला, परगावी असलेल्या पाव्हण्या रावळे ,नातेवाईकाला खुशालीच पोस्टकार्ड जायचं.कधीतरी कुणीतरी गेल्याची न दशक्रियेची माहिती देणारी काळ्या शाईत छापलेली पांढरी कार्ड असायची.

परगावी दिलेल्या लेकीला बाप अंतर्देशीय पत्र टाकायचा.नीळ पत्र आल न घरातल्या कुणीतरी आणून दिल कि कामातून वेळ काढून सासुरवाशीन लेक अधिरतेने अल्लाद पत्र फोडून वाचायची.

“ अनेक उत्तम आशीर्वाद " अस वाचल कि बापाचा खरखरीत हात गालावरून फिरल्याचा भास व्हायचा.
पत्र वाचताना लेकरू मांडीवर बसलेल असायचं न " पिंट्याला गोड पापा " वाचल कि नकळत हात लेकराच्या डोक्यावरून फिरायचा.
शेवटाला " सगळे खुशाल आहेत " वाचल कि डोळ्यातून पडलेल्या थेंबानी शाई ओली होऊन अक्षर विस्कटून जायची.

रात्री एकांतात पारायण करताना फुटलेला हुंदका नवऱ्याच्या हसण्यात विरघळून जायचा.
अक्षरावरून हात फिरवताना आईवडिलांच्या मायेचा जणू स्पर्श जाणवायचा.

पोस्टाच्या पिवळ्या पाकिटातून राख्या यायच्या नाहीतर तिळगुळ यायचे ,बारीक प्लास्टिकच्या पुडीत ठेवलेले.
भावाच्या आठवणी ,लटकी भांडण सगळ लख्ख आठवायचं.

लग्न जमलेली ,जमवण्याच्या प्रयत्नात असलेली ,कॉलेजला असलेली जोडपी निगुतीन गुलाबी सुगंधी कागदावर चांगल अक्षर असलेल्या मित्र नाहीतरी मैत्रिणीकडून लिहून घेऊन तेही रंगीत पेनान " मोह्ब्ब्तका इजहार " करायची.
मग अशी पत्र एखादी वही पुस्तक देण्याच्या निमित्ताने दिली जायची.
मग अशी सुगंधी पत्र कुठल्यातरी वहीच्या मधल्या पानात लपून बसायची न त्याचीही पारायण व्हायची.

लग्न ठरलेल्या जोड्यांची पत्र घरात आली कि कुणी फोडत नसल तरी त्यावरून लहान भाऊ ,बहिण,वहिनी चेष्टा मात्र करायची अन अशी चेष्टाही गोड गुदगुल्या करायची.

कधीतरी अवेळी दरवाजावर पडलेली थाप आणि " तार " अशी हाक ऐकली कि काळजात धस्स व्हायचं न छातीचा ठोका चुकायचं.
आलेली तार बहुतेक वेळा कुणाच्या तरी गेल्याची वर्दी द्यायची तर क्वचित प्रसंगी नोकरीवर रुजू व्हा म्हणून निवड झाल्याची बातमी देऊन आनंदी करायची.

साध्या चतकोर पानावर लिहिलेली चिठ्ठी,पोस्टकार्ड ,अंतर्देशीय पत्र असोत कि गुलाबी कागदावर लिहिलेली पत्र असोत ,त्या अक्षरांचा सुगंध आणि स्पर्श अगदी नेमका जाणवायचा ,अगदी मनाच्या तळाला जाऊन पोहोचायचा.

बदल चिरंतन असताय.काळ बदलला.स्मार्टफोन आणि सोशल मिडीयाच्या जमान्यात असली पत्र पाठवण म्हणजे बैलगाडीचा स्पीड वाटेल एखाद्याला.

पण वाट पाहण्यातली आतुरता ,हुरहूर आणि अप्रूप आता तेवढ राहील नाही.

तस तर पहिलं काहीच आता पहिल्यासारख राहील नाही.

*संग्रहित लेख*

31/01/2018

तक्रार करायची का?

महाभारतातील दोन पात्रामधील अतिशय सुरेख संवाद:

कर्ण कृष्णाला विचारतो - " माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले,
कारण मी अनौरस संतती होतो.
यात माझी काय चूक होती?

मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं,
कारण मी क्षत्रिय नाही मानला जात होतो.

परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल.
कारण मी क्षत्रिय होतो.

एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि
गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.

द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला.

कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.

मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.
तर मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?"

कृष्णाने उत्तर दिले:
"कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला.

जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होती.

रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.

तुम्ही तलवारी, रथघोडे, धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.

मला गौशाला, शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.

ना कोणती सेना, ना शिक्षण.

मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे, असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे.

तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही.

संदीपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी 16 वर्षाचा होतो.

तुम्ही तुमच्या पसंदीच्या मुलीशी लग्न केले.

माझं जिच्यावर प्रेम होते ती मला मिळाली नाही, तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या.

मला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले.
मला पळपुटा (रणछोडदास) म्हणतात.

जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल.
धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल, फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.

एक गोष्ट लक्षात घे कर्णा...
प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत

*आयुष्य कोणासाठीही सोपे नाही*

दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण.

परंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते...

कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या,
किती वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला,
कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले,

तरीही
त्यावेळी आपण कसा *प्रतिसाद* देतो याला महत्व आहे.

तक्रारी थांबव कर्णा!

आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनामुळे तुला *अधर्म* करण्याचा अधिकार मिळत नाही.

म्हणून मित्रानो, तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण व अतिवाईट प्रसंगी देखिल तुम्ही चांगलाच विचार करा, चांगलंच वागा आणि प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा. स्वच्छंदी व्हा आणि हे विसरून जा कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद...!

31/01/2018

"लवकर सेटल व्हायचंय?" मग नक्की वाचा.


दिवसेंदिवस मागे सरकून 'विमानतळाला' जागा करून देणाऱ्या 'केशसंभारा'वरून हात फिरवताना सहजच वृत्तपत्रातील त्या जाहिरातीवर लक्ष गेलं, "'well settle' असलेला मुलगा पाहिजे." लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या रणकुंडात उडी घेतली असल्याने तसा 'सेटल' होण्याशी अजून विशेष संबंध आला नव्हता. पण 'सेटल' होणे म्हणजे नक्की काय? या प्रश्नाने मात्र तेंव्हापासून अगदी पिच्छाच पुरवला.
माझे तेंव्हा engineering कॉलेजला admission झाले तेंव्हा शेजारचे काका म्हणाले होते, 'अरे या कॉलेज ला प्रवेश मिळाला म्हणजे तू आता सेटल झालास असेच समज.' म्हणजे 'कॉलेज ला प्रवेश मिळणे' हे सेटल होण्याचे पहिले परिमाण. टाटा मोटर्स ची नोकरी लागली तेंव्हा बरेच जण म्हणाले, 'एवढ्या नामांकित कंपनी मध्ये नोकरी लागली म्हणजे आता तू सेटल झाला.' म्हणजे नोकरी हे सेटल होण्याचे दुसरे परिमाण. पण नोकरीच्या पहिल्या काही महिन्यातच अंदाज आला की एवढ्या पगारात जर गाडी, घर घ्यायचे झाले तर अर्धे अधिक आयुष्य हफ्ते भरण्यातच जाणार आणि मग तेंव्हा कुठे आपण 'सेटल' होणार. मग सेटल होण्याचा एक शॉर्टकट सुचला. चला म्हटलं लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊ. एका झटक्यात सरकारी घर आणि गाडी! डोक्याला तापच नको. दोन वर्षात सेटल! पहिल्या परिक्षेतच कळून चुकलं की आपण ' शॉर्टकट' ने सेटल व्हायच्या नादात बरेच 'अनसेटल' झालोय ते.
पण तोही प्रश्न सुटला. सुदैवाने दुसऱ्याच वर्षी परीक्षा पास झाल्यामुळे गाडी आणि घराचा प्रश्न तरी सुटला. निकालाची गोड बातमी देण्यासाठी आईला केलेला फोन ठेवण्याआधीच आईने कळवले, "अरे एक स्थळ आलंय, मुलगी बघून घे. तुझे 'दोनाचे चार' हात होऊन तू 'सेटल' झाला की आम्ही मोकळे!" सेटल होण्यासाठी चार हात लागतात हे तेंव्हा कळाले.
सेटल होण्यासाठी शॉर्टकट ची आता सवय झाली होती जणू. म्हणून तर पहिलीच मुलगी पसंद करून लग्न केलं आणि एका वर्षाच्या आत दोनाचे तीन होण्याचा पराक्रमही केला. वाटलं 'आता तरी आपण झालो की नाही सेटल?' पण नाही! हे सेटल होण्याचं कोडं काही सुटत नव्हतं. त्याचे परिमाण बदलतच चालले होते. एका टप्प्याच्या जवळ जावं तर हे सेटल होणं माकडासारखी उडी घेऊन पुढच्या टप्प्यावर जाऊन बसायचं. असे अनेक टप्पे आले आणि गेले , मुलांचं शिक्षण, त्यांची लग्न, त्यांचं सेटल होणं या सगळ्यात कुठेतरी माझं सेटल होणं राहूनच गेलं.
आज वयाच्या 84 व्या वर्षी मृत्युशय्येवर पडलो असताना सेटल झाल्याची भावना जरा बळावली. कारण हातापायांची हालचाल तर बंदच होती, अन्नपाणीही नलिकेद्वारे जातंय पोटात. श्वास घेतानादेखील छातीच्या पिंजऱ्याचं वर खाली होणंही बंद झालंय. त्यावेळी वाटलं, 'चला सरतेशेवटी का होईना पण सेटल झालोच'. सेटल झाल्याचा आनंद 'जीव सोडून' साजरा करावा म्हटलं कारण तेवढीच गोष्ट आता करण्यासारखी राहिली होती. वैकुंठनगरीतून माझ्या वाटेकडे डोळे लाऊन बसलेल्या माझ्या सौभाग्यवतीच्या फोटोचा शेवटचा निरोप घ्यावा म्हणून डोळे भिंतीकडे वळवले आणि हिरव्यागार नऊवारीत वटपौर्णिमेसाठी नटून तयार झालेल्या सौंच्या फोटोकडे पाहून आठवले की, या बाईसाहेबांनी अजून 'सहा जन्म' आपल्याला सेटल न होऊ द्यायचं व्रत केलंय. झालं! मरणानंतरही सेटल होण्याचा प्लॅन पण रद्द!
त्यावेळी वाटलं, का पळालो आपण सेटल होण्याच्या पाठीमागे? नुसती वणवण झाली. का नाही सगळ्या गोष्टींमध्ये त्या-त्याच वेळी आनंद मानला? आताच्या लग्न करून किंवा नोकरी मिळवून सेटल होण्यापेक्षा, जसे जुन्या पिढीचे लोक म्हणायचे तसं लग्न करून किंवा नोकरी मिळवून 'मार्गी लागणं' जास्त चांगलं नाही का? खरंच का व्हायचं सेटल? गाळासारखं? शेवळाची पुटं चढायला? त्यापेक्षा प्रवाहीच राहूया ना, खळखळत्या पाण्यासारखं! रोज नवीन अनुभवांचा शोध आणि आनंद घेत. प्रत्येक वळणावर छोटा विसावा घेऊ हवा तर पण हे सेटल होणं नको. एकच तर छोटंसं सुंदर आयुष्य आहे, 'सेटल होऊन ते आणखी छोटं आणि निरस का करायचं? 🤗

07/01/2018

वयानुसार आपण काय काय ..
गोष्टी सोडल्या..

*आपण गाभुळलेली चिंच ..*
*अनेक वर्षात खाल्लेली नाही*

*जत्रेत मिळणारी ..*
*पत्र्याची शिट्टी ..*
*वाजवलेली नाही.*

*चटक्यांच्या बिया घासून ..*
*चटके द्यावेत ..*
*असं आता वाटत नाही...*

*कॅलिडोस्कोप ..*
*पाहिलेला नाही..*

*सर्कसमधला जोकर आपलं ...*
*मन आता रिझवू शकत नाही.*

*तसंच कापसाची म्हातारी ..*
*पकडण्याचा चार्मही ..*
*राहिलेला नाही..*
*कारण ..*
:
*कापसाच्या म्हातारीने ..*
*उडता उडता आपला ..*
*बालपणीचा काळ सुखाचा..* *स्वत:बरोबर कधी नेला ..*
*ते आपल्याला कळलंच नाही.*

*आता त्या ट्रिप्स नाहीत...*

*दोन दोन मुलांच्या ..*
*जोड्या करून ..*
*चालणं नाही..*

*विटी दांडू नाही...*

*साबणाचे फुगे नाहीत..*

*प्रवासात बोगदा आला तर ..*
*एक अनामिक हुरहूर नाही..*

*त्या उडणाऱ्या म्हातारीने ..*
*हे सगळे आनंद नेले...*
*त्याच्या बदली ..*
*तिचं वार्धक्य तिने ..*
*आपल्याला दिलं...*

*म्हणूनच ती अजून उडू शकते...*
*आणि आपण जमिनीवरच आहोत.*

*लाटेने की काळाने ...*
*नेला तो किनाऱ्यावरचा वाळूचा किल्ला?*

*भोवऱ्याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला…*

*हरवली कुठेतरी ती शाळेतली मूल्यशिक्षणाची वही,*

*इवलुश्या मार्कांच्या प्रगती पुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही….*

*गेले कुठे ते चालताना ..*
*“पॅकपॅक” आवाज करणारे ..*
*पायातले बूट?*

*"मी नाही देणार जा माझं चॉकलेट”*
*म्हणत आवळलेली ती ..*
*घट्ट मूठ….*

*किती जिव्हाळा होता ..*
*डोकं टेकवलेल्या ..*
*आईच्या हाताच्या उशीत?*
:
*ब्लँकेटहून जास्त ..*
*ऊब होती त्या ..*
*मायेच्या कुशीत…*

*हरवला तो प्रेमाचा घास….*
*“चिऊताई” दाखवत आईने भरवलेला…*

*घरात न सांगता ..*
*लपवून लपवून ..*
*भेळ खायचा तो ..*
*प्लॅन ठरवलेला?*

*गेले कुठे जत्रेतले ते ..*
*गोड गोड म्हातारीचे केस?*

*छोट्याशा बुटांची ..*
*आईने बांधलेली ती ..*
*सुटलेली लेस….*

*गेली कुठे ती ..*
*मामाच्या गावी जाणारी ..*
*झुकझुक गाडी?*

*हरवली कुठे ती ..*
*क्रिसमसमधली ..*
*सांताबाबाची पांढरी दाढी?*

*धावत धावत ज्याचा ...*
*पाठलाग केला ..*
*तो धूरवाल्याचा धूर कुठे गेला?*

*शाळेत बडबडगीते गाताना ..*
*एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?*

*झोपताना पाहिलेला तो ..*
*चांदोमामा कुठे हरवला?*

*अ आ इ ई ..*
*पाटीवर लिहिणारा तो ..*
*खडू कुणी पळवला?*

*कशाला आलं हे ...*
*आपल्याला शहाणपण????*

*हरवलं त्यात ते सुंदर बालपण..*
*खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना?*

*आयुष्यातील काही ...*
*अनमोल क्षणांची आठवण ...*
*ते क्षण निसटून गेल्यावरच प्रकर्षाने होते...*

*पण बालपणीच्या काही ..*
*आठवणी,*
*मनाच्या कोपऱ्यात ..*
*अजूनही दाटलेल्या असतात,*

*त्यांना हलकेच गोंजारलं असता ..*
*त्यांची सय अधिकच गडद होते...*

*आपलं मनही किती विचित्र असतं ना...*

*जेव्हा लहान असतो तेव्हा पटकन मोठं व्हावंसं वाटतं...*

*शाळा सोडून बाबांसारखं ...*
*ऑफिसला जावंसं वाटतं तर दादासारखं कॉलेजला जावंस वाटतं.*

*मात्र आता मोठं झाल्यावर ...*
*पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात ..*
*आणि नकळत डोळ्यात पाणी येतं..*

*आय मिस माय चाइल्डहूड यार*
*कोई लौटा दे मुझे...*
*बीते हुए दिन..*

*चला मन थोडे हलके झाले ..*
*लेटस् बी यंग फ्रेंड्स ..*

10/11/2017

पु लं च्या शब्दात...

शून्यातून विश्व का विश्वातून शून्य....!!!!

टू रुम किचन चा एखादा फ्लॅट ,
दोन चार एकर चे फार्म हाऊस,..
एखादी चार चाकी गाडी आणि
भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं ,
की आपण म्हणतो ,

अमक्या- तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं !!

म्हणजे होतंय काय की
सुख मिळेल या आशेने
माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय ,
पण सुखी काही दिसत नाही !!

आपणचं म्हणतो की,
आमच्या लहानपणी खूप मजा यायची...

खूप करमायचं , घर भरलेलं असायचं...

दिवस कधी मावळायचा ते कळायचंच नाही ....!!

मग आता काय झालं ???

मजा कुठ गेली ??

एकटं एकटं का वाटत ??

छातीत धडधड का होते ??

कशामुळे करमत नाही ...??

कारण......

"विश्व निर्माण करण्याची " व्याख्या
कुठेतरी चुकली...... !!

विश्व निर्माण करणं म्हणजे....

नाती गोती जपणं

छंद जोपासणं

पाहुणे होऊन जाणं

पाहुण्यांचे स्वागत करणं

खूप गप्पा मारणं

घराच्या उंबऱ्यात चपलांचा ढिग दिसणं

खळखळून हसणं

आणि...

काळजातलं दुःख सांगून मोकळेपणाने रडणं !!!

या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर

" शून्यातून विश्व निर्माण केलं " असं म्हणावं .

तुम्हीच सांगा ,

आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली
की घट झाली .....???

तुमचं खर दुःख तुम्ही मोकळेपणाने
किती जणांना सांगू शकता ????

असे किती मित्र , शेजारी , नातेवाईक
आपण निर्माण करू शकलो...????

खूप कमी , किंबहुना नाहीच.. !!!

मग आपण " विश्व निर्माण " केलं का ???

तर नाही....

मित्र हो ,

रजिस्ट्री च्या कागदाच्या फायली म्हणजे
विश्व...????

भौतिक साधनांची रेलचेल म्हणजे विश्व ...???

नाही....!

लॉकर मध्ये ठेवलेले हिरे मोत्यांचे दागिने म्हणजे
विश्व.....????

मुखवटे घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व......????

नाही !!

हे समजून घ्यावं लागेल ....!!!

मोठं बनण्याच्या दडपणा मुळे आणि मग कामाच्या व्यापा मुळे
नाती दूर जाणार असतील ,.....

इतरांना तुच्छ लेखण्यामुळे आणि
अहंकारामुळे माणसं जवळ येणार नसतील...

दुःख सांगायला , मन हलकं करायला जागाच
उरणार नसेल....
तर.....

आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं ,

की...

विश्वातून शून्य.... ?????

Address

कळंबी, पो. ढवळेश्वर, ता. खानापूर (विटा) , जि. सांगली
Vita
415311

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalambi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share