Nima Pathardi

Nima Pathardi nima pathardi

https://youtu.be/HkUNwctDMq8?si=8Fg5dM5eEn7Sc8K0
22/08/2026

https://youtu.be/HkUNwctDMq8?si=8Fg5dM5eEn7Sc8K0

पाथर्डी निमा शाखेच्या बैठकीत नवनिर्वाचित नगरसेवक डॉक्टरांचा सन्मान ...

डॉक्टरांचे सर्व प्रश्न कायदेशीर चौकटीत राहून सोडविणारी निमा ही आयुर्वेद,युनानी व सिद्ध डॉक्टरांची एकमेव संघटना- डॉ.प्रता...
20/08/2026

डॉक्टरांचे सर्व प्रश्न कायदेशीर चौकटीत राहून सोडविणारी निमा ही आयुर्वेद,युनानी व सिद्ध डॉक्टरांची एकमेव संघटना- डॉ.प्रताप सोमवंशी

पाथर्डी प्रतिनिधी - नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन ( निमा ) पाथर्डी शाखेचे सभासद डॉ.सौ.शारदा गर्जे व डॉ.जगदीश मुने यांचा पाथर्डी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवकपदी निवड झाल्याच्या निमित्ताने संघटनेच्या वार्षिक बैठकीत सन्मान करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पाथर्डी निमाचे अध्यक्ष डॉ.श्रीधर देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणुन सेंट्रल निमाचे प्रवक्ते व पिंपरी चिंचवड निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ.प्रताप सोमवंशी,पाथर्डी नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे हे उपस्थित होते.
डॉ.प्रताप सोमवंशी यांनी निमा संघटनेचे योगदान,प्रत्येक सभासदासाठी आवश्यक कायदेशीर बाबी,शासनाचे नियम,जी.आर. याबाबतीत मार्गदर्शन केले.तसेच
सभासद डॉक्टरांच्या हिताचे रक्षण करणारी,प्रत्येक प्रसंगात डॉक्टरांच्या पाठिशी स्थानिक ते राष्ट्रीय स्तरापर्यंत उभी राहणारी,डॉक्टरांचे सर्व प्रश्न कायदेशीर चौकटीत राहून सोडविणारी निमा ही आयुर्वेद,युनानी व सिद्ध डॉक्टरांची एकमेव संघटना असल्याचे प्रतिपादन डॉ.प्रताप सोमवंशी यांनी केले.
सदर कार्यक्रम श्री.धन्वंतरी योग व फर्टिलीटी सेंटर याठिकाणी घेण्यात आला.धन्वंतरी पूजनाने प्रारंभ झालेल्या
कार्यक्रमाचे प्रास्तविक संघटनेचे सचिव डॉ.सचिन गांधी,स्वागत निमा राज्य प्रतिनिधी डॉ.सुहास उरणकर तर आभार डॉ.अभय भंडारी यांनी मानले.डॉ.रणजीत वाघ,डॉ.दिगंबर भराट,डॉ.अमोल कोतकर,डॉ.सुनील फुंदे,डॉ.दिपक देशमुख,डॉ.सचिन मंत्री,डॉ.सतीश शेळके,डॉ.अमोल शिरसाठ,डॉ.योगेश वाघचौरे, डॉ.अमोल आव्हाड,डॉ.सागर भापकर,डॉ.राजेश धाकतोडे आदी डॉक्टर यावेळी उपस्थित होते.

डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रूग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हिंसक घटनेबाबत पाथर्डी तालुका निमा व डॉक्टर असोसिए...
20/07/2026

डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रूग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हिंसक घटनेबाबत पाथर्डी तालुका निमा व डॉक्टर असोसिएशन तर्फे निषेध

पाथर्डी प्रतिनिधी - डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रूग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हिंसक घटनेबाबत नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन (NIIMA) पाथर्डी निमा व पाथर्डी तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने निषेध करण्यात आला.

1) शास्त्रीनगर महापालिकेतील रुग्णालयात झालेल्या प्रकरणी आरोपींवर तातडीने निष्पक्ष कारवाई करण्यात यावी. राजकीय पाठबळ, हस्तक्षेप किंवा दोषीच्या संरक्षण देण्याचा कोणताही प्रयत्न त्वरेने थांबवावा. राजकीय पदांवर असलेल्या व्यक्तींचा अशा क्रूर हत्त्यांमध्ये सहभाग लोकशाहीची मूल्ये आणि नागरिकांच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला तडा देण्याची बाब आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करून पिडीतांना त्वरित न्याय मिळावा.
2) राज्यशासनाने केलेल्या महाराष्ट्र मेडिकल सेवा व्यक्ती व मेडिकेयर सेवा संस्था हिंसाचार व मालमत्ता आणि प्रतिबंधक अधिनियम 2010 मध्ये तात्काळ प्रभावी सुधारणा करून त्याचा प्रत्यक्ष वापर व्हावा.
3) अश्याप्रकारच्या घटनेत एफआयआर नोंदणी, गंभीर हल्ले व शस्त्रांच्या वापरासंदर्भातील गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र करणे 30 किंवा 60 दिवसात तपास पूर्ण करणे, जलदगती न्यायालयात खटल्यांचा निकाल करणे व
नुकसान भरपाई वसूलीची प्रभावी तरतूद समाविष्ट करण्यात यावी
4) आरोग्यासंस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप, धमक्या, दडपशाही, दहशतीचे वातावरण यास तात्काळ प्रतिबंध घालण्यात यावा. रुग्णालये,दवाखाने ही उपचाराची स्थळे असून तेथे कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव, बेकायदेशीर हस्तक्षेप तथा गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही यासाठी शासनाद्वारे प्रभावी यंत्रणा उभारण्यात यावी.
५) तसेच सर्व डॉक्टर्स,परिचारिका, आरोग्यकर्मचारी,आरोग्यसेवक या सर्वांना सुरक्षित,सन्मानजनक व निर्भय वातावरणात आपल्या सेवा देण्यासाठी समाज ,प्रशासन व कायदेशीर बाबी अनुकूल बनवाव्यात..
आदी मागण्या पाथर्डी निमा व डॉक्टर्स असोसिएशने सदर निवेदनात केल्या आहेत.सदर निवेदन प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी स्वीकारले.यावेळी तहसीलदार उद्धव नाईक,पाथर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे
उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सचिन दरंदले,ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ.विलास बाहेती,मा.नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे,मा.नगरसेवक डॉ.दीपक देशमुख,डॉ.अभय भंडारी,डॉ.सुहास उरणकर,पाथर्डी निमाचे अध्यक्ष डॉ.श्रीधर देशमुख,डॉ.रणजित वाघ,डॉ.आरती जायभाये,डॉ.ज्योती देशमुख,डॉ.अंबिका वाघचौरे,डॉ.सुरेखा लोखंडे,नगरसेवक डॉ.जगदीश मुने,डॉ.भाऊसाहेब लांडे,डॉ.शिरीष जोशी,डॉ.सचिन खेडकर,डॉ.सागर भापकर,डॉ.संदीप पवार,डॉ.प्रमोद सुपेकर,डॉ.बाळकृष्ण जवरे,डॉ.ओंकार दातीर आदी पाथर्डीतील सर्वच डॉक्टरांची उपस्थिती होती.

#डॉ_श्रीधर_मधुकर_देशमुख

Address

Shri Dhanwantari Yog & Fertility Centre Pathardi
Pathardi
414102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nima Pathardi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share